Skip to main content

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 25/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ? ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?) ९. इतर शंका हळू हळू
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25884
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by सूड

अनुभवशून्य असल्याने >> अरेरे ! सर्वांनीच असे हातपाय गाळून कसे चालेल ? मोदींनी आता लिव्ह इन इंडीया चे मनावर घ्यावे

........ .

३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? अशी काही अट-बीट नाही, पण शक्यतो अविवाहीत असावेत. त्याच काय आहे की, विवाहीत लोक रात्री आपापल्या घरी जातात. मग काय डोंबल लिइरि करणार..?

In reply to by स्वप्नांची राणी

विवाहीत जोड्यांमधले दोघेही लिअरी शोधू लागले तर काय प्रोब्ळेम हो ? संध्याकाळी "आपापल्या" घरीच जातील की.. ;)

५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? तुम्ही फक्त लिईरी च जमवा हो, मानपान आणि मानापमान आपोआपच सुरु होतील.

In reply to by आदूबाळ

रहाणेची आणि तुमची बॅटिंग जोरात चालू असू द्या. लवकरच तुम्हाला एक गंधर्वी प्राप्त होईल :clapping:

In reply to by निमिष ध.

अजिंक्य रहाणे अति झकास... या प्रतिसादाला जादूची झप्पी

In reply to by स्वप्नांची राणी

अजिंक्य रहाणे. =))))) वारलो रे...वारलो! =))))) कोण नक्की अ जिंक्य रहाणार म्हणे यात! =))

७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? हे पत्नीस / पतीस कल्पना द्यावी काय ? असे असायला हवे होते नै ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

ते लिइरी वाचायला कसंतरीच वाटतंय! चुकून 'लिंगरी' असंही वाचलं जाण्याची शक्यता आहे. बाकी चालू द्या.

सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो
आम्ही दोन्हींमध्ये मोडत नसल्याने (म्हणजे गृहस्थ जरी असलो तरी सभ्यतेचे वावडे असल्याने, उगाच भंकसपणा केलेला चालणार नाही) आमच्याकडे चवकशी करू नये. तरीही केल्यास दर प्रश्नाच्या उत्तरामागे स्ट्याण्डर्ड दर आकारला जाईल. (दरपत्रकाची चवकशी करण्याआधीही पैसे द्यावे लागतील. तेवढेही फुक्कट मिळणार नाही.) (अवांतर - चला, यानिमित्ताने भंकस सभ्यपणापेक्षा सभ्य भंकसपणा कसा चांगला यावर नवीन काथ्या कुटता येईल एखाद्या कट्ट्याला!)

In reply to by अन्या दातार

अरे खुळां की कांय तूं अन्या? बक्षिस कसलें, एखादें सर्किट ट्रेनिंग लिहून देतील तें. कांय समजलांस !! ;)

In reply to by सस्नेह

एका वाक्यात नऊ अनुस्वार
एका चार ओळींच्या प्रतिसादात १२ मी, ३ मला, २ माझे/माझ्या आणि एक आम्ही वापरण्यापेक्षा ९ अनुस्वार म्हणजे सस्त्यात भागलं हो!! शिवाय विशिष्ट बोलीची छाप पडण्याच्या दृष्टीने केलं होतं ते, त्यामुळे आपला एक अनुस्वार स्वीकारुन येथें लावीत आहोत. ;)

In reply to by सस्नेह

पुंर्णंविंरांमं कांयं किंवां एंकुंणं संर्वं विंरांमंचिंन्हांवंरंहीं अंनुंस्वांरं उंमंटंवांयंचीं सोंयं व्हांयंलां हंवीं. (आता मो(जी)जा)

२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
टिंडरसारख्या सैटींवर नाव नोंदवावे लागते असे ऐकून आहे. पण तिथेही वाचनमात्र राहून चालत नै बर्का.

४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?) ५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ? ६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
मग लग्नच करावे की!
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
न दिल्यास रात्री कुठे होतात याची रोज नवी उत्तरे देण्याइतकी प्रतिभा असणे आवश्यक आहे.
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
अटीचं कै म्हैत नै, पण त्यातल्या महिलेचा नव्रा सन्नी देवल टैप असल्यास जिवावर बेतू शकेल.
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे किमान एक महिला/पुरुष साथीदार मिळवणे आवश्यक असावे. एकट्याने लिव्ह इन रिलेशन ठेवल्याचे कधी ऐकले नाय ब्वा.

In reply to by पैसा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे किमान एक महिला/पुरुष साथीदार मिळवणे आवश्यक असावे. एकट्याने लिव्ह इन रिलेशन ठेवल्याचे कधी ऐकले नाय ब्वा. >>>>> लोळलो. पण तायबाय एक सांगा की, हा / ही साथीदार मिळवण्यासाठी पहायचा कार्यक्रम करायचा की रस्त्याने जाणा-या येणा-याला ते खाजगी बसच्या बाहेर दबक्या आवाजात कोल्हापूर कोल्हापूर म्हणतात तसं ए लिव्ह इन, लिव्ह इन असे भजावे की , रीतसर पाहण्याचा कार्यक्रम ठेवून कांदेपोहे हापसत पसंती नापसती कळवतो नंतर असे म्हणावे ?

In reply to by आदूबाळ

समोरासमोर विचारणे फार धोक्याचे हो! http://mumbai.quikr.com/I-want-to-relationship-with-girl-W0QQAdIdZ20230… quikr.com/ किंवा olx.in/ या भंगार विकणार्‍या सायटींवर झैरात दिल्यावर कायतरी मिळत असावे बहुधा.

अहो...अहो.... लो क हो! .....................थांबा!!! :stop: आम्ही अत्ताच एक नविन कर्म कांडं प्रसविले आहे.
परस्पारिक स्वेच्छा सहजीवन विधी
नावाचे!!!! आमच्या कडून सदर विधी करवून घेऊन(च) या नात्याची सुरवात करा. म्हणजे(सहजीवनाला..) भरपूर यश हाती लागेल... बुकिंग सुरु *MAIL* भेटा:- आत्मूभट (लि.इ.रि.(धर्मविधी)..स्पेशालिश्टं.. ;) ) म्यारेजकोर्टाच्या बाजूला...ग्यारेज चाळीत..तिसरा मजला...तुटक्या विटेची चवथी खोली!

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्रे हो...लिवीन मुळे धंदा व्यवसाय बसेल नै बर्याच जणांचा रच्याकने लिवीन सुरु करायच्या आधी पत्रिका जुळवावी कै?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाव नका काढू त्या सहकाराचं, राजू शेट्टीच आठवतात डायरेक्ट ! इथं पण घुस्ले म्हणजे ?

मराठीत माहेत नाही पण अकाऊंट भाषेत "हायर परचेस" म्हणू शकता. आवश्यक व आवाक्यातील वाटल्यासच शेवटचा हप्ता भरलावर वस्तू मालकी हक्क प्राप्त होतो "हायर" हे फायरलायर ला फक्त इथेच समानार्थी आहेत.

लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... शालिवाहन काळात भटकत भारतात नशीब काढायला आलेल्या एका युरोपियनाने एक पुरातन संस्कृत ग्रंथ चोरून नेला. त्यात दहा प्रकारचे विवाहविधी लिहीलेले होते... वैदीक, राक्षस, गांधर्व, इ इ इ. त्यातला गांधर्वविवाह त्याला फारच आवडला आणि त्याने युरोपमध्ये एक भूमीगत "गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते उघडकीस आल्यावर तो जीव वाचविण्यासाठी कोलंबसच्या जहाजाच्या वाणसामान ठेवण्याच्या खोलीत लपून अमेरिकेला गेला आणि तेथे त्याने सिसिली माफियाच्या सहकार्याने "जागतिक (अमेरिकेत पहिल्यापासून जे काय असतं ते सगळं जागतीकच असतं) अंडरग्राऊंड गांधर्वसर्कल" स्थापन केले. ते कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणुन त्याने आपल्या संघटनेचे नांव तिथल्या कॅलिफोर्नियामधिल मूल अमेरिकन (रेड इंडियन) भाषेत भांषांतरीत करून ते सांकेतीक नाव म्हणून वापरायला सुरुवात केली, ते असे होते: जागतिक = लिव, अंडरग्राऊंड = इन, गांधर्वसर्कल = रिलेशन; म्हणुन त्या जीवन पद्धतीला "लिव इन रिलेशन" उर्फ "लिईरि" असे नाव पडले. ही चलाखी सुरुवातीला कोणाच्याच ध्यानात आली नाही आणि जेव्हा ते उघड झाले तेव्हा ते लोकांना इतके आवडले की त्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी लिईरि ला कायदेशीर गोष्ट करून टाकली (कॅलिफोर्नियामध्ये असे खूपदा होते). तोच प्राचीन भारतिय गांधर्वविवाह आता पाश्चिमात्य देशांतून परत भारतात (योग चा योगा होऊन आला तंस्सांच्चं अग्दी) आल्यावर ही नविन शिंगे आलेली नविन पिढी त्याला डोक्यावर घेऊन त्याचे आचरण करायला लागली आहे... आणि आचरण न जमणारे आचरट धागे टाकून दुधाची तहान ताकावर भागवताहेत :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का साहेब धंद्यात भागीदारी घेणार काय ? जसे लग्नपूर्वक चाचणी आणि समुपदेशन (premarital counselling) असते तसे सहजीवन पूर्व(pre LIR counselling) समुपदेशनचे दवाखाने काढू या. पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको). प्याकेजेस पण देता येतील. गरोदरपण असेल तर वेगळे. आजार झाले तर वेगळे प्याकेज. ब्रेक अप झाल्यास मानसिक समुपदेशनाचे वेगळे. त्यातून गर्भपाताचे पैसे वायले इ इ. वर जमले तर SME चे फायदे घेत येतील का ते हि पाहू.

In reply to by टवाळ कार्टा

ह्या साठी जुनी नोकरी बदलायची आवश्यकता नाही. असलेल्या नोकरीमधली २-४ प्रकर्णे हाताळता येतील. माउथ टु माउथ (द्वयार्थ नं काढणे) प्रसिद्धीमुळे धंदा आपोआप वाढेल. त्यामुळे मार्केटींग जॉब पहाण्यापेक्षा एखादी फ्रांचायझी घेउन टाक की. हाकानाका..

In reply to by सुबोध खरे

आमचे एक जुने सहाध्यायी म्हणायचे तसे, "प्रयोग करून पाहण्यासारखा आहे" :) पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको). छे,छे. व्यवसाय सुरू केलाच तर "आमची इतर कोठेही शाखा नाही." अशी कूपमंडूक प्रवृत्ती आजाबात दाखवायची नाय. केवळ पुण्यामुंबैत केवळ इनमिन दोन शाखा ?? ह्या, ह्या, ह्या... हे आमच्या स्ट्रॅटेजिक थिंकींग विरुद्ध आहे. अहो सर्व भारतातच नाही तर आलम दुनियेत फ्रँचायजी सिस्टिमचे जाळे उभारू. पॅकेजेसची त्सुनामी तयार करू, एकावर दोन फ्री देऊ (फक्त पहिल्याची किंमत चारपाच पट ठेवली म्हणजे झालं ;) ). आख्ख्या होल दुनियेत टीव्ही-बिव्हीवरून जाहिरांतीचा भडीमार करू, सेमिनार घेऊ, आपण तयार केलेल्या तज्ञांची फौज जगावर सोडू, जगाला पळता भूई थोडी करून सोडू. लिईरि मध्ये न राहणार्‍या एकदम भारी न्युनगंड आला पायजेल... मग ते आपल्या समुपदेशन-शिक्षण-उपचार यापासून दूर पळूच शकणार नाहीत ! :) . आख्खी होल बिलियन डॉलर विंटरन्याशनल विंडष्ट्री हाय सायेब ! आमची प्राचीन आयड्या चोरतात काय ? दाखवूच त्या गोर्‍यांना विंढेन हिस्का, ढिष्कॅंवsss !!! =)) (गुप्त बातमी : सांगू नका कोणाला. बोहोनीसाठी कन्फूsssस झालेले पहिले चार पाच बकरे या धाग्यावरच हेरून ठेवले आहेत ;) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

किती वेळा बदलताय तो प्रतिसाद? नवीन म्हणून उघडून पाह्यलं तर, जुन्याच प्रतिसादावर नवीनचा टॅग दिसला. आयदर काहीतरी चेंज झालंय किंवा मिपा गंडलंय. जुन्या मिपावर प्रतिसाद बदलता येऊ नये म्हणून उपप्रतिसाद देऊन ठेवायची पद्धत होती, तेच केलं. ;)

In reply to by सूड

फक्त स्पेलींग / व्याकरण चुका दुरुस्त केल्या हो :) ही विनंती करून कोणीही करू शकते !