चॉकलेट चा बंगला अजून
आठवतो का हळूच मनात
खरं खरं सांगा बरं
गोष्ट राहील आपल्या आपल्यात...
लहानपण जर जपलं असेल
. बिस्किटांची गच्ची दिसेल
टॉफीच्या दारामधली
झुपकेवाली खार दिसेल ...
लेमनच्या खिडकीमधून
. उंच उंच झोका दिसेल
झोक्यावर बसलात तर
मैनेचा पिंजरा दिसेल
चॉकलेट डे च्या दिवशी आज
पुन्हा ऐकदा बंगला दिसला
तुझीच वाट पहात होतो
असं म्हणून हळूच हसला ...
चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये
तुम्ही सुद्धा जाऊन या
बालपणीच्या आठवणी त
फेरफटका मारून या!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3826
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाडगावकरी शैलीतील एक अतिशय
कित्ती गोड
सुरेख!
मस्त
सुंदर
कविता आवडली. कुठेतरी मनाच्या
अस्सावा सुंदर...
खूप गोड कविता . आणि साध्या
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन!!
@हॅलो हॅलो करायला छोटासा फोन!
In reply to हॅलो हॅलो करायला छोटासा फोन!! by स्पंदना
खरंच खूप गोड कविता आहे.आवडली
सुरेख
अप्रतीम
कविता फार आवडली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी