नमस्कार मंडळी,
आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी शक्य झाल्यास रजा घेऊन निकालांसाठी नवा धागा चालू करेन.
कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवालांनी ज्या हिंमतीने हा सामना लढविला आहे त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.विशेषत: एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये आआपचा दिल्लीत मोठा पराभव झाला होता, नंतरच्या काळात अनेक महत्वाचे साथीदार सोडून गेले, योगेन्द्र यादव यांच्याबरोबरही मतभेद आहेत असे चित्र होते आणि मतदानाला १५ दिवस राहिलेले असताना शांती भूषण या आआपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या महत्वाच्या नेत्याने केजरीवालांनाच बदला अशी मागणी केली या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तसेच दिल्लीसारख्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत काही दशके होत असताना तिसऱ्या पक्षाला चंचूप्रवेश करणेच मुळात कठिण होते.ते त्यांनी केलेच.आणि आता सर्व एक्झिट पोल्स कॉंग्रेसला ५ पेक्षाही कमी जागा देत आहेत (काही शून्य जागा सुध्दा देत आहेत) म्हणजे केजरीवालांनी कॉंग्रेसला दिल्लीतून जवळपास हद्दपार केले आणि परत दिल्लीचे राजकारण दुरंगी केले या दाखविलेल्या हिंमतीबद्दल केजरीवालांना माझ्यासारख्या आआपविरोधकाकडूनही १०० पैकी ११० मार्क.
जर आआपला यश मिळाले तर
१. आआप: हा विजय नक्कीच आआपसाठी मोठा मनोबल उंचाविणारा असेल.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे केंद्रात नरेंद्र मोदींना सामोरे जायला लागणार आहे त्याच गोष्टीला (लोकांच्या आपणच वाढविलेल्या अपेक्षांना सामोरे जाणे) भविष्यात केजरीवालांनाही सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने कारभार करायला हवा. धरणे धरणे आणि राज्यकारभार या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक समजून घ्यायला हवा. असे रस्त्यावरचे राजकारण करणे हे बेजबाबदारपणाचे आहे हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. तसेच दिल्ली हे अजूनही पूर्ण राज्य नाही आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा आहेत त्या चौकटीतच राहून काम केले पाहिजे.इतर राज्यांप्रमाणे दिल्लीलाही अधिकार द्या ही मागणी रास्त आहे आणि त्यासाठी घटनात्मक मार्ग अवलंबल्यास कोणाचीही हरकत त्याला असेल असे वाटत नाही.पण मागच्या वेळी जो आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखविला तो हद्दपार करावा ही अपेक्षा नक्कीच आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी स्वबळावर सरकार येणार आहे तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले तर दोष इतर कोणावरही ढकलता येणार नाही ही परिस्थिती नाकारून चालणार नाही.
तसेच दिल्ली म्हणजे सगळा देश नाही हे पण केजरीवालांनी (आणि त्यांच्या समर्थकांनी) लक्षात घ्यायला हवे. दिल्ली हे ९५% पेक्षा जास्त शहरी राज्य आहे.दिल्लीत ज्या मार्गांचा पक्ष वाढवायला उपयोग झाला तेच मार्ग सगळ्या देशात उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात घेऊन त्या प्रमाणातच अपेक्षा ठेवाव्यात.मागच्या वेळी विधानसभेत यश मिळाल्यानंतर लोकसभेत १०० जागा जिंकणार अशा अपेक्षा, कोणी कोणी तर केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला निघाले होते.असल्या अपेक्षा ठेवायला योग्य वातावरण दिल्लीतील विजयामुळे निर्माण होईल असे वाटत नाही.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे केजरीवालांना पक्ष एकत्र ठेवता आला पाहिजे.शेवटी आम आदमी पक्ष म्हणजे ’चळवळ्या’ लोकांचा पक्ष आहे.त्यात विविध मतेमतांतरे असलेल्यांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात आपापसातल्या भांडणांचे जाहिर प्रदर्शन इतक्या वेळा आआपने केले होते तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मतदार केजरीवालांना परत संधी द्यायला तयार झाले असतील तर त्या लोकभावनेवर स्वार होऊन पक्ष एकत्र ठेवणे आणि राज्यकारभार करणे ही कौशल्याची गोष्ट आहे.ती केजरीवालांना साधता यायला हवी.
२. भाजप: पक्षासाठी हा पराभव नक्कीच धक्कादायक असेल.विशेषत: २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींचा विजयरथ जो चौफेर उधळला होता त्याला अटकाव नक्कीच बसला असे चित्र या पराभवातून उभे राहिल.मतदान व्हायच्याही आधी ही निवडणुक म्हणजे मोदी सरकारवरील सार्वमत नाही अशी पूर्वी कॉंग्रेसचे नेते भाषा करायचे ती भाषा भाजपवाले करत होते ती नक्कीच धक्कादायक आहे.हा पराभव झाल्यास सर्वात पहिल्यांदा मोदी आणि अमित शहांनी त्या पराभवाची जबाबदारी जाहिरपणे स्विकारायला हवी.अन्यथा कॉंग्रेसमध्ये चालायचे तसे-- जिंकल्यास श्रेय गांधी घराण्याचे आणि पराभव झाल्यास दोष इतर कोणाचा अशी परिस्थिती भाजपमध्ये मोदी-शहांच्या नावाने उभी राहिल्यास ते योग्य नाही.असे करणे म्हणजे परिस्थितीपासून दूर पळून आत्मवंचना करणे हा त्याचा अर्थ होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा पराभव नक्की का झाला हे आत्मपरिक्षण करणे योग्य ठरेल.लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत. त्या अपेक्षा एका रात्रीत पूर्ण होतील अशी कोणाचीच अपेक्षा नाही.पण निदान त्या दिशेने पावले पडत आहेत हे चित्र निदान वरकरणी नाही.धोरणे बनविण्याच्या दृष्टीने पावले पडत असतीलही कदाचित पण अजून ’अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत तेव्हा लोक कुठे आहेत ’अच्छे दिन’ हा प्रश्न नक्कीच विचारणार आहेत.तेव्हा मतदारांना गृहित धरून चालायचे नाही.
मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल.त्यामुळे कारभारात सुधारणा करून त्याची फळे दिसायला पुरेसा वेळ आहे.त्या संधीचा पूर्ण फायदा पक्षाने उठवायला हवा. दिल्लीत पराभव झाला असला तरी आभाळ कोसळलेले नाही.शेवटी दिल्ली म्हणजे लोकसभेत अवघ्या सात जागा असलेले छोटे राज्य आहे.पण या पराभवानंतर कोषात जाऊन यानंतरच्या काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये (विशेषत: बिहारमध्ये) पराभव झाल्यास मात्र त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील.२०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये (केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,आसाम) भाजपला आसाम सोडून इतर राज्यांमध्ये फार चमकदार कामगिरी करता येणे कठिण आहे.तेव्हा बिहारनंतर थेट मार्च २०१७ मध्ये गोवा,पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड याच निवडणुका असतील.तेव्हा मधल्या काळात नरेंद्र मोदींची पकड ढिली होत आहे हे चित्र उभे राहणे भाजपला परवडणार नाही. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणुकांचे महत्व लक्षात यावे.
दुसरे म्हणजे दिल्ली भाजप हे एक दुभंगलेले घर गेली कित्येक वर्षे आहे ही परिस्थिती बदलायला हवी. सतत एकमेकांशी भांडणार्या स्थानिक नेत्यांना नारळ देऊन मीनाक्षी लेखींसारख्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी केली तर ते चांगले ठरेल. दुभंगलेले सैन्य घेऊन आयत्या वेळी सेनापती बदलून युध्द जिंकता येत नाही हे भाजपने दिल्लीत १९९८ मध्ये अनुभवले तेच २०१५ मध्ये अनुभवले असे चित्र उभे राहिल.त्या दृष्टीने निदान पुढच्या निवडणुकांसाठी तरी भाजपने आतापासून लोकांसमोर एकजुटीने सामोरे जावे हे इष्ट.
३. कॉंग्रेस: हे निकाल मात्र कॉंग्रेस पक्षाची झोप उडवतील हे नक्कीच.दिल्लीमध्ये ७० पैकी ५ पेक्षा कमी जागा मिळणे म्हणजे पक्षाची मोठीच वाताहत झालेली असेल.पक्षाला राहुल गांधी नवी दिशा देऊ शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द होईल.अजय माकनसारखा चेहरा पुढे करूनही आणि दिल्लीमध्ये १५ वर्षे काम करूनही इतका मोठा पराभव का पदरी पडला याचे आत्मपरिक्षण करणे नक्कीच गरजेचे असेल.१९७९ ते १९९७ या काळात विरोधी पक्षात असताना इंग्लंडमधील लेबर पक्षाने टोनी ब्लेअर हे नवेच नेतृत्व पुढे आणले आणि मग सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या त्याप्रमाणे कॉंग्रेसला नक्कीच स्वत:ला रिइन्व्हेंट करायला हवे.
वाचने
16213
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम विवेचन क्लिंटन.
ही निवडणूक नक्कीच कठीण जाणार
मते आवडली.. आनखिन विस्तारीत
कारण
In reply to मते आवडली.. आनखिन विस्तारीत by गणेशा
>>> मलाही १० तारखेनंतर धागा
In reply to कारण by क्लिंटन
मलाही १० तारखेनंतर धागा
In reply to कारण by क्लिंटन
श्रीगुरुजी यांनी काढलेल्या
In reply to मलाही १० तारखेनंतर धागा by गणेशा
>>> श्रीगुरुजी यांनी
In reply to श्रीगुरुजी यांनी काढलेल्या by पिंपातला उंदीर
प्रतिसाद द्यायची लई इच्छा
In reply to >>> श्रीगुरुजी यांनी by श्रीगुरुजी
गुड. वरच्या प्रतिसादात दिलेला
In reply to प्रतिसाद द्यायची लई इच्छा by पिंपातला उंदीर
दिल्लीच्या दुसर्या धाग्यावर
In reply to गुड. वरच्या प्रतिसादात दिलेला by श्रीगुरुजी
निवडणुक झाल्यावर मतमोजणी ३
In reply to दिल्लीच्या दुसर्या धाग्यावर by पिंपातला उंदीर
(No subject)
In reply to प्रतिसाद द्यायची लई इच्छा by पिंपातला उंदीर
पिंपातला उंदीर, तुमच्यासाठी
In reply to (No subject) by नांदेडीअन
(No subject)
In reply to पिंपातला उंदीर, तुमच्यासाठी by नांदेडीअन
श्री गुरुजी, जास्त वयक्तीक
In reply to >>> श्रीगुरुजी यांनी by श्रीगुरुजी
चांगले विश्लेषण. भाजपने आआपला
छान विवेचन.
मस्त
हायकमांड
In reply to मस्त by विकास
दुसरी फळी
In reply to हायकमांड by क्लिंटन
आणि दुसरे म्हणजे वाजपेयी आणि
In reply to हायकमांड by क्लिंटन
पहील्या फळीतल्या सो कॉल्ड
In reply to आणि दुसरे म्हणजे वाजपेयी आणि by हाडक्या
भाजपत ह्या पूर्वी पहील्या
In reply to हायकमांड by क्लिंटन
धन्य !
In reply to भाजपत ह्या पूर्वी पहील्या by प्रसाद१९७१
मान्य आहे. पण मला वाटते
In reply to भाजपत ह्या पूर्वी पहील्या by प्रसाद१९७१
>>> भिती एवढीच वाटते की
In reply to हायकमांड by क्लिंटन
भारतात एकूण ३ विचारधारा
In reply to >>> भिती एवढीच वाटते की by श्रीगुरुजी
+१ आणि किंचित अजून पुढे
In reply to हायकमांड by क्लिंटन
भाजपचे सरकार आले नाही तरी
सहमत.
In reply to भाजपचे सरकार आले नाही तरी by निनाद मुक्काम …
विश्लेषण आवडले.
आशा आहे
दिल्ली आप जिंकणार अशी लक्षणे
In reply to आशा आहे by हुप्प्या
दिल्ली आप जिंकणार अशी लक्षणे दिसत आहेत. दुसर्या संधीचे तरी त्यांनी सोने करावे अशी अपेक्षा. पहिली संधी गमावल्यामुळे विश्वासार्हता गेली ती पुन्हा प्रचंड प्रयत्नांनी मिळवता आली. पण हे पुन्हा पुन्हा करता येणार नाही. त्यामुळे नीट कारभार करावा लागेल.सहमत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुळ लेखात क्लिंटन यांनी म्हटल्याप्रमाणे केजरीवाल यांना सगळ्या सहकार्यांना प़क्षाशी बांधून ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. शुभेच्छा !एकत्र येउन
अवांतर विचार, अवांतर प्रश्न.
आवडला प्रतिसाद..
In reply to अवांतर विचार, अवांतर प्रश्न. by अर्धवटराव
+१
In reply to अवांतर विचार, अवांतर प्रश्न. by अर्धवटराव
+++११११
In reply to +१ by विकास
मोहल्ला समित्या
In reply to अवांतर विचार, अवांतर प्रश्न. by अर्धवटराव
मोहल्ला समित्यांचं खुळ.
In reply to मोहल्ला समित्या by क्लिंटन
सत्त्ता मिळवणे सोपे, राखणे
सह्मत
In reply to सत्त्ता मिळवणे सोपे, राखणे by खटपट्या
मस्तं विवेचन.
चांगले विश्लेषण!
कांग्रेस पक्ष हरला नाही आहे,
सर्वाथाने सहमत
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
जो प्रधानमंत्री राजधानी
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
आपण कांग्रेसच्या
In reply to जो प्रधानमंत्री राजधानी by पिंपातला उंदीर
https://twitter.com
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
विचार करायला लावणारा प्रतिसाद
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
शक्य आहे
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
मला आप आवडत नाही पण तुमचे
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
क्या "आप" भी?
In reply to कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, by विवेकपटाईत
या निवडणूकीत एका वोट ची किंमत हजार रुपये होती. आमच्या उत्तम नगरच्या आपच्या उम्मेद्वाराच्या गोदामातून ८८०० बाटल्या पोलिसांनी जब्त केल्या तरी ही दारू वाहत होती. बहुतेक निवडणूक जिंकेल.मुद्दाम आठवण ठेऊन या उमेदवाराची बातमी फॉलो केली, नरेश बालियन हा "आप"चा उमेदवार निवडून आलाच पटाईत साहेबांच्या होर्याप्रमाणे, आणि त्याची दिल्ली पोलिस कमिशनरने दोन तास चौकशीही केली आज असं दिसतं. पुढे काय होतं ते पहायला हवं. या 'आप'च्या उडदामाजी काळे किती हे कळायला हवेच. शुक्रवारी म्हणे 'आप'च्या संजय सिंग, आशुतोष आणि आशीष खैतान यांनी याच कमिशनरला भेटून नरेश बालियान याची चौकशी निवडणुकीनंतर करा अशी विनंती केली होती. या सर्वावर (आणि या नवनिर्वाचित आमदारास अटक झाल्यास) अरविंद केजरीवाल, आणि आतापर्यंत मलातरी प्रामाणिक आणि संयमी वाटणारे योगेंद्र यादव, यांची प्रतिक्रिया काय असेल ते नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं असेल.बापरे!
In reply to क्या "आप" भी? by बहुगुणी
मुद्दाम आठवण ठेऊन या
In reply to क्या "आप" भी? by बहुगुणी
दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. TOI ने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून Clarification सुद्धा छापले होते. इलेक्शन कमिशननेसुद्धा कुठेही नरेश बाल्यान यांचे नाव घेतल्याचे मला आठवत नाही. I answered all questions I was asked, in future also if I'll be summoned I will extend full cooperation. - Naresh Balyan ^ ANI ची बातमी एखाद्या जागी दारू पकडल्या गेली तर स्वतः पोलिस कमिशनर कॅमेर्यापुढे येऊन बाईट देतांना आजवर मी तरी पाहिले नव्हते. दिल्ली पोलिस कुणाच्या ऑर्डवर काम करते हे जाणून घेण्यासाठी राज्यघटना वाचण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळे फक्त ‘आप’ च्या उमेदवारावर आरोप का लावल्या गेले असतील हे सहज समजण्यासारखे आहे. कॉंग्रेस-भाजपच्या उमेदवरांचे दारू वाटतांनाचे व्हिडिओ यूट्युबर उपलब्ध आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलत नाही यातच सगळे आले. समजा चौकशीअंती स्पष्ट झाले की दारू नरेश बाल्यान यांचीच होती, आणि तरीही आम आदमी पार्टी जर तेव्हा त्यांचा बचाव करताना दिसून आली तर ते निषेधार्हच असेल ! आप असा एकमेव पक्ष आहे ज्याला अधिकृत विपक्ष नाही, पण त्यांचे लाखो कार्यकर्तेच त्यांच्यासाठी विपक्षाचे काम करतात. अवांतर - दिल्लीचे सध्याचे पोलिस कमिशनर भिम बस्सी मला निरज कुमार यांच्यासारखेच वाटतात. इंडिया टुडे च्या कार्यक्रमात या निरज कुमारांनी अरविंद केजरीवालची टिंगल उडवतांना स्वतःची पातळी दाखवून दिली होती.
माहिती...
In reply to मुद्दाम आठवण ठेऊन या by नांदेडीअन
उत्तम लेख
शक्य आहे
In reply to उत्तम लेख by llपुण्याचे पेशवेll
धोरणे
कारण
In reply to धोरणे by मित्रहो
मुद्दा
In reply to कारण by क्लिंटन
आपले म्हणणे बरोबर वाटते आहे.
In reply to मुद्दा by मित्रहो
According to Today’s Chanakya
प्रतिक्रिया द्यायला आवडेल.
धन्यवाद.
In reply to प्रतिक्रिया द्यायला आवडेल. by श्रीगुरुजी
मला वाटते की टॅक्स पेअर्स अ
+१००
In reply to मला वाटते की टॅक्स पेअर्स अ by जयंत कुलकर्णी
टॅक्स पेअर्स अॅसोसिएशन
खर्च केल्यास टॅक्स भरावा
In reply to टॅक्स पेअर्स अॅसोसिएशन by दुश्यन्त
मी कंपन्या असेही म्हटले आहे.
In reply to खर्च केल्यास टॅक्स भरावा by जयंत कुलकर्णी
जयंत कुलकर्णींंशी सहमत
In reply to मी कंपन्या असेही म्हटले आहे. by जयंत कुलकर्णी
देशाच्या साधन संपत्तीवर पहिला
+१ आणि किंचित अजून पुढे
In reply to देशाच्या साधन संपत्तीवर पहिला by सुबोध खरे
एक कदम आगे...
In reply to देशाच्या साधन संपत्तीवर पहिला by सुबोध खरे
एक कॉन्स्पिरसी थिअरी
In reply to देशाच्या साधन संपत्तीवर पहिला by सुबोध खरे
भाजपचा विजय झाल्यास
विश्लेषण योग्य ...
In reply to भाजपचा विजय झाल्यास by क्लिंटन
ह्म्म...
भाजपाचा पराभव हा कदाचित
In reply to ह्म्म... by विटेकर
खैरातीची चटक
ह्म्म.. कदाचीत असे ही असेन की
In reply to खैरातीची चटक by रमेश आठवले
अरविंद बद्दल लई काही माहिती
तुमाले कोन इचारुन राह्यते वो
In reply to अरविंद बद्दल लई काही माहिती by कैलासवासी सोन्याबापु
सालं तेच तर रडणे आहे
In reply to तुमाले कोन इचारुन राह्यते वो by विशाल कुलकर्णी
अरविंद बद्दल लई काही माहिती
In reply to अरविंद बद्दल लई काही माहिती by कैलासवासी सोन्याबापु
लई काही माहिती
In reply to अरविंद बद्दल लई काही माहिती by कैलासवासी सोन्याबापु
नको हो!!! राज्यपाल पद म्हणजे
In reply to लई काही माहिती by कपिलमुनी
माझ्या मते, भाजप हरला तरी
यासाठी तर बेदी
In reply to माझ्या मते, भाजप हरला तरी by प्रसाद१९७१
'आआप'ला बहुमत..
+१
In reply to 'आआप'ला बहुमत.. by चिगो
त्रिशंकू
मी निवडणुकांचा अंदाज गेली
In reply to त्रिशंकू by कपिलमुनी
क्लिंटन एक सल्ला.....
In reply to मी निवडणुकांचा अंदाज गेली by क्लिंटन
धन्यवाद जयंतराव
In reply to क्लिंटन एक सल्ला..... by जयंत कुलकर्णी
येस, आप बद्दल आपली मते टोकाची
In reply to धन्यवाद जयंतराव by क्लिंटन
सर्वांना धन्यवाद
उद्या निकालाचा दिवस
आतुरतेने वाट बघत आहे
In reply to उद्या निकालाचा दिवस by ज्योति अळवणी
अळवणी
In reply to उद्या निकालाचा दिवस by ज्योति अळवणी
अगदी हाच प्रश्न
In reply to अळवणी by राही
सरकारी नोकर
ते सरकारी नोकर नाहीत हो. ते
In reply to सरकारी नोकर by कपिलमुनी
ओक्के
In reply to ते सरकारी नोकर नाहीत हो. ते by हाडक्या
दिल्ली राज्य लहान आहे (पूर्ण
मुद्दाम आठवण ठेऊन या
दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. TOI ने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून Clarification सुद्धा छापले होते. इलेक्शन कमिशननेसुद्धा कुठेही नरेश बाल्यान यांचे नाव घेतल्याचे मला आठवत नाही. I answered all questions I was asked, in future also if I'll be summoned I will extend full cooperation. - Naresh Balyan ^ ANI ची बातमी एखाद्या जागी दारू पकडल्या गेली तर स्वतः पोलिस कमिशनर कॅमेर्यापुढे येऊन बाईट देतांना आजवर मी तरी पाहिले नव्हते. दिल्ली पोलिस कुणाच्या ऑर्डवर काम करते हे जाणून घेण्यासाठी राज्यघटना वाचण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळे फक्त ‘आप’ च्या उमेदवारावर आरोप का लावल्या गेले असतील हे सहज समजण्यासारखे आहे. कॉंग्रेस-भाजपच्या उमेदवरांचे दारू वाटतांनाचे व्हिडिओ यूट्युबर उपलब्ध आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलत नाही यातच सगळे आले. समजा चौकशीअंती स्पष्ट झाले की दारू नरेश बाल्यान यांचीच होती, आणि तरीही आम आदमी पार्टी जर तेव्हा त्यांचा बचाव करताना दिसून आली तर ते निषेधार्हच असेल ! आप असा एकमेव पक्ष आहे ज्याला अधिकृत विपक्ष नाही, पण त्यांचे लाखो कार्यकर्तेच त्यांच्यासाठी विपक्षाचे काम करतात. अवांतर - दिल्लीचे सध्याचे पोलिस कमिशनर भिम बस्सी मला निरज कुमार यांच्यासारखेच वाटतात. इंडिया टुडे च्या कार्यक्रमात या निरज कुमारांनी अरविंद केजरीवालची टिंगल उडवतांना स्वतःची पातळी दाखवून दिली होती.