Skip to main content

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

वाचने 111072
प्रतिक्रिया 303

प्रतिक्रिया

बरोबर. हे हुडेंर चे वाळवंट

ओ नो.

In reply to by कपिलमुनी

इतरांनासुद्धा ओळखायला अवघड जात असेल, तर १-२ क्ल्यू देतो नंतर. मंदिर दक्षिणेतले आहे एव्हढे तर कळाले ना ?

In reply to by नांदेडीअन

कर्नाटकामधल गोपालस्वामी किंवा वेणु गोपाल स्वामी मंदीर आहे का ? आजकाल अशी मंदीरे फार आहेत म्हणून खात्री नाह्ये

गोपाळस्वामी मंदीर ,चामराजनगर कर्नाटक बांदीपूर अभयारण्य परिसर

In reply to by _मनश्री_

याला म्हणतात परफेक्ट उत्तर !!

In reply to by तुषार काळभोर

आपल्याच राज्यातले पुढारी होते हे. लुंगी वगैरे नसताना तुम्हाला दक्षिणी कसे काय वाटले?

In reply to by श्रीरंग_जोशी

पन्जाब राव देशमुख चौक अमरावति

In reply to by प्रफुल्ल पा

या चौकाला स्व. पंजाबराव देशमुख यांचे नाव दिले असले तरी तो पंचवटी (पाच रस्ते एकत्र येतात अन तेथे पंचवटी उपहारगृह पण आहे) चौक म्हणून अधिक ओळखला जातो. या पुतळ्यासमोरची त्रिकोणी बागही सुंदर आहे.

In reply to by असंका

स्व. पंजाबराव स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री होते म्हणून मी तसे लिहिले. कॄषीमंत्री असा उल्लेख केला असता तर उत्तर दिल्यासारखेच झाले असते.

In reply to by कपिलमुनी

श्री ___ यांच्याकडून प्रेरणा घेत मिपाच्या इतिहासातील अजून एक फोटो!! जसाच्या तसा!!! ओळखा आता!! (...अहो पण तो लेख लिहिणारे तर कुणी वेगळे आहेत. मग तुम्ही त्यांचे डु आयडी का? कारण फोटो तर अगदी तोच दिस्तो आहे!)

In reply to by खंडेराव

उत्तर बरोबर आहे. गाडगीळ पुलाशेजारी हा पुतळा आहे.

Z bridge javalil aahe ka?

In reply to by श्रीरंग_जोशी

ती डावीकडची इमारत मंजे कुठली तरी गाड्यांची डीलरशीप आहे ना? पाषाणकर ऑटो बहुतेक...बावधन की अस्लच कुठलंतरी ठिकाण असेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

पाषाण-सुस पूल . डावीकडे आहे ते पाषाणकर अ‍ॅटो चा शोरूम .. पुढे बालेवाडी स्टेडियमच्या अंधुक खुणा दिसत आहेत

In reply to by कपिलमुनी

हा फोटो २००७ सालचा आहे. आता हा परिसर खूपच बदलला आहे. पाषाणकर यांची कार शोरुम बंद होऊन इतर कुणाची शोरुम सुरू झालेली आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

विशेष असा काय आहे या फोटो मध्ये ? म्हणजे असा एखादा वैशिष्ठ्य ज्यावरून ही जागा ओळखता येइल ?

In reply to by कपिलमुनी

होय..काहीच वेगळेपणा लक्षात येत नाहिये...रत्नागिरीहून पावसला जाताना समुद्र असा दिसत असेल किंवा गणपतीपुळयाला जातानापण...किवा अगदी भारताबाहेरचा पण असू शकेल.

In reply to by कपिलमुनी

कोकणात फिरायला जाणारे बरेच पर्यटक या ठिकाणी जातात पण या बीचवर प्रत्यक्षात जात नाही.

In reply to by कपिलमुनी

हे ठिकाण बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे आणि ते दक्षिण कोकणात नाही. मिपावर याचा उल्लेख अनेकदा वाचलाय.

In reply to by श्रीरंग_जोशी

रंगाराव...आवो ह्यो आमच हरेश्वर...तीर्थावरून घ्येतलेला बंद्राचा फोटू... हा बं अजुन दोन देता मी! https://lh4.googleusercontent.com/-Y59tpq8UUOk/T8ha_c9lKRI/AAAAAAAABok/GQdXpBeiOlg/w434-h579-no/Photo-0323.jpg https://lh6.googleusercontent.com/-9Y5QSU9w8Yk/T8hR7QPD4WI/AAAAAAAABjw/sKkyXme7Nz0/w771-h579-no/Photo-0250.jpg

देता येईल का? महाराष्त्रातील आहे का?