हा दोष ना कुणाचा (कविता)
लेखनविषय:
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा
प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा
जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे
स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा
माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता
दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे
नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा
शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी
सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा
तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी
घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा
- संध्या
(एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )
वाचने
2601
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
जे काम ज्यास येते, त्यानेच ते
संदर्भ?
In reply to संदर्भ? by आतिवास
विडंबन नाही.
सांगून ना कळाले, शब्दांतले
आवडलि
आनंदकंद वृत्त का?
In reply to आनंदकंद वृत्त का? by प्रचेतस
बरोबर आहे. आनंदकंद वृत्तच आहे
आभार सर्वांचे
छान!
मला वृत्त येत नाही. हे वृत्त
सांगून ना कळाले, शब्दांतले
सुरेख
अप्रतिम
In reply to अप्रतिम by एक एकटा एकटाच
+++१११ पुन: पुनर्वाचनीय!
In reply to +++१११ पुन: पुनर्वाचनीय! by अत्रुप्त आत्मा
ओह !
सुंदर