ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच.
वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला. सैन्य ही युद्धघोष तिच्या मागे निघाले. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिथे लक्ष न देता केवळ शत्रूचा पराभव, हाच उद्देश्य ध्यानात ठेऊन तिने रणांगणावर वर रथ चौफेर उधळला. एका रथी प्रमाणे युद्ध करून तिने हजारो शत्रू सैनिकांचा पाडाव केला. युद्धात जय मिळवून दिला. गौ धन ही पुन्हा परत मिळाले. मुद्गलानीच्या नेतृत्व आणि पराक्रमा मुळे विजय मिळाला, सर्वांनी तिचे कौतुक केले. त्या वेळच्या इतिहासकार अर्थात मंत्रदृष्टा ऋषीनीं वीरांगना मुद्गलानीच्या पराक्रमाची नोंद घेतली. तिच्या पराक्रमाची गाथा ऋग्वेदात ऋचाच्यां रुपात आज ही जिवंत आहे.
उत् स्म॒ वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ भरे॑कृतं व्यचेदिन्द्रसेना ॥ २ ॥
(ऋग्वेद १०/१०२)
प्रख्यात योद्धा मुद्गल याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या जवळच रथांत बसली. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही. इंद्रसेनेत रथी होऊन तिने हजारो शत्रू सैनिकांचा पराभव केला आणि गायींना प्राप्त केले.
वाचने
3674
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
कथा मस्तच!!
कुठे लढता म्हणे आपण?
In reply to कथा मस्तच!! by स्पंदना
मिपा कोणत्या युध्धभूमीपेक्षा
In reply to कुठे लढता म्हणे आपण? by एस
तात्या, तै कोल्लापूरातल्या
In reply to कुठे लढता म्हणे आपण? by एस
कुट नाय ते विचारा!!
In reply to कुठे लढता म्हणे आपण? by एस
धार लावायला मिपासारखे ठिकाण
In reply to कुट नाय ते विचारा!! by स्पंदना
कुठेकुठे!
In reply to कुट नाय ते विचारा!! by स्पंदना
तै
In reply to कथा मस्तच!! by स्पंदना
ते नंतर
In reply to तै by पगला गजोधर
अस्स कस्स, अस्स कस्स !
In reply to ते नंतर by स्पंदना
मस्त
कथा आवडली.