Skip to main content

डाॅक्टरांची फी

लेखक स्वधर्म यांनी बुधवार, 11/03/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म

वाचने 82765
प्रतिक्रिया 429

प्रतिक्रिया

In reply to by आयुर्हित

त्या जाहीररित्या सल्ला मागत आहेत ना. मग तुम्हाला, त्यांना जो सल्ला व्यनितून देणार तो जाहीररीत्या द्यायला काय प्रोब्लेम आहे?

In reply to by पिलीयन रायडर

नका ठेवू, काही जबरदस्ती नाही आपल्यावर. ह्या गोष्टी व्यनीतूनही होवू शकतात हे सांगूनही एवढी साधी गोष्ट आपल्याला कळत नाही? (धागा इतरही वाचत असतात त्यांनाही कळली असेलच आता आपली ही गोष्ट)

In reply to by आयुर्हित

चौकशी विना सल्ला. तुम्ही सगळ्या गोष्टी चौकशी न करताच करता अस दिसतय.

In reply to by पिलीयन रायडर

अग मी त्यांना या आधीपण याच धाग्यावर विचारलं आहे "सबिंसा (sabinsa) किंवा (sami labs limited) या कंपनीच्या औषधांबद्दल आहे का म्हणुन" त्यांनी वाचलेले दिसत नाही.

In reply to by आयुर्हित

ओह, पुरानी खांसी! मला वाटलं की हिंदीमध्ये हा काही वेगळाच खांसीचा प्रकार आहे की काय! नेव्हर माईन्ड, टायपो आमचेही होतात अनेकदा, समजू शकतो. स्पेशालिस्टांच्या रेट्सबद्दल विचारलं कारण काही नॉन्-अ‍ॅलोपाथी स्पेशालिस्टांचे रेट्सही भरभक्कम असतात. असोत बिचारे. आणि ह्या उपचारपद्धती दीर्घकालीन समजल्या गेलेल्या असल्यामुळे प्रत्येक वेळचे पैसे धरून दीर्घ कालात बरेच होतात असा अनुभव आहे. आमच्या मते, अ‍ॅलोपाथी डॉक्टर मोंगलांसारखे एकदम धाड घालून लुटतात तर नॉन-अ‍ॅलोपाथी डॉक्टर्स इंग्रजांसारखं दीर्घकाळ शोषण करून लुटतात!! :) अर्थातच मिपावरचे सगळे डॉक्टर, वैद्य, हकीम, मांत्रिक, जडीबुटीवाले, अ‍ॅक्युप्रेशर/पंक्चरवाले सोडून!!
माझ्याकडे एक आगळीवेगळी पद्धती आहे, जिचा घरबसल्या वापर करून कुठलाही दमा संपूर्ण घालवता येतो!
आम्हाला दमा नसल्याने आम्हाला तिचा काही उपयोग नाही. पण श्री. केजरीवालांना कळवलंत तर ते कदाचित उपयोग करून घेतील...

डोळे येण्यावर घातल्या जाणार्या औषधामुळे डोळे जाण्याची शक्यता असते, हे किती लोकांना माहीती असते ? डोळे येण्यावर दिले जाणार्या स्टूरॉईड ड्रॉप्सच्या जास्त वापरामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते असे प्र सिद्ध नेत्र तज्ञ काल टीव्हीवर सागत होते. पण असे सल्ले डॉक्टर तुम्हाला कधीच देत नाही !! का देत नाही ? माहितीतल्या ह्र्दयरोग्याला औषधामुळे देन्ही किडन्या निकामी झालेल्या पाहील्या आहेत. डॉक्टरने त्या रुग्णाला ४-५ वर्षे असे औषध दिले जे सगळीकडे (अमेरीकेत आणि युरोप मध्ये) बॅन् आहे, त्या औषधामुळे ह्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. आता तो कोणाकडे तक्रार करणार ?

'स्वाइन फ्लू'च्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक लसीची मागणी वाढल्याचा गैरफायदा घेत एका कंपनीच्या लसीचा 'काळाबाजार' डॉक्टरांकडून काही दिवसांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका कंपनीची ७१४ रुपयांना मिळणारी लस डॉक्टरच खरेदी करून तिप्पट दराने थेट पेशंटना विकत असल्याची माहिती हाती आली आहे. लसींची वाढती मागणी आणि 'स्वाइन फ्लू'चा वाढता उद्रेक याचा गैरफायदा घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी डॉक्टरमंडळी पुढे सरसावली आहेत. त्यामुळे केमिस्टांकडे असलेली लस पेशंट डॉक्टरांकडे घेऊन गेल्यास त्यांना 'आमच्याकडूच लस विकत घ्यावी लागेल. केमिस्टांकडील लस चालणार नाही', असा दम डॉक्टर भरू लागले आहेत. त्यामुळे पेशंट थेट डॉक्टरकडून लस टोचून घेत असून, त्यासाठी त्यांना आठशे ते अडीच हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागत आहे. डॉक्टरांकडून लसींचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हा काळाबाजार रोखण्याची पेशंटकडून मागणी होत आहे.

आयुर्हित, माफ करा पण तुमचे प्रतिसाद वाचून मला साईनफेल्डमधील होलिस्टिक हीलरची आठवण येते. www.youtube.com/watch?v=uH5IMv2jeuk

सुद्धा ब-याच डॉक्टरांचा खास गुण आहे. एक डॉक्टर दुस-या डॉक्टरचे मत कधीच ग्राह्य धरत नाही. "Unless they are a part of the same chain" सेकंड ओपीनीअन चा विषय काढतात डॉक्टर कपाळ्याला आठ्या घालतात. पेशंट मेला तरी चालेल पण मी म्हणेन तेच योग्य असा अ‍ॅट्यीटुड असणारे बरेच डॉक्टर बघितले. सेकंड ओपीनीअन घेणारच तर मी सांगतो त्याच डॉक्टर कडुन घ्या म्हणणारे पण आहेत. दुसरीकडे गेलात तर मी जबाबदार नाही म्हणणा-या डॉक्टरला जेव्हा विचारले की " बरं आता शंभर टक्के जबाबदारी घेता का? मग रुग्णाला इथेच उपचार करवतो" तर बोलती बंद. बाकी विषय फार मोठा आहे. बरेच प्रतिसाद ह्यावर प्रकाश टाकतात.

हेल्थ केअर इंडस्ट्रीत मानवी अवयव मूल्यवान आहेत. मग एखाद्याला वाटल की बास झाल जगण आपण आपले शरीर वैद्यकीय क्शेत्राला डिसमेंटल करुन द्याव. त्याची किंमत आपल्या कुटुंबियांना द्यावी. थोडकयात म्हणजे मानवी अवयवाचा व्यापार वैध असू द्यावा. शरीर माझ आहे त्याच काय करायच हे मला ठरवू द्यात. मरण येत नाही म्हणुन जगताहेत असे कित्येक लोक असतात. तसा शरीर विक्रय करायच्या ऐवजी असा शरीर विक्रय करु. अनेक गरीब कुटुंबात आर्थिक हातभार मिळेल. पुर्वी रक्त देउन पैसे मिळण्याची सोय होती. दान द्यायच्या ऐवजी विकत देउ! काय बिघडल. असा विचारप्रवाह भविश्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच मला वाटते कि सरकारने बर्याच लोकांना मृत्यू दंड द्यावा. अति भ्रष्टाचारी . बलात्कारी आणि child molestar ला आणि अजून काही गुन्हेगारांना जगण्याचा काहीही हक्क नाही. तरी कडक कायदे करूनं वर्षाला १५-२० हजार लोकांना मृत्यू दंड देवून त्यातील ८० % लोकांचे अवयव विकता येतील. जर जास्ती झाले तर विदेशी लोकांना चढ्या भावात विकून नफा कमावता येईल . मी हे मी गंभीर पणे लिहित आहे.

मानवी अवयवाचा व्यापार हि आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. गर्दच्या आहारी गेलेली तरुण मुले पैश्याच्या लोभाने आपली मूत्रपिंडे विकण्यासाठी आलेली मी पाहिलेली आहेत. एकदा त्यांनी मूत्रपिंड विकले आणि ते आपल्या नातेवाईकाला बसवले कि लोक त्या गर्द पीडीत तरुणाला( रुग्णालयातून डिसचार्ज देववून) अक्षरशः रस्त्यावर सोडत असत. आणि असे तरुण त्या शल्यक्रियेतून पूर्ण बाहेर यायच्या अगोदरच शरीराने आणि पैश्याने लुबाडले जाऊन बेवारशी रस्त्यावर मृत्युमुखी पडलेले पाहिलेले आहेत.(याचा मी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे) एखाद्याला धमकी देऊन त्याचे अवयव विकत घेणे किती सोपे होईल हे पहा. आज जर कोणी अगदी जवळचा नातेवाईक असेल तरच हे अवयव रोपण करता येते. हा कायदा सैल केला तर काय होइल ते पहा. प्रतिसाद देणे एकदम सोपे आहे

In reply to by सुबोध खरे

मला व्यक्तिशः प्रतिसाद देणे देखील सोपे वाटत नाही.पण मी भविश्यात विचारश्रेणी अशी असू शकते असे शेवटी लिहिले आहे.

आज एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश वाचनात आला. त्यातले काही प्रश्न रोचक (आणि खोचक) वाटले म्हणून त्याची नक्कल खाली देत आहे. विशेषतः शेवटचा पॅराग्राफ आपल्या समाजातले एक महत्वाचे सत्य सांगून जातो... India's Doctors, When was the last time, you heard, there is a national emergency of pending cases in Indian courts so judges and lawyers must work 16 hr a day till all cases are cleared. When was the last time, you heard, There are so many vacancies in officer cadres of Indian Army that national security is at risk, so all management graduates from IIMs must join army for 5 years When was the last time, you heard, there is a crisis in education system as we have very few teachers going to village schools, so all engineering grads must dedicate 3 years of their life after graduation for this cause When was the last time, you heard, so many children, adults and old people are suffering from mental agony and remain untreated, so all bollywood actors, musicians, artists must do a 3 month crash course in art therapy and serve this population for 3 years and not pursue any commercial activity at all When was the last time, you heard, millions of people in India are dying due to lack of medical investigations and medications so all manufacturers of medical equipment and pharma companies must set up factories at their own cost and supply entire output for almost free to rural areas When was the last time, you heard, A politician was jailed and served a lifetime bar from any elections because a clerk did not fill a form properly that was mandatory by law When was the last time, you asked, Why software companies pay residential rate property tax and doctors clinics are treated and taxed as "Commercial establishments"? When was the last time anybody gave a F*** to what is happening to medical services in India? Then why majority hardworking medical professionals are maligned and treated like criminals because of a small percent of crooks, lame regulators and apathetic short sighted governments get a free run of the country? जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्‍या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्‍या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांना कोणी झोडपत नाही, मग डाॅक्टरांनाच का झोडपायचं, हा तुमचा प्रश्न बरोबर अाहे. ही चर्चा एकूणच वैद्यकीय सेवा, त्यातले अनेक घटक इत्यादीवर घसरत चालल्यामुळे मी वर पुन्हा एकदा मूळ प्रश्न / विचार मांडण्याचा प्रयत्न केला अाहे, तो असा: >> एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत? अाता इथे कोणीतरी उदाहरण दिले अाहे, त्याप्रमाणे डाॅक्टरएेवजी सर्वोच्व न्यायालयातल्या वकीलांबाबतही हा प्रश्न विचारता येईलच. हा विषय केवऴ मागणी - पुरवठा यावर सोडून देता येईल काय? - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत
हे ठरवायचा अधिकार कुणाकडे असावा? जो कष्ट घेतो त्याच्याकडे, की जो कष्ट घेतो तो सोडून इतर सर्वांकडे? कधी 'अ‍ॅटलास श्रग्ड' नावाची 'अ‍ॅन रँड' या लेखिकेची कादंबरी वाचली आहे का? माझ्या मते नसावी...ती वाचल्यास काही मुलभुत प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील.

In reply to by असंका

अर्थातच जो कष्ट घेतो त्याच्याकडेच. धंदा असल्यामुळे डॉक्टरांनी एका ऑपरेशन चे एक लाख किंवा दहा लाख रुपये, डॉलर किंवा पौंड घेण्यात काहीच प्रत्यवाय नाही. पण मग सगळंच मार्केट फोर्सेस च्या रूलप्रमाणं व्हावं. स्वाईन फ्लूची लस त्यांच्याकडूनच (तिप्पट किंमतीत) घेण्याची जबरदस्ती डॉक्टरांनी का करावी? आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्‍या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत. १. मेडिकल शिक्षणासाठी स्वस्तात (एडेड/सरकारी) फी वगैरे असते असा माझा समज आहे. त्याला मेरिट ने प्रवेश दिला जातो. जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार असतील त्यांच्यासाठी ती बंद करून सगळीकडेच एन-एडेड फी लागू करावी. २. जे सवलतीच्या फीत शिकतील त्यांना कायमची गव्हर्नमेंट सर्व्हिस मँडॅटरी करावी. त्यांना खाजगी प्रॅक्टीस करता येणार नाही असा कायदा करावा. ३. जास्तीत जास्त गव्हर्नमेंट इस्पितळे सुरू करावीत.

In reply to by काळा पहाड

आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्‍या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत. खटले कोणी दाखल करावेत?

In reply to by मोदक

आरोग्य विभागानं. शेवटी कायदे समाजासाठीच असतात. आणि समाजाचा प्रतिनिधी सरकार असतं. म्हणून आरोग्य विभागानं. जसं स्त्री भ्रूणहत्ये विरोधी तक्रार करता येते तशीच ही किंवा तत्सम तक्रार स्वीकारली जावी. आणि संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणे किंवा अतिप्रचंड पेनल्टी लावता येईल.

In reply to by काळा पहाड

म्हण्जे आरोग्य विभागाला तक्रारी देण्याचे काम सामान्य नागरिकच करणार - बरोबर..? का येथेही आरोग्य विभागाने गैरप्रकारांचा "तपास करून, उघडकीस आणून" मग खटले दाखल करावेत..?

In reply to by मोदक

हो तसंच. जसं अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरो ची साईट आहे तशी आरोग्य विभागाची साईट अशा तक्रारी स्वीकारू शकते ना?

In reply to by काळा पहाड

नागरिकांनी आवाज उठवण्याची आवश्यकता असेल तर नवीन सेटअप* करण्याची काय गरज आहे? सध्याच्या यंत्रणेमध्ये डॉक्टर / हॉस्पीटलच्या मनमानीविरूद्ध दाद मागण्याची सोय असेलच की. *आरोग्य विभागाने तक्रारींची दखल घेवून खटले दाखल करण्याची - थोडक्यात एक "मध्यस्थ" होण्याची

In reply to by मोदक

सध्याची यंत्रणा कोणती? सगळे डॉक्टर आरोग्य विभागाअंतर्गत तर येतात. मी या प्रकारचा कायदा असण्याबद्दल बोलत होतो. आहे की नाही मला माहित नाही, नसला तर केला पाहिजे. कारण असा कायदा नसेल तर आरोग्य विभाग कारवाईच करू शकणार नाही. ता.क. अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात.

In reply to by काळा पहाड

सध्याची यंत्रणा कोणती? न्यायदान यंत्रणा. यामध्ये आपण सामान्य नागरिक खटले दाखल करू शकतो. असे खटले दाखल केल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार किंवा तुमच्या हयातीत तरी लागेल का.. याची खात्री कोणीही देवू शकत नही. त्यामुळे हा मुद्दा बाद. (हा मुद्दा तुमच्या दृष्टीने बाद नसेल तरी हरकत नाही) अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात. समजा पुण्यामध्ये काही लाख मुले शाळेत जातात. त्यातल्या ५०% शाळा असे नियम करतात. मग अशा हजारो मुलांपैकी सर्वांचे पालक अशा मुजोर आणि अन्यायकारक नियमांना बळी का पडतात..? कारण.. या असल्या शाळा आणि ही हॉस्पीटल्स या गोष्टी "Perquisites" आहेत. सक्ती नाही. (शाळा / उपचार हे मुलभूत हक्क आहेत आणि सरकारने याची तरतुद केलेली आहे) पांचगणीच्या शाळेपासून ते गल्लीतल्या नगरसेवकाने टाकलेल्या इंग्लीश मिडीयम दुकानापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेही नको असतील तर सरकारने ZP शाळा उघडलेल्या आहेतच - कोठे जायचे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असताना त्यामध्येही एखादा नियम असावा, रेग्युलेशन असावे या मागण्यांना सरकारदरबारी काडीचीही किंमत मिळणार नाही. तुम्हाला मुलांना डेहराडूनला पाठवायचे आहे परंतु ती सेवा जिल्हा परिषद शाळेच्या फी मध्ये मिळावी ही अपेक्षा रास्त नाही. आपण असे समजू की चरक शुश्रुतांच्या काळापासून डॉक्टर लोक दुनीयेला असेच लुबाडून पैसे कमावत आलेले आहेत. साधा उपाय आहे. "त्यांचे उपचार घेवू नका" समजा डॉक्टर लोकांनी बळजबरी केली तर सांगा "मला तुमच्याकडून उपचार नकोत" शक्य आहे?

In reply to by असंका

हे ठरवायचा अधिकार कुणाकडे असावा? जो कष्ट घेतो त्याच्याकडे, की जो कष्ट घेतो तो सोडून इतर सर्वांकडे? >> जो हे कष्ट करतो, तो जर या समाजातच रहात असेल, समाजावरच अवलंबून असेल, समाजातूनच पैसे मिळवत असेल, अन समाजातच खर्च करत असेल, तर हे मूल्य ठरविताना निदान समाजातील इतर घटक किती व कसे मिळवत अाहेत, हे तरी पहावे. त्या तुलनेत अापण किती शुल्क अाकारतो, त्याचा विचार सुजाण घटकांनी तरी करायला नको काय? फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे? >> 'अ‍ॅटलास श्रग्ड' नावाची 'अ‍ॅन रँड' या लेखिकेची कादंबरी वाचली होती, बर्याच वर्षांपूर्वी, खूप अावडली होती. नंतर त्या विचारातला एकांगीपणा जाणवला व पटला नाही. शेवटी लेखिकाही असायलममध्ये मृत्यू पावली, असे माहिती अाहे.

In reply to by स्वधर्म

फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे?
एम आर पी च्या पेक्षा जास्त किंमत घेणे हे काळाबाजार या सदराखाली येते हे आपल्याला माहीत आहे. असाच प्रकार सर्व्हिसेस च्या बाबतीत (उदा: रिक्षावाल्याने बंदच्या दिवशी ५० रुपया ऐवजी ५०० रुपयाची मागणी करणे) आहे का?

In reply to by स्वधर्म

तो जर या समाजातच रहात असेल, समाजावरच अवलंबून असेल, समाजातूनच पैसे मिळवत असेल, अन समाजातच खर्च करत असेल, तर हे मूल्य ठरविताना निदान समाजातील इतर घटक किती व कसे मिळवत अाहेत, हे तरी पहावे. त्या तुलनेत अापण किती शुल्क अाकारतो, त्याचा विचार सुजाण घटकांनी तरी करायला नको काय? फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे?
नाही. हा विषय दुसर्‍याने सांगायचा नाहीच. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने मखलाशी करायचा प्रयत्न करतो तेव्हा स्वत:ला पण असल्या हल्ल्याला तोंड द्यावे लागेल हे विसरतो. आपण जरी बसने लटकत जात असलो तरी इतर बैलगाडीतनं जात असतील; अगदी चालत जाणारंही कुणीतरी असतंच. मग आपणही चालत जायचं असं वाटायला पाहिजे का? कुणा कुणाकडे तर कामच नसतं. मग आपणही असलेलं काम न करता बसायचं का? इतरांकडे बघून अशा गोष्टी ठरवायच्या का? समाजातील इतर घटकांनी किती मानधन घ्यावे, किती क्षमता मिळवावी, किती कष्ट घ्यावे हे आपणच ठरवायचा अट्टाहास कशाला? एखादा व्यकती अगदी अव्वाच्या सव्वा मानधन घेत असेल, तर जाऊ नका त्याच्याकडे. दुसर्‍याकडे जा. ज्याची जी क्षमता आहे, तेवढे तो पैसे मिळवतो. दुसर्‍याला मिळणार्‍या अधिकच्या पैशाकडे बघू सुद्धा नका.
शेवटी लेखिकाही असायलममध्ये मृत्यू पावली, असे माहिती अाहे
फारच मुद्देसूद. म्हणजे ती जेव्हा एखाद्या वस्तूला "फावडं" म्हणाली असेल, तेव्हा ते नक्कीच फावडं सोडून दुसरं काहीतरी असणार! मान्य!

In reply to by असंका

मग डॉक्टरकी सारखं पवित्र कार्यच कशाला स्वीकारायला हवं असं करायचं तर? बाकी ठिकाणीसुद्धा पैसे मिळवता येतात. जे कार्य एखाद्याच्या जीवाशी निगडीत आहे त्यात नफेखोरी करू नये असं वाटतं. बाकीची कुठलीच कामं अशी जीवाशी निगडीत नाहीत. आणि समजा नफेखोरी करायचीच असेल (आणि मरणार्‍या लोकांच्या टाळूवरचं लोणी खायचंच असेल) तर डॉक्टरांना समाजाच्या संरक्षण परिघाबाहेर ठेवावं. डॉक्टरांना ठेवू देत प्रायव्हेट सिक्यूरिटी गार्ड. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस दलाला प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही. चालेल का?

In reply to by काळा पहाड

मग डॉक्टरकी सारखं पवित्र कार्यच कशाला स्वीकारायला हवं
बरोबर. जरा इतर कार्य जी अपवित्र किंवा कमी पवित्र आहेत त्यांची नावं सांगा ना प्लीज.

In reply to by असंका

ज्यात जनतेचे हित महत्वाचे असते ती पवित्र सदरात येतात. उदाहरणार्थ, वैद्यकीय, ज्ञानदान, मंत्रीपरिषद, राज्यपाल, न्यायाधीश इत्यादी. सर्वसाधारण पणे अशा कार्यात शपथ घेतली जाते. बाकीची सगळी कामं म्हणजे खानावळ टाकणे, बैलगाडी चालवणे, व्यापार करणे, दलाली करणे, करविषयक सल्ले देणे :) इत्यादी कामं पवित्र सदरात येत नाहीत. या गोष्टींचा संदर्भ व्यक्तीगत फायद्याशी असतो. आणि तुमचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही सरकारला कर देता. तुमचा टोमणा मला खरं तर कळाला नाही.

In reply to by काळा पहाड

ज्यात जनतेचे हित महत्वाचे असते ती पवित्र सदरात येतात. मग येथेही डॉक्टरांचे सरसकटीकरण करता येणार नाही. हृदयरोगतज्ञ आणि मेंदूचे विकार वाले डॉक्टर सोडले तर बाकी सर्वप्रकारच्या आजारांना "स्पेशल उपचार" केले नाही तरी माणूस जिवंत राहू शकतो. उदा - पायाला दुखापत झाली आणि त्याचे पर्यावसन पाय कापण्यात झाले तरी काय फरक पडतो? शेकडो हजारो लोक हातापायांशिवाय जगत आहेतच की.

In reply to by मोदक

तुम्ही डॉक्टर आहात का? की वकील? दुसरा प्रश्न हा अपमानास्पद रित्या विचारला गेला आहे याची कृपया नोंद घ्यावी. :) गंभीर दृष्ट्या विचार करता शेकडो हजारो लोक आहेत हा खरा प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आपण या अफाट संख्येनं संवेदनाहीन होतो आहोत? जगात इतके बलात्कार होतात तर एका निर्भयाचा झाला तर काय फरक पडतो? जगात इतके मृत्यू होतात तर एकाचा अपघात झाला तर काय फरक पडतो? जगात इतक्या लोकांना वैद्यकीय उपचार मिळतच नाहीत आणखी काही जणांना नाही मिळाले तर काय फरक पडतो? काही जणांना वेदना होतात तर काय फरक पडतो? आपण "स्पेशल" गोष्टीबद्दल बोलतच नाही आहोत. आपण फक्त जिवंत ठेवण्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण एका अशा गोष्टी बद्दल बोलतोय की ज्यामुळे दोन डॉक्टर्स हे देवांत गणले गेले (http://en.wikipedia.org/wiki/Ashvins). आपण एका अशा परंपरेबद्दल बोलतोय जिथे एका डॉक्टरने दुसर्‍यांसाठी आपले प्राण अर्पण केले (http://en.wikipedia.org/wiki/Dwarkanath_Kotnis). जिथे एका डॉक्टरने दुसर्‍यांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं (http://en.wikipedia.org/wiki/Prakash_Amte). इतर डॉक्टरांना ते कदाचित शक्य नसेल पण त्यामुळे आदर्श गोष्टी कशा बदलतील? युग बदललं म्हणून काळ्या प्रॅक्टीसेस ना राजमान्यता मिळाली असं कधी होतं का? भ्रष्टाचाराचं आणि नफेखोरीचं इतरांनी समर्थन करणं आणि एका शिक्षकानं समर्थन करणं यात फरक असायला नको का? माझा व्यवसाय हा 'धंदा' आहे असं म्हणणारा वैद्य, सैनिक, मंत्री आणि गुरू हा तिरस्करणीयच हवा, कारण त्याला तो करायला कोणी भाग पाडलं नव्हतं. बाकी वकीली आर्ग्युमेंट मध्ये जिंकालही कदाचित तुम्ही.

In reply to by काळा पहाड

मी डॉक्टर नाही. वकीलही नाही. (हे उत्तर प्रांजळपणे दिले आहे, अपमानास्पद पद्धतीने बोललो तर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहणार? किमान तो असावा म्हणून तुमच्या पायरीला खाली उतरत नाहीये असे समजा) :) बाकी वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठे झालात की परत धागा वर काढा. आपण बोलू मग. ********************** आजचा सवाल - अकारण आक्रस्ताळेपणा करणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण समजावे काय? **********************

In reply to by मोदक

मोदकसाहेब, हलके घ्या असं सांगायला विसरलो. तुमच्या माझ्यात फरक आहे हे आधी कळालं असतं तर तुम्हाला उत्तर देण्याची 'हिमाकत' झाली नसती. तस्मात, क्षमस्व. विनोद करायचा एक (बहुधा अयशस्वी) प्रयत्न केला होता. असो. तुम्ही माझी पायरी दाखवून दिलीत हे बरं झालं. बाकी वाढदिवसाची भानगड कळाली नाही. तरी पण असोच.

In reply to by काळा पहाड

खरं म्हणजे आपल्या वरच्या प्रतिसादातला शब्द अन शब्द एखाद्या हिर्‍या मोत्यापेक्षा कमी नाहिये. पण हे खालचं वाक्य मला फारच कोडयात टाकतंय..जरा कृपा कराल का विस्तार करण्याची-
आणि तुमचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही सरकारला कर देता.
याशिवाय जी पवित्र कार्ये वर आपण वर्णिली आहेत त्यात करासंबंधी नक्की काय तरतुदी आहेत तेही सांगणेचे करावे...म्हणजे त्यात फायदा करून घेण्यासाठी ते सरकारला कर वगैरे काही देत नाहीत असं म्हणायचंय ते तर उघडच आहे. पण हे साध्य कसं केलं जात असेल?

In reply to by असंका

ज्याची जी क्षमता आहे, तेवढे तो पैसे मिळवतो. दुसर्‍याला मिळणार्‍या अधिकच्या पैशाकडे बघू सुद्धा नका.
याचीच दुसरी बाजू अशी, की अापल्या अाजूबाजूचे कसे जगतायत की मरतायत, अर्धपोटी, रस्त्यावर राहतायत का, याकडे बघू सुध्दा नका. फक्त अापल्याला ‘जास्तीत जास्त’ मोबदला मिळतोय ना, मग बाकी अापल्या अाजूबाजूला काही का परिस्थिती असेना! तुंम्हाला हा विचार खरंच पटतो? बाकी तुमच्या फावड्याने कंन्फ्यूज केले अाहे.

In reply to by स्वधर्म

याचीच दुसरी बाजू अशी, की अापल्या अाजूबाजूचे कसे जगतायत की मरतायत, अर्धपोटी, रस्त्यावर राहतायत का, याकडे बघू सुध्दा नका. फक्त अापल्याला ‘जास्तीत जास्त’ मोबदला मिळतोय ना, मग बाकी अापल्या अाजूबाजूला काही का परिस्थिती असेना! तुंम्हाला हा विचार खरंच पटतो?
हो. फक्त थोडा बदल करून, कारण आपले काय मत आहे माहित नाही, पण जगात मिळणार्‍या वस्तु एवढ्या जास्त नाहीत. त्या मिळवाव्या लागतात. त्यामुळे माझे मत असे- फक्त अापण ‘जास्तीत जास्त’ मोबदला "मिळवतोय" ना, मग बाकी अापल्या अाजूबाजूला काही का परिस्थिती असेना! आपल्या आजुबाजुची परीस्थिती म्हणजे काय हे आपल्याला कळत आहे असं आपल्या कुठल्याच प्रतिसादावरनं मला दिसत नाही. तेव्हा हे परीस्थितीचे दाखले देणं बंद करा किंवा अगदी विस्तृतपणे काय परीस्थिती आहे ते इथे सांगा. (बिनकामाचे उसासे टाकणं तुम्ही मी सांगून तर काही बंद करणार नाही. त्यापेक्षा जे काम करतायत (- हो, जास्तीत जास्त मोबदला घेऊन) त्यांना असंवेदनशील, माणुसकीहीन ठरवणं जास्त सोपंय. चालू द्या.)
बाकी तुमच्या फावड्याने कंन्फ्यूज केले अाहे.
मग वेगळ्या शब्दात सांगतो. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम". एखादी गोष्ट जर योग्य असेल, तर ती कुणी सांगितली याने काय फरक पडतो? रामाने तर रावणाकडनं ही सल्ला घेतला होता म्हणतात. मग अ‍ॅन रँड ही असायलम मध्ये गेली, तिने आत्महत्या केली, याचा तिने त्याच्या आधी जे लिहिलं आहे त्याच्याशी काय संबंध आहे? त्या एका घटनेमुळे तिने जे जे लिहिले ते सगळे चुक असं कसं म्हणता येइल? आपण त्याचा संदर्भ देणं ही मुळात एक असंबद्ध गोष्ट आहे, असं मला वाटतं.

In reply to by स्वधर्म

एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. आपली चप्पल तुटली तर चर्मकार त्याला टाका घालून देतो त्याला आपण १० रुपये देता. आपल्या पत्नीचे मंगळसूत्र वाढवले(तुटले) तर सोनार १० रुपयात काम करतो का? कि ५००/- रुपये घेतो. मग त्याच्या विरुद्ध काय कार्यवाही करता ? यात चपलेची किंमत ती काय आणि सोन्याच्या दागिन्याची किंमत काय? असा प्रश्न विचारला जातो.## मोटारसायकल चे सर्व्हिसिंग केले तर खर्च रुपये २५० येतो. सध्या कारचे केले तर २५००/- येतो. सफारी सारख्या गाडीचे १२०००/- येतो आणि मर्सिडिस एस क्लासचे सर्व्हीसिंग एक लाख रुपये आहे. काम एकच पण त्यावर लागणारी मजुरी मोटार सायकल ला १०० रुपये आहे सफारीला २०००/- आहे मर्सिडिस ला रुपये २०,०००/- आहे. असे का? बदललेल्या सुट्या भागाचे पैसे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ( मर्सिडीझच्या डावीकडच्या आरशाची किमत फक्त सव्वालाख रुपये होती २००४ मध्ये) धुलाई यन्त्राचा/ फ्रीज चा किंवा संगणकाचा घरी येणारा तंत्रज्ञ नुसते घरी येण्याचे ३५० रुपये घेतो. तितके पैसे आपल्या फ्यामिली डॉक्टरची व्हिजीट फी म्हणून देण्याची किती लोकांची तयारी आहे? यात दोन्ही लोकांच्या कौशल्याची पातळी एकाच आहे हे आपण गृहीत धरलेले आहे. ## याच न्यायाने आपल्या धुलाई यंत्राची/ फ्रीजची/ संगणकाची किंमत किती आणि आपल्या आयुष्याची किंमत किती? असो. डॉक्टर लुटालूट करतातच मग त्यांना कशाला फी द्यायची? कावीळ झाली कि सगळे जग पिवळे दिसते असे आमचे "हे" म्हणतात असे त्या "ह्या" म्हणत होत्या.

In reply to by सुबोध खरे

डाॅ. साहेब, चर्चा वळणावर अाणल्याबद्दल अाभारी अाहे. निदान अापण इतर गोष्टींशी तुलना करून काहीतरी बेसिस दाखवण्याचा प्रयत्न केला अाहे. मनापासून धन्यवाद. पण इथे एक गोंधळ होतोय. माझाच बरं का. यात मर्सिडीस हा प्रकार अापण सोडून देऊ, कारण त्यांचे प्रायसिंग हेच मुळी वेगळ्या बेसिसवर अाहे. ती गाडी म्हणे सामान्य कुणालाही घेताच येत नाही. अाणि काही (‘नतद्रष्ट’ ?) असेही म्हणतात, की ती म्हणे अालेला खर्च अाधिक योग्य नफा या किमतीला विकली, तर कोणी घेणारच नाही. तिच्या किमतीत समाजातल्या ‘फालतू’ लोकांनी ती घेऊच न शकणे, याचे मूल्य समाविषट अाहे. म्हणून तिची गोष्टच न्यारी. अापण सोडून देऊ. पण इतर उदाहरणे घेता येतील. यातला माझा गोंधळ असा: - अापण एकूण वैद्यकीय खर्चाविषयी बोलत नाही अाहोत. इथे बरीच चर्चा त्यावर झडलीय, पण तो मूळ मुद्दा नव्हता. शहरात वैद्यकीय खर्च चौपट वगैरे असणार हे मान्यच. शहरातले जागेचे भाव, कर्मचार्यांचे पगार हेही दुप्पट चौपट असतात. पण अापला मुद्दा फी विषयी अाहे. दुचाकीचा मेकॅनिक व सफारी कारचा मेकॅनिक यांच्या पगारात किती फरक असेल? मला वाटते जास्तीत जास्त पाच ते दहा पटीचा असू शकेल. अगदी खेड्यातला मेकॅनिक समजा महिना पाच हजार मिळबत असेल, तर मुंबईतला सफारीचा मेकॅनिक पन्नास हजार मिळवत असेलही. हा फरक १००/ २०० पटीचा नाहीए. महाकुशल डाॅ साध्या फॅमिली डाॅ.च्या फीच्याही कित्येक पट फी चार्ज करत अाहेत.
कावीळ झाली कि सगळे जग पिवळे दिसते असे आमचे "हे" म्हणतात असे त्या "ह्या" म्हणत होत्या.
हे कुणाला म्हणत अाहात माहीत नाही, पण, असं म्हणायची खरंच गरज होती का?

In reply to by स्वधर्म

@स्वधर्म साहेब आपण चर्मकाराच्या आणि सुवर्णकाराच्या मोबदल्याची तुलना सोयीस्करपणे विसरला आहात. मोटार सायकल आणि मोटार गाडीची देखरेख करणाऱ्या "व्यवसाय"करणाऱ्या तंत्रज्ञाची तुलना विसरलात आणि तुलना फक्त नोकरी करणाऱ्या तंत्रज्ञांची करता आहात. नोकरीत कधीच इतके पट पैसे मिळत नाहीत किबहुना बहुसंख्य कौशल्य असणारे लोक नोकरी न करत व्यवसाय करतात याचे हेच कारण आहे. माझे स्वतःचे उदाहरण देत आहे. मी लष्करातून निवृत्त होताना २००६ साली माझा पगार रु ४५,०००/- होता आणि माझा क्ष किरण तंत्रज्ञ बारावी + एक वर्ष प्रशिक्षण याचा पगार १५ हजार रुपये होता. माझी नोकरी २३ व्या वर्षी सुरु झाली आणि तो पगार १८ व्या वर्षपासून मिळवू लागला. त्याचा अनुभव ४ वर्षे होता आणि माझा १८ वर्षे होता. आता अशी आपल्याला सोयीस्कर तुलना करून आपल्याला सोयीस्कर अर्थ आपण काढत आहात याला पूर्वग्रह दुषित मत नाही तर काय म्हणायचे? रेअल स्किल ची महाप्रचंड फी -- मी एक उदाहरण देत आहे. मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक गरोदर स्त्री आली होती. तिची सोनोग्राफी करताना मला असे लक्षात आले कि तिच्या बाळाला ARNOLD CHIARI SYNDROME हा जन्मजात आजार आहे यात मूल कमरेपासून खाली लुळे असते आणी मेंदूत पाणी झाल्यामुळे मुलाचा बुद्ध्यांक पण कमी होतो ( मतीमंदता) जवळ जवळ पाऊण तास मी त्या मुलाची तपासणी करीत होतो. आणी एकदा पूर्ण खात्री झाल्यावर मी त्यांना सांगितले कि तुम्ही गर्भपात केला तर बरे होईल कारण असे मुल आयुष्यभर वाढवणे हा तुमच्यावर, त्या मुलावर आणी तुमच्या नंतर त्याच्या भावंडावर अन्याय आहे. तुम्ही एक सेकंड ओपिनियन घ्या. कारण माझ्यासाठी तुम्ही एक रुग्ण आहात पण तुमच्या साथी ते स्वतःचे मूल आहे. आणी तसे (सेकंड ओपिनियन) घेण्यासाठी मी लिहूनही दिले. या कौशल्यासाठी मी त्यांच्या कडून १५००/- (रुपये पंधराशे फक्त) घेतले तर ते महाप्रचंड होते का? मग मी चर्मकाराच्या १०० पट पैसे घेतले तेही चुकीचेच आहे का ? (किंवा सुवर्णकाराच्या दुप्पट पैसे घेतले) तुमच्या म्हणण्याप्रमाणे सिटी बसच्या ड्रायव्हरचे सुद्धा कौशल्य तितकेच आहे मग त्याच्या कौशल्याला इतके पैसे कमी का? आणखी काय लिहावे?

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब - तुम्ही प्रतिवाद करायचे कष्ट घेऊ नका. तुम्हाला जस्टीफाय करायची काही गरज नाही. लोकांना दारू, गाड्या, फ्लॅट, फर्निचर, इंटीरीअर ह्यांच्यावर पैसे खर्च करायला पैसे आहेत, पण डॉक्टरची फी द्यायला नाहीत. माझ्या मते डॉक्टर च्या ज्ञान आणी कौशल्या पेक्षा डॉक्टर्स कमीच फी घेत आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

इतक्या महत्वाच्या सल्ल्यासाठी १५०० रुपये योग्यच आहेत ...आणि तो सल्ला अत्यंत स्पष्टपणे दिल्याचा फार मोठा दिलासा आहे ... दुर्दैवाने असे अनुभव जर यायचेच असतील तर ते अशा पद्धतीने आलेले त्यातल्यात्यात चांगले ... कुठल्याही विषयातल्या तज्ञाने आपले मत हे (जरूर पडल्यास शक्याशक्यतेचा उल्लेख करून) निस्संग्न्निध आणि ठासून दिलेले असावे ... ( आज उत्तर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाउस होण्याची शक्यता आहे टाईप घुमवले जाणे नको) असो ...

In reply to by अत्रन्गि पाउस

काय करताय डॉक्टरसाहेब? कुणाकडून किती अपेक्षा ठेवताय? जरा मऊ लागलं तर कोपरापासून खणून बघतात लोक. त्यांना काय विचारताय जास्त झाले का कमी? या विषयावर भाष्य करायची आपली जागा नाही ही जाणीव पण नाही इथे कुणाला. समजा ते म्हणाले फारच जास्त घेतलेत मग?

In reply to by सुबोध खरे

अापण जी केस सांगितली, त्यात अापण दिलेली सेवा, सल्ला हा पैशाने मोजता येणारा नाही. तुंम्ही केलेले निदान, दिलेला सल्लाही हार्ट सर्जरी इतकाच जीवन-मरणाचा सवाल अाहे. अापण लावलेली फी रिझनेबल अाहे, हे दिसतेच अाहे. त्यात सगळा सेट-अप, कर्मचार्यांचा पगार, इतर ओहरहेड्सही अाले, असे गृहित धरतो. साधा हिशोब करता अापल्या तुलनेतही हार्ट सर्जनचे चार्जेस सहा - सात पट अाहेतच. मला एक सामान्य माणूस म्हणून तुमचे कौशल्य, ज्ञान, जबाबदारी हार्ट सर्जनहून तितक्या पटीत कमी वाटत नाही. तुंम्हाला ते तसे वाटते का? तुंम्हाला काय वाटते हे फार महत्तवाचे अाहे, कारण अांम्ही अशी कौशल्यांची तुलना करूच शकत नाही. अाणि म्हणूनच धागा काढला होता. माफ करा, तुंम्ही व्यक्तीगत संदर्भ दिल्याने, हा प्रश्न व्यक्तीगत झाला अाहे. मी चर्मकार - सुवर्णकार तसेच सर्वांना समान मोबदला असे कधीच म्हणालो नव्हतो, तो फरक जरूर असावा असेच मत होते. फक्त त्यात एवढी प्रचंड डिसपॅरिटी का दिसते, ती कितपत बरोबर अाहे, याविषयी इतरांना काय काय वाटते हे जाणून घेण्यात रस होता. पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

तीन चार दिवसांनी धाग्यावर अालो तर पुन्हा बर्याच प्रतिक्रीया अालेल्या दिसल्या. डाॅ. खरे यांनी बरेच प्रतिसाद दिले अाहेत. मला मात्र डाॅक्टरसाहेबांनी वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असेल, ही अाशा होती. ही सगळी चर्चा प्रमाणाची, तफावतीची अाहे. त्यांचे मत महत्वाचे अाहे, असे माझे अजूनही मत अाहे. वाट पहाणारा, - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

स्वधर्म साहेब तुम्ही कोणताही चष्मा लावत नाही त्यामुळे मी स्व्च्छ मनाने उत्तर देत आहे. हृदय शल्य चिकित्सकाच्या आयुष्याचा लेखा जोखा-- एक हृदयाची शल्यक्रिया करणारा डॉक्टर एम बी बी एस नंतर कमीत कमी सहा वर्षे (तीन वर्षे एम एस साठी आणि जर पुढे प्रवेश मिळाला तर एम सी एच साठी तीन) पदवी मिळवण्यासाठी शिकत असतो. यानंतर साधारण पाच ते सात वर्षे त्याला प्रत्यक्ष शल्यक्रियेचा अनुभव घेण्यासाठी लागतात. एम सी एच केल्यावर कोणी त्याला लगेच बायपास ची शल्यक्रिया करू देत नाही. एवढा अनुभव घेतल्यावर ती सर्जन बाजारात उतरतो. तोवर त्याचे वय कमीत कमी ३५ असते. या वयाला त्याला सहाय्यक सर्जन म्हणून मोठ्या रुग्णालयात नोकरी मिळते ज्यात त्याचा पगार आजमितीला दीड लाखच्या आसपास असतो. साधारण एखाद्या प्रथितयश सर्जनच्या बरोबर तो काम करू लागल्यावर दोन एक वर्षाने त्याला सहाय्यक म्हणून रुग्णाकडून मिळणार्या सेवाशुल्कातील भाग मिळतो. अशी अजून दोन तीन वर्षे काढल्यावर तो पूर्ण वेळ हृदय शल्य चिकित्सक म्हणून काम करू लागतो. या वेळेपर्यंत त्यःच्या कामाची वेळ सकाळी ७ पासून रात्री कितीही आणि रविवारी अर्धा दिवस. कारण सकाळी सात वाजता आदल्या दिवशी शल्यक्रिया केलेल्या रुग्णांच्या प्रगतीचा आढावा (प्रथम आय सी यु आणि नंतर वार्डात) आणि त्याबरोबर सल्ला. किंवा जो रुग्ण डिसचार्जवर जाणार आहे त्याच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता. हे सर्व करेपर्यंत नउ वाजतात. यानंतर तो शल्य क्रिया गृहात जातो. जर दोन शल्यक्रिया असतील आणि सर्व व्यवस्थित असेल तर त्या आटोपेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजतात. जेवण शल्यक्रियागृहातच आटोपले जाते. यानंतर तो बाहेर येऊन तो आय सी यु मध्ये असलेले आजचे आणि कालचे रुग्ण पाहायला जातात. त्यांचे सर्व आटोपेपर्यंत सात वाजतात. यानंतर तो शल्यचिकित्सक बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासणी करतो. बायपाससाठी आलेल्या रुग्णांच्या अन्जीयोग्राफी इ पाहून त्यांना सल्ला देणे शल्यक्रिया आवश्यक असेल तर त्याची तारीख देणे. रुग्णाशी सल्लामसलत करणे आणि बायपासच्या बद्दल आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीची कल्पना देणे. इ इ या सर्व गोष्टीना कितीही वेळ लागू शकतो. हे सर्व जर प्रथितयश शल्यचिकित्सका बद्दल आहे. होतकरू शल्यचिकित्सकाला एकाच ठिकाणी एवढे रुग्ण मिळत नाहीत त्यामुळे त्याला दोन अजून ठिकाणी पॉली क्लिनिक किंवा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग चालवावा लागतो. अशात येणारे अर्धे रुग्ण हे "सेकंड ओपिनियन" वाले असतात.म्हणजे तास दीड तास घालवून अन्जीयोग्राफी इ पाहून एक हजार रुपये घेताना रुग्णाच्या नातेवाईकांच्या शिव्या हि खायला लागतात. (नुसते रिपोर्ट पहायचे १००० रुपये फार होतात म्हणून). हे सर्व कमी म्हणून रविवारी सकाळी सुद्धा शनिवारी शल्यक्रिया केलेल्या रुग्णांना पाहायला यावे लागते. त्यातून आपण शल्यक्रिया केलेला रुग्ण रात्री अपरात्री धापा टाकू लागला तर आपली झोप अर्धवट टाकून यावे लागते. रुग्ण दगावला तर त्यामुळे कुरतडणारे मन शिवाय त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारे शिव्याशाप. हे सर्व मिळून अर्धे आयुष्य संपल्यावर मिळणारा चाळीशीनंतर थोडाफार पैसा सुद्धा लोकांच्या डोळ्यात येतो. त्यातून डॉक्टर नीतू मांडके सारख्या उत्कृष्ट सर्जनला तणावामुळे आलेला अकाली मृत्यू पहिले कि असे वाटते कि कितीही मोबदला दिला तरी तो अपूर्णच आहे. आमच्या सख्ख्या काकांची बायपास सर्जरी मी पाहिली आहे. त्यांचे शल्य्क्रीयेला घेण्यापूर्वी बिघडत चाललेलं हृदय मी पाहात होतो असे असताना प्रत्यक्ष शल्यक्रियेच्या दरम्यान एकाच विचार डोक्यात होता कि जर त्यांचे हृदय चालू झालेच नाही तर काय? आपल्या काकांचे असे अंत्य दर्शन आपल्याला घ्यावे लागेल काय हा विचार आजही मी माझ्या चुलतभावाल आणी बहिणीला बोलून दाखवलेला नाही. सुदैवाने आमचे काका ८ वर्षानंतर आजही सुस्थितीत आहेत. यासाठी ७००००/- च काय तीन लाख जरी दिले तरी ते कमी होतील. . या तुलनेत मी अगदी पंचेचाळीस मिनिटे घालवून रुग्णाकडून १५००/- रुपये घेतो तेंव्हा रुग्ण माझ्या दवाखान्याच्या बाहेर पडला कि मी सुद्धा दवाखान्याला कुलूप लावून बाहेर पडू शकतो. रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी मिसळपाव कट्ट्यावर उपस्थित राहू शकतो. अर्थात सर्वच रुग्णांकडून १५००/- मिळत नाहीत साधी सोनोग्राफी असेल तर ८००/- किंवा १०००/- मिळतात. दर दिवसाआड एखादा रुग्ण १०००/- रुपये जास्त आहेत हे म्हणतोच परंतु मी त्यांना सांगतो कि हा माझा दर आहे. सार्वजनीक किंवा सेवाभावी संस्थानी चालविलेल्या केंद्रात करून घ्या तेथे ६०० ते ७०० रुपयात होईल.मी एक साधे उदाहरण देतो. मुलुंड हून अंधेरीला गेलात तर रेल्वे चे तिकीट १० रुपये, बसचे २५ रुपये, रिक्षाचे २०० रुपये TAXI चे ३०० रुपये आणी मेरू चे ४०० रुपये होतात. तुम्हाला जे परवडते ते तुम्ही स्वीकारा. जे लोक महापालिकेच्या रुग्णालयातून येतात त्यांना मी हटकून सवलत देतो. पण जे लोक सवलत घेणे हा आपला हक्क समजतात अशा दीड शहाण्या लोकांना मी एक रुपया सुद्धा सवलत देत नाही. मी वरिष्ठ नागरिकांना एक रुपया सुद्धा सवलत देत नाही.( याचे कारण नंतर केंव्हा तरी). एका दीड शहाण्या एन जी ओ बाईने समाजसेवा नावाची काही गोष्ट आहे कि नाही असा टेचात सवाल विचारला होता तेंव्हा तिला मी स्पष्ट शब्दात विचारले कि तुम्ही कधी दोन दिवस म्यागी खाऊन काढले आहेत काय/ किंवा कधी मिल्कमेड आणी पाव खाल्ला आहे काय? मी लष्करात हे सर्व केले आहे. २३ वर्षे मी लष्करात माझे तारुण्य घालवले आहे तेंव्हा मला सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी करीन. तुमच्या एन जी ओ चे पैसे कुठून येतात आणी त्याचा लेखाजोखा काय आहे ते मला माहिती आहे माझे तोंड उघडायला लावू नका असे म्हणून तिला स्पष्ट शब्दात गेट आउट म्हणून सांगितले माझे सोनोग्राफी यंत्र २५ लाख रुपयाचे आहे. आणि त्याच्या वार्षिक देखभालीचा खर्च(AMC) २ लाख रुपये आहे( ८%) कर्जाचा हप्ता आणी व्यावसायिक जागेचे भाडे असताना मला लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वस्तात सोनोग्राफी करणे परवडेल काय? असे असूनही मला आयुष्यात कधीही हृदय शल्यचिकित्सक व्हावेसे वाटले नाही किंवा त्यांच्या बद्दल असूयाही वाटली नाही. वाटली ती करूणाच. याचे कारण ज्यांचा व्यवसाय चालत नाही किंवा दुर्दैवाने व्यवसायाच्या सुरुवातीला अपयश आल्याने कच खाऊन वर्षानुवर्षे एक ते दीड लाखावर प्रथितयश सर्जनचे सहाय्यक म्हणून दहातील सात हृदय शल्यचिकित्सक दिवसातील बारा तास काम करीत आहेत हि वस्तुस्थिती आहे. हि परिस्थिती कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणून नाही. अखिल भारतीय परीक्षेत मी तिसरा आलो असताना मी रेडीयोलोजी घेतले कारण मला इतर लोकांपेक्षा स्वतःचे कुटुंब जास्त प्यारे आहे. आयुष्यभर समाजसेवा करण्याचा माझा पिंड नाही. आयुष्यात फार काम केल्याने कुणाचे भले झाले आहे यावर माझा विश्वास नाही. मी कधीच दिवसात ८ तासापेक्षा जास्त काम करू शकत नाही. मग मला जेवढे मिळते त्यात मी आनंदी आहे. माझ्याकडे इंडिका आहे आणी मी होंडा युनिकोर्न या मोटार सायकलीवर आनंदात फिरतो. यावर काही विद्वान लोक त्यांची तुलना चेनचोर किंवा पाकीटमार किंवा दरोडेखोरांबरोबर करतात बायपासची आवश्यकताच नाही असे म्हणतात. किंवा त्यांची तुलना ड्रायव्हरच्या कौशल्याबरोबर करतात त्याला काय म्हणावे? याहून अधिक काय सांगावे?

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद प्रचंड आवडलेला आहे आणि १००% सहमत आहे. शाळेमधल्या डॉक्टर झालेल्या दोन जणांची सर्जन होण्यासाठी चाललेली धडपड नेहेमी पाहाण्यात येते.

In reply to by सुबोध खरे

आपल्या संतुलित प्रतिसादांचा मी नेहेमीच चाहता राहिलो आहे ... फार छान समजावून सांगितलेत ... खरोखरच कठीण परिस्थिती आहे ...

In reply to by सुबोध खरे

डाॅक्टरसाहेब, मनात अालेल्या साध्या विचारावर मी एक पोस्ट लिहीली अाणि त्यावर अनेक प्रतिक्रीया अाल्या. अत्यंत सुदैवाचा भाग म्हणजे तुमच्यासारख्या डाॅक्टरांनीही त्यावर लिहीले. वर तुंम्ही जो ‘हृदय शल्य चिकित्सकाच्या आयुष्याचा लेखा जोखा’ समजावून सांगितला अाहे, तसा माझ्यासारख्या सामान्य माणसाला कधीच समजला नसता. म्हणूनच तुम्हाला काहीसा व्यक्तीगत वाटणारा प्रश्न विचारताना अवघड वाटत होते, तरी विचारला व तुमच्या उत्तराची वाट पहात राहिलो. अाज रात्री तुमचा प्रतिसाद वाचल्यावर हा धागा काढल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. एखादा माणूस हृदय शल्य चिकित्सक होतो, त्याच्यामागे काय असते, हे एरव्ही फी मोजूनही कळले नसते. एम बी बी एस नंतर सहा वर्षे शिक्षण, पाच ते सात वर्षे सहाय्यक म्हणून काम व त्यानंतर स्वतंत्रपणे हृदय शल्य चिकीत्सक होणे. त्यातही दहापैकी तीनच लोकांना स्वतंत्र काम करायला मिळणे ही अतिदुर्मिळ कौशल्यामागची तपश्चर्या केवळ तुंम्ही सांगितल्यामुळेच समजली. या धाग्यावर अालेल्या फार थोड्या लोकांनाच ही पार्श्वभूमी माहीत असेल, अशी शक्यता अाहे. तुंम्ही ती इतक्या सुंदर (काहीतरी त्यापेक्षा चांगला शब्द हवा) रीतीने समजून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. विशेष म्हणजे तुंम्ही एखाद्या हृदय शल्य चिकित्सकाकडे कसे पाहता, हे ज्या मोकळेपणाने कसलाही अाव न अाणता, सांगितले अाहे, तसा नितळ दृष्टकोन ही खास दाद देण्यासारखी गोष्ट! एखाद्या गोष्टीबद्दल अापला काही दृष्टीकोन असावा, त्यातल्या खाचाखोचा नंतर अाधिकारी माणसाने दाखवून द्याव्यात, हळूहळू अापल्याला उलगडत जावे अाणि शेवटी अापल्याला त्यातली मेख कळो यावी, हे अमूल्य अाहे. मी अाता हृदय शल्य चिकीत्सकाकडे एका वेगळ्याच नजरेने बघू शकेन. पैसा अाणि कौशल्य यापेक्षा अाधिक काहीतरी मला नक्की दिसेल. हा दृष्टीकोनातला बदल, ही अमूल्य भेट दिल्याबद्दल मनापासून अाभार मानतो. - स्वधर्म मिपा राॅक्स!!