✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

ख
खटासि खट यांनी
Fri, 03/06/2015 - 12:14  ·  लेख
लेख
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?) इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले. तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ? विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत याबद्दल संबंधितांनी प्रेमाने मार्गदर्शन करावे ही विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
उखाणे
जीवनमान
तंत्र
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
11654 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

का रे

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/06/2015 - 12:52 नवीन
खट्या, अरे 'विद्वत्तापूर्ण प्रतिसाद पहायचे असतील तर ते खटासी खट ह्याचे प्रतिसाद पहा' असे हे कालच म्हणाले. जेपी,श्रीगुरुजी,जॅक स्पॅरो,मीरजकर-बॅटमॅन.. हे ही शर्यतीत आहेत.
  • Log in or register to post comments

माई तुम्ही टवाळ कार्ट्यास,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/07/2015 - 13:49 नवीन
माई तुम्ही टवाळ कार्ट्यास, आजानुकर्णास आणि इतर अनेक जेष्ठ मिपाकरांना विसरलात काय वयोमानाप्रमाणे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

(No subject)

खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:27 नवीन
*yahoo*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सोप्पंय....

संदीप डांगे
Fri, 03/06/2015 - 13:26 नवीन
१. दुसर्‍याला ठार अज्ञानी ठरवून त्याच्या बुद्धीचा, आकलनाचा कमाल अपमान करणे. २. आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असा ठाम विश्वास असणे. ३. आपल्याकडे मुद्दा असो वा नसो पण शब्दबंबाळ प्रतिसाद लिहिणे प्रचंड आवश्यक. वरीलप्रमाणे गोष्टी तुमच्या प्रतिसादात असतील तर तुम्ही विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद दिला आहे असे समजावे. हाय काय नाय काय.
  • Log in or register to post comments

या तिन्ही निकषांवर पुरेपुर

सतिश गावडे
Fri, 03/06/2015 - 13:30 नवीन
या तिन्ही निकषांवर पुरेपुर उतरणारा एक विद्वान आयडी काही काळापूर्वी सरुटॉबानेच्या सहभोजनाचे अजीर्ण होऊन हेवनवासी झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जाणकारांच्या प्रतिक्षेत

उगा काहितरीच
Fri, 03/06/2015 - 14:32 नवीन
जाणकारांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

खटपणा सोडा !!

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 03/06/2015 - 14:45 नवीन
खटपणा सोडा !!
  • Log in or register to post comments

आपण विद्वान नावाची डू आय डी

सुबोध खरे
Fri, 03/06/2015 - 15:00 नवीन
आपण विद्वान नावाची डू आय डी घ्या म्हणजे आपोआपच लोक आपल्याला विद्वान म्हणू लागतील
  • Log in or register to post comments

हे मस्तय

एक एकटा एकटाच
Fri, 03/06/2015 - 16:02 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस

सांजसंध्या
Sat, 03/07/2015 - 12:49 नवीन
घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस यांची तारेवरची कसरत कशी करावी, मुलांचा अभ्यास, त्यांचं भावविश्व, त्यांच्यावरचे संस्कार, पाककृती आत्मसात करणं आणि खाऊ घालणं, घर नीटनेटकं आणि सुंदर लावणं, स्वच्छता ठेवणं आणि तत्सम विषय सोडून कुठल्याही विषयावर बिनधास्त मत दिलं की ते विप्र ठरतं ही खूणगाठ मनाशी बाळगावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

(No subject)

खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:30 नवीन
*dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

१)ज्याच्या लेखाला वि॰

कंजूस
Fri, 03/06/2015 - 15:01 नवीन
१)ज्याच्या लेखाला वि॰ प्रतिसाद द्यायचे असतील तो आईडी फार मुरलेला आणि प्रसिद्ध नसावा नवखा असावा. २)त्याची रास ४ -८ -१२ असावी. क्रमश:
  • Log in or register to post comments

प्रॅक्टीसराव सुरू करतो इथंच.

खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:39 नवीन
प्रॅक्टीसराव सुरू करतो इथंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तुम्ही बोललेले पचवायला दुसर्‍यांना जेव्हा २ -३ दिवस लागतील.....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 03/06/2015 - 15:32 नवीन
आणि दर वेळी त्याचे पठण/ मनन/ चिंतन केल्यावर प्रत्येक वेळी भलभलते अर्थ निघतील तेव्हाच तुम्ही विद्वत्ताप्रचुर म्हणून ओळखले जाल हो !!
  • Log in or register to post comments

(No subject)

खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:31 नवीन
*mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

सगळ्यात सोप्पा

नाखु
Fri, 03/06/2015 - 15:48 नवीन
नियम : तुम्ही टंकलेले तुम्हालाच शेवटपर्यंत कळले नाही आणि भविष्यातही कळणार नाही अशी श्बद्योजना ठेवा हळूहळू तुम्ही वि.प्र. म्हणून गणले जाल. वाचकांची पत्रेवाला भोट वाचक नाखु.
  • Log in or register to post comments

एक विप्र प्रतिसाद - सराव

खटासि खट
Sun, 03/08/2015 - 11:45 नवीन
काल मधरात्री जाग आली तेव्हां हे संस्थळ देखभालीसाठी बंद असल्याचे लक्षात आले. या समयी या संस्थळावर एक संदेश झळकत होता की हे संस्थळ मधरात्री ००.१० वा निद्रावस्थेत जाईल आणि मध्यरात्री १.०० वाजता पुन्हा जागृतावस्थेत येईल. तरी सदस्य व लेखकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. पण १.०० वाजता काही हे संस्थळ चालू झाले नाही.२. वाजताही ते चालू नव्हते. केव्हां चालू झाले हे समजले नाही. पण या काळात एक सत्य उमगले ते असे की लेखक झाल्याशिवाय लेखकाची दु:खे उमजत नाहीत. संस्थळ चालू झाले, न झाले सदस्यांना काही फरक पडत नाही. ते सन्नी देओल अथवा अन्य कुणाच्या अदाकारी पाहू शकतात. पण लेखकाचे तसे नसते. आपल्या अदाकारीवर किती लाईक्स आले आहेत. किती प्रतिसाद आले आहेत हे कळावे यासाठी तो रात्रीचा दिवस करू शकतो. अशा वेळी एक एक सेकंद सुद्धा त्याला युगासारखा वाटू शकतो. लेखकांया या अवस्थेची टिंगल करणा-यांनी स्वतः लेखक होऊन पहावे. उपोषणाशिवाय महात्मा होता येत नाही तसे प्रतिसादाशिवाय लेखक बनता येत नाही हे सत्य आम्हाला निद्रीतावस्थेतील संस्थळावर येऊन उमगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दारू पिण्यास सुरूवात कशी

सूड
Fri, 03/06/2015 - 16:39 नवीन
दारू पिण्यास सुरूवात कशी करावी
पाणी पितो तशीच, तोंडाने!!
जुगारात यशस्वी कसे व्हावे
सतत खेळावे, एकतर कंगाल व्हाल किंवा शहाणपण येईल.
बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे
आधीच भोकं असलेले, ब्लेड मारल्यासारखे दिसणारे फ्याशनेबल बनियान घ्यावे. म्हणजे भोक पडायची वाट बघून "आता काय करु" असा प्रश्न पडणार नाही.
अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे
लंगोट वापरावयास सुरुवात करावी, म्हणजे इलॅस्टीकचा प्रश्न सतावणार नाही.
  • Log in or register to post comments

@ लंगोट वापरावयास सुरुवात

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/06/2015 - 19:18 नवीन
@ लंगोट वापरावयास सुरुवात करावी>> :-D आणि लंगोटी वापरल्यास इल्याक्ष्टिक आणखी टिकेल! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

इथं पण लिंगभेद ? निषेध !

खटासि खट
Fri, 03/06/2015 - 22:44 नवीन
इथं पण लिंगभेद ? निषेध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असो!

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/08/2015 - 08:25 नवीन
असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

मागे घेतला निषेध.

खटासि खट
Sun, 03/08/2015 - 11:36 नवीन
मागे घेतला निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:33 नवीन
*clapping*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हाकानाका...

सोत्रि
Sun, 03/08/2015 - 06:11 नवीन
धागाकर्त्याच्या मनात असलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. किंबहूना बहुसंख्यांच्या मनात हे प्रश्न पडत असतीलच. त्यामुळे ती प्रश्नावळी व्यापक आणि जनताभिमुख होती असे मानन्यास प्रत्यवाय नसावा. परंतु सूडरावांनी त्या प्रश्नांंना दिलेली उत्तरे ही मूळ प्रश्नांशी नाळ सोडून भलतीच उपरोधिक आहेत. त्यामुळे जनताभिमुख प्रश्नांना असे अतिउरफाटे वळण देणे हे अतिशय अश्लाघ्य वर्तन आहे असेही म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ह्या उपरिनिर्दिष्ट प्रश्नांची ठाम उत्तरे अस्मादिकांकडे आहेतच, पण जनमाणसांत त्यावर काही वक्तव करणे हे सूडरावांनी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाच्या पार्श्वभूमीवर सयुक्तिक न ठरावे, सबब खजिल होऊन प्रश्नांवर मौन बाळगण्याचे ठरविले गेल्या आहे! - (स्वयंघोषित विद्वत्ताप्रचुर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नैष्ठिक मौन ??

अत्रन्गि पाउस
Sun, 03/08/2015 - 08:48 नवीन
नैष्ठिक मौन असेल तर मंडळींनी सांगितल्यावर पाव कप दुध पिऊन मौन सोडावे ... आणि मौनाचे फायदे ह्यावर एक मौलिक व्याख्यान द्यावे आपणास मिपाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीने विनंती करणेत येत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मौनाचि अंतरे असा एक आयडी

खटासि खट
Sun, 03/08/2015 - 11:38 नवीन
मौनाचि अंतरे असा एक आयडी घ्यावा असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

For starters एखादा विचित्र

पिंपातला उंदीर
Sat, 03/07/2015 - 15:27 नवीन
For starters एखादा विचित्र आणि सगळ्यात उठून दिसणारा आय डी घ्यावा
  • Log in or register to post comments

विचित्रवीर्य कसा वाटतो ?

खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:40 नवीन
विचित्रवीर्य कसा वाटतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अश्लील वाटतो !!

खटपट्या
Sun, 03/08/2015 - 11:59 नवीन
अश्लील वाटतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

महाभारतकालीन आयडी आहे की..

खटासि खट
Sun, 03/08/2015 - 20:18 नवीन
महाभारतकालीन आयडी आहे की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सगळ्यांत उठून दिसायची शक्यता

आदूबाळ
Sun, 03/08/2015 - 12:19 नवीन
सगळ्यांत उठून दिसायची शक्यता नाकारता येत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 03/08/2015 - 12:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

=)) रामा परमेश्वरा! =))

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/08/2015 - 16:49 नवीन
=)) रामा परमेश्वरा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा