Skip to main content

पंक्चरवाल्यांची चालुगिरी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 08/10/2014 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल. प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १० ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले.मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो.पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले.म्हणजे किमन १२० रुपयाला फटका.त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.गप्पा मारता मारता "गाडी कितना साल हुवा?" (प्रत्येक टायरवाला हा प्रश्न विचारतोच्..त्याचे कारण माहीत नाही.) वगैरे विचारतानाच त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले..त्यातला मोठा (आणि जास्त किंमतीचा) गळ्यात मारला. असे करुन ४२० रुपये उकळले (मला ४२० बनवले). रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचलो. प्रसंग २-स्थळ-वाकडेवाडी वेळ-दुपारी १२ तपशील थोड्या फरकाने सेम. ६०० रुपयाला फटका. एकदोनदा मी फक्त ट्युबचे पक्चर काढुन घेतले..पण टायरला पॅच मारला नाही...दोन दिवसात पुन्हा पंक्चर होउन डबल खर्च झाला. काही प्रश्न--- पेट्रोल पंप वाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात? टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का?की ती एक बिझनेस ट्रिक आहे? टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच हिंजवडीला २५० चे का होते? चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते? रस्त्यात एव्हढे खिळे/चुका कुठुन येतात? तुम्ही या प्रसंगात कसे वागता? या लोकांकडुन न फसण्यासाठी काही टिप्स मिळतील का?

वाचने 26026
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..! असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?

In reply to by पिलीयन रायडर

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'( ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता.. माहितीसाठी धन्यवाद!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2
असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)

"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही. त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..? या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..? हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.

In reply to by मोदक

कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही. शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एकुलता एकच असायचो मी :D शाळा, कॉलेजमध्ये अनिरुद्ध नावाचे फार कमी लोक्स :) जरूर करूयात कट्टा!

In reply to by मोदक

मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे. एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत. नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इत्ता दुर तक ढकले ?? सही मे ज्यादा पी थी लगती मिंया तुमने... सन्नी देओल बन गये यारों... :)

In reply to by मोदक

"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.
@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते. इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं) याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.

In reply to by गवि

गवि साहेब माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात. http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या मागचे शास्त्र काही समजवून सांगता का? माझ्या मते हा भोंदू पणा असावा. आणि ८०-१०० रुपये नायट्रोजन भरण्यासाठी म्हणजे दरोडा घालणेच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एवढे नाही हो घेत पैसे. बाईक साठी वीस रुपये-तीस रुपये जास्तीत जास्त. तसं पहायला गेलं तर आपण जी हवा श्वासोच्छावासासाठी वापरतो तिच्यामधे नायट्रोजनचे प्रमाण साधारण ७४% एवढं असतं. नेमका शास्त्रोक्तपणे मी तुम्हाला सांगु शकणार नाही पण अनुभव म्हणुन सांगतो. नायट्रोजनमुळे लाँग ड्राईव्ह मधे टायर गरम व्हायचं प्रमाण खुपचं कमी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एक्सप्रेसवेवरच्या पंपावर नायट्रोजन फिलिंगसाठी कार टायरसाठी ७५ ते १०० रुपये दर पाहिला आहे. शिवाय त्यासाठी आधीची पूर्ण हवा काढून टाकावी लागत असल्याने ते वेळखाऊ प्रकरण आहे.

In reply to by गवि

एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. पिंपरी चिंचवडमधे असाल तर लिंक रोडवरच्या पेट्रोल पंपावर सर्टिफाईड नायट्रोजन फिलिंग स्टेशन आहे. मी गेल्या वेळेला भरला होता तो ३० रुपयात दोन्ही चाकांसाठी भरला होता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खालील लिंकवर नायट्रोजन फिलिंगबद्दल प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतीलः http://www.racq.com.au/cars-and-driving/cars/owning-and-maintaining-a-c…

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लॉजिक्/शास्त्रीय कारण माहिती नाही. पण मलापण हाच अनुभव आहे. युनिकॉर्नमध्ये ४ वर्षांपुर्वी दोन्ही टायरांमध्ये नायट्रोजन भरला होता उत्सुकतेपोटी.(मार्केट्यार्ड-गंगाधाम चौक-सिरवी समोर) झॅपर टायर आहेत. आईबाबा-अन-साईबाबाची शप्पथ, अजून पंच्चर नाय अन् हवा पन नाही भरली कधी . देव त्या नायट्रोजनचं/माझ्या युनिकॉर्नचं/तिच्या झॅपर टायरचं भलं करो!

In reply to by तुषार काळभोर

वरचा पैलवानांचा प्रतिसाद त्यांनी स्वतः संपादित केल्यामुळे आमचासुध्धा स्वसंपादनाचा हक्क बजावत आहोत :) खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)

In reply to by प्रसाद१९७१

नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे आहेत. पण ते नगण्य आहेत. त्यामुळे जास्त खर्च करुन तो भरणे इज नॉट वर्थ इट. तातडीने संदर्भ देणं शक्य नसलं तरी ढोबळपणे सांगायचं तरः लिस्टेड फायदा-शुद्ध नायट्रोजनचे रेणू ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा मोठे असल्याने टायर प्रेशर लॉस हवेपेक्षा कमी वेगाने होतो. त्यामुळे कमी दाब झाल्याचा दुष्परिणाम (फ्युएल इकॉनॉमी कमी होणे) टळतो. टिप्पणी: शुद्ध नायट्रोजनचाही लॉस होतोच. तो सदासर्वकाळ टायरमधे टिकत नाहीच. हा टायरमधून होणारा नायट्रोजन लॉस आणि एअर लॉस यांतला फरक इतका कमी आहे की ३-४ आठवड्यातून एकदा जरी साधी हवा चेक करुन भरली तरी तो ऑफसेट होतो. तीन आठवडे ते एक महिन्यात एकदा तपासल्याने हवा योग्य प्रेशरमधे राहिली की फ्युएल इकॉनॉमीत काहीच फरक पडत नाही. तस्मात नायट्रोजन हे फ्युएल इकॉनॉमीचं कारण नसून वेळेत हवा न भरणार्‍यांना आठवडाभर जास्त हवा टिकण्याचा फायदा नायट्रोजनमुळे मिळतो इतकंच. -लिस्टेड फायदा: शुद्ध नायट्रोजन भरल्यावर टायर प्रेशरचे चढउतार हवेपेक्षा कमी असतात. टिप्पणी: होय. हवेत बाष्प असतं. ते हवेसोबत कॉम्प्रेसरमधे जाऊन साठतं. ते कॉम्प्रेसरच्या आत किंवा टायरच्या आत कंडेन्स झालेल्या (पाणी) अवस्थेत राहतं. टायर गाडी चालताना गरम झाला की त्याची वाफ होऊन टायर प्रेशर वाढतं. टायर थंड झाला की प्रेशर ड्रॉप होतं. शुद्ध नायट्रोजन कोरडा केलेला असल्याने त्यात हे घडत नाही. .....पण हे फ्लक्चुएशनही एकदम नगण्य असतं त्यासाठी १०० १५० रुपये देऊन नायट्रोजन भरल्याने काही खास फरक पडत नाही. अगदी मोजता सुद्धा न येण्यासारखा सूक्ष्म फरक असतो. थोडक्यात तात्विक आणि फिजिक्सच्या दृष्टीने शुद्ध नायट्रोजन (९५%हून जास्त) व्हर्सेस ७८% नायट्रोजन (हवा) यांच्यात फरक आहे, पण तो फ्युएल इकॉनॉमी, तापमान, स्थिरता वगैरे बाबतीत इतका सूक्ष्म फरक पाडतो की त्यासाठी वास्तविक फार फार तर पाचदहा रुपये जादा मोजण्यापेक्षा जास्त अर्थ नाही.

बरेच पिडीत पुण्याचे दिसतात, :) यानिमित्याने जरा चांगले व बेक्कार पंक्चरवाले पण सांगा राव, कधीतरी लागतीलच.. माझ्या काळ्या लिस्टीत.. :- १) हिंजेवाडीतुन जगताप डेयरीकडे जातांना नविन बीआरटीच्या टर्निंगच्या अलिकडचा (विरुध्द दिशेला फर्निचरचे दुकान आहे) - १५ पंक्चर रेकार्ड.. :( २) हिंजेवाडीतुन डांगे चौकाकडे जातांना भुमकर अंडरब्रिज पासुन १०० मी वर. (बाजुला झोपडपट्टी व जिम आहे). - ०९ पंक्चर रेकार्ड.. :( माझ्या पांढ-या लिस्टीत.. :- १) पिंपरीवरून पिंपळे सौदागर कडे येतांना ब्रिजच्या अलिकडे (विरुध्द दिशेला काचेचे दुकान आहे).. रेट ५०-६० रु. फक्त व नो हातचलाखी.. दोन वेळा टायर काढुन काही नाही म्हणुन परत लावलाय.. :) एव्हड्या कमी विदा वर अंदाज लावणे तसे चुकीचे आहे.. पण मग बघा तुम्ही जाऊन.. :))

In reply to by ब़जरबट्टू

जगताप डेअरीतील हिंदी भाषीक पंक्चरवाल्यां बाबतीत सहमत, इतरांबद्दल अनुभव नाही.

वारज्याला सीएनजी पंपाच्या पुढे (कात्रजच्या दिशेने) लगेचच एक युपीवाला पानखाऊ हवा/पंक्चरवाला आहे. सकाळी सकाळी त्याला हवा भरायला सांगितली तर एक चाक पंच्कर आहे म्हणाला. म्हटलं हवा भर गुपचुप, तर हवा बसत नाही म्हणाला. मग म्हटलं आता भरतोस का मोरं बोलवू मनसेची ? तर लगेच हवा गेली ट्यूबमधे.

चांगला धागा माझे अनुभव (ट्युब लेस ) २०११ मधला नवी पेठेतील पंपावर इंधन भरुन झाले आणि हवा चेक करताना त्याणे सांगितले की पुढच्या डाव्या चाकात पंक्चर आहे.पण ते काढायाची सोय नाही. म्हणून शेजारच्याच गल्लीत पंक्चर काढायला सांगितले त्याने चौदा पंक्चर काढली. १०० रू प्रमणे १४०० अधिक वाल्व चे २०० असे १६०० रू बांबू. मी धायरीत राहतो. धायरीत आल्यावर (सुमारे १२ किमि) गाडी परत डगमगू लागली परत दुसरा पंक्चर वाला म्हणाला की पंक्चर आहे. फकत हवा भरून घरी गेलो. नंतर टिळक रोड वरच्या मेहता टायर ची चौकशी केली आणि नवा टायर बसवला (रू २८०० बिज्स्टोन)) काही गोष्टी समजल्या
  1. लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
  2. वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
  3. ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
  4. असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)
  • टायरची कालजी घ्या प्रत्येक ४०० किमि रनींग नंतर हवा चेक करा
  • मॅन्युल मध्ये हवा स्टॅडर्ड (वॅगनर ३३ किलो) तेवढिच भरा.
  • अनोळख्या ठिकाणी फकत हवा भरा किंवा फार तर स्पेयर बदलून घ्या
  • १०००० किनि नंतर टायर सायकल करा (मागचा डावा टायर पुढे उजवा आणि उलट) मेहता/ कुलकर्णी वैगेरे ठिकाणी ते गाइड करतात.
  • नायट्रोजन चा जरूर वापर कर्र त्याचा नक्कीच उपयोग होतो.
  • ४०,०००/५०,००० रनीम्ग नंतर चक्क चारी टायर बदलून टाका (सध्या रू.१२०००)

औधच्या आंबेडकर चौकातला. रात्री राजगडला निघालो ट्रेकला. हवा चेक केली तर पंचर सांगतोय. मला खात्री होती कि पंचर नसावे, फक्त हवा भरली. मी पार जाउन परत आलो तरी हवा निट. या हरामखोरांना बडवायला पाहीजे.

मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन १ महिना झालेल्या टायरमधे बघून मी पंक्चरवाल्यावर चिडलो होतो. मी म्हटले काहीही असले तरी तूच काहीतरी गडबड केली हे नक्की. त्याने मला म्हटले, साहेब, तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून तुमच्या हाताने फक्त एकच पंक्चर ह्या टायरमधे करून दाखवा मी सगळे पंक्चर फुकट काढून देइन. मी खरंच खीळा, त्याच्याकडच्या दोन-तीन अणुकुचीदार वस्तू घेऊन प्रयत्न करून पाहिला पण काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला की गाडीच्या वजनाएवढं (२५० ते ५०० किलो एका टायरवर) वजन वापरून तुम्ही खिळा आत रुतवू शकलात तरच पंक्चर शक्य आहे. मानवी हातांना हे शक्य नाही. हे चारचाकीबद्दल आहे, पण वर सगळ्यांचे दुचाकीचे अनुभव आहेत तरी निमिषार्धात एखादयाला ७-८ पंक्चर करता यावे असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे. कुणाला काही गूढ उकलता येइल का? साइडवॉलच्या पंक्चरबद्दलपण असेच गूढ आहे.

In reply to by संदीप डांगे

अहो, ते ट्युब बाहेर काढताना/काढल्यावर केली जाणार्‍या हातचलाखीबद्दल चाललंय. ते लोक टायरला नाही तर ट्युबला भोकं पाडतात.

In reply to by तुषार काळभोर

वोके वोके. माय मिष्टेक... म्ह्णजे ट्युबलेस टायर एक वरदान आहे अश्या चालुगिरी विरोधात. ट्युबलेस टायरच्या आतल्या बाजुला सीलंट लावल्यास टायरचं आयुष्य वाढू शकतं. अधिक माहिती इथे तरी नुसतं हवा भरत असतांना ट्युबमधे पंक्चर सांगणारा महान अंतर्यामी असला पाहिजे. :-)

मग काय ठरलं? मी काय करायचय नक्की? ट्युबलेस? अ‍ॅन्टी पंक्चर जेल? नायट्रोजन भरणे? गाडी ८ दिवस नुसती लावुन ठेवली आहे, बाहेर काढायची हिम्मत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

ट्युबलेस टायर उत्तम पर्याय आहे ... अ‍ॅन्टी पंक्चर जेलची जास्त गरज नै...हवा भरताना आपण फक्त बाजूला जाउन उभे रहायचे आणि हवा भरताना भरणार्याच्या हातात एखादी धातुची वस्तु नाहीना याची खात्री करायची

मी हवा नेहमी पेट्रोल पंपावरच भरून घेतो. पंक्चर काढणे/हवा भरणे हा जोडधंदा असलेल्यांकडून कधीही हवा भरून घेऊ नये.

योग्य सुचना. मी लगेच अंमलबजावनी सुरु केली आहे.

In reply to by खंडेराव

सुनीलरावांशी सहमत... टाकीत पेट्रोल भरल्यावर चकटफु यंत्राद्वारे टायरमधे हवा भरुन घेतो, मागचे टायर ट्युबलेस टाकुन घेतले आहे. जेल बाबतीत विचार करायला हवा ! कोणाला बाईकसाठीच्या टायर जेलचा अनुभव आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

In reply to by मदनबाण

गेल्या वर्षी आम्ही ७ मित्र मोटरसायकलवर लेहची वारी करून आलो. जाताना प्रत्येक गाडीत (रु १५०० प्रत्येक गाडीसाठी अशा किमतीचे) पंक्चर सीलंट टाकले. पण उपयोग शुन्य! आमच्या ग्रुपमधल्या एका बुलेटचे मागचे चाक चक्क गुळ्गुळीत डांबरी रस्त्यावर पंक्चर झाले (खिळ्यामुळे). पंक्चर सीलंट छानपैकी बाहेर येऊन वेडावून दाखवत होते. तशी लोडेड बुलेट स्टअँडवर लावतानाच घाम फुटला. मग चाक काढणे, पुढील गावात नेणे, पंक्चर काढून आणल्यावर परत गाडीला चाक लावणे ई. सोपस्कार पार पाडले. त्यात ३ तास फु़कट गेले. तस्मात, कुठेही मिळणारे स्वस्तातले सीलंट म्हणजे कुचकामीच ! (फक्त स्लाईम नावाचे परदेशी सीलंट खरच पंक्चर सील करते असा मित्रांचा अनुभव आहे. पण ते खूप महाग असते आणि पुण्यात सहजी मिळत नाही.) त्यामुळे ट्युबलेस टायर आणि पंक्चर रिपेयर किट (व हवा भरायचा पंप) हाच उत्तम उपाय आहे.

In reply to by ऋष्या

ओह्ह... चला तर सीलंट निदान बाईकसाठी तितके लाभकारक दिसत नाहीये तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }