महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अंतर्गत, बालभारती ने सर्वप्रथम 1971 मधे किशोर प्रकाशित करायला सुरुवात केली!!, पाठयपुस्तक मंडळात विषय तज्ञ म्हणुन माझे वडील "सिलेबस रिव्यु" ला पुण्याला जात असत, त्यांनीच प्रथम मला ह्या मासिकाची गोडी लावली, कॉन्वेंट मधे शिकुनही आज जी काही मोड़की तोड़की मराठी मी लिहु शकतो त्याचे बऱ्याच अंशी श्रेय ह्या मासिकाला मी देतो, 1992 ते 2000(वय वर्षे 7 ते 16) दर महिन्याला हे मासिक घरपोच अगदी वेळेवर येत असे पोस्टाने. वाचनाची आवड आईबाबांनी फार पद्धतशीर् लावली होती मला ते आज कळुन येते, रेल्वेत 6 वर्षाचा असताना प्रवासात एकदा हळुच "चाचा चौधरी" हाती दिला होता मला त्या वयात ती चित्रे चाचाजी अन साबु चे पराक्रम त्यांनी गोबरसिंह अन धामाकासिंह ला दिलेली धोबी पछाड़ वाचता वाचता हाती किशोर सरकवले गेले. सुरवातीला ते लांब लेख चित्रे नसलेले (कमी असलेले) मासिक नको वाटे तेव्हा बाबा किंवा आई रात्री झोपताना त्यातले लेख कथा वाचुन दाखवत हळूहळू त्यात रस वाटायला लागला, 16 चा झालो तेव्हा त्याच प्रकारे "एक होता कार्वर" हाती आले! क्रमबद्ध आवड विकसित करत मग आजोबांच्या कपाटात असलेल्या सावरकर, टिळक, आझाद, भगत, मानवेंद्र नाथ रॉय इत्यादी ताऱ्या बरोबर ओळख वाढली! थोर पुरुष भांडतात ते विचारसरणी वर अन अनुयायी भांडतात ते पुरुषांचे नाव घेऊन हे सत्य नेमक्या वयात कळले.
किशोर चा खाका उत्तम होता!! त्याच्या तत्कालीन संपादक मंडळीच कौतिक करावे तितके कमी!प्रथम एक लेख शिवाजी महाराजांच्या न ऐकलेल्या कथा (हिरकणी,गड आला पण सिंह गेला वगैरे सोडुन) असत ते लेख सुद्धा बाबासाहेब पुरंदरे,सेतु माधवराव पगड़ी,निनाद बेडेकर वगैरे बाप लोकांचे असत, त्यानंतर एखाद बालवीर हीरो (फास्टर फेणे, बिपिन बुकलवार टाइप) कसा सत्यरक्षणार्थ करामती करतो ह्या आशयची एक फिक्शनल गोष्ट, मधेच कोडी शब्दकोडी ,शेवटी जागतिक अन राष्ट्रीय चालू घडामोडी अन क्विज अन अगदी शेवटी बालवाचक अन त्यांच्या पालकांचा पत्रव्यवहार असला साधा सुटसुटीत मामला, एका "किशोर"वयीन मुलावर वाचन संस्कार करायचा परफेक्ट मसाला अन रेसिपी होती ती!!!
दगडाचे सूप लिहिल्यावर सहज हे सगळे आठवत गेले अन लिहित गेलो. आपल्या पैकी किती जणांनी किशोर वाचले आहे? आपला अनुभव काय होता? किशोर चा आपल्या जड़णघड़णीत एक वाटा असल्याचे किती जणांस् वाटते, नसल्यास असे कुठले साहित्य होते ज्याने त्याला हातभार लावला, चला ह्या धाग्यात हे सगळे चर्चा करुयात
(नॉस्टॅल्जिक) बाप्या
प्रतिक्रिया
महिन्याभरावरापूर्वी किस्त्रीम
ओह!!! मी नव्हते वाचले हे दुवे
किशोर, छावा, ठकठक आणि चंपक
वाचता येत नव्हते तेव्हापासून
अतिशय साधी छपाई पण उत्कृष्ट
किशोर आणि बालवाडी
माझ्याकडे अजूनही जुने किशोर चे अंक आहेत
मझ्यामते किशोर चा एक क्लास
आमच्या धाग्याचि जाहिरात
तुम्हाला खोट वाटेल पण आजही
'किशोर' जास्त वाचनात नाही आले
किशोर बालपणीचा बेस्ट फ्रेंड
आज शुद्ध समृद्ध भाषेचा वापर
नुसतीच आठवण का गतकाळाचा नॉस्टेल्जिया?
किशोर
काय आठवण काढलीत!
आपण किशोरच्याही आधीच्या काळचे
असेलही
किशोर मासिकाचे जुने अंक
किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण
किशोर आणि चांदोबा वचायला
आणि तुम्ही म्हणता सरकार काहीच
खूपच छान आठवण
एकदा किशोरचा नवा कोरा दिवाळी
किशोर आणि चांदोबा
थोर पुरुष भांडतात ते
थोर पुरुष भांडतात ते विचारसरणी वर अन अनुयायी भांडतात ते पुरुषांचे नाव घेऊन हे सत्य नेमक्या वयात कळले.सहमत आहे बापु :) बाकी किशोरबद्दल बाडिस ! माझ्याकडे सोलापूरच्या घरी अजुनही जवळपास सत्तर-ऐशी जुने अंक जपून ठेवलेले आहेत किशोरचे. अतिशय आवडते पुस्तक :)