दारी कडुलींब
पसरी सावली
घराला माऊली
जशी वाटे
दारी कडुलींब
घराचे बिरुद
पाव्हण्याला साद
देतो जणू
दारी कडुलींब
पानांचा संभार
गारवा चौफेर
उन्हाळ्यात
दारी कडुलींब
पक्ष्यांचा संसार
घरट्यांचा भार
अंगावर
दारी कडुलींब
खेळामध्ये येतो
आम्हा लपवितो
खोडामागे
दारी कडुलींब
श्रावण खेळतो
झोका झुलवितो
फांदीवर
असा कडुलींब
डोळां साठविते
घर आठवीते
माहेराचे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2037
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगले आहे
असा
नेहेमीप्रमाणे
कविता ...