Skip to main content

माझ्याबद्दल थोडक्यात

लेखक सुचिकांत यांनी मंगळवार, 03/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या तर नाहीच नाही! पण आपला तो बाळासाहेब आणि दुसऱ्याच कार्टं या मानसिकतेच्या विरोधात आहे. मी सर्व धर्मांच्या ठेकेदारांच्या विरोधात आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. मी whatsapp आणि facebook वर अफवा आणि चुकीचे संदेश पसरवणार्यांच्या विरोधात आहे. माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम करतो. त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो. जे लोक गाईंच्या कत्तलिवरुन सोशल नेटवर्किंगवर रान उठवतात आणि त्यांच्या संवर्धनासाठी १ रुपयासुद्धा प्राणीमित्रसंस्थांना देत नाहीत मला अशा लोकांचा राग आहे. जे लोक दहशतवादासाठी विशिष्ट धर्माच्या लोकांना जबाबदार धरतात मी त्यांच्या विरुद्ध आहे. "बलात्कार आणि खून" या गुन्ह्याला मी दहशतवादी कृत्य समजतो........ मला पाऊस पडायला लागला कि मनसोक्त पावसात भिजावस वाटतं. मला पर्यटक नाही तर निसर्गप्रेमी व्हायला आवडतं. भारतात फिरायला आवडत नाही, पण मला महाराष्ट्रात फिरायला भन्नाट आवडतं. महाराष्ट्राची देवभूमी साताऱ्यावर मी मनापासून प्रेम करतो. वर्षातून 10 वेळा तरी कासच्या पठारावर बागडून येतो. मला सह्याद्रीला ऐन उन्हाळ्यात भेट द्यायला आवडतं, बहुधा त्याचवेळेस त्याला सच्च्या निसर्गप्रेमींची गरज असते असा मला वाटतं. पावसाळ्यात, सर्वत्र हिरवाई पसरलेली असताना तर सर्वच भेट देतात त्यात काय नवल? मला किल्ले, माळरानं, धरणाचे परिसर, जंगलं, अशा ठिकाणी फिरायला भारी आवडतं, आणि बरोबर माझा कुत्रा असेल तर मग काय विचारायलाच नको!!! गेल्या अनेक वर्षांपासून २ ट्रेक्स माझ्या मनात आहेत, लोणावळा ते भीमाशंकर आणि प्रचितगड. आता कधी संधी मिळते आणि कधी सर्व गोष्टी जुळून येतात ते पाहावे लागेल. मी पूर्वी कुत्र्यांना फार म्हणजे फार घाबरायचो! आणि भूतांना सुधा!!!!! मग मी नामी शक्कल शोधून काढली. डिस्कवरीला पहिले होते, कुत्र्यांना ultrasonic समजते. मी कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतला. एका दगडात २ पक्षी मारले. कुत्र्यांची भीती निघून गेली, आणि भुताची भीती सुधा, कारण नेहमी प्लुटो माझ्या पायाजवळच बसलेला असतो. आता कुठलं भूत येईल मला त्रास द्यायला ते पहायचं होतं मला…त्यात भरीला भर माझा बोका.. एकदा घरातलं वातावरण जरा tense होतं. गेलो बाहेर आणि मांजराचं पिल्लू उचलून आणलं, तेव्हापासून माझ्याकडे कुत्रा आणि बोका सुखाने नांदत आहेत. जुन्या मराठी चित्रपटांमधलि घरे पहिली कि माझं मन प्रफुल्लीत होतं, बैलजोडी, दारात आड, चुलीवरचा स्वयंपाक, कोपऱ्यात ठेवलेलं जातं, ९ वारी साडी नेसलेल्या स्त्रिया, धोतर घातलेले पुरुष, पाहिलकी वाटतं, एखादा चमत्कार व्हावा आणि मी TV मध्ये प्रवेश करावा आणि ते वातावरण जवळून अनुभवावं, त्याचमुळे माझ्याकडे अनेक मराठी चित्रपटांच्या CD/DVD आहेत. मला प्रभात फिल्म्स चे चित्रपट आवडतात. गेली अनेक वर्षे मला कुंकू हा चित्रपट फार आवडायचा तसा अजूनही आवडतो पण अगदी अलीकडे पाहिलेला शेजारी चित्रपट ०.१ % जास्त आवडतो. त्या काळात हिंदू - मुसलमान शेजार्यांवर चित्रपट काढणे म्हणजे खरोखर कौतुकास्पदच आहे. मला मोहित्यांची मंजुळा फार आवडतो, मंजुळा तर मनापासून आवडते. जेव्हा मंजुळा आणि केदारजी पहिल्यांदा जत्रेत भेटतात तेव्हाचा सीन तर मी ५० वेळा परत परत बघतो. सुधीर फडके, श्रीनिवास खळे , ग. दि. मा., जगदीश खेबुडकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि लिहिलेली गीते ऐकताना मी अक्षरशः हरवून जातो… अलीकडच्या चित्रपटांमध्ये मला "धुमधडाका" भन्नाट आवडतो. माझं स्पष्ट मत आहे, लक्षाने रंगवलेला रात्रीचा भुताचा सीन, मेहमूदने "प्यार किये जा" मध्ये रंगवलेल्या सीन पेक्षा १००० पटीने प्रभावी आहे, आणि १००० पटीने मनोरंजक सुधा आहे!!! अजय-अतुल, सर्व नवीन चांगले संगीतकार, कल्पक मराठी दिग्दर्शक मला फार आवडतात… माझं मराठी भाषेवर भन्नाट प्रेम आहे. माझी ठाम समजूत आहे कि, जगातल्या सर्व लोकांना मराठी समजतं. खूप साधी,सरळ, आणि सुंदर भाषा आहे, न कळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हैदराबाद मध्ये सुधा एखाद्या व्यक्तीशी बोलताना मी मराठीतूनच सुरुवात करतो, मग त्याला नाही समजले तर मग हिंदीतून बोलायचं! मी माझ्या मुलीला मराठी शाळेतच घालणार आहे, बाकी कितीही संकटे आली तरी, कितीही त्याग करावा लागला तरीही माझा निर्णय मी बदलणार नाही! आता मराठी अस्मितेबद्दल बोलायचं आणि यांच नाव घ्यायचं नाही हे होऊ शकत नाही. "राज ठाकरे" आपल्याला जाम आवडतात बरंका, अगदी सन २००० पासून….काही २-४ आक्षेपार्ह गोष्टी सोडल्या तर म न से तसा चांगला पक्ष आहे असं मी मानतो. [ सगळेच राजकीय पक्ष आपल्या कारकिर्दीत एखादी तरी घोडचूक करतातच विसरून जायचं आपण ;)] मी अभ्यासात जरा माठ होतो. त्यात आईवडील शिक्षक, तेव्हा खरडपट्टी सुधा भरपूर झाली, पण आज जो काही आहे तो त्यांच्यामुळेच! मी माझ्या आईच्याच शाळेत शिकायला होतो. ६ वीला असताना आईच वर्गशिक्षिका होती बाप रे! लोकांना वाटायचं कि चंगळ आहे बुवा, पण मलाच माहिती होतं किती चंगळ होती ते!!! बाबा माझ्यासाठी नेहमी ठरलेले २ श्लोक म्हणायचे,"घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना." - अभ्यास सोडून दिवस दिवसभर क्रिकेट खेळायचोना म्हणून, आणि २रा माझा फेवरेट आहे, ॥अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् । अधनस्य कुतो मित्रं अमित्रस्य कुतः सुखम् ॥ खरच मी भाग्यवानच आहे, मला असे आई वडील मिळाले… मला शाळेत असताना नाट्यवाचन आणि नाट्यसंगीत स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळाली. शास्त्रिय गायनाच्या कलेला मी पुढे अजून विकसित नाही करू शकलो याची मला खंत वाटते. नाट्यवाचनाचे म्हणाल तर तिथे सुधा मी थोडा कमीच पडलो. पण माझा एक DreamJob आहे, मला कार्टून फिल्म्स करता डबिंग करायचय. कधी कधी घरामध्ये मराठी चित्रपटामध्ये जो पाटील असायचा त्याच्या आवाजात मला बोलायला फार आवडतं, त्याशिवाय मी एक छाट-छूट नकलाकार सुधा आहे बरका! सगळ्यात चांगली नक्कल मी करतो ती माझ्या बाबांची, अजून त्यांना हि गोष्ट माहित नाही त्याशिवाय संजीव कुमारचा घशातून आवाज काढताना मी जे तोंड वेडं वाकडं करतो त्यासाठी बायकोचा मार सुधा खातो कॉलेजात असताना फिरोदिया करंडकामध्ये मी भाग घेतला होता, पण जाऊदे नको त्या आठवणी! आमचं नाटक पडलं! फार वाईट वाटलं होतं मला पुरुषोत्तमच्या स्टेजवर एकदाजरी संधी मिळाली असतीना तर…. जाऊदे उगाच अख्या जगासमोर स्वतःचे कौतुक नको!!!! आई रागवेल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10615
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

In reply to by उमा @ मिपा

सूचीकाका तुम्ही शहरी माणसं का...

हम्म म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः

आमच्या सातार्‍याच्या माणसाने फक्कड लिज्बी पाडलेली आहे ह्याचा आम्हाला भलताच असा सार्थ अभिमान वाटतो आहे. यांस (तरी) तांब्यापीठाधिपतींनी दीक्षा देवून पीठात घ्यावे ही (जाहीर) विनंती.!!

In reply to by टवाळ कार्टा

कोणी पीठात हसताहेत, तर कोणी तांब्यात रडताहेत... पण वेड्यांना हे माहीत नाही की सर्वांचा शेवट जिल्बीतच होणार आहे +D

माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही
असो.
भारतात फिरायला आवडत नाही, पण मला महाराष्ट्रात फिरायला भन्नाट आवडतं
समजलं नै! महाराष्ट्र तूर्तास भारतातच आहे ना?
मी कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतला
हे बाकी आवडलं! ;)

हे वर्षानुवर्षे विचार करून लिहिलेले नाही ! फेसबूकासाठी लिहिलेले आहे, साधारण २-३ तासात ! पण सर्व प्रतिक्रिया छान ! अनोळखी व्यक्ती आपल्या लिखाणावर काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता होती, ती पूर्ण झाली.

अप्रतिम लिहिलेले आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असे बरेच काही असते आणि त्याला ही तसेच काहीसे जगायचे असते. परंतु सध्य परिस्थीती मध्ये तो तसा जगत नसतो म्हणुन ह्या ज्या दिसलेल्या/अनुभवलेल्या/चित्रपटातील गोष्टींवरुन तो आपण तेथे असतो तर, किंवा आपल्या आवडीचे असे काय कायसे सुंडर चित्र आपल्या मनावर कोरत असतो. निटसा विचार केला तर आपल्याला जगताना असे सर्व साधे साधे सिंपल आवडत असते.. पण आपण जगताना मात्र सर्व हायक्लास गोष्टींच्या मागे लागलेलो असतो असे उगाच वाटुन गेले.

आता आली का पंचाईत? किती किती नावं लक्षांत ठेवायची आम्ही या सगळ्या थोर लेखकांची ? आणि प्रत्येकाला अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यायचा म्हटला तर हा जन्म देखील पुरणार नाही!

@माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम करतो. >>> हम्म्म्म! अवघड आहे एकंदरित. असो! @त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो. >>> ह्या काळात अण्णां च्या किंवा अंनिस च्या आंदोलनात कृतिशील सहभागी होऊन तुरुंगातंहि जाता येइल. थांबु नका. :)

In reply to by सुचिकांत

ह्या ह्या ह्या. सायेब.. हे कुटून शिकलात म्हनायचं. आमचं गांधीबाबा लय मोट्टं राजकारनी होतं आणि टिळकपण. देशभक्ती वगैरे संपली आसं वाटत असेल तर जेपी (आधीचे आणि आत्ताचे पण) पहा. चांगले-वाईट राजकारनी अजूनपण हायेत (त्याचा क्रायटेरिया पन ठरवा) आणि आधी पन होते (आगदी इंग्रजाच्यात पन) थोडं प्रमाण कमी जास्त झालं असेल (कारण माध्यमं पन तेव्हा तशी कमीच होती ना मग सगळं गोग्गोडच दिसतं आपल्याला). असो. :)

हा लेख टाकुन तुम्ही फार चांगले केलेत.. कार्ण आता मिपा वर आल्यावर सरजी...आप ही आप छा गये हो!! सगळ्यांना एकच प्रश्न पडणार.. कोण हा माणुस सुचिकांत..?? तर उत्तर लगेच हजर आहेच..! वा!! तुमच्याबद्दल झालं? आता मिपाबद्दल पण जाणुन घ्या.. इतरांनाही चार-दोन बर्‍या वाईट प्रतिक्रिया द्या.. आपल्या लेखाला काय प्रतिसाद मिळतो हे जाणुन घेण्याची हौस सगळ्यांनाच असते.. नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्याबद्दल झालं? आता मिपाबद्दल पण जाणुन घ्या.. इतरांनाही चार-दोन बर्‍या वाईट प्रतिक्रिया द्या.. आपल्या लेखाला काय प्रतिसाद मिळतो हे जाणुन घेण्याची हौस सगळ्यांनाच असते.. नाही का?
सहमत. सुचिकांत साहेब माझ्या लेखांवरही एखादी प्रतिक्रिया येउंद्या.....(झैरात झैरात)

माई मोड ऑन- अरे सुचिकांता,छानच लिहिलेस हो..पण तु आता स्वांतत्र्यपुर्व काळात जन्मला नाहीस याचा थोडा विचार कर ..असे आमचे हे म्हणतात. -माई मोड ऑफ

In reply to by जेपी

तुमच्या ह्यांचे किस्से म्हणे आदिमानवांनी आमचे पुर्वज ह्या नावाखाली गेरुनी रंगवलेत गुहांमधे...

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माई मोड- अरे चिमण्या,आमचे पुर्वज गेरु नाही हो वापरयचे.चुना वापरायचे ,लावयला सोपा.असे हे म्हणतात. -माई मोड ऑफ

In reply to by जेपी

अरे चिमण्या,
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

सरांपासून धडा घेऊन, सर्व आजी -माजी-पाजी सदस्यांनी कळफलक घेऊन आपापला पंचनामा बडवावा अशी नम्र सूचना. त्यामुळे आपण नक्की कोण आहोत आणि मिपावर का आहोत याची सर्व सदस्यांना पुनर्जाणीव होऊन ते एका वेगळ्याच प्रतलावर(उसना शब्द) जातील.

In reply to by सस्नेह

बरं झालं! ग धड्याची नाही म्हणालात. मग कोणाचीच धडगत नव्हती.

In reply to by तिमा

सरांपासून धडा घेऊन, सर्व आजी -माजी-पाजी सदस्यांनी कळफलक घेऊन आपापला पंचनामा बडवावा अशी नम्र सूचना.
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

मिपावर एकामागोमाग जिल्ब्या टाकायला आवडतं हे लिहायचं राहिलं वाटतं.

तुम्ही समद्या मिसळकरांची एक सहल का नाही काढत..

In reply to by आशु जोग

सहल काढायची हौस असणारे आमचे एक मित्र सद्ध्या सेमीमिपासंन्यास घेउन मुक्तपणे विहार करत आहेत, दुसरा कोणी ती बॅटन त्यांच्याएवढ्या क्षमतेने पेलु शकेल असं मला वाटतं नाही. तस्मात त्यांना परत आणा महिन्याला ५ च्या हिशोबानी ट्रिपा होतात का नाही बघा.

होत आस कधि कधि....... चालुद्या....

महाराज तुम्ही फारच थकला आहात लिहून. आज मला खाऊन दिवस ढकला असं म्हणत माझ्याविषयी लिहिणारा एकपण उंट पुढे येत कसा नाही ?शेवटी हा माझ्याविषयी लिहिण्याचा तंबू महाराजांवरच पडणार आणि साताऱ्याऐवजी साओ पाउलोतून नवीन आईडी जन्म घ्यावा लागणार का?

जाऊदे उगाच अख्या जगासमोर स्वतःचे कौतुक नको!!!! आई रागवेल
आई रागावली का ?