नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वाचने
82765
प्रतिक्रिया
429
मिसळपाव
प्रतिक्रिया
मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा
In reply to चर्चा भरकटू देऊ नका. by संदीप डांगे
अहो तो उपरोध होता हो. उपरोध
In reply to मास्तरांइतका पगार देऊन तेव्हा by हाडक्या
एकदा नीट ठरवा. डॉक्टरी ही
टू द. पॉईंट.
In reply to एकदा नीट ठरवा. डॉक्टरी ही by काळा पहाड
अगदी सहमत. सोयीस्करवाद हाच एक
In reply to टू द. पॉईंट. by आनंदी गोपाळ
माझा धंदा आहे. पैसे मी ठरवणार
In reply to टू द. पॉईंट. by आनंदी गोपाळ
मलाही इंजिनियरिंग, आयाआयटीत अ
In reply to टू द. पॉईंट. by आनंदी गोपाळ
या निमित्ताने एक प्रस्ताव
अशा काही साईट्स आहेत. सध्या
In reply to या निमित्ताने एक प्रस्ताव by बॅटमॅन
अत्यंत मोलाची माहिती.
In reply to अशा काही साईट्स आहेत. सध्या by गिरकी
अरे वा!
In reply to अशा काही साईट्स आहेत. सध्या by गिरकी
मोठाली हॉस्पिटल्स चालवणारे
अॅडमिनिस्ट्रेटरला पॉटॅशियम
In reply to मोठाली हॉस्पिटल्स चालवणारे by आनंदी गोपाळ
वर डॉक्टर आणि मेकॅनिकची
मेकॅनिकचा धंदा करायला डिग्री
In reply to वर डॉक्टर आणि मेकॅनिकची by खटपट्या
सर्टीफिकेट, डिग्री असणार्
In reply to मेकॅनिकचा धंदा करायला डिग्री by खटासि खट
धन्यवाद बेसिक्सबद्दल.
In reply to सर्टीफिकेट, डिग्री असणार् by संदीप डांगे
पुढे
In reply to वर डॉक्टर आणि मेकॅनिकची by खटपट्या
पुढचा असा आहे
In reply to वर डॉक्टर आणि मेकॅनिकची by खटपट्या
सर्टिफिकेट हे त्या त्या
डाॅक्टर स्वतःचा अनुभव,शिक्षण
अप्रस्तुत
सहमत. अजुनही एका रुग्णाकडून
In reply to अप्रस्तुत by पिवळा डांबिस
पी डां साहेब
In reply to अप्रस्तुत by पिवळा डांबिस
सहमत आहे.
In reply to पी डां साहेब by सुबोध खरे
गोपाळराव कशाला जळ जळ करून
त्रस्त डॉक्टरा, शांत हो!!
In reply to गोपाळराव कशाला जळ जळ करून by सुबोध खरे
तत्काळ सेवेचे वेगळे पैसे!
In reply to गोपाळराव कशाला जळ जळ करून by सुबोध खरे
लोकांचं पोट दुखेल तर किती बरं
In reply to तत्काळ सेवेचे वेगळे पैसे! by अजया
साधा साबण ,त्याची मेकिंग
In reply to तत्काळ सेवेचे वेगळे पैसे! by अजया
प्रश्न तुमच्या लॉजिकवर नाही,
In reply to साधा साबण ,त्याची मेकिंग by अजया
डाॅक्टरकी समाजसेवा म्हणून
In reply to प्रश्न तुमच्या लॉजिकवर नाही, by काळा पहाड
अहो कोणी साबण अडीच लाखाला
In reply to डाॅक्टरकी समाजसेवा म्हणून by अजया
आम्हाला काय झालंय हे
In reply to अहो कोणी साबण अडीच लाखाला by काळा पहाड
तेंव्हा हा धागा वाचताना एक
In reply to गोपाळराव कशाला जळ जळ करून by सुबोध खरे
का हो पहाड साहेब
In reply to तेंव्हा हा धागा वाचताना एक by काळा पहाड
"मग माणूस म्हणूनसुद्धा कुणी
In reply to का हो पहाड साहेब by सुबोध खरे
महागडी
माझ्या मते डॉक्टर आणि मेकॅनिक
मेकॅनिकशी तुलना बरोबर नाही.
मेकॅनिक
In reply to मेकॅनिकशी तुलना बरोबर नाही. by मराठी_माणूस
हो, पण त्यांच्याशी त्या
In reply to मेकॅनिक by कपिलमुनी
ह्या स्वधर्मचा आयडी बदलून
अालोय
In reply to ह्या स्वधर्मचा आयडी बदलून by सूड
आता काय उपयोग? बूंद से गयी वो
In reply to अालोय by स्वधर्म
साधा हिशोब
शेतकरी व डॉक्टर सारखेच
ज्वलंत आहे पण तो फक्त पब्लिक फोरम वर लिहिताना
कंटाळा
कौशल्याची किंमत?
सतत प्रतिसाद देणे
In reply to कौशल्याची किंमत? by स्वधर्म
जाता जाता....
रुग्णालयांकडून लुटालूट
In reply to जाता जाता.... by vikramaditya
डाँक्टरांची फी आणि उपचार
अण्णा हजारेंचा नव्हे... हा तर आहे मोदींचा सल्ला.
In reply to डाँक्टरांची फी आणि उपचार by डँबिस००७
केजरीवालना दमा आहे का?
In reply to अण्णा हजारेंचा नव्हे... हा तर आहे मोदींचा सल्ला. by आयुर्हित
पुरानी खांसी
In reply to केजरीवालना दमा आहे का? by पिवळा डांबिस
परानी खांसी म्हणजे काय ते
In reply to पुरानी खांसी by आयुर्हित
"पुरानी" तला उकार गायब झाला...
In reply to परानी खांसी म्हणजे काय ते by पिवळा डांबिस
बाकी सगळं जाउ द्या.. ह्या
In reply to "पुरानी" तला उकार गायब झाला... by आयुर्हित
काहीतरी मार्केटिंग स्किम आहे हे नक्की.. +१११
In reply to बाकी सगळं जाउ द्या.. ह्या by पिलीयन रायडर
जैसी जिसकी सोच!
In reply to काहीतरी मार्केटिंग स्किम आहे हे नक्की.. +१११ by रुस्तम
बरं माझी सोच च बेक्कार आहे..
In reply to जैसी जिसकी सोच! by आयुर्हित
एकाचे औषध हे दुसर्यासाठी विष ठरु शकते
In reply to बरं माझी सोच च बेक्कार आहे.. by पिलीयन रायडर
मला हेच उत्तर अपेक्षित होतं.
In reply to एकाचे औषध हे दुसर्यासाठी विष ठरु शकते by आयुर्हित
नुसता आजार सांगून उपयोग होत नाही.
In reply to मला हेच उत्तर अपेक्षित होतं. by पिलीयन रायडर
सगळी माहिती देऊ.. पण
In reply to नुसता आजार सांगून उपयोग होत नाही. by आयुर्हित
गुरूमंत्र
In reply to सगळी माहिती देऊ.. पण by पिलीयन रायडर
ज्यांना मनापासून बरे व्हायचं आहे
In reply to सगळी माहिती देऊ.. पण by पिलीयन रायडर
तुम्ही देता ती माहिती
In reply to ज्यांना मनापासून बरे व्हायचं आहे by आयुर्हित