Skip to main content

अंध चित्र

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 22/02/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र काढताना त्यास पाहिले क्षणात कुतुहल जागे झाले रंगाचे चार पट्टेच दिसले चित्रातुन काहीच न उमजले चित्राचे गुढ त्यास विचारले अंध पोर ते गालात हसले "मनातले चित्र इथे काढले तुमचे रंगच कमी पडले रंगाचे ज्ञान जरी नसले माझे चित्र मीच पाहिले" डोळस नजरेतुन काय निसटले जे पोरास पाहता आले? आजवर सर्वत्र केवळ पाहिले अनुभवणे केव्हाच होते विसरलेले. .
लेखनविषय:

वाचने 1893
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आवडली' खरंच आहे ... आजवर सर्वत्र केवळ पाहिले अनुभवणे केव्हाच होते विसरलेले.

धन्यवाद

धन्यवाद

अप्रतिम काव्य