Skip to main content

<पुन्हा पुन्हा मी!!!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 19/11/2008 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा मी!!!> (श्री प्रवीण खेर्डेकर यांच्या "पुन्हा पुन्हा मी" या कवितेवरून प्रेरणा घेऊन.......) जीवनात नसेल टिकवले ब्रम्हचर्य आम्ही हात अधिक महत्वाच्या कामामध्ये व्यस्त आहे... असे उठसूठ बोंबा मारत जाऊ नका डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? बेवडे म्हणून जीवनभर आम्हाला हिणवता.... श्रीखंड पुढ्यात आलं की कोणाला बनवता? आम्ही असू "टल्ली", पण तुमच्यात संयम किती पक्का आहे? असे डोळे फाडून पाहू नका डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? तुम्हाला पोरगी पटत नाही, याचा दोष आमच्यावरच आश्रमात कितीही शिकवा, तुमचे घोडे आडवळणावरच.... असा अन्याय आमच्यावर करणं किती रास्त आहे? असे स्मायली टाकून सटकू नका डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? आमच्या नांवासारखे आयडी कितिकांनी घेतले आयडी कसले घेतले, ते तर धाडकन पडले.... आयच्यान् सांगा मिपाकरांनो! ही नक्कल काय इष्ट आहे? असे "काका" करून गंडवू नका अहो डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? X( ;) :P
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3938
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

ड्यांबीस व्हायचे म्हणजे काही चेष्टा नाही, असे अनुमान काढता येईल. -- (ड्यांबीस पुतण्या) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

झक्कास कविता रे डांबिसा.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हेच म्हणतो ! डांबिसखानाला परत मैदानात फुल्ल फॉर्ममधे आलेला पाहून धमाल येते आहे !

ऊन सावल्यांचा हा खेळ चालणारच एक दिवस कोरडा गेला तरी डांबिस पुन्हा बहरणारच गप्प बसायला तो काय भामटा आहे? डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? आपला, (डांबिसचा वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.

लैच्च भारी ... बाकी डांबिस होणं च्येष्टा नैच्चये .. च्यामारी .. ह्या काकाला कै कै कै कै सुचु र्‍हायलंय हल्ली .. :) चिवास रिगल रिचवून बसतो कायनु लिवायला .. आम्ही आमचा जुणा आयडी कडू आठवणींमुळे बदलला तरी अजुन आम्ही खविसगीरी सोडलेली नाही (डांबिसशिष्य) कुबड्या खविस

=)) मान गये काका!!!

ही चेष्टा नाय बर का. वेताळ =))

खरे आहे बाबा डांबिसा तुझे... मी ठरवले की आपण आता नाना डांबिस व्हायचे पण... नकोच ते! नाही जमणार आपल्याला ;) बरय आपले आपले नाना (चेंगट)

In reply to by अवलिया

काका, लय भारी ... माग गये आप को! >> मी ठरवले की आपण आता नाना डांबिस व्हायचे पण... नकोच ते! नाही जमणार आपल्याला Wink अहो चेंगट, नुसते स्मायली टाकून डांबिस नाही होणार तुम्ही. संदर्भः पिडा काकांची कविता ...

पिडांकाका भरधाव सुटलेत!! पळा पळा पळा... :D झक्कास लिवलंय राव! जियो!! मुमुक्षु

मस्त ! मजेदार :) -- लिखाळ.