मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल
"आख्खा मसूर"
साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ
कृती
मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?) तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता. टोमॅटो प्युरे घालून २-३ मिनिटे शिजवा.
कांदा-लसूण मसाला व मसूर घालून आणखी २ मिनिटे शिजवा, जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घाला व नंतर झाकण लावून एक वाफ येउद्या. वाफ आल्यावर मीठ घालून मसूर मोडू न देता हलक्या हाताने ढवळून घ्या. अख्खा मसूर इज रेडी.
वाचने
11907
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडत्या डिशचा फोटू नसल्यामुळे
उद्या करतो आणी फोटो पण देतो
In reply to आवडत्या डिशचा फोटू नसल्यामुळे by एस
अरे वा!
In reply to उद्या करतो आणी फोटो पण देतो by जयंत माळी
मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड
पुर्ण शिजवू नका
In reply to मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड by असंका
आख्खा मसूर मसाला
नाही
In reply to आख्खा मसूर मसाला by रानडेंचा ओंकार
फोटूsssssssssssssssssssssssss
नवीन आहे मिपा वर फोटो कोठून अपलोड करतात ?
In reply to फोटूsssssssssssssssssssssssss by अत्रुप्त आत्मा
हा दुवा बघा
In reply to नवीन आहे मिपा वर फोटो कोठून अपलोड करतात ? by जयंत माळी
सोप्पी पाकृ, ह्यातच फोडणी
मसूर सात आठ तास भिजवलेले
सोप्पी पाकृ
फोटू टाका की राव ...
केला की टाकतो फोटो
कुकरला आणि कशाला लावायचा आणि
इस्लामपूर
इस्लामपुर
In reply to इस्लामपूर by मनिमौ
पाकृ