नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं...
आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं...
यमक जुळतं का बघावं म्हटलं...
तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी

सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते
एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच
होईल बहुदा पानिपत, उडेल बहुदा धुरळा
आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच
विडंबनी धागा निघेल, हसण्यावारी जाईल ती
दु:ख कसले त्याचे जी गोष्ट आहे घडायचीच
उगीच शस्त्र काढणे नाही उगीच कुणा डिवचणे
झालीच तरी लढाई तर अपूर्व ती लढायचीच
- अपूर्व ओक (२७-३-१५)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
22030
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोड्डरस
गोड्डरस
आग्रह करून तरीसुद्धा
मधुमेह असलेल्याना वेगळी जिलेबी ?
ओके, कधीपासून होतयं असं?
ओके, कधीपासून होतयं असं?
@ ओके, कधीपासून होतयं असं?>>
In reply to ओके, कधीपासून होतयं असं? by स्पा
@ ओके, कधीपासून होतयं असं?>> =)) तुझ्यासारखि हलकट माणसं चावायला लागली, तेंव्हापासून! =))
...
बाकी वेल ल्ला भटा,चांगली पडली जिलबी .. पटा पटा! :-D
आमचीबी यक...
आमचीबी यक...
एक तरी जिल्बी पाडु द्या कि रं
मला बी बोर्डाव येउ द्या की
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य
या पहिल्या वाक्यालाच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि फेटे. =))
+१००
In reply to नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य by अन्या दातार
+१००
त्या फोटोत
त्या फोटोत जिलब्यांच्या मागे मठ्ठा ठेवला आहे की रबडी ? आम्हाला काहीही असलं तरी चालेल, पण त्यांतल्या त्यांत रबडी असेल तर फारच मजा येईल!
सुंदर
सुंदर
चविष्ट
चविष्ट झाली आहे ही जिलबी...
जिलबी फक्क्डशान पडलीय पर
जिलबी फक्क्डशान पडलीय पर मट्ठा पण द्या की वाईच.
+१
गु रु जी
रू मा ल
जी ल बी
:)
In reply to +१ by नाखु
:)
क्या बात!
In reply to +१ by नाखु
क्या बात!
जिलबी आवडली!
जिलबी आवडली!
धन्यवाद सगळ्यांचे ! :)
धन्यवाद सगळ्यांचे ! :)
गोड मानून घेतल्याबद्दल. :)
एकदा नागपुरात जलेबी दह्या
एकदा नागपुरात जलेबी दह्या सोबत खाल्ली होती. बाकी मी पाव वर जलेबी सर्वात आवडता पदार्थ आहेच.
रसदार.
रसदार.
जमलाय घाणा. आता मठ्ठा पण पाड.
जमलाय घाणा. आता मठ्ठा पण पाड. :)
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
In reply to दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. by वेल्लाभट
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
मग मते मिळ्तील मिपाकरांची...एक गठ्ठा ;)
--------
तांब्या पास केलाय.. पाडा रे पुढे.. =))
तांब्या पास केलाय.
In reply to दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. by अत्रुप्त आत्मा
चला. म्हणजे तांब्या अजून तुमच्याकडेच आहे हे मान्य केलेत शेवटी तर =))
@हे मान्य केलेत शेवटी तर =))>
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
@हे मान्य केलेत शेवटी तर =))>>> असोच्च!
ठ्ठो =))
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
ठ्ठो =))
>>चला. म्हणजे तांब्या अजून
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
=))))
एकच नंबर!!
तांब्याविण गुर्जी म्हणजे
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी
मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी
;) =))
ह घ्या
=))
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
अगायायायायायायायायायायायायाया
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगायायायायायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =)) =))
टोर्टूगातला खास प्रथमधारीय सोमरस प्राशुनी कविता पाडली काय हो? लयच भारी. _/\_
नाही रे. प्रथमधारेची फक्त आणि
In reply to अगायायायायायायायायायायायायाया by बॅटमॅन
नाही रे. प्रथमधारेची फक्त आणि फक्त काफी घेतो... =))
@तांब्याविण गुर्जी म्हणजे
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
@तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी
मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी>>>
तांब्या माझाची आहे,कधी ठेवितो तयासी दूर
परि अंतर्मनी तो रुजला,काढितो कधी तो धूर
बाटलीवर बाटली प्रतिभा आटली..
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाटलीवर बाटली प्रतिभा आटली..
आमच्या गुर्जींचं नाव घ्यायला लाज नै वाटली ..?
=)) खतरा
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
=))
खतरा
खेळता रोजरोज विटीदांडू
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
खेळता रोजरोज विटीदांडू
गुर्जींचं नाव घेणारा कोण रे तो पांडू?
गुर्जींच्या तांब्याचा फार
In reply to खेळता रोजरोज विटीदांडू by बॅटमॅन
गुर्जींच्या तांब्याचा फार परिणाम होऊन देऊ नये. ;)
ताम्रयुग यू सी ;)
In reply to गुर्जींच्या तांब्याचा फार by सूड
ताम्रयुग यू सी ;)
हल कट शब्दछळू दू दू खाटुक
In reply to खेळता रोजरोज विटीदांडू by बॅटमॅन
हल कट शब्दछळू दू दू खाटुक
खरंखुरं वट वाघुळ..नाव त्याचं ब्याटुक!
ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं पण लिहलं तर गुर्जी मंत्र मारतील म्हणुन आवरतो =))
मला पण!! ;)
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला पण!! ;)
मलापण मलापण व्यनि!
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मलापण मलापण व्यनि!
मला पण व्यनी :)
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला पण व्यनी :)
दोन थेंब या दिशेला पण टाका =)
In reply to मला पण व्यनी :) by टवाळ कार्टा
दोन थेंब या दिशेला पण टाका =))
दो बूंद जिंदगीके =))
In reply to दोन थेंब या दिशेला पण टाका =) by जेपी
दो बूंद जिंदगीके =))
टाकलेत दोन शिंतोडे पाकाचे...
In reply to दो बूंद जिंदगीके =)) by टवाळ कार्टा
टाकलेत दोन शिंतोडे पाकाचे... =))
=))))
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))))
आमची ही जिलबी
तांब्याधारी जो जो त्यासी, विहीत नित्य कर्म
जिलब्या पाडणे हाची होई, आगळा न धर्म
रोज ताजे पीठ शोधणे, हाची एक नेम
अचरटांचा गोतावळा, सुखे करो काम
पैजारबुवा,
पाडा पाडा!
मला या विषयावर एकदा लै गंभीर काथ्या कुटायचा आहे! =))
कोणत्या विषयावर ? तांब्या की
In reply to पाडा पाडा! by पैसा
कोणत्या विषयावर ? तांब्या की जिलबी ?
अद्भुत जिलबी ! ;)
अद्भुत जिलबी ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
धाग्याच्या नावाप्रमाणे
धाग्याच्या नावाप्रमाणे अनेकांनी एक तरी जिलबी पाडायचीच असं ठरवलंय :)
आपणही लावा जोर....एखादी
In reply to धाग्याच्या नावाप्रमाणे by अन्या दातार
आपणही लावा जोर....एखादी पडेलही जिलबी =))
पन्नाशी गाठली बुवा एकदाची!
पन्नाशी गाठली बुवा एकदाची!
आपणा सर्वांचे लाडके
In reply to पन्नाशी गाठली बुवा एकदाची! by सूड
आपणा सर्वांचे लाडके संगीतप्रेमी, जिलबीप्रेमी श्री. वेल्लाभट ह्यांचा काका हलवाईकडच्या सुद्द साजुक तुपातल्या पावशेर जिलब्या, अर्धा ग्लास मठ्ठा व पुस्प्गुच् देउन करण्यात येत आहे.
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.वेल्लाभट आणी श्री.चिमणराव यांचा सत्कार एक एक तांब्या देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते
जेप्या...
सत्काराला येणे येताना किमान तांब्याची प्रतिकृती म्हणून मड़क आणू नये ! जिलबी कशीही अस्ली तरी माश्यांस़कट पुड्यात बांधू नये.
चिट्(कव)णीस
अखिलमिपाजिल्बीप्रतिसादक्आस्वादक्वाट्प केंद्र संचालीत शेंच्युरी/हाफशेंच्युरी सत्कार मंडळ