Skip to main content

रुसलेले शब्द

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द माझ्यावर रुसलेत... बहुतेक कोप-यात लपलेत. शोधून त्यांना दामले; मीच फ़ुरगटुन बसले! वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... वाट पाहून थकले; ते अजुनही लपले. लिहायची होती एक शायरी... निदान एक इटकुली नज्म तरी.. बहुतेक त्यांना वाटल... हिला जमणार कुठल? त्यांच ही बरोबरच आहे; नज्म-शायरी... अपना बस कुठे? नाद मी सोडून दिला... शब्दांनी परत हात दिला!
लेखनविषय:

वाचने 2840
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

माफ़ करा. अपलोड नव्हती होत कविता बराच वेळ. आणि मग काहीतरी गड़बड़ झाली.. अचानक 3 वेळा अपलोड झाली.

In reply to by आनन्दिता

शोधून त्यांना दामले;
हे दामले म्हणजे कोण? असो गंमत होती ही. कविता छान आहे, भाव आवडले. (कवितेतले)

वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... व्वा व्वा!! अतिशय सुंदर रचना. syg- नाद मी सोडून दिला... :))

हे राम ... नै नै ---- हेय राम *biggrin* शब्दांनी परत हात दिला का? का? *unknw* * *DONT_KNOW* :HZ: :hz:

वाईट वाटले काही प्रतिसाद वाचून. मान्य आहे अनेक मेंबर्स एकमेकांना अगोदर पासून ओळखतात. पुणेकर असल्याने भेटी देखील होतात... चेष्टा होणारच नविन लेखक/कवी यांची आणि त्यांच्या लेखनाची. परंतु इथे काही प्रमाणात वैयक्तिक बोलले गेले. कदाचित यावर तुम्हा मी पा करांचे म्हणणे असेल की आम्ही तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते. चालायचेच. फ़क्त इथले प्रतिसाद वाचून वाईट वाटले ते सांगावेसे वाटले.

In reply to by ज्योति अळवणी

@ज्योती अलवनि तुम्हाला वाईट वाटावं अश्या उद्देशानी एकही प्रतिसाद इथे लिहिलेला नाही. तुम्हास राग आला असल्यास क्षमस्व. आमची आमची अशीचं मस्ती नियमित चालते. त्यात तुम्हीही सगळे सं.मं,च्या डोक्याला त्रास नं देता सामिल झालात तरं आनंदचं होईल.