कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर...
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण कोरडा उरलास का रे ?
***************************************
गलित आहे गात्र अजुनी, लाडके अवधी जरा दे
एवढ्यातच पुनर्प्रत्यय मागशी, देऊ कसा गे?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन उरली रात्र अवघी, का न धरीशी धीर जरा गे?
बघ अजून पुसतोच आहे पाठीवरचा घाम सारा
कोरडा पडला घसा अन् प्राणही कंठाशी आले
सांग, ह्या आतुरल्या मुखचंद्रम्याला काय देऊ?
सुकून गेले ओठ, आता थोडका 'सूकून' दे गे
प्रेमरंगी खेळता, घाई सखे नाही बरी गे
दोन डावां अंतरी, थोडीतरी टँप्लिज दे गे
- कवि चिमिचांगेश खट
वाचने
7173
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
छान.
In reply to छान. by टिल्लू
__/|\__
In reply to छान. by टिल्लू
चांगलीय, चांगेश...
छान...
सर अलिकडे गहिवरणं वारंवार होऊ
In reply to छान... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्वारं.
In reply to सर अलिकडे गहिवरणं वारंवार होऊ by सस्नेह
चिमिचांगा सखे मिळाल्या
+१
In reply to चिमिचांगा सखे मिळाल्या by साती
मूळ गाणं...
.
In reply to मूळ गाणं... by अर्धवटराव
मिपाचे मोठे प्लेयर व्हाल असे
किंवा असलेल्याचं एखाद्या
In reply to मिपाचे मोठे प्लेयर व्हाल असे by पाषाणभेद
बैद्यनाथची एक जाहिरात आठवली
.
जरा वेगळी बाजु....
(No subject)
In reply to जरा वेगळी बाजु.... by ज्ञानोबाचे पैजार
@सांग त्या शेजारणीला, उत्तरे
In reply to जरा वेगळी बाजु.... by ज्ञानोबाचे पैजार
झक्कास.
In reply to जरा वेगळी बाजु.... by ज्ञानोबाचे पैजार
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा
In reply to जरा वेगळी बाजु.... by ज्ञानोबाचे पैजार
अगागागागा......म्हटले तर ठ्ठो
In reply to जरा वेगळी बाजु.... by ज्ञानोबाचे पैजार
यु टु पैजारबुवा ?
In reply to जरा वेगळी बाजु.... by ज्ञानोबाचे पैजार
..स्वल्पवैराग्याचे उत्तम
(No subject)
(No subject)
मेलो ...
शिलाजित........
ते पण चांदीच्या पेल्यातून
In reply to शिलाजित........ by बाबा पाटील
आवडलं नाही.
बीभत्सरसोत्कर्षसीमा
In reply to आवडलं नाही. by सूड
धमाल