मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हा दोष ना कुणाचा (कविता)

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा - संध्या (एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )

वाचने 2601 वाचनखूण प्रतिक्रिया 16

जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा
ह्याला तोडच नाही. __/\__
एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा
वृत्तापेक्षा, आशय महत्वाचा. अर्थगर्भ रचना.

आतिवास Fri, 03/15/2013 - 13:50
कविता आवडली. ( पण कशाचे तरी विडंबन असल्यासारखं वाटतं आहे - तो संदर्भ लक्षात नाही आला!)