Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 01:06
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
माहिती
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे. हा प्रवास एकूण बारा टप्प्यांत होणार आहे आणि त्याला एकूण पाच महिने लागतील असा अंदाज आहे. पहिला टप्पा : अबू धाबी ते मस्कत : ०९ मार्च २०१५ उड्डाण : संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीतील अल् बतीन विमानतळ; स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी ७:१२ ला. पोहोचले : ओमानामधील मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ; रात्री ८:१३ वाजता. अंतर : ४०० किलोमीटर. उड्डाणाची वेळ : १३ तास १ मिनिट. उड्डाणात विमानाने गाठलेली उच्चतम उंची : ५,७९१ मीटर. दुसरा टप्पा : मस्कत ते अहमदाबाद. तिसरा टप्पा : अहमदाबाद ते वाराणसी. पुढचा प्रवास : वाराणसी - मंडाले (ब्रम्हदेश) - चोंगचिंग (चीन) - नानजिंग (चीन) - हवाई (यु एस ए) - फिनिक्स अ‍ॅरिझोना (यु एस ए) - मध्य यु एस ए - न्यू यॉर्क (यु एस ए) - युरोप / उत्तर आफ्रिका - अबू धाबी. खालील चित्रे सोलार इंपल्सच्या अधिकृत संस्थळावरून घेतली आहेत... या प्रवासाचे धावती माहिती येथे मिळेल. .  .  .  ================================================================== संबद्धित माहिती : * या वैमानिक जोडगोळीने १९९९ मध्ये "ब्रीटिलंग ऑर्बायटर ३" नावाच्या आकाशप्लवाच्या (balloon) साहाय्याने १९ दिवसांत न थांबता पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विक्रम केला आहे. * सोलार इंपल्स १ ने ७-८ जुलै २०१० ला केवळ सौरऊर्जा वापरून स्वबळावर उडून करून दिवस-रात्र सतत २६ तास उडण्याचा विक्रम केला आहे. त्यातले ९ तास रात्रीचे होते. * सोलार इंपल्स १ ने केवळ सौरऊर्जा वापरून सतत ३६ तास उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे. ==================================================================
  • Log in or register to post comments
  • 23317 views

प्रतिक्रिया

Submitted by स्रुजा on Tue, 03/10/2015 - 01:13

Permalink

छान माहिती दिलीत. मागच्या

छान माहिती दिलीत. मागच्या आठवड्यात पहिल्यांदा वाचली बातमी पण एवढा मोठा पल्ला गाठणार आहे हे त्यात नव्हतं. पंख एवढे मोठे का आहेत? का तेच सोलार पॅनेल आहेत? शेपटीच्या मागे पण दिसतंय पॅनेल सारखं काही तरी. तुम्ही दिलेली लिंक घरी जाऊन बघते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 01:20

In reply to छान माहिती दिलीत. मागच्या by स्रुजा

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद ! पंख जेवढे जास्त मोठे तेवढे त्यांची सौरउर्जा मिळविण्याची क्षमता वाढते. केवळ पंखच नाहीत तर विमानाच्या सर्व वरच्या पृष्ठभागावर सोलर पॅनेल्स आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 03/10/2015 - 01:15

Permalink

होय. आजच संध्याकाळी हे विमान

होय. आजच संध्याकाळी हे विमान मस्कत विमानतळावर उतरले. अनेकांनी हा अविस्मरणिय सोहळा याची देही याची डोळा पाहिला. दुर्दैवाने मी विमानतळावर जाऊ शकलो नाही. असो. अबुधाबी ते मस्कत १३ तास म्हणजे बराच जास्त काळ आहे. रस्त्याने कार प्रवासही ह्याच्या अर्ध्यावेळात होईल. इतका वेळ का लागावा कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 01:29

In reply to होय. आजच संध्याकाळी हे विमान by प्रभाकर पेठकर

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद ! सद्याचे सौरउर्जा मिळविण्याचे तंत्र आणि या विमानाचे हलके वजन यांचा विचार करता या विमानाचा वेग नेहमीच्या विमानांपेक्षा कमी असणे सहाजिक आहे. तसे बघितले तर हे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेतच आहे. पण असले प्रयोग त्या तंत्रज्ञानाच्या प्रगतितील मैलाचे दगड आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 03/10/2015 - 07:34

In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सहमत.

सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/10/2015 - 01:18

Permalink

क्रांतिकारी प्रकल्प

हा प्रकल्प यशस्वी झाल्यास सौरौर्जेच्या वापरामधील तो मैलाचा दगड ठरेल. या विमानाच्या प्रवासाचा पुढचा टप्पा भारतात असल्याने आनंद वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 01:29

In reply to क्रांतिकारी प्रकल्प by श्रीरंग_जोशी

Permalink

धन्यवाद ! सहमत.

धन्यवाद ! सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 01:31

Permalink

प्रवासाच्या मार्गाचा नकाशा...

प्रवासाच्या मार्गाचा नकाशा... Image removed. (जालावरून साभार)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 03/10/2015 - 01:37

Permalink

मस्तच!

रोचक आहे. फक्त आणिबाणीकरता कोणतेही इंधन नसणे जरा रिस्की प्रकार वाटला. विशेष करून ते विमान जेंव्हा प्रशांत आणि अ‍ॅटलांटीक महासागरावरून प्रवास करेल तेंव्हा!
  • Log in or register to post comments

Submitted by सांगलीचा भडंग on Tue, 03/10/2015 - 02:09

Permalink

.

वा भारता मधील टप्पे पाहून आनंद झाला.सोलर पोवर बहुतेक पुढच्या काळातील महत्वाचा उर्जा स्त्रोत असेल
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 03/10/2015 - 03:17

Permalink

ऐकल होतं बातमीत, अन वाट पहात

ऐकल होतं बातमीत, अन वाट पहात होते जास्तीच्या माहितेची. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 03/10/2015 - 06:50

Permalink

एअरबस ३४० इतके लांब पंख, १६००

एअरबस ३४० इतके लांब पंख, १६०० - २००० किलोच्या मधलं वजन आणि या सर्वात एकच सीट, तीही पायलटची.. ७० किलोमीटर प्रतितासाचा मॅक्झिमम क्रूझिंग स्पीड..बाकी वाढीव वेग मिळालाच तर वातकृपेवर अवलंबून. समोरुन प्रचंड वारा असेल तर जागच्याजागी जॉगिंगचा प्रकार. सर्विस सीलींग सत्तावीस हजार फुटांहून जास्त, पण केबिन प्रेशराईज्ड नाही, त्यामुळे मनुष्य श्वास घेईल इतपत आल्टिट्यूडच शक्य (१०-१२ हजार फूट). अन्यथा ऑक्सिजन सिलिंडर नाकात लावून घेऊन जायला हवे. त्यामुळे साध्या प्रवासालाही अनेक दिवस.. पृथ्वीप्रदक्षिणेला तर महिने.. हे सर्व जेट आणि फॉसिल फ्युएलवर चालणार्‍या विमानांशी तुलनाही करु नये इतकं अव्यवहार्य वाटेल, सध्या मेणबत्यांच्या ज्योतीवर बॉयलर चालवण्याचा प्रकार आहे असं वाटेल. पण ही सुरुवात आहे. त्यामुळे कौतुकास्पदच. मुख्य ब्रेकथ्रू या सौर ऊर्जेच्या क्षेत्रात हवा आहे तो कमी क्षेत्रफळावर जास्त ऊर्जा कॅप्चर करण्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Fri, 06/24/2016 - 07:19

In reply to एअरबस ३४० इतके लांब पंख, १६०० by गवि

Permalink

Energy

Apali zad karatat baghata has pralay.. Max utilization of energy without creating any garbage and creating useful stuff in d process..
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 03/10/2015 - 07:35

Permalink

ग्रीन फ्लाईटच्या ह्या

ग्रीन फ्लाईटच्या ह्या उपक्रमास अनेक शुभेच्छा!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 03/10/2015 - 07:37

Permalink

@इए काका @गवि,

@इए काका @गवि, विमानाविषयी जास्त तांत्रिकी माहिती जमली तर लिहाल का?
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Tue, 03/10/2015 - 07:41

In reply to @इए काका @गवि, by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

+ १. असेच म्हणते.

+ १. असेच म्हणते. ए काका, पंखांच्या खुलाशाबद्दल धन्यवाद. अजून पण लिहा प्लीझ. गवि तुमच्याकडून पण अजून जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 03/10/2015 - 07:58

In reply to + १. असेच म्हणते. by स्रुजा

Permalink

+3

+3 मुख्यत: स्पीड इतका कमी असलेल्या विमानाचे उड्डाण कसे काय शक्य होते? की तेव्हढ्या पुरते पर्यायी इंधन वापरतात?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/10/2015 - 08:47

Permalink

तुलनात्मक स्पेक्स

या विमानाची क्षमता समजुन घेताना दुसर्‍या एखाद्या भरपूर वापरल्या जाणार्‍या विमानाबरोबर तुलनात्मक आकडेवारी मांडाविशी वाटली. दोन्ही आकडेवार्‍या विकीवरून साभार. Cessna 152 Solar Impulse 2 Image removed. Image removed. Crew 1 pilot + 1 passanger 1+1 Length 24 ft 73.5 ft Wingspan 33 ft 236 ft Height 8 ft 6 in 20.9 ft Wing area 160 ft² 269.5 m2 Empty weight 490 kg Loaded weight: 2,300 kg Max. takeoff weight757 kg 2,000 kg Maximum speed 110 knots (204 km/h) 77 kts (140 km/h) Cruise speed 107 knots (198 km/h) 90 km/h Takeoff speed35 kmph Range 477 mi (414 nm, 768 km) Service ceiling 14,700 ft (4,480 m) 27,900 ft ( 8,500 m)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 03/10/2015 - 09:10

In reply to तुलनात्मक स्पेक्स by श्रीरंग_जोशी

Permalink

सर्व्हिस सिलिंग काय प्रकार

सर्व्हिस सिलिंग काय प्रकार आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/10/2015 - 09:15

In reply to सर्व्हिस सिलिंग काय प्रकार by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कमाल उंची

आदर्श परिस्थितीमध्ये ज्या कमाल उंचीवरून विमान उड्डाण करू शकते ती उंची (असा माझा समज आहे) . Service ceiling. The maximum density altitude where the best rate-of-climb airspeed will produce a 100-feet-per-minute climb at maximum weight while in a clean configuration with maximum continuous power. विकी दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 03/10/2015 - 09:17

In reply to कमाल उंची by श्रीरंग_जोशी

Permalink

वोक्के!!! पहातो नंतर.

वोक्के!!! पहातो नंतर.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/10/2015 - 09:47

Permalink

गविंचे या विषयासंबंधीत लेख

या विषयावर चर्चा करताना अनेक तांत्रिक गोष्टींना सामोरे जावे लागते ज्या समजून घेण्यास क्लिष्ट असू शकतात. गवि यांचे या विषयावरील लेखन या ठिकाणी उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. खालील प्रतिसादात ते सर्व दुवे एकत्र देण्याचा प्रयत्न केला होता.
  • गविंचे या विषयासंबंधीत लेख
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 20:40

Permalink

दुसरा टप्पा : १० मार्च २०१५ :

दुसरा टप्पा : १० मार्च २०१५ : सोलर इंपल्सने सकाळी ६:३५ ला मस्कतहून भरारी घेतली आणि अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रिय विमानतळच्या दिशेन मार्गक्रमण सुरू केले. या १४६५ किमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये बरट्रांड पिकार्ड वैमानिकाची भूमिका बजावित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/10/2015 - 22:46

Permalink

सोलर इंपल्स २ भारताच्या

सोलर इंपल्स २ भारताच्या वायूहद्दीत पोहोचले आहे आणि थोड्याच वेळात अहमदाबादला उतरणार आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा (रात्री १०:३० वाजता) थोडा उशीर झाला आहे. पण अश्या प्रकल्पात हे नविन नाही. थोड्याच वेळात हे अव्दितिय विमान प्रथमच भारताच्या भूमीला स्पर्श करेल. आदित्य बिर्ला गृप या प्रकल्पाचा भारतिय यजमान आहे. खालील दुव्यावर धावते समालोचन पाहता येईल...
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 03/15/2015 - 13:10

Permalink

सोलार इंपल्स २ आणि भारत...

१. भारतातील तंत्रज्ञ आणि कंपन्याचा सोलार इंपल्स २ च्या बांधणीत महत्वाचा हातभार लागला आहे. २. विमानोड्डाण चालू असताना वैमानिकाला उत्तम शारिरीक आणि मानसिक अवस्थेत ठेवण्यासाठी योगाचे सहाय्य घेतले जात आहे. त्याबद्दल खालील व्हिडिओ क्लिपमध्ये माहिती आहे... . Image removed. Deep relaxation with portable Shirodhara prepares the mind for alertness and concentration #RTW http://t.co/za5cgGV14Z
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sun, 03/15/2015 - 15:52

Permalink

किती छान!

किती छान! जगलोवाचलो तर अजून २०-३० वर्षांनी आपण सोलर विमानातून प्रवास करणार म्हणजे!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 06/13/2015 - 02:05

Permalink

महत्वाचा टप्पा

शक्यतो मी जुने धागे वर आणत नाहे पण आज अपवाद करत आहे. या प्रकल्पातला सर्वाधिक महत्वाचा टप्पा म्हणजे आशियातून पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांवर सोलार इंपल्स २ या विमानाद्वारे पोचणे. चीनमधून निघालेली सलग पाच दिवसांची ही फ्लाइट खराब वातावरणामुळे १ जुन रोजी जपानमध्ये उतरवावी लागली. आता सलग चार दिवसांचा प्रवास आहे. खराब वातावरण किंवा यांत्रिक बिघाड झाल्यास पॅराशुटने सुटका करून घेतल्यावर छोट्याशा राफ्टच्या सहाय्याने (मदत पोचेपर्यंत) समुद्रात तरंगत राहायचे आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यास सोलार प्लेनने सर्वाधिक लांबच्या फ्लाइटच्या प्रवासाचा विक्रम तर होईलच तसेच आजवरचे सर्वाधिक काळ चालणारी फ्लाइट म्हणून इतिहासात नोंद होईल. André Borschberg व Bertrand Piccard या पायलट द्वयीला व सोलार इंपल्स २ च्या चमूला मन:पूर्वक शुभेच्छा!! या संदर्भातली बातमी: Solar Impulse to fly world's longest solo flight from Japan to Hawaii Image removed. जपानमधील विमानतळावरच्या हॅन्गरमधले सोलार इंपल्स २ विमान फोटो जालावरून साभार.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 06/13/2015 - 10:04

In reply to महत्वाचा टप्पा by श्रीरंग_जोशी

Permalink

उत्सुकता आहेच. सोलर इम्पल्सला

उत्सुकता आहेच. सोलर इम्पल्सला मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 06/13/2015 - 11:28

Permalink

सोलार इंपल्स २ च्या ताज्या

सोलार इंपल्स २ च्या ताज्या बातम्या आणि अनेक व्हिडिओ-क्लिप्ससह असलेली इतर माहिती या अधिकृत संस्थळावर पाहू शकाल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/29/2015 - 09:43

Permalink

जपानहून उडाले

हवामान सोयीचे नसल्याने जवळपास चार आठवड्यांपासून जपानमधील नागोया विमानतळावर सोलार इंपल्स २ थांबले होते. अखेर आज त्याने उड्डाण केले आहे. बातमी: Solar Impulse begins second bid to cross Pacific Ocean. Image removed. फोटो सौजन्य - बीबीसी. दोन्ही वैमानिक व या प्रकल्पाच्या चमूला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 06/29/2015 - 12:09

Permalink

उड्डाणाची १२ तास ३६ मिनिटे (साधारण १०%) पूर्ण...

नागोया (जपान) ते हवाई उड्डाणाची १२ तास ३६ मिनिटे (१०%) पूर्ण... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 07/01/2015 - 23:45

Permalink

अर्धे अंतर संपले

या टप्प्यातले अर्धे अंतर संपले आहे. सोलार विमानाद्वारे आजवरच्या सर्वाधिक लांबीच्या (वेळ व अंतर दोन्ही) उड्डाणाचा विक्रम झाला आहे. संबंधीत बातम्या:
  • Solar Impulse covers half the distance on longest solo flight to Hawaii
  • Solar Impulse 2 making good progress, breaks records on epic Pacific journey
Image removed. वैमानिक Andre Borschberg योग करताना (फोटो जालावरून साभार).
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 07/03/2015 - 21:06

Permalink

आता पासून काही मिनिटात सोलार

आता पासून काही मिनिटात सोलार इंपल्स २ हवाई बेटावर उतरेल. हा आतापर्यंतच्या खनिज तेल विरहित आणि केवळ सौर्यउर्जेवर चालवलेल्या विमानाचा जागतीक विक्रम आहे. TIME OF DEPARTURE : 28/06/2015 18:03 UTC FLIGHT TIME : 4d 21h 31m 31s DISTANCE : 8246 km (99 %) ALTITUDE : 1580 ft (482 m) BATTERIES CHARGE : 30% (discharging) ENERGY NEUTRAL IN : 2h 03m GROUND SPEED : 21.2 KTS (39 km/h)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 07/03/2015 - 23:19

Permalink

यशस्वी

या मोहिमेचा सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. संबंधीत बातम्या:
  • Solar Impulse plane lands in Hawaii
  • Solar plane lands in Hawaii, ending perilous leg of around-the-world journey
  • Solar Impulse: One Giant Leap for Green Energy
Image removed. पायलटद्वयीचा फोटो बीबीसीवरून साभार.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 07/16/2015 - 04:14

Permalink

आता थेट एप्रिल २०१६

जपान ते हवाई या प्रवासादरम्यान ओव्हरहिटींगमुळे सोलार इंपल्स २ च्या बॅटरीजचे नुकसान झाले आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अधिक सुर्यप्रकाशाचा काळ संपून जाईल. त्यामुळे पुढचा टप्पा आता थेट एप्रिल २०१६ मध्ये सुरु होईल. बातमी: Battery damage grounds Solar Impulse 2 until 2016
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 04/22/2016 - 00:27

Permalink

पुन्हा सुरु

मोठ्या खंडानंतर ही मोहिम पुन्हा सुरु झाली आहे. हवाई बेटांवरील एका विमानतळावरून सोलार इंपल्स २ विमानाने उड्डाण केले आहे व ते सॅन फ्रॅन्सिस्को येथे उतरणार आहे (लाइव्ह स्ट्रीम). संबंधीत बातमी: Solar Impulse sets off for California after long lay-off
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 04/24/2016 - 12:23

Permalink

उड्डाणाचा ९वा टप्पा पूर्ण

उड्डाणाचा ९वा टप्पा पूर्ण करून सोलार इंपल्स २ अमेरिका खंडात दाखल ! हवाई बेटावरून उडाल्यानंतर ६२ तासांचा प्रवास करून सोइं२ काही मिनिटांपूर्वी भारतिय प्रमाणवेळेप्रमाणे दुपारी १२:१५ ला अमेरिकेतील माऊंटन व्ह्यु, कॅलिफोर्निया येथे सुखरूपपणे उतरले ! या थांब्यानंतरचा त्याचा प्रवास फिनिक्स (अ‍ॅरिझोना, युएसए) येथे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 04/24/2016 - 12:32

In reply to उड्डाणाचा ९वा टप्पा पूर्ण by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सोइई२ चा या उड्डाणचा मार्ग...

रियल टाईम व्हिडिओ स्ट्रिमिंग... . सोइई२ च्या उड्डाणाच्या या ९व्या टप्प्याचा मार्ग... Image removed. . सोइं२ सान फ्रन्सिस्कोच्या गोल्डन गेट पूलावरून भरारी घेताना... Image removed. .
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 06/11/2016 - 19:05

Permalink

सोलार इंपल्स२ अमेरिकन पूर्व

सोलार इंपल्स२ अमेरिकन पूर्व किनार्‍याच्या वेळेप्रमाणे ११ तारखेच्या पहाटे न्युयॉर्कच्या जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रिय विमानतळावर उतरले. उतरण्याअगोदर त्याने स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यावरून (स्टॅच्यु ऑफ लिबर्टी) भरारी घेतली. अश्या तर्‍हेने सोलार इंपल्स२ने अमेरिकेच्या भूमीची फेरी संपवली आहे. आता पुढच्या खडतर टप्प्यात त्याला एकाच भरारीत अटलांटिक महासागर पार करून युरोपच्या भूमीवर पोहोचायचे आहे.

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 06/12/2016 - 14:31

Permalink

जबरदस्त लेख आणि प्रतिसाद !!!!!!!!!

अत्यंत अनोखा विषय आणि जबरदस्त माहीतीपुर्ण प्रतिसाद. धन्यवाद या लेखासाठी खुप आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sat, 06/18/2016 - 09:04

Permalink

व्व्वा! मस्त .....

नवी प्रकाशचित्रे सुंदरच.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/23/2016 - 22:29

Permalink

अटलांटिक महासागर पार करून



अटलांटिक महासागर पार करून सोलार इंपल्स२ युरोपच्या भूमीवर पोहोचले !

२० जूनला अमेरिकेच्या पूर्व किनारा वेळेप्रमाणे पहाटे २:३० ला निघालेले सोलार इंपल्स२ ७१ तास व ८ मिनिटांचे उड्डाण करून स्पेनमधिक सेविल येथे २३ तारखेला पहाटे ५:३८ (UTC/GMT) वाजता उतरले. पात्रुला अगिला (Patrulla Águila) या हवाई कसरती करणार्‍या स्पॅनिश विमानांच्या ताफ्याने त्याचे जंगी स्वागत केले... Image removed. चार्ल्स लिंडबर्ग याने १९२७ साली खनिज तेलावर चालणार्‍या विमानाने एका भरारीत अटलांटिक महासागर (न्युयॉर्क ते पॅरिस) सर्वप्रथम ओलांडला होता. आता बरट्रांड पिकार्ड याने तेच काम खनिज तेलाचा एकही थेंब न वापरता केवळ सौरशक्तीवर साध्य केले आहे ! या उड्डाणाने सोलार इंपल्स२ ने पृथ्वीप्रक्षिणेतील ९०% हिस्सा पुरा केला आहे ! जेथून सुरुवात केली त्या अबू धाबीला पोहोचण्यासाठी आता केवळ तीन उड्डाणे बाकी राहिली आहेत. आता थोडी विश्रांती घेऊन पुढचे उड्डाण इजिप्त अथवा ग्रीसच्या दिशेने होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 07/10/2016 - 21:19

Permalink

UTC वेळेप्रमाणे ११ जुलैला

UTC (Universal Time Coordinated, पूर्वीची ग्रिनिच वेळ) प्रमाणे ११ जुलैला पहाटे ४:३० वाजता सोलार इंपल्स२ त्याच्या पृथ्वीप्रदक्षिणेची शेवटून दुसरी भरारी स्पेनमधिल सविल् (Seville) येथून घेणार आहे. या फेरीत हे विमान भूमध्य समुद्र ओलांडून इजिप्तमधिल कैरो येथे पोहोचेल. त्यानंतर कैरो ते अबू धाबी हा शेवटचा आणि तुलनेने सोपा टप्पा बाकी असेल. त्या शेवटच्या टप्प्याच्या पूर्ततेनंतर "पृथ्वीवरच्या कोणत्याच इंधनाची मदत न घेता केवळ सौरउर्जेवर केलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचा हा एकमेवाद्वितिय विक्रम पुरा होईल ! या भरारीसाठी आंद्रे बोर्शबर्गला अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 07/23/2016 - 00:35

Permalink

विश्वविक्रम पुरा होण्यासाठीची

विश्वविक्रम पुरा होण्यासाठीची शेवटची भरारी

सोलार इंपल्स२ अबु धाबी (यु ए ई) या गंतव्याला पोचण्यासाठी कैरो (इजिप्त) येथून २३ जुलै २०१६ रोजी UTC (Universal Time Coordinated, पूर्वीची ग्रिनिच वेळ) प्रमाणे रात्री ११ वाजरा शेवटची भरारी घेणार आहे. हा ४८ तासांचा टप्पा पार केल्यावर सोलार इंपल्स२ ने स्वच्छ इंधनाच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवलेला असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Sun, 07/24/2016 - 07:37

Permalink

वा वा वा वा ....

सोलर इम्पल्सला या टप्प्यासाठी शुभेच्छा. अपडेट करिता धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 07/24/2016 - 07:52

Permalink

.

.

सोलार इंपल्स२ ने कैरो येथून शेवटच्या टप्प्याची भरारी घेतली आहे... आता ते अबू धाबीला उतरून आपला विक्रम कधी पुरा करतेय याची वाट पाहिली जात आहे.

.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 07/26/2016 - 08:52

Permalink

ब्रेकिंग न्युज !!!

.

ब्रेकिंग न्युज !!!

.

सोलार इंपल्स२ ने केवळ सौरउर्जा वापरून ४०,००० किलोमीटर लांबीची जगप्रदक्षिणा पूरी करून एक जागतिक विक्रमच नव्हे तर अपारंपारिक उर्जेच्या वापरासंबंधी एक मैलाचा रोवला आहे.

.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Tue, 07/26/2016 - 09:44

Permalink

प्रकल्पात सहभागी झालेल्या .......

सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि तुम्हाला नित्य अद्यतनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com