Skip to main content

आख्खा मसुर

लेखक जयंत माळी यांनी सोमवार, 02/03/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल "आख्खा मसूर" साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी) एक मोठा कांदा - बारीक चिरून एक मध्यम टोमॅटो - बा.चि. टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी तेल, मीठ कृती मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?) तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता. टोमॅटो प्युरे घालून २-३ मिनिटे शिजवा. कांदा-लसूण मसाला व मसूर घालून आणखी २ मिनिटे शिजवा, जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घाला व नंतर झाकण लावून एक वाफ येउद्या. वाफ आल्यावर मीठ घालून मसूर मोडू न देता हलक्या हाताने ढवळून घ्या. अख्खा मसूर इज रेडी.

वाचने 11926
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by जयंत माळी

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? पाकॄ आवडली. फटुची प्रतिक्षा राहील.

सोप्पी पाकृ, ह्यातच फोडणी साठीच्या तेलात लसाणाच्या पाकळ्या ठेचून आणि किसलेलं आलं घातलं की कुठल्याही डाळी पदार्थाला अप्रतिम चव येते असा अनुभव. मुसलमानांमध्ये मसूर ह्या डाळीचा जास्त वापर करतात जसं की मसूर भात, मसूर खिचडी, मसूराचं वरण ई. ह्याला काही शास्त्रीय कारण आहे का? (मुळात खरंच मुसलमानांमध्ये ह्या डाळीचा जास्त वापर करतात का ह्या बद्दल विशेष निरीक्षण नाही पण आमच्या जुन्या घरासमोर व शेजारी मुसलमान परिवार रहात असे ते सांगत की मुसलमानांमध्ये मसूर डाळ जास्त वापरतात)

मसूर सात आठ तास भिजवलेले असतील तर कुकरला लावायची गरज नाही. १५-२० मिनिटात शिजतात ते. ही हमखास मस्त होणारी, आवडीची भाजी आहे.

कुकरला आणि कशाला लावायचा आणि तो/ती मसूर? अहो फोडणीतच शिजून येते झटक्यात. जरा पाण्याचा हबका मारा वरुन बस होइल.

प. महाराष्ट्राच्या हॉटेलमध्ये मिळणारी पाकृ थोडी वेगळी असते.