मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता- मेसेज...

प्रितम तोरवने · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मेसेज किती दिवस झाले तुझा काही मेसेज नाही, मला आहे माहीती तुझा मेसेजपेक अजून संपलेला नाही जरी तुझा मेसेजपेक संपलेला असायचा , तरी दुसऱ्याच्या मोबाईल वरून का असेना तुझा मेसेज यायचा , जेव्हा हि वाजते मेसेज ची ringtone , तुझाच मेसेज असावा म्हणून लगेचच चेच्क करतो मी माझा cellphone. काही चुकले का माझे कि नवीन मित्र झाले तुझे सांग ना काय आहे माझा गुन्हा , मी तर मित्र तुझा जुना ……. -कवि -प्रितम दादाजी तोरवणे साक्री ता. साक्री ,जिल्हा -धुळे

वाचने 4107 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by इनिगोय

स्पंदना 17/03/2015 - 06:00
अरे वा! इनिच्या नेटला...हे आपल...हृदयाला भिडलेलं दिसतयं. आणि वल्ली म्हणजे आजच्या नव कविंचे तोरण हार!!

In reply to by स्पंदना

सस्नेह 17/03/2015 - 07:37
ते 'तोरण' नसून 'तारण' हार आहेत ! ..तुमची शब्दप्रतिभा तारण पडलेली दिसतेय ;)

In reply to by अजया

अत्रुप्त आत्मा 17/03/2015 - 09:00
@काही चुकले का माझे कि नवीन मित्र झाले तुझ>> =))))) @ वल्लींनी प्रोत्साहण दिलंय म्हंजे कविता बेस्टच!!! >> +++१११ अगदी अगदी! वल्ली नव्याच काय? जुन्या ही लोकांना असच्च प्रो त्साहण देत असतात . या बाबतीत त्यांचा की बोर्ड कोणीही धरु शकत नाही. फारच सेवाSभावी मणो वृत्तीचे आहेत. वल्ली!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 17/03/2015 - 12:31
प्रोत्साहानाच माहिती नाही...अशा प्रेम कविता आल्या की धावत येतो. कोनाचं लफ़्र तुटलं की खांदा द्यायला हमखास येतो. नै तर ते शिल्प भले आणि वल्ली भला. (पळा आता) ;) -दिलीप बिरुटे

मनीषा 16/03/2015 - 22:39
काही चुकले का माझे कि नवीन मित्र झाले तुझे सांग ना काय आहे माझा गुन्हा , मी तर मित्र तुझा जुना … मन चिंती ते वैरी न चिंती ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 17/03/2015 - 12:02
प्रितम मी हजार वेळा सांगितलं की प्रेम करु नका आणि प्रेमात पडला असला तर तक्रार करु नका. सहन करा. अरे, तिची काही मजबुरी असेल तिला कोणी मेसेज करु देत नसेल. असा विचार कर ना. येईल तुला तिचा मेसेज. वाट पाहा. तुला त्रास होतो तिलाही त्रास होतो आपला दिसतो तिचा नाही. :) कालच मी माझ्या मैत्रीणीला मेसेज केला. कोणाचा शेर आहे काय माहिती पण कामाला आला. तुही सेंड कर तिला मेसेज. माझं नाव नको सांगु :) इसन दुनिया मे कोयी किसी का हमदर्द नही होता. लाश को शमशान मे रखकर अपनेही लोग पुछते है 'और कितना वक्त लगेगा' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ 17/03/2015 - 17:03
मजबुरी शब्दावरून बशीर बद्र यांची शायरी आठवली… कोई कांटा चुभा नहीं होता, दिल अगर फूल सा नहीं होता, कुछ तो मजबूरियां रही होंगी यूँ कोई बेवफा नहीं होता…

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 18/03/2015 - 13:27
लाश को शमशान मे रखकर अपनेही लोग पुछते है 'और कितना वक्त लगेगा'
.... कौन रोता है किसी और की खातिर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया..... कभी खुद पे कभी हालात पे रोना आया...

आदूबाळ 17/03/2015 - 13:13
सांग ना काय आहे माझा गुन्हा , मी तर मित्र तुझा जुना …….
या ऐवजी गायछाप आणि चुना , मी तर मित्र तुझा जुना ……. असंही चाललं असतं. अमर मैत्रीचं प्रतीक.

चित्रगुप्त 18/03/2015 - 13:22
मी तर मित्र तुझा जुना ……. -कवि -प्रितम दादाजी तोरवणे साक्री ता. साक्री ,जिल्हा -धुळे ................. यावरून ' वाहवा वाहवा चेंडू हा, सुरेख कितितरि खचित हा" या कवितेच्या शेवटी येणार्‍या "मिस मेरी भोर" ची आठवण झाली. कुणाला माहीत आहे का ही कविता पूर्ण ?