✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक संवाद - १

ख
खटपट्या यांनी
गुरुवार, 03/12/2015 - 10:51  ·  लेख
लेख
एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद - तो - हाय ती - हेलो तो - कधी आलीस ? ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज. तो - ओके, चहा झाला का? ती - नाही जातेय आता. तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का? ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय. तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ? ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय. तो - ओके. लकी आहेस. ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने? तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना. ती - काय ? तो - आज काल नीट बोलते कुठे माझ्याशी… ती - काही झालंय का ? तो - सोड ना. तू सांग. ती - माझं काय…. आल्यावर १२/१ वाजेपर्यंत laptop घेऊन बसला होता. तो - हम्म. आमच्या बाईसाहेब ११ वाजेपर्यंत किचन मधलं आवरत होत्या आणि नंतर छोट्याची शाळेची तयारी करत होत्या. ती - हम्म, ठीकै चल, आता मीटिंग आहे. परत आल्यावर पिंग करते. तो - बघू ती - करते बोलली ना रे बाबा. तो - ओके. --------------------------------------------------------------------------------- तो - हेलो आहेस कुठे ? ती - मीटिंग लांबली रे. तो - जेवायला येतेयस का ? ती - नको डेस्कवरच जेवणारेय… तो - ……… ती - काय रे. तो - मी काय बोलू, बस एकटी…। ती - तसं नाही रे… तो - ?? ती - अरे उगाच लोकाना विषय नको, चघळायला… तो - ठीकै… दोघे एकत्र जेवण्यामुळे लगेच विषय मिळतो का ? ती - तुला समजत नाही रे… तो - मग समजव ना तू… ती - जाउदे…. तुला काही कामे नाहीये का ? तो - काम पूर्ण झालंय आता नुसतं दाखवण्यासाठी विंडो ओपन करून बसलोय. :) ती - स्मार्ट हा … मग आता काय करणार आहेस. तो - एकाने पिक्चर दिलाय मस्त "टू स्टेट्स". बारीक विंडो करून गपचूप बघणार आहे दुपारी. ती - शी त्यात काय मजा…. तो - मग चल थियेटर मधे … ती - "…………" तो - काय ग ? ती - काय ? तो - येणार का ? ती - तू जरा जास्तच बोलतोयस असं नाही वाटत तुला? तो - नाही. ती - घरी नवरा आहे माझ्या तो - आठवड्यातून किती वाक्य बोललाय तुझ्याशी ? ती - "………" तो - ओ मॅडम. ती - तुला असं तर नाहीना वाटत की मी तुझ्या… तो - काय ? ती - मला खूप काम आहे. मी आता तुझ्याशी परवा बोलेन. तो - ठीकै राहिलं…. ती - बायकोकडे लक्ष दे जरा…. एखादं गिफ्ट घेऊन जा. तो - ते मी माझं बघेन. ती - राग आला वाटतं तो - तुला खूप काम होतं ना ? ती - अरे चल निघायची वेळ झाली. सी यु. ----------------------------------------------- दिवस दुसरा. ती - हेलो तो - बोल ती - काय करतोयस तो - काही नाही. बोलणार नव्हतीस ना आज? ती - नव्हतीच बोलणार पण कांदेपोहे आणले होते म्हणून तुला पिंग केले. नको असतील तर राहू दे. तो - कुठे येऊ ? ती - कँटीन मध्ये तो - लोकांना चघळायला विषय मिळेल. ती - तू जरा अती करतोयस असे नाही वाटत तुला ? तो - तूच म्हणालीस ना काल ? ती - हो. तो - मग ? ती - "…… " तो - काय गं ? ती - मला वाटतं आपण थोडे दिवस एकमेकांशी नको बोलूया. तो - ते तर तू काल पण म्हणालीस, की आपण परवा बोलूया. आणि आज तूच पिंग केलेस ना ? ती - "……… " तो - हेलो ? ती - मला खूप काम आहे. मी तुला उद्या पिंग करते. तो - तुझी मर्जी ती - तू अशक्य आहेस. तो - ????? ती - जाउदे तो - तुला काम आहे ना? ती - हम्म तो - नवरा काय म्हणतोय. ती - नाव नको काढूस. चार दिवस बोलला नाहीये. काहीतरी अर्जंट डेलिवरेबल आहेत म्हणे. तो - तेच करत बस म्हणावं ती - "……." तो - आज मी दुपारी निघून लाँग ड्राइव ला जाणार आहे. ती - एकटा ? तो - तू चल … ती - "……. " तो - हेलो ती - मला काम आहे. मी उद्या बोलते तुझ्याशी तो - ठीक आहे ती - कुठे जाणार आहेस तो - येणार नाहीस तर कशाला विचारतेस ती - "…...." तो - आहेस का ? ती - आता खरंच काम आहे रे. तो - हो का ? ती - हो आपण उद्या बोलूया. तो - तुझी मर्जी ती - तू अशक्य आहेस तो - हे कितीवेळा सांगणार आहेस ? ती - तू पण ना. तो - काय ? ती - चल, मी जाते. तो - ठीक आहे. क्रमश:
  • एक संवाद - २

Book traversal links for एक संवाद - १

  • एक संवाद - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8144 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

इथे मिपा वर काही महिन्या

अभिजित - १
गुरुवार, 03/12/2015 - 12:59 नवीन
इथे मिपा वर काही महिन्या पूर्वी एक धागा आला होता. काही बायका समोरच्या माणसाला कसे उत्तेजन देतात .. आणि शेवटच्या क्षणी कशी माघार घेतात. त्या वर दोन्ही बाजूनी बर्याच उलट सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. तोच प्रकार आहे हा ..
  • Log in or register to post comments

Excited

एक एकटा एकटाच
गुरुवार, 03/12/2015 - 14:36 नवीन
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

हम्म्म

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/12/2015 - 20:44 नवीन
ट्विस्ट येणार दिसतोय दुसर्‍या भागात. फार लांबवू नका ओ खट्पट्या भाऊ -क्रमश: कथांना कंटाळलेला.
  • Log in or register to post comments

विंट्रेष्टिंग !

सस्नेह
गुरुवार, 03/12/2015 - 21:16 नवीन
विंट्रेष्टिंग ! जरा फाष्ट घ्या आता..
  • Log in or register to post comments

थोड्याफार फरकाने सत्यकथा !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/12/2015 - 23:38 नवीन
थोड्याफार फरकाने सत्यकथा ! पुढील भागात काय होते ह्याची वाट पहात आहे !
  • Log in or register to post comments

बापरे, ही तर माझी गोष्ट!

चुकलामाकला
गुरुवार, 03/12/2015 - 23:47 नवीन
बापरे, ही तर माझी गोष्ट! पुढिल भाग लवकर टाका हो!
  • Log in or register to post comments

घाई करू नका

कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 14:14 नवीन
ही तर माझी गोष्ट!
पुढे काहीतरी ट्विस्ट मिळायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला

हे दोघे नवरा-बायको असणार (

प्रसाद१९७१
Fri, 03/13/2015 - 14:27 नवीन
हे दोघे नवरा-बायको असणार ( एकमेकांचे )
  • Log in or register to post comments

भारी क्लायमॅक्स होईल.

पॉइंट ब्लँक
Fri, 03/13/2015 - 14:45 नवीन
भारी क्लायमॅक्स होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

धाग्यात

नाखु
Fri, 03/13/2015 - 14:43 नवीन
धाग्यात पिंग ! वाचकांना झिंग !! शेवटात टिंगा !! झट्क्यात रिंगा !! ============
  • Log in or register to post comments

हल्ली बऱ्याच ठिकाणी हा प्रकार

स्पा
Fri, 03/13/2015 - 14:51 नवीन
हल्ली बऱ्याच ठिकाणी हा प्रकार सुरु असतो ,
  • Log in or register to post comments

कुठे रे कुठे

कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 15:17 नवीन
हिंजवडीमध्ये पण बरेच ऐकून असतोय पण आजूबाजूला काहीच 'सापडत' नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चोराच्या वाटा चोराला ठावुक ..

प्रसाद गोडबोले
Fri, 03/13/2015 - 18:29 नवीन
चोराच्या वाटा चोराला ठावुक ... इथे मिपावर तांब्या संप्रदायाची दीक्षा घेतलेल्यांना अन इथे रतीब पाडत बसलेल्यांन्ना कसे सापडणार असे काही .... गड्या आपुला तांब्याच बरा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पुढे ??

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/19/2015 - 20:40 नवीन
पुढे ??
  • Log in or register to post comments

पुभाप्र..

सूड
गुरुवार, 03/19/2015 - 20:47 नवीन
पुभाप्र..
  • Log in or register to post comments

पुभाप्र.

अजया
गुरुवार, 03/19/2015 - 21:14 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

ह्म्म.. पुढचा भाग आला की

स्रुजा
गुरुवार, 03/19/2015 - 21:31 नवीन
ह्म्म.. पुढचा भाग आला की बोलेन ह्म्म च्या पुढे :)
  • Log in or register to post comments

पिंग पॉंग!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/20/2015 - 00:10 नवीन
पिंग पॉंग! :-D
  • Log in or register to post comments

हे सगळे आय टी मधले शब्द हायेत

खटपट्या
Fri, 03/20/2015 - 02:16 नवीन
हे सगळे आय टी मधले शब्द हायेत !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा