✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चार अपशब्द

प — पदकि, Tue, 02/17/2015 - 03:54
(जसे: दाखव विठ्ठला / तुझे देवपण नाहीतर घण/ आहे माझा : विंदा करंदीकर ) खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा बोल तो रांगडा / सुनावितो असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे ? आई-बाप नेले/ मृत्युलागी साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा रक्त भळाभळा / वाहते ते सर्वत्र ही मृत्यू /घालितो थैमान सोडीला हैवान / मोकळा तो. धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ त्याने काय xट/ बदलले? साऱ्या सजीवांना / बनविसी हीन होती मग दीन/ पायी तुझ्या . आम्हा सजीवांना / करी जे भिकारी ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही. अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत घाल ते कांशीत / जग तुझे! : मिलिंद पदकी

प्रतिक्रिया द्या
3750 वाचन

💬 प्रतिसाद (14)

सुरेख लिहीता हो!!

स्पंदना
Tue, 02/17/2015 - 04:01 नवीन
सुरेख लिहीता हो!! विशेषतः
माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही.
या ओळी!!
  • Log in or register to post comments

छान .

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/17/2015 - 06:58 नवीन
छान .
  • Log in or register to post comments

आवडली !

वेल्लाभट
Tue, 02/17/2015 - 07:23 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/17/2015 - 08:23 नवीन
आवडले अभंग.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खुप छान.

प्रमोद देर्देकर
Tue, 02/17/2015 - 09:05 नवीन
खुप छान.
  • Log in or register to post comments

उत्तम !

विटेकर
Tue, 02/17/2015 - 09:43 नवीन
छान च लिहिली आहे. कविता म्हणून छानच असली तरी मध्यवर्ती कल्पना मान्य नाही. " त्याने" कधीच सांगितले नाही की तुमचे भले करीन. उलट अवतार घेऊन पुरुषार्थ गाजवून कसे जगायचे हेच दाखवले आहे. अन्वयार्थ चुकीचा लावण्यात आपण लोक पटाईत असतो. " तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार " असेन तर तक्रार कुणाकडे आणि कशासाठी ? ग्रहांचे साह्य शूराला , यशश्री पायची दासी
  • Log in or register to post comments

थोडं विटुकाकांसारखं मत आहे..

सूड
Tue, 02/17/2015 - 17:41 नवीन
मध्यवर्ती कल्पना मान्य नाही.
कविता म्हणून आवडली. तुमचे विचार म्हणून आदर आहे, पण अपेक्षा ठेवू नयेत; अगदी देवाकडूनही!! मग राग येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

कविता खूप आवडली

होकाका
गुरुवार, 02/19/2015 - 07:39 नवीन
कविता खूप आवडली. @ विटेकर, मध्यवर्ती कल्पना महत्वाचा मुद्दा आहे. मध्यवर्ती कल्पना पटली नाही असं लिहिणं ही आपली इतरांप्रती असलेली कळकळ दर्शवते. कुठेतरी आतमध्ये तुंम्हाला दुसर्‍या व्यक्तीबद्दल काळजी वाटल्याचं जाणवतं. मध्यवर्ती कल्पना पटणं किंवा न पटणं हे दोन्हीही साहजिक आहे. आपण सगळेच सततच्या मानसिक/ वैचारिक उत्क्रान्तीतून घडत / बिघडत असतो. कविता कधीही सुचू शकते — उत्क्रान्तीच्या कोणत्याही क्षणी. तुकाराम महाराजांचे अभंग बघितले तर त्यात हे दिसून येतं, वेगवेगळ्या मनोभुमिकेतून वेगवेगळा दृष्टीकोण मांडणारे, वेगवेगळ्या वेदनांना वाट मोकळी करून देणारे असे पुष्कळ अभंग महाराजांनी लिहिले आहेत. काही अभंगात असाच तक्रारीचा स्वरही जाणवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मस्त

गणेशा
Tue, 02/17/2015 - 12:43 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

.

hitesh
Tue, 02/17/2015 - 17:33 नवीन
सुंदर ...
  • Log in or register to post comments

कल्पाना नाही पटली

ज्योति अळवणी
Tue, 02/17/2015 - 18:38 नवीन
कविता म्हणून ठिक आहे. पण आपल्या दुःखाचा राग देवावर का काढायचा?
  • Log in or register to post comments

चार अपशब्द

पदकि
Fri, 02/20/2015 - 05:27 नवीन
"कर्ता- करविता जर 'तोच'" असेल, तर मग शिव्याही तोच खाणार, नाही का?
  • Log in or register to post comments

मस्त

स्वप्नज
Fri, 02/20/2015 - 07:19 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान

सविता००१
Mon, 02/23/2015 - 12:06 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा