युद्ध....... खलिल जिब्रान
राजवाड्यात जंगी मेजवानी चालू होती, तेव्हा एक माणूस तिथे घाईघाईने आला आणि त्याने राजपुत्राला लवून मुजरा केला. सगळे पाहुणे त्याच्याकडे टकामका पाहू लागले कारण त्याचा एक डोळा निखळला होता, रिकाम्या खोबणीतून रक्त ठिबकत होते.
राजपुत्राने त्याला विचारले, ‘ही आपत्ती तुझ्यावर कशी काय कोसळली?’
त्यावर तो सांगू लागला, ‘ हे राजपुत्रा, मी व्यवसायाने चोर आहे. आज अमावस्या! आकाशात चंद्र नव्हता म्हणून मी चोरी करण्यासाठी एका दलालाच्या घरात घुसायचे ठरवले. पण अंधारात चूक झाली. दलालाच्या घराऐवजी मी विणकराच्या घरात शिरलो. अंधारात उडी मारताना तिथल्या हातमागाला माझा धक्का लागला आणि माझा डोळा निखळून पडला. हे राजपुत्रा, मला तुझ्या कडून योग्य न्याय हवा. त्या विणकराला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि माझी नुकसानभरपाई पण मिळाली पाहिजे.’
राजपुत्राने लगेच विणकराला बोलवून घेतले. तो येताच, त्याचा एक डोळा काढण्याची आज्ञा दिली. ते ऐकून विणकर न डगमगता, आत्मविश्वासाने म्हणाला, ‘ राजपुत्रा, तू दिलेला निर्णय योग्यच आहे. माझा एक डोळा काढून घ्यायला काहीच हरकत नाही. पण माझी एक अडचण आहे! हातमागावर विणून तयार झालेले कापड दोन्ही बाजूंनी बघण्यासाठी मला दोन्ही डोळ्यांची गरज भासते.... हो, पण यावर एक उपाय आहे!’
‘तो कोणता?,’ राजपुत्राने विचारले.
‘माझ्या शेजारी एक कुंभार राहतो. त्यालाही दोन डोळे आहेत. पण मला माहितीय, त्याच्या व्यवसायात त्याला दोन डोळ्यांची गरज नाही पडत!’
राजपुत्राने लगोलग त्या कुंभाराला बोलावून घेतले. तो येताच, त्याचा एक डोळा काढून घेण्यात आला.
---------- मग उच्चासनावरील न्यायदेवता समाधानाने हसली.
खलिल जिब्रानच्या 'War' या रूपककथेचा भावानुवाद.
Book traversal links for युद्ध....... खलिल जिब्रान
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हि कथा काय डोक्यात गेली नाही
हातमागाला धक्का लागला आणि
रूपक कथांचा काढू तसा अर्थ
+१
कुंभार , त्यालाही दोन्ही
सगळीकडेच युद्ध आणि मरणारे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान...
ज्याच्या हातात सत्ता /
अॅप्ट!
लहरी राजा, प्रजा आंधळी,
अपघाताच्या वेळी सुपर स्टारचा
बरोबर विवेक पटाईत.....
झणझणीत अंजन! सुरेख!