Skip to main content

कॉफ़ी

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/02/2015 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफ़ीत एक नशा असते... ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने.. अनुभवायची असते.. नशा काही कॉफ़ीची नसते.. ती सोबतिच्या भावनेची असते.. एकटेपणातही नशेची company असते... ती कधी खोल गर्तेत नेते.. दुकटेपणात romance ची सोबत असते... romantic नशेची धुंदी कॉफ़ीत असते... मोजक्या गप्पा, business deals; कॉफ़ी च्या टेबलावरची अनेक thrills... गरमा-गरम गप्पांची वाफाळती कॉफ़ी, हळुवार नजरांची बर्फाळती कॉफ़ी प्रेमाच्या आणा-भाका; कुटुंबांची बैठक कॉफ़ी च्या टेबलाची अशीही एक रौनक सोबत कॉफ़ीची वाट पहातानाची.... खूप कामानंतरच्या निवांत क्षणाची! कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति? कळत-नकळत झाली आपल्यात sink ती... टपरीच्या चहाची इज्जत भारी पण कॉफ़ी च्या टेबलाने आणली नजाकत न्यारी ---------
लेखनविषय:

वाचने 2361
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वर ४ मान्यवरांनी सर्टिफिकट दिल्यावर खरं तर मी अधिक काय लिवणार ? ..इत्केच बोल्ते की, कवयित्रीची काॅफी-काव्य-कल्पकता आणि काव्यातून कस केलेला करूण-क्लांत क्लिष्ट कर्माशय पाहून केवळ स्तिमित झाले आहे +)

ओ ताई/काका, तुमच्या डायरीला किती पानं आहेत? अवांतरः तुम्हाला काळी कडवट कॉफी आवडते का पुणेरी बासुंदीसारखी?

कॉफीची नशा येते तुम्हाला. आयला, भाग्यवान तुम्ही!!! मला बुवा तुमच्या लेखनाची नशा येते!! अजून भरभरून येऊ द्यात!!