Skip to main content

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 04/03/2015 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

वाचने 78138
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

विशालदा, ये हुई ना बात.. मस्त. काय दिसतोय...

In reply to by मिनियन

सरडा पण छान आहे. आणखी एकाने बेडूक दिला आहे, मग सरडा का नको? चतुष्पाद प्राणी म्हटलंय ना, पृष्ठवंशीय नाही म्हटलेले! ;)

जरा विसावू या वळणावर a कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस एफ ४ १/८०० ११ एम एम आयएसओ २००

In reply to by वेल्लाभट

जबरदस्त रंगसंगती....दोन तीन वेळा परत परत बघून खात्री करून घेतली की हे हाताने रंगवलेलं चित्र तर नैये!!

यावेळी तीन नाही तर पाच किंवा सात नंबर काढावे असे संपादक मंडळाला नम्रपणे सुचवतो. च्यायला.... प्रत्येक नव्या फोटो बरोबर मनात धरुन ठेवलेले नंबर बदलत आहेत. पैजारबुवा,

प्रवेशिका, गुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......म्याँssssssवं!!!....हाय का आव्वाsssssssज??? https://lh4.googleusercontent.com/-UkBYm_38YMo/T7p8mbJbj3I/AAAAAAAABXI/vKDMOelydgk/w771-h579-no/Photo-0225.jpg

In reply to by नांदेडीअन

थ्री ईडीयट आवडले.

In reply to by नांदेडीअन

यांना थ्री इनोसंट्स म्हणायला हवं हो! किती क्यूट आहेत..

In reply to by शाहिर

ह्ही ह्ही ह्ही .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif म्हस भारीये! आमच्या साळतल्या इति हासा च्या बैं सारकं तोंड आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

In reply to by आनंदराव

तुम्ही गुगलफोटोवर ज्या अल्बममध्ये फोटो ठेवले आहेत ते बघण्याचे हक्क(अ‍ॅक्सेस परमिशन) "प्रायव्हेट" आहे. परमिशन "पब्लिक" केल्यास फोटो इतरांना पण दिसतील.

१. शेजारचीचं मांजर. Cat २. स्पर्धेसाठी नाही - तोरणा गडावरील उंच गवतात लपुन आमच्यावर पाळत ठेवणारा मित्र. पायथ्याशी दिसला, त्यानंतर पुर्ण गड चढेपर्यंत सोबत केली. Dog

In reply to by आनंदराव

नाय दिसत.... पूर्वी आपण ते इंदोरचे फोटो कसे टाकले होते..? तिथनं लिंक देऊन बघा...