लोकहो,
देवद्वार छंदावर छान चर्चा झाली . त्याला प्रतिसादही अभूतपूर्व मिळाला. आमचे तात्यासाहेबही उत्तम काव्यलेखन करू शकतात हे देवद्वार ने सिद्ध केले. नानामहाराज चेंगट , सहजराव, मनीषाताई, घाटावरचे भट, मदनबाण, ऋषिकेश, कपिलराव, अरूणपंत मनोहर, दिपोटी, लिखाळपंत, चेतनराव या सर्वांनी या छंदात सुरेख लेखन केले. आमचे लेखन सार्थकी लागल्याचा आनंद मिळाला. त्यानिमित्ताने मिपावर छंदशास्त्र हे स्वतंत्र सदर निर्माण झाले. (इतरत्र कुठेही छंदशास्त्राला वाहिलेले स्वतंत्र सदर आमच्यातरी पाहण्यात नाही.) लोकहो, तुम्हां सर्वांना या धोंडोपंताचा दंडवत.
आज अजून एक अत्यंत सोपा आणि गोड छंद घेऊन आलो आहोत. या छंदाचे विविध प्रकार छंदशास्त्रात आहेत. पण त्यातील सर्वात सुटसुटीत प्रकार इथे मांडतो.
पादाकुलक छंद
या छंदाला साध्या सोप्या भाषेत अष्टाक्षरी असे म्हणतात. जरी त्याचे मूळ नाव पादाकुलक असे असले तरी अष्टाक्षरी हेच नाव आता प्रचलित आहे. नावावरूनच छंदाचा बोध होतो.
या छंदात एका चरणात आठ अक्षरे असतात. आणि ४|४ अक्षरांचे दोन गण यात कल्पिलेले आहेत. छंद अत्यंत सोपा, सुलभ आणि गोड आहे.
प्रत्येक ओळीत आठ अक्षरे आणि चार ओळींच्या चरणात दुसर्या आणि चौथ्या ओळींचा यमक एवढेच या छंदाचे मागणे आहे. अत्यंत गोड, हळवी, प्रेमळ गीते या छंदात लिहिली गेली आहेत.
उदाहरणार्थ, आपल्या बहिणाबाईंच्या रचना याच छंदात आहेत.
मन वढायं वढायं
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
पुन्हा येतं पिकावर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
पान्यावरल्या रं लाटा
काय लिहिलाय बहिणाबाईंनी. बहिणाबाईंना आमचा दंडवत.
स्वामी मालिका आठवतेय ना???????
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
तुझे प्राण माझे प्राण
उरले ना वेगळाले
काय आहे हे? अष्टाक्षरी आहे रावं अष्टाक्षरी
या छंदातली आमची एक रचना येथे देतो
दृष्टी लागे पैलतीरी
नाही उरली वासना
पुरे झाले जिणे देवा
सोडवा ना दयाघना
किती सोसावे सोसावे
जिवावरचे आघात
मानले मी ज्यांना माझे
त्यांनी केला माझा घात
सभोवती किती दिवे
नाही तयांना गणती
अंधारात विझुनिया
गेली माझीच पणती
दान मागतो मी देवा
तुझ्या कृपेचा जोगवा
दिगंतरा चाललासे
माझ्या पाखरांचा थवा
आपणही हा छंद आत्मसात करून प्रतिभेला न्याय द्यावा या अपेक्षेसह....
आपला,
(अष्टाक्षरी) धोंडोपंत
विशेष
वाचने
22847
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
धोंडोपंत
कवितेच्या
In reply to धोंडोपंत by विसोबा खेचर
वाहवा तात्या!
In reply to धोंडोपंत by विसोबा खेचर
अप्रतिम
In reply to धोंडोपंत by विसोबा खेचर
गोष्टी
In reply to अप्रतिम by धोंडोपंत
जीवनाचा
अ प्र ति म
In reply to जीवनाचा by प्राजु
:)
In reply to अ प्र ति म by बिपिन कार्यकर्ते
जीवनाचा
In reply to जीवनाचा by प्राजु
सूर्य कुठून उगवला ?
In reply to जीवनाचा by विसोबा खेचर
खिखिखि
In reply to सूर्य कुठून उगवला ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
छंद लागे जीवा
In reply to जीवनाचा by विसोबा खेचर
कुवी
In reply to जीवनाचा by विसोबा खेचर
मस्तच. जीवन
In reply to जीवनाचा by प्राजु
दंडवत
धन्यवाद
In reply to दंडवत by अरुण मनोहर
देवीवर
In reply to धन्यवाद by धोंडोपंत
काय होइल होइल
सुंदर रचना,....
In reply to काय होइल होइल by कपिल काळे
अनुष्टुभ छंद
In reply to काय होइल होइल by कपिल काळे
वा वा
In reply to काय होइल होइल by कपिल काळे
वा!
हा हा
In reply to वा! by ऋषिकेश
मस्त
In reply to हा हा by धोंडोपंत
धन्यवाद पंत
वा वा , छान.
In reply to धन्यवाद पंत by सहज
पंत अभारी आहे
वा
In reply to पंत अभारी आहे by अमोल केळकर
कुठे गेले
हा हा हा हा
In reply to कुठे गेले by कपिल काळे
चुकलो.
नाय
In reply to चुकलो. by ब्रिटिश
आठ अक्षरे
सांभाळले
In reply to आठ अक्षरे by अरुण मनोहर
वा
In reply to आठ अक्षरे by अरुण मनोहर
भले काव्य
अष्टाक्षरी अमुचाही !
छंदाचा हा सुगंध
धन्यवाद
देवद्बार छंदातल्या कविता
दादा, तुमचा
सुरेख
पंढरी (अष्टाक्षरी)
क्या बात
In reply to पंढरी (अष्टाक्षरी) by प्रशांत.पोरे
आहा...
बाय द वे,
In reply to आहा... by आचरट कार्टा