भारत माझा देश आहे??? सारे भारतीय माझे,,,,,,,,,???
मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते. कारण भारत हा देश हिप्पोक्रसी, धर्माजातीआडच्या बुरख्याआड लपलेल्या छुप्या राजकारणावर चालतो.
कसा तो आता सांगतोच
भारताची प्रतिज्ञा काय आहे हो?
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील सम्रुद्ध आणि विविधतेनी नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणुन मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्यानी वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातचं माझे सौख्यं सामावलेले आहे.
चु.भु.दे.घे. मोजुन आठं वाक्याची प्रतिज्ञा आणि त्यातली पण सहा वाक्यं खोटी. व्वा!! क्या बात है. पण हा खोटेपणा ज्यांनी प्रतिज्ञा लिहिली त्यांचा नाहिये, तरं ही प्रतिज्ञा म्हणल्यानंतर साधारण पुढच्या पाच सेकंदांमधे त्याचा अन्वयार्थ विसरुन जाणार्यांचा म्हणजे आपला आहे.१. भारत माझा देश आहे.
आख्ख्या प्रतिज्ञेमधलं पहिलं सत्य वाक्य. झालाय बाबा इथे जन्म, त्यामुळे भारत माझा देश आहेच. आणि हो माझं नशिब चांगलं आहे म्हणुन माझा जन्म भारतामधे झालेला आहे.२. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
प्रतिज्ञेमधलं बहुतेक सगळ्यात खोटं वाक्य. हे वाक्य म्हणायच्या आधी आपण देशबांधव सोडा पण स्वतःच्या सख्ख्या भावंडांना तरी "बांधव" समजतो काय? साधं एक प्रातिनिधिक उदाहरण देतो. शेताचा बांध वितभर इकडचा इकडे झाला म्हणुन पार कुर्हाडी सख्ख्या भावाच्या डोक्यात घालणारी जमात ह्याचं माझ्या भारतात अस्तित्वात आहे. तु हिंदु, हा मुस्लिम, तो तिकडे बसलाय तो अजुन कोणीतरी. कसले बोडक्याचे बांधव रे? बरं एक वेळ कमीत कमी एका धर्मियाने त्याच्याचं स्वधर्मियाला तरी "बांधव" म्हणायची तयारी आहे का आपली? हॅट्ट, आपल्या सगळ्यांच्या अंगातल्या हिप्पोक्रसी ला धक्का लागेल की मग. सारे भारतीय माझे बांधव आहेत ह्या वाक्याचं आचरण करायला गेलं की मी ब्राम्हण, मी मराठा, मी अमुक-तमुक अश्या भिंती बांधणार्यांची दुकानं बंद होतील की मग. उगाचं कशाला कोणाच्या पोटावर पाय आणायचा? लायकीपेक्षा कागदी सर्टिफिकेटवरच्या जातीउल्लेखाच्या एक दोन शब्दाला जिथे महत्त्व आहे तिथे "बंधुभाव" कसा वाढीस लागावा हो. भीक नं मागता अभिमानानी नोकरी करुन जगणार्या तृतीयपंथीयांना सार्वजनिक ठिकाणी काय बंधुभावाची वागणुक मिळते? आपल्याच इशान्य भारतीय बांधवांना आपण नेपाळ्या, चीन्या, गुरखा वगैरे नावानी बोलवतो. केवढा तो बंधुभाव तो, ड्वाळे पाणावले बंधुभावाच्या ओव्हरडोसनी. मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु? होय मला एक बेजबाबदार आणि बंधुभावाचा अभाव असणारा एक भारतीय असल्याची लाज वाटते.३. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
प्रतिज्ञेमधलं दुसरं आणि शेवटचं सत्यवचन. होय माझा जन्म इथे झालायं आणि माझ्या आईवर आहे तेवढचं माझं प्रेम माझं ह्या देशावर आहे. त्याविषयी वाद नाही.४. माझ्या देशातील सम्रुद्ध आणि विविधतेनी नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
देशाच्या अनेक परंपरा नक्कीचं अभिमानास्पद आहेत. त्याविषयी दुमत नाही. पण त्याबरोबर येणार्या कर्मकांडांचा आणि ह्या कर्मकांडांबरोबर येणार्या परंपरांचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे का? कितीतरी परंपरा अश्या आहेत की ज्यामुळे लोकांची आयुष्य उध्वस्तं झालीयेत. एकमेकांवर प्रेम असणार्या दोन लोकांचा फक्त सजातीय नाहीत, रुढी परंपरा मोडतात म्हणुन जीव घेणारे आणि त्यांच्या घरच्यांना वाळीत टाकणारे खाप पंचायत, गावकीची बैठक बसवणारे पण ह्याचं परंपरांचा भाग आहेत की. बाळगणार का त्यांचा अभिमान? देवदासी, मुरळी वगैरे प्रथा परंपरा कमी झाल्यात, पण ह्या स्त्रियांचं आयुष्याची राखरांगोळी करणार्या परंपरा अभिमानास्पद असु शकतात? ही तर फक्तं प्रातिनिधिक उदाहरणं झाली. अश्या शेकडो "अभिमानास्पद" परंपरांच्या नावाखाली हजारो-लाखो लोकं पिचतं आहेतं त्यांचं काय? का परंपरांच्या नावाखाली ही लोकं "कोलॅटरल डॅमेज" ह्या सदराखाली मोडली जावीत? बाकी सणवार आणि त्याच्या अनुषंगानी येणार्या परंपरा ह्या आनंद पसरवत असल्यानी अभिमान आहेचं. होय, मला असल्या अंध परंपरांचा विरोध करायची ताकद नसल्याची एक भारतीय म्हणुन लाज वाटते.५. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी; म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
योग्य परंपरांचा पाईक होण्याला कोणाचाही विरोध नसावा. पण फक्त नुसतं पिढ्यानपिढ्या चालतं आलेल्या अर्थहिन, दुसर्या कोणाचं तरी आयुष्य उध्वस्तं करायची ताकद असणार्या बिनडोक परंपरा पण अगदी प्रयत्न करुन जपल्या जाव्यात ह्याचं दुख्ख: वाटतं. नेमक्या शब्दात मांडता येतं नाहिये मला, पण योग्य परंपरांचा पाईक एवढा एक बारीकसा बदल केला तर प्रतिज्ञेमधे दोनच्या ऐवजी तीन सत्य वाक्य होउ शकतील. होय, बिनडोक परंपरांचा सारासार विचार नं करता अनुसरण करण्याच्या भारतीय वृत्तीची मला लाज वाटते.६. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
भारतीय संस्कृतीचा प्रभाव म्हणा किंवा पालकांशी असणारे स्नेहबंध म्हणा सुदैवानी बहुतेक घरांमधे पालकांचा आदर केला जातोचं. पण ह्यालाही लाखो नतद्रष्ट अपवाद आहेतचं की. आई-बापाची इष्टेट नावावर झाली की त्यांची रवानगी थेट वृद्धाश्रमात करणारे लोकही ह्याचं समाजात आहेत. बरं कमीत कमी जे रवानगी वृद्धाश्रमात रवानगी होणार्या आई-बापांना कमीत कमी चार भिंती तरी असतात हो. पण चक्कं रस्त्यावर सोडुन देणारे महाभागही इथेचं आहेत. गुरुजन आणि आईवडील सोडुन इतर वडीलधारी माणसं ह्यांना सौजन्यानी वागेन. ह्या वाक्याला फाट्यावर मारणारे शेकडा ९० लोकं सहजं सापडतीलं. मी स्वतः एक-दोन गुर्जी सोडले तर बाकीच्या सर्व गुरुजनांना आदरानीचं वागवतं आलेलो आहे. शाळेपासुनचं हल्ली गुर्जी गुर्जींणींचा उल्लेख थेट अरे तुरे, पंचाक्षरी, चाराक्षरी वगैरे विशेष स्नेहभाव व्यक्त करणारे मा, भे, आ पासुन सुरुवात होणारे शब्द वापरल्याशिवाय होतं नाही. सौजन्याचा अतिरेक हो बाकी काही नाही. वडीलधार्यांना बसमधे साधी बसायला जागा नं देणार्या लोकांकडुन सौजन्याची आणि चार समजुतीचे शब्द बोलले जातील अशी अपेक्षा करावी का? पुण्यात पी.एम.पी.एम.एल. मधे डाव्या बाजुच्या जागा महिलावर्गासाठी आरक्षित केलेल्या आहेत. ह्या जागेवर बसलेल्या एका अत्यंत वृद्ध व्यक्तीला अत्यंत उद्धट शब्दात उल्लेख करुन जागेवरुन उठवणार्या धडधाकट कॉलेज कन्यकाही पाहिलेल्या आहेत. पुरुषवर्गही ह्या आजोबांना बसायला जागा द्यावी असा विचार नं करणारा निघाला. (सन्मानिय अपवाद आहेत. पण फोर लिफ क्लोव्हर हुन दुर्मिळ आहेत.) सौजन्याचा हा कडेलोट अगदी. होय, ह्या सौजन्यहिन आणि आदरहिन समाजाचा एक भाग असल्याची एक भारतीय म्हणुन मला जबरदस्त लाज वाटते.७. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.
ज्या देशामधे पैसा फेकल्यावर काहीही मिळु शकतं त्या देशाच्या प्रतिज्ञेमधे हे वाक्यं असावं ही प्रचंड हास्यास्पद गोष्ट आहे. हाचं तो देश जिथे देशाशी निष्ठा बाळहुन असणार्या लोकांनी जन्मठेपं, काळ्या पाण्यापासुन ते फाशीपर्यंतच्या शि़क्षा भोगल्या त्यांच्याच दृष्टीकोनाला "वाट चुकलेले" वगैरे विशेषणं बहाल केली गेली. चुकीच्या आणि "लोहा गरम है, मार दो हातोडा" छाप लोकांच्यामागे अपप्रचाराला बळी पडुन निष्ठा वाहिल्यानी देशाचं काय वाट्टोळं व्हायचं ते होउन गेलं. ज्या देशामधे कुंपणच शेत खातं त्या देशात निष्ठा हा शब्द उच्चारल्याबद्दल काही वर्षांनी कदाचित फाशी होईल. काळानुरुप त्यामधे माझ्या देशाचा पैसा आणि माझ्या देशबांधवांची संपत्ती ह्यांच्याशी निष्ठा वगैरे बदल सरकारी पातळीवरुन झाले नाहीत ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. निष्ठा ज्याच्यावर वाहायची ती व्यक्ती तेवढी विश्वासु नको? होय, चुकीच्या ठिकाणी निष्ठा वाहण्याच्या वृतीचीमला एक भारतीय म्हणुन लाज वाटते.८. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे.
=)) ह्या विषयी मी अधिक काही लिहायची गरज आहे का? दुसर्याला मुलं झाली म्हणुन तुम्ही किती दिवस आनंद साजरा करणार हे माननिय मुख्यमंत्री फडणवीस ह्यांचं विधान पुरेसं आहे असं मला वाटतं. एकुण तात्पर्य काय? मला भारताची नव्हे तर भारतीय असल्याची लाज वाटते. आणि ह्या वरच्या काही प्रकारात मी स्वतःही सामील आहे. पण आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन. पुनर्जन्म ही संकल्पना खरी असेल तर मला पुढचा जन्म परत भारतात मिळाला तरी हरकत नाही. पण तोपर्यंत ह्या देशातले लोकं सुसंस्कृत झाले असतील हिचं अपेक्षा. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्वं. आणि हो जय हिंद जय भारत.In reply to चिमणराव, ती कबूल केलेली कथा by आदूबाळ
In reply to हम्म! by शब्दबम्बाळ
पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.हे वाचायला विसरलात काय? मी माझ्या परिनी प्रयत्न करतचं असतो. ह्या लेखाला मसालेदार म्हणलेलं पाहुन ड्वॉळे पाण्यानी डबडबले. बाहेरच्या देशाचा उल्लेख तरी आलाय का माझ्या लेखात? उगीचं कुठलीतरी शेपटं कुठेतरी जोडु नका. मी प्रतिज्ञा म्हणुनसुद्धा तसं नं वागण्याबद्दल बोलतोय. बाकी अभ्यास वाढवा.
In reply to पुढचा लेख वाचायच्या आधी एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to टीका बोचली वाटत! by शब्दबम्बाळ
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का?तुम्ही तुमच्या आधीच्या प्रतिसादात माझ्याविषयी काय बोल्लायतं? आणि हो कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म असेल तर माझ्याकडुन स्वागतचं आहे. लेख पुन्हा नीट वाचा एवढी एक विनंती. मग चर्चा करु हवं तरं.
In reply to तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अहो कॅप्टन! by शब्दबम्बाळ
In reply to असो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to काही प्रश्न… by शब्दबम्बाळ
भ्रम
In reply to भारत - भारतीय म्हणजे नक्की काय? by कपिलमुनी
In reply to भारत - भारतीय म्हणजे नक्की काय? by कपिलमुनी
In reply to दिक्षा घेतलीत का काय? _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हम्म! by शब्दबम्बाळ
भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे
वरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल.
कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!
In reply to -१०० / +१००! by बहुगुणी
In reply to मला कळत नाहीये. by बाप्पू
In reply to अगदी सहमत.........देशात राहणे by बॅटमॅन
In reply to काय बोलणार… by शब्दबम्बाळ
In reply to तुमचा आयडी बाकी स्वतःच्या by बॅटमॅन
In reply to आभार! by शब्दबम्बाळ
मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल!हा सल्ला अगोदर तुम्ही पाळलात तर इतरांपुढे पाजळायची वेळच येणार नाही. लोका सांगे इ.इ.
In reply to मला पण अपेक्षा आहे इथून पुढे by बॅटमॅन
In reply to हा हा! by शब्दबम्बाळ
In reply to हा हा! by शब्दबम्बाळ
In reply to कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }In reply to माझा पास ! by मदनबाण
In reply to आमचा पण पास.. डब्बल by जेपी
In reply to पास केल्याबद्दल शाल, श्रीफळ ई by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मी पुस्पगुच पाँसर कर्तो... by टवाळ कार्टा
In reply to एकट्या जेपी ला का? म.बा. ला by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to म.बा.ला पुस्प्गुच नै...त्याला by टवाळ कार्टा
मला मायभूमीच नाहीहे आंबेडकरांचे विधान ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. लोकशाही आणि राष्ट्रवाद ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. दोन्हीकडे त्याग आवश्यक आहे. परंतु त्याग नेमका कशासाठी करायचा ह्यामागची कारणे अतिशय भिन्न आहेत. आपले राष्ट्रीय आदर्श कोण असावेत ह्याबद्दलच जिथे अजून एकमत नाही तिथे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला फारशी किंमत नसणार हे उघडच आहे. राष्ट्रवाद काय किंवा आणखी कोणताही वाद काय; शेवटी विचारधारा हे माध्यम आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे ! ह्याचे भान असणे महत्वाचे.
In reply to Nationalism by अवतार
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?स्वतःबद्दल मी कोकणस्थ ब्राह्मण आहे असं सांगणं हे लेखाच्या एकूण संदेशाच्या अत्यंत विपरित आहे.
In reply to मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला by arunjoshi123
ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?को.ब्रा. किंवा बाकी उल्लेखाचा अट्टाहास ह्या वाक्यासाठी.
दहा वर्षे रविवार वगळता