Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खटासि खट on Wed, 02/25/2015 - 13:52
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ? ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?) ९. इतर शंका हळू हळू
  • Log in or register to post comments
  • 25731 views

प्रतिक्रिया

Submitted by अत्रन्गि पाउस on Wed, 02/25/2015 - 20:23

In reply to अहो...अहो.... लो क हो! by अत्रुप्त आत्मा

Permalink

तुटक्या विटेची चवथी खोली!

हसून फुटलो आहे *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on Wed, 03/04/2015 - 07:26

In reply to अहो...अहो.... लो क हो! by अत्रुप्त आत्मा

Permalink

परस्पारिक स्वेच्छा सहजीवन

परस्पारिक स्वेच्छा सहजीवन विधी >>> :D कुणाचं काय, तर कुणाचं काय
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 03/04/2015 - 14:15

In reply to परस्पारिक स्वेच्छा सहजीवन by सांजसंध्या

Permalink

हो नं!!

हो नं!!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 02/25/2015 - 16:41

Permalink

लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय

लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>> गांधर्वनाते... तसे, 'गर्दभनाते' हेही चालू शकेल +D
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 02/25/2015 - 16:46

In reply to लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय by सस्नेह

Permalink

@गर्दभनाते'>>>

@गर्दभनाते'>>> =)))))
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 02/26/2015 - 02:23

In reply to @गर्दभनाते'>>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.

आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/25/2015 - 17:04

Permalink

सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की

सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की घोटाळा आलाचं) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 02/25/2015 - 23:13

In reply to सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

नाव नका काढू त्या सहकाराचं,

नाव नका काढू त्या सहकाराचं, राजू शेट्टीच आठवतात डायरेक्ट ! इथं पण घुस्ले म्हणजे ?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 02/25/2015 - 17:17

Permalink

लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>>

मराठीत माहेत नाही पण अकाऊंट भाषेत "हायर परचेस" म्हणू शकता. आवश्यक व आवाक्यातील वाटल्यासच शेवटचा हप्ता भरलावर वस्तू मालकी हक्क प्राप्त होतो "हायर" हे फायर व लायर ला फक्त इथेच समानार्थी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 02/25/2015 - 19:10

Permalink

लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ...

लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... शालिवाहन काळात भटकत भारतात नशीब काढायला आलेल्या एका युरोपियनाने एक पुरातन संस्कृत ग्रंथ चोरून नेला. त्यात दहा प्रकारचे विवाहविधी लिहीलेले होते... वैदीक, राक्षस, गांधर्व, इ इ इ. त्यातला गांधर्वविवाह त्याला फारच आवडला आणि त्याने युरोपमध्ये एक भूमीगत "गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते उघडकीस आल्यावर तो जीव वाचविण्यासाठी कोलंबसच्या जहाजाच्या वाणसामान ठेवण्याच्या खोलीत लपून अमेरिकेला गेला आणि तेथे त्याने सिसिली माफियाच्या सहकार्याने "जागतिक (अमेरिकेत पहिल्यापासून जे काय असतं ते सगळं जागतीकच असतं) अंडरग्राऊंड गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणुन त्याने आपल्या संघटनेचे नांव तिथल्या कॅलिफोर्नियामधिल मूल अमेरिकन (रेड इंडियन) भाषेत भांषांतरीत करून ते सांकेतीक नाव म्हणून वापरायला सुरुवात केली, ते असे होते: जागतिक = लिव, अंडरग्राऊंड = इन, गांधर्वसर्कल = रिलेशन; म्हणुन त्या जीवन पद्धतीला "लिव इन रिलेशन" उर्फ "लिईरि" असे नाव पडले. ही चलाखी सुरुवातीला कोणाच्याच ध्यानात आली नाही आणि जेव्हा ते उघड झाले तेव्हा ते लोकांना इतके आवडले की त्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी लिईरि ला कायदेशीर गोष्ट करून टाकली (कॅलिफोर्नियामध्ये असे खूपदा होते). तोच प्राचीन भारतिय गांधर्वविवाह आता पाश्चिमात्य देशांतून परत भारतात (योग चा योगा होऊन आला तंस्सांच्चं अग्दी) आल्यावर ही नविन शिंगे आलेली नविन पिढी त्याला डोक्यावर घेऊन त्याचे आचरण करायला लागली आहे... आणि आचरण न जमणारे आचरट धागे टाकून दुधाची तहान ताकावर भागवताहेत :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 02/25/2015 - 19:45

In reply to लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एक्का साहेब धंद्यात भागीदारी

एक्का साहेब धंद्यात भागीदारी घेणार काय ? जसे लग्नपूर्वक चाचणी आणि समुपदेशन (premarital counselling) असते तसे सहजीवन पूर्व(pre LIR counselling) समुपदेशनचे दवाखाने काढू या. पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको). प्याकेजेस पण देता येतील. गरोदरपण असेल तर वेगळे. आजार झाले तर वेगळे प्याकेज. ब्रेक अप झाल्यास मानसिक समुपदेशनाचे वेगळे. त्यातून गर्भपाताचे पैसे वायले इ इ. वर जमले तर SME चे फायदे घेत येतील का ते हि पाहू.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/25/2015 - 20:28

In reply to एक्का साहेब धंद्यात भागीदारी by सुबोध खरे

Permalink

_/|\_

_/|\_ मला मार्केटिंग साठी घेणार का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 10:03

In reply to _/|\_ by टवाळ कार्टा

Permalink

ह्या साठी जुनी नोकरी बदलायची

ह्या साठी जुनी नोकरी बदलायची आवश्यकता नाही. असलेल्या नोकरीमधली २-४ प्रकर्णे हाताळता येतील. माउथ टु माउथ (द्वयार्थ नं काढणे) प्रसिद्धीमुळे धंदा आपोआप वाढेल. त्यामुळे मार्केटींग जॉब पहाण्यापेक्षा एखादी फ्रांचायझी घेउन टाक की. हाकानाका..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 02/25/2015 - 20:33

In reply to एक्का साहेब धंद्यात भागीदारी by सुबोध खरे

Permalink

आमचे एक जुने सहाध्यायी

आमचे एक जुने सहाध्यायी म्हणायचे तसे, "प्रयोग करून पाहण्यासारखा आहे" :) पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको). छे,छे. व्यवसाय सुरू केलाच तर "आमची इतर कोठेही शाखा नाही." अशी कूपमंडूक प्रवृत्ती आजाबात दाखवायची नाय. केवळ पुण्यामुंबैत केवळ इनमिन दोन शाखा ?? ह्या, ह्या, ह्या... हे आमच्या स्ट्रॅटेजिक थिंकींग विरुद्ध आहे. अहो सर्व भारतातच नाही तर आलम दुनियेत फ्रँचायजी सिस्टिमचे जाळे उभारू. पॅकेजेसची त्सुनामी तयार करू, एकावर दोन फ्री देऊ (फक्त पहिल्याची किंमत चारपाच पट ठेवली म्हणजे झालं ;) ). आख्ख्या होल दुनियेत टीव्ही-बिव्हीवरून जाहिरांतीचा भडीमार करू, सेमिनार घेऊ, आपण तयार केलेल्या तज्ञांची फौज जगावर सोडू, जगाला पळता भूई थोडी करून सोडू. लिईरि मध्ये न राहणार्‍या एकदम भारी न्युनगंड आला पायजेल... मग ते आपल्या समुपदेशन-शिक्षण-उपचार यापासून दूर पळूच शकणार नाहीत ! :) . आख्खी होल बिलियन डॉलर विंटरन्याशनल विंडष्ट्री हाय सायेब ! आमची प्राचीन आयड्या चोरतात काय ? दाखवूच त्या गोर्‍यांना विंढेन हिस्का, ढिष्कॅंवsss !!! =)) (गुप्त बातमी : सांगू नका कोणाला. बोहोनीसाठी कन्फूsssस झालेले पहिले चार पाच बकरे या धाग्यावरच हेरून ठेवले आहेत ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 21:22

In reply to आमचे एक जुने सहाध्यायी by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

बूच!!

नो चीटींग, कितलें फावट चेंज करतां!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 02/25/2015 - 21:59

In reply to बूच!! by सूड

Permalink

म्हंजे काय ?

म्हंजे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 02/25/2015 - 23:04

In reply to म्हंजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

किती वेळा बदलताय तो प्रतिसाद?

किती वेळा बदलताय तो प्रतिसाद? नवीन म्हणून उघडून पाह्यलं तर, जुन्याच प्रतिसादावर नवीनचा टॅग दिसला. आयदर काहीतरी चेंज झालंय किंवा मिपा गंडलंय. जुन्या मिपावर प्रतिसाद बदलता येऊ नये म्हणून उपप्रतिसाद देऊन ठेवायची पद्धत होती, तेच केलं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 00:48

In reply to किती वेळा बदलताय तो प्रतिसाद? by सूड

Permalink

फक्त स्पेलींग / व्याकरण चुका

फक्त स्पेलींग / व्याकरण चुका दुरुस्त केल्या हो :) ही विनंती करून कोणीही करू शकते !
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 02/25/2015 - 23:15

In reply to लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

पुना ओक विद्यापीठाचे

पुना ओक विद्यापीठाचे विद्यार्थी इकडे पण ? काय खारं नाय ब्वॉ !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 00:49

In reply to पुना ओक विद्यापीठाचे by खटासि खट

Permalink

उपरोध पुरेसा व्यक्त झालेला

उपरोध पुरेसा व्यक्त झालेला नाही काय ?!
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on गुरुवार, 02/26/2015 - 12:20

In reply to उपरोध पुरेसा व्यक्त झालेला by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स

उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स उपरोध आहे, रिव्हर्स स्विंग सारखा ..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/26/2015 - 14:38

In reply to उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स by खटासि खट

Permalink

उपरोधावर उपरोध = रिव्हर्स

उपरोधावर उपरोध = रिव्हर्स उपरोध = खरे मत !!! +D
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 02/26/2015 - 03:19

Permalink

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
तुम्ही अजून प्रेषित प्रगो यांच्या पोप संप्रदायाचे सदस्य झालेले दिसत नाही आहात? लौकर दिक्षा घ्या म्हणजे वरिल दोन्ही प्रश्न चटकन सुटतील. मग पुढच्या प्रश्नांची काही आवश्यकता वाटणार नाही कारण पुढची उत्तरे आपोआप निर्माण होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/26/2015 - 06:55

In reply to १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय by संदीप डांगे

Permalink

@प्रेषित प्रगो >>>

@प्रेषित प्रगो >>> =))))) योग्य! अगदी योग्य शब्दरचना! =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 02/26/2015 - 11:36

In reply to १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय by संदीप डांगे

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/26/2015 - 12:01

Permalink

एकदा सर्व ठरले की लि.री.चा

एकदा सर्व ठरले की लि.री.चा बस्ता मात्र लिरिल सारीज अ‍ॅड कटपीस सेंटर, लाजरा रोड, अंमळनेस या ठिकाणीच. तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on गुरुवार, 02/26/2015 - 12:13

In reply to एकदा सर्व ठरले की लि.री.चा by गवि

Permalink

तीन पिढ्यांपासून विश्वासाचं

तीन पिढ्यांपासून विश्वासाचं अतूट नातं.
१.या तीन पिढ्या लिइरि मधून जन्मलेल्या पुण्यफळांच्या का? २.कधीही तुटू शकतं हा लिइरिचा विश्वास आहे. तो तुमच्याकडे अतूट कसा काय?
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on गुरुवार, 02/26/2015 - 12:22

In reply to एकदा सर्व ठरले की लि.री.चा by गवि

Permalink

तीन पिढ्यांपासून ?

तीन पिढ्यांपासून ? आशिर्वाद द्यावा सर जी.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/26/2015 - 12:26

In reply to तीन पिढ्यांपासून ? by खटासि खट

Permalink

अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक

अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक आहे हो.. आशीर्वाद आहेतच. बिलातही सूट देऊ. लिरीचे ठरले की जोडीने या.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/26/2015 - 12:24

Permalink

नव्या सिरीयल्स चे नाव "

नव्या सिरीयल्स चे नाव " लिव्हीन बन्धन" , गोष्ट एका लिव्हीन ची
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/26/2015 - 12:26

Permalink

नवे गाणी

नवे गाणी " निघाले आज.....लिव्हीन च्या घरी " " लेक लाडकी या घरची.होणार लिव्हीन मी त्या घरची "
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 02/26/2015 - 19:22

In reply to नवे गाणी by विजुभाऊ

Permalink

मग

मग तिची आई हे गाणं म्हणेल, ओटीत घातली मुलगी लिव्हिण बाई!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 02/26/2015 - 19:32

In reply to मग by तिमा

Permalink

हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला

हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला पाह्यजे असं काही नाही ना. फक्त, 'लाडकी लेक ही माझी पहिली वहिली, भाग्येच तियेच्या ??? आपली झाली'
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 02/26/2015 - 19:35

In reply to मग by तिमा

Permalink

नाय म्हणजे रिकाम्या जागी

नाय म्हणजे रिकाम्या जागी लिहीणार काय?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/26/2015 - 12:27

Permalink

आणखी एक.

आणखी एक. नेसली....ईईईईईईईईईई लिव्हीन ची साडी.......
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on गुरुवार, 02/26/2015 - 12:39

Permalink

बरं अजून एक आठवले

बरं अजून एक आठवले जर लग्न गावाकडे किंवा मुलीच्या घरी झाले तर शहरात पोहोचल्यावर रिसेप्शन द्यावे लागते का ? मंगळागौर, हळदीकुंकू करावे लागते का ? झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 02/26/2015 - 14:19

In reply to बरं अजून एक आठवले by खटासि खट

Permalink

झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय

झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय करतात ?
डोहाळजेवण चांदण्यातलं करायचं!! दोघांनीही पांढरे कपडे घालायचे. पदार्थही पांढरे...उकडीचे मोदक, दहीभात, दूधभात. नारळीभात, बासुंदी केली तरी त्यात केशर घालायचं नाही. मुळा, पांढरा कांदा हे भाजीत वापरायचं आणि सगळी चांदण्याशी संबंधित गाणी ऐकत बसायचं!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on गुरुवार, 02/26/2015 - 14:22

In reply to बरं अजून एक आठवले by खटासि खट

Permalink

कै च्या कै. मुलगी काय चि.सौ

कै च्या कै. मुलगी काय चि.सौ.कां. होती का हे सगळं करायला?
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on गुरुवार, 02/26/2015 - 19:51

In reply to कै च्या कै. मुलगी काय चि.सौ by काळा पहाड

Permalink

चि.लि.कां म्हणा की

चि.लि.कां म्हणा की
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 02/26/2015 - 15:27

Permalink

धागा विषय :

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे मार्गदर्शन ला हसवाफसवी मधला शब्द "मागल दर्शन " वापरून लिहा आनि मग बघा.... कशी रांग लागेल. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . दर्शन नव्हे सल्ला देणार्यांची..
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 02/26/2015 - 16:12

Permalink

उत्तरे

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
यात सगळ्यात मोठी अडचण आहे जागा. एकदा का 'खोली' गावली का नाय मंग पार्टनर मिळुनच जायेल!
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
कुठेही चालेल. आजकाल मुंबईत यासाठी लोकलचे डब्बे, बसमधील फुडल्या शीटांची पाठ यांची फुल्ल चलती हाय. जरा वेगळ्या प्रकारचे पार्टनर हवे असतील तर सार्वनजिक मुतार्‍यांच्या भितीही ट्राय करू शकता.
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
नाय बा! काय कल्पना नाय!
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
हात साला! जे काय करायचा हाय त्याला खोली पुरते. उंगाच कशाला होल बिल!
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
तुझ्या षौकावर डिपेन् हाय! नैतर हव्वी ती लाँज्री नाय म्हनून पन मानापमान होतात म्हने!
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे
नकोच ते.. ते मदे मदे येत अस्नार! पोशाक टांगायला खिल्ला पण पुरतो, नैरत र्‍हावू दे की जमिनीवर!
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
कोनाकोनाच्या?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
लिव्ह मंजी र्‍हाणे, इन म्हंजी आत नी रिलेशनशिप म्हंजी संबंद आसं मास्तुराने शिकवलेला! म्हणून मी तरी वरची माहिती "आत राहून (ठेवलेल्या) संबंधा"ची दिलेली हाय!! बरुबर अर्थय ना!?
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on गुरुवार, 02/26/2015 - 19:53

In reply to उत्तरे by ऋषिकेश

Permalink

अभ्यास अभ्यास !!

अभ्यास अभ्यास !! नतमस्तक हो ! एक दडवत घ्यावा..
  • Log in or register to post comments

Submitted by यमगर्निकर on Fri, 02/27/2015 - 12:21

Permalink

तुम्हि विवाहित आहत कि अविवहित

खटसि खट जर तुमचे लग्न झाले असेल तर सुखाने संसार करा, कशाला नसत्या भानगडित पाय अडकऊन घेत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 12:23

In reply to तुम्हि विवाहित आहत कि अविवहित by यमगर्निकर

Permalink

त्रैनुभवाचे बोल?

त्रैनुभवाचे बोल?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 02/27/2015 - 13:26

In reply to त्रैनुभवाचे बोल? by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

अशा प्रतिगामी लोकांच्या

अशा प्रतिगामी लोकांच्या सल्ल्यामुळेच असे नवीन उपक्रम बंद पडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Fri, 02/27/2015 - 14:40

In reply to अशा प्रतिगामी लोकांच्या by काळा पहाड

Permalink

जबरी हो का.प. दडवत घ्यावा.

जबरी हो का.प. दडवत घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 14:44

In reply to अशा प्रतिगामी लोकांच्या by काळा पहाड

Permalink

उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला

=)) उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला असता हो. पण काय करणार युज अँड थ्रो वृत्ती नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/27/2015 - 14:46

In reply to त्रैनुभवाचे बोल? by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे??

यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे???????
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/27/2015 - 15:00

In reply to यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे?? by बॅटमॅन

Permalink

त्रिदंडी त्रिदंडानुभव पंथ

त्रिदंडी
=)) त्रिदंडानुभव पंथ =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/27/2015 - 15:08

In reply to त्रिदंडी त्रिदंडानुभव पंथ by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

अगदी अगदी =))

अगदी अगदी =)) =)) त्रिदंडानुभवी त्रिगर्तगामी पंथ =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com