डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही !
तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल !
.
त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)
तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले. त्याने संगणक आणि इंकजेट प्रिंटर तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या खास रोबोच्या साहाय्याने प्रकाश पडल्यावर घन/कडक बनणाऱ्या पॉलिमरचे अनेक थर एकमेकावर रचून मूळ त्रिमिती वस्तू निर्माण केल्या. आज हे तंत्र खूपच विकसित झाले आहे आणि पॉलिमर बरोबर एकाच वेळेस प्लास्टिक, धातू, इ अनेक पदार्थ वापरून अत्यंत किचकट जडणघडण असलेल्या वस्तू बनवता येतात. ग्राहक उत्पादने, वाहन उत्पादने, अनेक उद्योगधंद्यात वापरली जाणारी यंत्रे; तसेच शिक्षण, ऊर्जा, जल, आर्किटेक्चर, वैद्यकीय, इ अनेक उद्योगांना पुरवठा केल्या जाणार्या आधुनिक यंत्रप्रणाल्या बनविण्यासाठी या तंत्राचा अधिकाधिक वापर होत आहे. या तंत्रामध्ये प्रथम जी वस्तू छापायची आहे तिचे संगणक प्रणाली (CAD) आणि 3D स्कॅनर वापरून एक संगणकीय प्रारूप (Computer model) बनवले जाते.
संगणकीय प्रारुपाचे एक उदाहरण (Computer model)
3D छपाई करणार्या रोबोंचे काही नमुने
......

......
......
3D छपाई करून बनवलेल्या काही वस्तू
......
......
......
......
......
......
3D छपाई आणि विमान उद्योग
इतकी प्रगती झाल्यावर या तंत्रज्ञानाने विमानबांधणीसारख्या टोकाच्या उच्च तकनिकी उद्योगाचेही लक्ष वेधून घेतले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या "दुबई एअर शो" या जगप्रसिद्ध विमान उद्योग प्रदर्शनात GE Aviation ने दुबईच्या Emirates या विमानकंपनीबरोबर केलेल्या कराराने त्या उद्योगात खळबळ माजली. या विक्रमी कराराप्रमाणे तब्बल ११०० कोटी अमेरिकन डॉलर्स मोजून ३०० GE9X प्रकारची विमानाची इंजिने खरेदी केली जाणार आहेत आणि ती बोईंग कंपनीच्या १५० 777X प्रकारच्या विमानांत वापरली जाणार आहेत. 777X प्रकारची महाकाय विमाने ३५०-४०० प्रवासी घेऊन १५-१७००० किमी अंतर १५-१७ तासांत आणि एका दमात पार करू शकतात. अर्थातच अशी विमाने फायदेशीर होण्यासाठी त्यांची इंजिने मजबूत, अत्यंत अचूक बांधणीची, अत्यंत भरवशाची, देखभालीची कमीत कमी गरज असणारी, इंधन वाचवणारी आणि वजनाने हलकी असण्याची गरज असते. या सर्व अटी पुर्या करण्यासाठी त्या इंजिनांच्या बांधणीस खास पदार्थ (मटेरियल्स) वापरण्याबरोबरच, त्यांच्या बांधणीची प्रक्रिया १००० डिग्री सेल्सियस तापमानाला धातू वितळवणार्या लेझर किरणांचा उपयोग (Direct Metal Laser Sintering) करणारे 3D छपाईतंत्र वापरून करण्याचे GE Aviation ने ठरवले आहे. यासाठी तिने मॉरीस टेक्नॉलोजीज ही या तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे इंजिनाचे बहुतेक सर्व सुटे भाग GE Aviation आता स्वतःच्याच मालकीच्या कारखान्यात बनवू शकेल. या पद्धतीने बनविलेले पहिले इंजिन २०१६ मध्ये सर्वप्रथम Airbus A320neo, Boeing 737 MAX आणि Chinese COMAC C919 या विमानांत वापरले जाणार आहे. या प्रकारच्या ६००० विमानांचे साधारणपणे ६ कोटी उड्डाणतास पुरे होण्याच्या सुमारास हे नवीनं तंत्र 9X प्रकारच्या इंजिनांच्या उत्पादनात वापरले जाईल आणि Emirates ला या प्रकारचे पहिले 777X विमान २०२० साली मिळेल. एकंदरीत हे नवीनं तंत्र विमान बांधणी आणि प्रवास उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणेल असे दिसत आहे.
3D छपाई करून बनवलेला विमानाच्या जेट इंजिनाचा एक भाग
वाचने
26732
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
३डी चपाई करुन बनवलेल्या वस्तू
वरती छायाचित्रांमधे विमानाचा
In reply to ३डी चपाई करुन बनवलेल्या वस्तू by खटपट्या
सवड काढाच. मी Cnc
In reply to वरती छायाचित्रांमधे विमानाचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
नक्की लिहिन. ५ अॅक्सीस मशिन=
In reply to सवड काढाच. मी Cnc by यसवायजी
धन्यवाद !
In reply to ३डी चपाई करुन बनवलेल्या वस्तू by खटपट्या
पण बाकीच्या गोष्टींच काय?
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मी यातला तज्ञ नाही. केवळ
In reply to पण बाकीच्या गोष्टींच काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
छान. जी.ई. असेल तर क्वालिटी
In reply to मी यातला तज्ञ नाही. केवळ by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम माहिती
:))
In reply to उत्तम माहिती by श्रीरंग_जोशी
परवाच एक अतिशय सुंदर साईट सापडली
उत्तम दुवा
In reply to परवाच एक अतिशय सुंदर साईट सापडली by लंबूटांग
पुण्यातील एका प्रदर्शनामध्ये
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
उद्या माणसाची हुबे हुबे
मध्यंतरी आपल्या हिंदूस्थानात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कभी भुला कधी याद किया... { Sapne Saajan Ke }थ्रीडी प्रिंटिंग इतके पसरेल
आता वेळ मिळाला म्हणुन टंकतो.
कॅजॅस्पॅच्या शेवटच्या
In reply to आता वेळ मिळाला म्हणुन टंकतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
या विषयातली माझी रुची
In reply to कॅजॅस्पॅच्या शेवटच्या by गवि
...The additive manufacturing process involves taking digital designs from computer aided design (CAD) software, and laying horizontal cross-sections to manufacture the part. The process creates the layered cross-sections using a laser beam to melt the raw material. These parts tend to be lighter than traditional forged parts because they don't require the same level of welding. Additive manufacturing also generates less scrap material during the fabrication process... ...Morris Technologies and Rapid Quality Manufacturing focus on the aerospace, energy, oil & gas, and medical industries.तांत्रिक नियतकालिकांत (professional journals) कदाचित जास्त माहिती असू शकेल.हे मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या
In reply to या विषयातली माझी रुची by डॉ सुहास म्हात्रे
सहमतं. जनरल इल. सारखी कंपनी
In reply to हे मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या by गवि
जेट इंजिनाच्या थ्रस्टची ताकद
भन्नाट
प्रोटोटाईप बनवण्यासाठी
उत्तम लेख , उपयुक्त माहीती.
डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल
In reply to उत्तम लेख , उपयुक्त माहीती. by विटेकर
अमेरिकेत F.A.A.
In reply to उत्तम लेख , उपयुक्त माहीती. by विटेकर
खूप छान माहितीपूर्ण धागा ,
या दिशेनेही प्रगती चालू आहे
In reply to खूप छान माहितीपूर्ण धागा , by माझीही शॅम्पेन
या यंत्राचा माहितीपट DW-TV
गमतीची पण सत्य गोष्ट अशी आहे
In reply to या यंत्राचा माहितीपट DW-TV by कंजूस
माहितीपुर्ण.
अत्यंत माहितीपुर्ण अवांतर
In reply to माहितीपुर्ण. by जेपी
या तंत्रामुळे जग परत एकदा
त्रिमिती छपाई व्यवहारात
खुपच रोचक माहीती.... पण,
बनवण्याचे तंत्रज्ञान मागास
In reply to खुपच रोचक माहीती.... पण, by बबन ताम्बे
+१
In reply to बनवण्याचे तंत्रज्ञान मागास by गवि
इतर काही तंत्रांनी जर
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
खाली दुव्यावर संकल्पना दिली आहे.
In reply to इतर काही तंत्रांनी जर by संदीप डांगे
यावरून
In reply to खाली दुव्यावर संकल्पना दिली आहे. by संदीप डांगे
ड्रोनने माणसांची ने आण
In reply to इतर काही तंत्रांनी जर by संदीप डांगे
सुरक्षेच्या बाबतीत फार कठीण
In reply to ड्रोनने माणसांची ने आण by श्रीरंग_जोशी
सहमत पण
In reply to सुरक्षेच्या बाबतीत फार कठीण by संदीप डांगे
हो. तेही खरे आहेच.
In reply to सहमत पण by श्रीरंग_जोशी
हम्म... एकदम पटले. उत्तम विश्लेषन.
हो.
In reply to हम्म... एकदम पटले. उत्तम विश्लेषन. by बबन ताम्बे
तुमच्या दोन्ही प्रतिसादांशी
In reply to हो. by गवि
डायरेक्ट विमान?
कार बनवताना ह्या वेळच्या
In reply to डायरेक्ट विमान? by कपिलमुनी
नॅनो टेक्नॉलॉजिचा वापर कोटींग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }कोणीतरी 3D प्रिंटर वापरून
अशी बंदूक छापून तिच्यातून खरी
In reply to कोणीतरी 3D प्रिंटर वापरून by मालोजीराव
25$ Gun
3D Printing: Make anything
३डी मॅजिक गोष्टी बनविणारा पेन
चांगली माहिती आहे.
निस्तं इमानातून न्हाय,
In reply to चांगली माहिती आहे. by जेपी
ब्येस हाये आयड्या. नॉर्थ पोल
In reply to निस्तं इमानातून न्हाय, by डॉ सुहास म्हात्रे
कृत्रीम अवयव निर्मीती
उलट, आताही थंड डोक्याने
In reply to कृत्रीम अवयव निर्मीती by अर्धवटराव
बायको/गफ/सामान आणि वस्तू यात
In reply to कृत्रीम अवयव निर्मीती by अर्धवटराव
वा!
अतिशय माहितीपूर्ण धागा
आता प्रिंटरवर छापलेल्या
अद्भुत
छान माहीती, धन्यवाद
आज माध्यमांत ही बातमी दिसली.
सुंदर आहेच.
In reply to आज माध्यमांत ही बातमी दिसली. by डॉ सुहास म्हात्रे