✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गाजरं

श
शिव कन्या यांनी
Sat, 03/14/2015 - 18:57  ·  लेख
लेख
रोम्यांटिक लोक याला मधाचं बोट म्हणतात. बिचारी छोटी मुले अन बालबुद्धीचे याला चोकलेट म्हणतात. आमच्यासारखी ओबडधोबड माणसं याला गाजरं म्हणतात. अशी गाजरं आपल्या अगलबगलेत, समोर, दूर, डोक्यावर लटकवत ठेवणारे चिक्कारजण असतात. हि गाजरं सर्व प्रकारची, सर्व आकाराची, सर्व प्रतीची असतात. हि गाजरं कधीही दिसत नाहीत. हाती लागणं तर दूरच! या गाजरांच्या मागे धावायला लावणारे तर कोपऱ्याकोपऱ्यात दबा धरून बसलेले असतात! या गाजरांची किमत आपण ठरवत नाही, पण मोजत राहतो. ...... काय काय देऊन? ..... आपापल्या मनाचे खिसे तपासून पहावेत! कधीतरी बांधावर ठामपणे उभे राहून, एक ठळक नाही म्हणावा लागतो. पाय रोवून असल्या रक्तपित्या गाजरांचे समूळ उच्चाटन करावे लागते. .....म्हणजे मग आपली सेंद्रिय शेती आपल्याला सकसपणे करता येते. अन मनाचे खिसे फुल्ल्ल ठेवता येतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
2978 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

बरं, मनाच्या शेतीत कंपोस्ट

एस
Sat, 03/14/2015 - 20:54 नवीन
बरं, मनाच्या शेतीत कंपोस्ट कसे करतात सांगाल का?
  • Log in or register to post comments

एकदम अध्यात्मिक लेख. कळतय पण

पॉइंट ब्लँक
Sat, 03/14/2015 - 21:21 नवीन
एकदम अध्यात्मिक लेख. कळतय पण वळत नाही ही सगळ्यांचीच परीस्थिती आहे. तुम्ही ती थोडक्यात पण छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

हम्म..गाजरं खायला गेल्यास

नगरीनिरंजन
Sat, 03/14/2015 - 21:34 नवीन
हम्म..गाजरं खायला गेल्यास गुलामी नशिबी येते असे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments

गाजराची शेती आणि मधुमक्षिका

मनीषा
Sun, 03/15/2015 - 00:13 नवीन
गाजराची शेती आणि मधुमक्षिका पालन, हा सध्याचा सर्वात किफायतशीर उद्योग असावा असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

गाजर म्हणजेच मोहमाया.. आणि

पिंगू
Sun, 03/15/2015 - 17:57 नवीन
गाजर म्हणजेच मोहमाया.. आणि काय..
  • Log in or register to post comments

अश्या गाजराची पुंगी बनवावी

जेपी
Sun, 03/15/2015 - 18:07 नवीन
अश्या गाजराची पुंगी बनवावी,वाजली तर ठिक नायतर मोडुन खाल्ली.. खाल्यावर जे आऊटपुट निघल त्यावर नवे कायतरी करावे.
  • Log in or register to post comments

आवडले

वगिश
Mon, 03/16/2015 - 14:13 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

आवडले, अगदी खरे सांगितलेत!!

प्राची अश्विनी
Tue, 03/17/2015 - 19:20 नवीन
आवडले, अगदी खरे सांगितलेत!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा