गाजरं
रोम्यांटिक लोक याला मधाचं बोट म्हणतात.
बिचारी छोटी मुले अन बालबुद्धीचे याला चोकलेट म्हणतात.
आमच्यासारखी ओबडधोबड माणसं याला गाजरं म्हणतात.
अशी गाजरं आपल्या अगलबगलेत, समोर, दूर, डोक्यावर लटकवत ठेवणारे चिक्कारजण असतात.
हि गाजरं सर्व प्रकारची, सर्व आकाराची, सर्व प्रतीची असतात.
हि गाजरं कधीही दिसत नाहीत. हाती लागणं तर दूरच!
या गाजरांच्या मागे धावायला लावणारे तर कोपऱ्याकोपऱ्यात दबा धरून बसलेले असतात!
या गाजरांची किमत आपण ठरवत नाही, पण मोजत राहतो.
...... काय काय देऊन? ..... आपापल्या मनाचे खिसे तपासून पहावेत!
कधीतरी बांधावर ठामपणे उभे राहून,
एक ठळक नाही म्हणावा लागतो.
पाय रोवून असल्या रक्तपित्या गाजरांचे समूळ उच्चाटन करावे लागते.
.....म्हणजे मग आपली सेंद्रिय शेती आपल्याला सकसपणे करता येते.
अन मनाचे खिसे फुल्ल्ल ठेवता येतात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरं, मनाच्या शेतीत कंपोस्ट
एकदम अध्यात्मिक लेख. कळतय पण
हम्म..गाजरं खायला गेल्यास
गाजराची शेती आणि मधुमक्षिका
गाजर म्हणजेच मोहमाया.. आणि
अश्या गाजराची पुंगी बनवावी
आवडले
आवडले, अगदी खरे सांगितलेत!!