अंध चित्र
लेखनविषय:
चित्र काढताना त्यास पाहिले
क्षणात कुतुहल जागे झाले
रंगाचे चार पट्टेच दिसले
चित्रातुन काहीच न उमजले
चित्राचे गुढ त्यास विचारले
अंध पोर ते गालात हसले
"मनातले चित्र इथे काढले
तुमचे रंगच कमी पडले
रंगाचे ज्ञान जरी नसले
माझे चित्र मीच पाहिले"
डोळस नजरेतुन काय निसटले
जे पोरास पाहता आले?
आजवर सर्वत्र केवळ पाहिले
अनुभवणे केव्हाच होते विसरलेले.
.
वाचने
1887
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
आवडली' खरंच आहे ...
.
आवडली.
.
आवडली कविता
उत्तम!!!!!
सुंदर!!
अप्रतिम
जाणीव करुन देणारी कविता ..