आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला!
शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे.
अगदी पहिली फेरी हिंदी गाण्यांची होती. यात सर्वप्रथम गाणे सादर केले ते शमिका भिडे हिने व तिला सा ते नी या पट्टीत दोन्ही परिक्षकांनी ध दिला. मात्र नंतर प्रत्येकच स्पर्धकाला शंकरने आग्रह करुन दोन्ही परिक्षकांना नी देणे भाग पाडले. शमिका पहिली न येता नंतर आली असती तर तिलाही नी मिळाले असते असे आम्ही म्हणत असतानाच फेरी अखेर शंकर महादेवनने स्वतः उभे राहुन जाहिर केले की सुरुवातीला गाण्याचे परिक्षण, गुणांकन या विषयी त्याला काहीच माहित नसल्याने पहिल्या स्पर्धकावर अन्याय झाला आहे आणि त्याने परिक्षकांना शमिकाला देखिल दोन नी देण्याची विनंती केली.
शंकरने प्रत्येक बाल कलाकाराला गाणे संपल्यावर उठुन उभे राहत दाद दिली, दुसर्या फेरीत तर थेट मंचावर जात त्याने प्रत्येकाची गळाभेट घेतली. प्रत्येक गाण्यातले काय आवडले हे सांगत त्याने कुणाला 'पुन्हा एकदा' ची फर्माईश दिली, कुणाला एखादी आवडलेली जागा पुन्हा घ्यायला सांगितली तर कुणाच्या बरोबर तो स्वतः गायला.
पाहुणा परिक्षक असावा तर असा. घरी शिस्त लावायला आई वडील असतातच, पाहुण्याने केवळ घरातल्या मुलांचे कौतुक करायचे असते. तदवत या गुणी कलावंताने स्वतः ला विसरुन स्पर्धकांचे जे काही दणदणीत कौतुक केले ते खरोखरच उल्लेखनिय आहे. दुसर्याला नावे ठेवणे वा दुसर्याच्या चुका काढणे सोपे असते पण उमलत्या कलाकारांचा आत्मविश्वास वाढावा म्हणुन त्यांचे असे दिलखुलास कौतुक करणे फार क्वचितच कुणाला जमते.
वाचने
6912
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण जिंकलं?
महादेवनसा
चालायचंच
In reply to महादेवनसा by विसोबा खेचर
+१ सहमत आहे!
In reply to चालायचंच by आजानुकर्ण
क्या बात है !!!!!!
In reply to +१ सहमत आहे! by चतुरंग
ह्यात गंमत काही नाही सर्किट!
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सहमत आहे
In reply to ह्यात गंमत काही नाही सर्किट! by चतुरंग
वा वा वा !
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
चालायचेच
In reply to वा वा वा ! by विसोबा खेचर
मुलं-मुली
In reply to +१ सहमत आहे! by चतुरंग
ही मुलं
In reply to चालायचंच by आजानुकर्ण
ह्या
गालावरचा तीळ
In reply to ह्या by कपिल काळे
हा तीळ नव्हे
In reply to गालावरचा तीळ by बेसनलाडू
हाहाहा
पल्लवीचं
असेच म्हणतो
In reply to पल्लवीचं by भाग्यश्री
सवाईगंधर्व
शंकर
मराठी माणुस तुम्ही अगदी मनातले बोललात.
यु ट्यूब..
बातमी
सारेगमपधनीसा हे सप्तक संपल्यानंतर त्याहीपुढे जावून तारसप्तकात येणारा पुढचा ग म्हणजेच सारेगमपधनीसारेग यातील ग द्यावा, एवढं तू अप्रतिम गायलास... मी तुझा आभारी आहे. प्रथमेश म्हणजे गणपती आणि आता तू गायल्यानंतर मी त्या ठिकाणी येऊन गाणे गायचे म्हणजे गणपतीचाच अपमान असेल... अशा शब्दांत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी झी मराठीवरील आयडीया सारेगम लिटिल चॅम्प्समधील प्रसिद्ध `मोदक' अर्थात प्रथमेश लघाटे याचे कौतूक केले. एवढेच नव्हे तर सर्वच्या सर्व सहा लिटिल चॅम्प्सचे त्यांनी `महान' या एकाच शब्दात वर्णन केले!
येत्या मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होणाऱ्या या भागाचे चित्रिकरण काल महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओमध्ये पार पडले. या भागातील आकर्षण ठरला तो कोकणातील रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावचा प्रथमेश लघाटे. आÆलबागची मुग्धा वैशंपायन आणि रत्नागिरीची शमिका भिडे हेदेखील या भागाचे आकर्षण होते. या सर्व लिटील चॅम्प्समध्ये प्रत्येकाचे वेगळे वर्णन करणे शक्य नाही. गुलाबाचा ताटवा पाहताना जो आनंद होतो, तसाच आनंद या मुलांचे गाणे ऐकताना होतो, अशा शब्दात पंडितजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाटयसंगीत गाण्यासाठी सर्वत्र कौतूक होत असलेल्या प्रथमेश लघाटे याचे त्यांनी विशेष कौतूक केले. लतादीदींना भेटण्यासाठी लिटिलचॅम्प्स त्यांच्या घरी गेले होते, त्यावेळेस देखील दीदींनी प्रथमेशकडे पाहून नाटयसंगीत गाणारा तो तूच का? अशी विचारणा करत त्याच्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली होती. सारेगमच्या आजवरच्या अनेक भागांमध्ये प्रथमेशवर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. आजवर अनेकदा विक्रमी `नी' मिळविणारा म्हणूनही त्याचे कौतूक अनेकदा झाले आहे.
पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने व त्यांनी रंगवलेल्या गप्पांच्या मैफलीमुळे सारेगमचा हा भाग आÆतशय आÆवस्मरणीय ठरला. गळ्यात गाणे येणे ही ईश्वराची देणगी आहे. त्यामुळे प्रत्येक सूर हा तोलून लावण्याची प्रगल्भता तुमच्यात यायला हवी, असा वडीलकीचा सल्ला पंडीतजींनी या मुलांना दिला. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आरती प्रभू व सुरेश भट यांच्या आठवणी जागवल्या आणि अनेक गमतीदार किस्से सांगितले.
मी कालच हा