Skip to main content

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 04/03/2015 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

वाचने 78197
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

In reply to by शैलेन्द्र

तुमच्या चित्राचा दुवा हा वापरल्यास वर ते दिसू शकेल. https://lh3.googleusercontent.com/-e_DVqx-w-0g/VQb-NKaPOhI/AAAAAAAACWk/… हा दुवा मिळवण्यासाठी मी तुम्ही वापरलेला दुवा ओपन केला अन चित्रावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएल केले.

पांढरशुभ्र हरिण स्पर्धेसाठी प्रवेशिका स्थळ : मिशिगन याआधी पांढरा वाघ उंदीर ऐकून माहित होते, पण प्रत्यक्षात पाहिले नव्हते हे हरिण पाहिल तेव्हा विश्वास ठेवावाच लागला. White Deer ============================================================== { स्पर्धेसाठी नसलेला आणखी एक फोटो - आणि हे त्यांच आईच्या वळणावर गेलेल गोंडस पिल्लू } White Deer Baby

image 1 image 2 image 3 प्राणी नेहमीचाच आहे पण जरा वेगळ्या पार्श्वभूमीवर टिपण्याचा प्रयत्न केलाय. स्पर्धेसाठी पहिलं छायाचित्र आहे, बाकी २ स्पर्धेसाठी नाही.

In reply to by Mrunalini

व्हिस्की तिच्या पिल्लांसकट आवडली आहे ग. कसली गोग्गोड आहे

In reply to by कपिलमुनी

बर्‍याच जणांनी भरपूर माऊ..माऊंचे फोटू टाकलेत. मी ही टाकलाय आधी. पण ह्या सापडलेल्या आणखि काहि (भारी..) माऊ टाकल्याशिवाय बरं वाटणार नाही.. म्हणून ह्या भारी पोझ मधल्या,अजुन काहि माऊ.. :) https://lh6.googleusercontent.com/-DF3fl2RjKdU/U6py-xsBPcI/AAAAAAAAC_E/w7pft-bOPkM/w434-h579-no/IMG_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7.jpg https://lh5.googleusercontent.com/-PfBIM-AYcyE/U6py67U8IXI/AAAAAAAAC-0/RIDPWHHqOEM/w434-h579-no/IMG_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AF.jpg https://lh6.googleusercontent.com/-eAq_57eUsqo/VP8gTWxr97I/AAAAAAAAG-o/oI9AzaX7nBQ/w800-h450-no/IMG_20140707_190757983.jpg https://lh4.googleusercontent.com/-QrnKPUNQTxs/U7qi8sfxNWI/AAAAAAAAEuI/pfMtircEmbI/w800-h450-no/IMG_20140707_190832583.jpg https://lh4.googleusercontent.com/85ZD2oaNzn4BT8-QRJeiZufHHlHwTy8ee1kxiUOvlko=w800-h450-no

तुमच्याकडची माउ पण मराठी सिरिअल्स पहाते???? देवा........................किती ती एकाग्रता ;)

In reply to by सविता००१

@तुमच्याकडची माउ पण मराठी सिरिअल्स पहाते????>> =)) ही माऊ आमच्या घरातली नाही, एका माझ्या पुरोहित मित्राच्या घरातला हा फोटो आहे. =)) @देवा........................किती ती एकाग्रता>> =)) गुण लागला,हो गुण. =))

संपादक मंडळ, मि.पा.वर मी नविनच असल्यामुळे "इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील" याचा नक्की अर्थ समजला नाहीये. तरी काही चूक झाली असल्यास तसे सांगा. चूक श.ति.ल. (asap) सुधारण्यात येईल. "या माणसाच्या माकडचेष्टा बघून माझीच मान खाली जाते." Laadghar_20141214_170940

मी काल अपलोड केलेली लिंक का दिसत नाहीये? पूर्वपरिक्षण मध्ये फोटो दिसत होता.

संपादक मंडळासाठी विनंती। काल मी लिंक अपलोड केली होती परंतु फ़ोटो दिसत नव्हता म्हणून आज परत पाठवित आहे. pic1