✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ए आय बी ची बातमी

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Tue, 02/03/2015 - 15:52  ·  लेख
लेख
ए आय बी ची बातमी आज सकाळी तडक जाऊन तू नळी वर संबंधित कार्यक्रमाच्या २ ३ क्लिप्स पहिल्या ... सुरुवातीला हा काहीतरी उच्चप्रतीचा बौद्धिक कोटीक्रमाचा कार्यक्रम असावा असा संशय येतो न येतो तोच अत्यंत अश्लील, सवंग, शिवराळ भाषेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि माईक समोरील माणसाने बाजूच्या सगळ्यांची नावे घेऊन ..प्रसंगी समोरील दीपिका पदुकोन, आलीय भट्ट आदींची सुद्धा 'काढणे'... एकमेकांच्या लैंगिक अवयवांचा, तदनुश्न्गिक अत्यंत बीभत्स विनोद हे कमी म्हणून कि काय एक महाशय तर दुसर्या उपस्थिताच्या जन्मप्रसंगाचे त्यांच्या मातोश्रींच्या अवयवांचे विक्षिप्त वर्णन ... लैंगिक क्रिया, अनैसर्गिक संभोग ह्यांचा उल्लेख करतांना कश्शा कश्शाचा संकोच म्हणून नाहीच तो ... वक्त्यान्न्मध्ये एक पंजाबी स्त्री होती आणि तिने तर कहर केला संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न क्षण खिदळत होता ... माणशी ४००० रुपये तिकीट काढून गेलेल्या लोकांची गर्दी बघून केवळ स्तिमित व्हायला झाले ... ...
तुज विकृत म्हणू कि अश्लील रे
असे त्या करण जोहरला म्हणावेसे वाटते ...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30181 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

टीआरपी

कपिलमुनी
Tue, 02/03/2015 - 16:03 नवीन
यात रघूरामने पहिली शिवी देताना सांगितला , ' मी दिलेल्या प्रत्येक शिवीमुळे तुमचा टीआरपी वाढणार आहे'.. तसाच झाला आहे .. बदनाम सही नाम तो हुआ ! बाकी त्या ओंगळवाण्या प्रकाराची चर्चा करण्यात काही अर्थ नाही
  • Log in or register to post comments

पण मी काय म्हणतो ,

पिंपातला उंदीर
Tue, 02/03/2015 - 16:17 नवीन
पण मी काय म्हणतो , मित्रांमध्ये , दारू पार्ट्यांमध्ये , whats app ग्रुप मध्ये नेहमी सात्विक , देश हिताच्या आणि निर्मल कौटुंबिक गप्पा करणार्या चान चान लोकांच्या देशात असे कार्यक्रम करण्याची लोकांची हिम्मत कशी होते ?
  • Log in or register to post comments

मित्रांमध्ये , दारू

टवाळ कार्टा
Tue, 02/03/2015 - 16:23 नवीन
मित्रांमध्ये , दारू पार्ट्यांमध्ये , whats app ग्रुप मध्ये जे बोलले जाते ते जाहिरपणे आपण घरात मुलांसमोर बोलतो का? ते टिव्हीवर दाखवले तर मुलांसमोर आपण टिव्ही सुरु करु का? काही गोष्टी बोलण्यासाठी फक्त मनाने समवयस्क असलेलेच हवेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अहो त्या कार्यक्रमात लहान

पिंपातला उंदीर
Tue, 02/03/2015 - 16:31 नवीन
अहो त्या कार्यक्रमात लहान मुल नव्हती कोणी . A I B ग्रुप चा स्वतहाचा एक प्रेक्षक वर्ग आहे . त्यांचे विनॊद काय दर्जाचे आहेत हे त्याना माहित आहे . आणि ते माहित असून ते तिथे जातात . बाकी टीवी वर जे काही दाखवतात (खून , अनैतिक संबंध ई ) ते यांच्या कार्यक्रमापेक्षा बेक्कार आहे . लैच यार . कशामुळे आपली संस्कृती धोक्यात पडेल ते सांगता येत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१

कोंबडी प्रेमी
Tue, 02/03/2015 - 17:41 नवीन
बरोबर आहे तुमचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा

आदूबाळ
Tue, 02/03/2015 - 16:21 नवीन
या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा तर नव्हे? "बकध्याना"ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

बगळा नाही

चलत मुसाफिर
Tue, 02/03/2015 - 18:23 नवीन
बक*द या ग्राम्य म्हणता येईल अशा हिंदी शब्दाचा भावार्थ, "अखंड बडबड करण्याची क्षमता असणारा" असा काहीसा आहे. फोडः 'बक' म्हणजे वाणी. पुढील अर्थ माहिती असेलच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग

सुहास झेले
Tue, 02/03/2015 - 17:44 नवीन
एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यांचे सर्व व्हिडीओ स्ट्रीकली फॉर ऍडल्स. मीही त्यांना गेले वर्षभर फॉलो करतोय. रोस्ट हा शो पार वर्षानुवर्ष सुरु आहे, ह्यात मोठमोठे सेलिब्रिटी आपणहून येतात (ऑफकोर्स त्याचे खंडीभर पैसे मिळतात हेवेसांगनल :) ) ..... हे फक्त त्याचे भारतीय वर्जन. त्यांनी जर सर्व परवानग्या घेऊन हा शो केला असेल तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. सरकारने हे आधीच सांगितले आहे (अश्लिल शो ‘AIB’ बंद करू शकत नाही : विनोद तावडे ) :) . . .
  • Log in or register to post comments

बरं बरं.

खटासि खट
गुरुवार, 02/12/2015 - 19:32 नवीन
बरं बरं. मग ते मराठी नाटकांचं सेन्सॉरबोर्ड काढून टाका की. वयस्क लोकच बघणार ना तिकीट काढून ? फॉरेनच्या विलायतेत स्टेज वर काय काय सादरीकरण होतंय ते पण येउनच जाऊ द्या म्हणतो. संस्कृती काय बुडत नाही, आणि जी बुडती तिला संस्कृती म्हणत नाहीत. ------------------------------------------------------------------------------------------------------ तुमचा कोंबडा गावगप्पांपेक्षाही वेगाने प्रवास करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

जरा हलके घ्या राव..!!

चलत मुसाफिर
Tue, 02/03/2015 - 18:18 नवीन
१. या कार्यक्रमामुळे समाज धोक्यात वगैरे येण्याची शक्यता आहे, हे (सुचवलेले!) ऐकून जितकी हहपुवा झाली, तितकी तो कार्यक्रम बघूनही झाली नव्हती. २. तिकिट काढून अपमान करून घ्यायला आलेल्या लोकांच्या भावना अजिबात दुखावल्या नाहीत. त्यामुळे इतर कुणाच्या दुखवायचा प्रश्नच येत नाही. ३. आपल्याकडे होळीमध्ये जे काही करण्याची पद्धत आहे, त्याहून हा कार्यक्रम फार वेगळा नव्हता. उलट, होळीमध्ये भाग घेण्यास अनुत्सुक असलेल्या त्रयस्थांनाही शिव्या, रंगकाम आणि एकूण सार्वजनिक राडा यांचा सामना करावा लागतो. इथे तसे झाले नाही. तिकिट काढणे किंवा आंतरजालावरील दुव्यावर टिचकी मारणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. याला स्तुत्यच म्हणू नये काय? ४. कार्यक्रमाचा कलात्मक दर्जा फार उच्च होता असे मी (किंवा कुणीही) म्हणणार नाही. पण ज्या समाजात सेक्स हा विषय सार्वजनिकरूपाने निघताच बहुतेकजणांची दातखिळी बसते तिथे, हातचे राखून न ठेवता, भीडभाड न बाळगता, असे थेट विनोद (संबंधितांची नावे घेऊन) तासभर केले जाणे आणि उपस्थित मिश्रलिंगी जनसमुदायाने त्यावर मनमुराद हसून पावती देणे, याचा मला तरी आनंद होतो. हे विनोद कोंडकेछाप द्वयर्थी नसून, थेट लैंगिक अर्थाचे होते. (कोंडकेंचा इरसाल, बेरकी विनोदही मला आवडतो हे इथे नमूद करणे गरजेचे.) ५. लहान मुलांवर काय परिणाम होईल, वगैरे विचार ज्या चिंतातुर जंतूंना छळत आहेत, त्यांना सांगू इच्छितो, की बंधो, लहान मुलांना आपण समजतो त्याहून खूप खूप जास्त जाण असते. उलट विशिष्ट विषयांवर त्यांच्याशी निकोपपणे बोलायला आपण प्रौढच फार चाचरतो.
  • Log in or register to post comments

जबरदस्त सहमत..

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 02/04/2015 - 11:39 नवीन
जबरदस्त सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

सहमत

बटाटा१
Wed, 02/04/2015 - 20:30 नवीन
आपल्या विचारांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

लै भारी समर्थन.

चिंतामणी
Fri, 02/06/2015 - 13:42 नवीन
त्यातील एक मुद्दा २. तिकिट काढून अपमान करून घ्यायला आलेल्या लोकांच्या भावना अजिबात दुखावल्या नाहीत. चार चार हजार रूपये एका तिकीटासाठी मोजल्यावर बोलायची चोरी होणारच. असो. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

आकडा कितीही असूदे...तितक्या

टवाळ कार्टा
Fri, 02/06/2015 - 13:52 नवीन
आकडा कितीही असूदे...तितक्या रुपड्यांची किंमत माणसा-माणसापरत्वे बदलते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

पिंपातला उंदीर आणि चलत

आनन्दा
Tue, 02/03/2015 - 18:44 नवीन
पिंपातला उंदीर आणि चलत मुसाफिर दोघांशीदेखील सहमत.
  • Log in or register to post comments

बॉलि

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/03/2015 - 22:31 नवीन
बॉलीवूडची 'संस्कृती' अतिशय दळभद्री आहे. आताच नाही तर अगदी पूर्वीपासून. अगदी ५०-६०च्या दशकात विदूषकी चाळे करणारा गायक्,अभिनय सम्राट म्हणवून घेणारा नट्,हिंदीत प्रसिद्ध झालेल्या आपल्याच काही मराठी 'बाया'...अर्थात हे सर्व तेव्हा त्यांच्या पार्ट्यांमध्ये चालायचे.. आता चॅनेलवर दाखवतात.
  • Log in or register to post comments

अर्थात हे सर्व तेव्हा

बॅटमॅन
Wed, 02/04/2015 - 15:32 नवीन
अर्थात हे सर्व तेव्हा त्यांच्या पार्ट्यांमध्ये चालायचे..
अर्थात 'हे' तेव्हा त्यांच्या पार्ट्यांमध्ये चालायचे असं वाचलं गं माई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

प्रॉब्लेम काय आहे ते समजलं

भृशुंडी
Wed, 02/04/2015 - 06:30 नवीन
प्रॉब्लेम काय आहे ते समजलं नाही. १. त्यांनी शो पैसे लावून केला. फुकट नव्हता. २. वयोमर्यादा होती. ३. उपस्थितांना आवडला/नावडला असला तरी त्यांना काहीच हरकत नव्हती. मग फुकटात यूट्यूबवर बघताना आपल्याला काय फरक पडतो? ह्या प्रकारचा विनोद (!) आवडला नाही तर फार तर Not my cup of tea म्हणता येईल. पण दरवेळी वक्त्याने politically correct असण्याची गरज तरी कमी होईल हे चांगलच. नसत्या भावना वगैरे न दुखावता जे काही बोलायचंय ते अशा प्रकारच्या विनोदातून निदान बोलता तरी येईल.
  • Log in or register to post comments

चौथा अंक

सुनील
Wed, 02/04/2015 - 08:24 नवीन
हल्लीची नाटके सोडा पण फार्फार वर्षांपूर्वी जेव्हा नाटके ही कौटुंबिक, सोज्ज्वळ इ. इ असायची तेव्हादेखिल, तिसर्‍या अंकाचा पडदा पडला आणि प्रेक्षक (हातरुमालाने डोळे वैग्रे पुसीत) नाट्यगृहाबाहेर गेले, की विंगेत चौथा अंक सुरू होई! (ख खो नटेश्वर जा).
  • Log in or register to post comments

पाचवा अंक.

प्रभाकर पेठकर
Wed, 02/04/2015 - 12:44 नवीन
तुम्हाला नक्की काय म्हणायचय कळलं नाही पण चौथा अंक हा 'ओल्या पार्टीचा' असतो. पुढे कांही जोड्यांचा पाचवा अंक हॉटेलच्या रुमवर सुरु होतो. पण सर्व नाटक कंपन्यांत अस्सेच असते असेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

प्रॉब्लेम काय

अत्रन्गि पाउस
Wed, 02/04/2015 - 08:47 नवीन
अहो प्रॉब्लेम हा आहे कि --लोकशाहीतल्या जबाबदार्या अजिबात जाणून न घेता त्यातील अधिकार मात्र वाजवून गाजवले जाताहेत .. --केवळ खिशात पैसे असले कि आपण काहीही कसेही वागू/बोलू शकतो असे सगळ्यांनाच वाटू लागते आणि मग खिशात पैसे येणे हि एकमेव प्रायोरिटी बनते ...आणि मग पुढे विधिनिषेध शून्य वागण्याचे निर्लज्ज समर्थन हे आलेच .. --खाजगीत कुणी काय वागावे ह्यावर कुणीच काही बोलू शकत नाही आणि नयेच...आक्षेप आहे तो असे कार्यक्रम जाहीर रित्या करण्याला (ते हि एकवेळ करोत बापडे ज्यांना जायचे ते जटील नाही ते नाही) त्याचे यु ट्यूब वर प्रसारण करायला ..कारण शेवटी ती त्याची जाहिरातच आहे ...असो ...पाश्चात्य जगातील ह्या अशा गोष्टी चट्कन उचलणारे आपण लोक ..डिस्कव्हरी चानेल सारखे काही प्रोग्राम्स का निर्माण करू शकत नाही ... हीन अभिरुचीचे आपल्याला जितके आकर्षण वाटून ती आत्मसात करण्याची तत्परता दाखवतो आपण आणि वर व्यक्तीस्वात्नत्र्याचा मुलामा देतो ..परंतु चांगल्या उत्तम गोष्टींचे निर्माण, जतन, संवर्धन ह्या गोष्टी अध्याहृत कर्तव्य आहे ह्याकडे सोयीस्कर काणाडोळा ... प्रोब्लेम आहे तो इथे... असो ..
  • Log in or register to post comments

अतिशय समर्पक प्रतिसाद.

मराठी_माणूस
Wed, 02/04/2015 - 09:49 नवीन
अतिशय समर्पक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

हा एक ग्रूप आहे त्यांचं काम

भृशुंडी
Wed, 02/04/2015 - 09:55 नवीन
हा एक ग्रूप आहे त्यांचं काम आहे विनोद निर्मिती करणं. त्यांना बाकीच्या गोष्टी नाही जमत, नाही आवडत त्याला ते तरी काय करणार? तेव्हा त्यांनी विनोदी कार्यक्रम बनवायचं सोडून डिस्कव्हरी चॅनेल वरच्या सारखे कार्यक्रम बनवावे- ही अपेक्षा हुकलेली आहे. डिस्कव्हरी चॅनेलवाल्यांना स्टँड अप कॉमेडी करायला का नाही सांगत? निव्वळ विनोदाचा दर्जा बकवास होता असा आक्षेप असेल तर समजू शकतो, पण त्यांनी "हे करावं अन् ते करावं" असा आग्रह का? असो. रोस्ट वगैरे एक विनोदाचा प्रकार आहे. पटला नाही तर सोडून द्या. त्यांचे बाकीचे यूट्यूब वरचे अंकही छान असतात कधीमधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

रोस्ट वगैरे एक विनोदाचा प्रकार आहे. पटला नाही तर सोडून द्या

अत्रन्गि पाउस
Wed, 02/04/2015 - 10:11 नवीन
हा विनोद आहे का ?? दुसरे म्हणजे
डिस्कव्हरी चॅनेल वरच्या सारखे कार्यक्रम बनवावे- ही अपेक्षा हुकलेली
.. हि अपेक्षा ह्या विशिष्ट लोकांकडून आहे असे नाही मी एकंदर आपल्या आजूबाजूच्या सांस्कृतिक घडामोडींवर तसे म्हटले आहे ... आणि माझा आक्षेप फक्त निर्मात्यांवर नाही प्रेक्षकांवर पण आहे ...शेवटी people get the government they deserve ह्यात government ऐवेजी entertainment सुद्धा टाकता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

@ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही

यसवायजी
Wed, 02/04/2015 - 12:54 नवीन
@ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही छान असतात कधीमधी. >> @ पटला नाही तर सोडून द्या >> +१. आस्क wh questions वगैरे एपिसोड टैमपास होते. बाकी, या व्हिडिओला सुध्दा वॉर्निन्ग दाखवली आहेच की. एवढं असताना ज्यांनी बघितला, त्यांनी का गळे काढावेत तेच समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

असे कार्यक्रम एका विशिष्ठ

टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 13:08 नवीन
असे कार्यक्रम एका विशिष्ठ प्रेक्षकवर्गासाठी असतात आणि जोपर्यंत आयोजकांना हे कार्यक्रम बाकीच्या प्रेक्षकापर्यंत पोचणार नाहित हे सांभाळता येते तोपर्यंत असे कार्यक्रम होणे ठिक आहे ...पण युट्युबसारख्या ठिकाणी हे ठेवणे म्हणजे गुढग्यातसुध्धा मेंदू नसणे याची जाहिर कबुली देणे युट्युबवर मुले काय बघतात यावर पालकांचा कंट्रोल नस्तो...आणि असे भारतीय लोकांनी केलेले कार्यक्रम आपलीच मुले लवकर डोक्यावर घेतात...कारण १ मुर्खाने चूक / वाईट काम केले की आणखी १०० लोक तेच लगेच करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@टका-

यसवायजी
Wed, 02/04/2015 - 13:24 नवीन
@टका- युट्युबवर व्हिडिओ असवा किंवा नाही हा वेगळा विषय आहे. लेखकाने त्याबद्दल काहीच लिहिले नाही. पण मिडियातलं ऐकुन स्वतःच बघणार आणी उगाच शिव्या देणार त्याला काय करायचं? बाकी असले व्हिडिओ व्हायरल व्हायला फक्त युट्यूबच आहे असे नाही, २ दिवसामागे हेच व्हिडीओ व्हॉटसॅपवरदिखील आले होते. आजकाल मेडीया शेअरींग सोपे झालंय. त्याचे फायदे आणी तोटे आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझा मुद्दा इतकाच होता की

टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 15:31 नवीन
माझा मुद्दा इतकाच होता की आयोजकांनी ते व्हिडिओ युट्युबवर टाकायला नको होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

अनुमोदन

मंदार दिलीप जोशी
Wed, 02/04/2015 - 16:21 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

समर्पक प्रतिसाद

मंदार दिलीप जोशी
Wed, 02/04/2015 - 16:20 नवीन
समर्पक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

...१००% सहमत अ.पा. .....!!!

विनोद१८
Wed, 02/04/2015 - 20:46 नवीन
'काही मूठ्भर लोकांना तो प्रॉब्लेमच वाटत नाही, हाच खरा प्रॉब्लेम आहे' न्हवे लोकशाहीत त्यांना तसे समजण्याचा अधिकार आहे असेसुद्धा म्हटले जाईल, नैतिकता वगैरे अत्यंत खाजगी बाब आहे किंवा कालबाह्य गोष्ट आहे, त्याचा इतका बाउ कशासाठी ?? असे प्रश्ण्ही आता विचारले जातील. लोकशाहीत ज्याला जे आवडेल ते त्याने करावे / पहावे परंतु कायदेशीर मर्यादेत असा सोयीचा समज करुन हे सगळे घडते. लोकशाहीच्या चौकटीत 'बदफैलीपणाला जर प्रतिष्ठा लाभत असेल' तर त्याला तुम्हीआम्ही पामर काय करणार ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

यु ट्यूब वर याहून अनेक अतरंगी

कहर
गुरुवार, 02/05/2015 - 11:21 नवीन
यु ट्यूब वर याहून अनेक अतरंगी कार्यक्रम आहेत … त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही बरे … मग आत्ताच का … आणि अश्लीलतेचे म्हणाल तर त्यासाठी पहाणार्यांना यु ट्यूब शिवाय इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेतच की …. मग आता काय नेट वरच बंदी घालाल …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

उद्या I Am Offended ही

नांदेडीअन
Wed, 02/04/2015 - 09:21 नवीन
उद्या I Am Offended ही डॉक्युमेंट्री रिलीज होणार आहे. ही डॉक्युमेंट्री बघूनसुद्धा हजारो लोक ऑफंडेड होतील. तूनळीवर ट्रेलर बघू शकता.
  • Log in or register to post comments

१० मिनिटांपूर्वी रिलिज झालीये

नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 12:23 नवीन
१० मिनिटांपूर्वी रिलिज झालीये ही डॉक्युमेंट्री. डाऊनलोड करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

उगाच बाऊ करू नका...

ओल्द मोन्क
Wed, 02/04/2015 - 09:45 नवीन
उगाच बाऊ करू नका . ज्याला पटत त्याने बघाव . ज्याला नाही पटत त्याने बघू नये. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार ए आय बी ने तो विडीओ काढून घेतला आहे
  • Log in or register to post comments

हा शो काल रात्री तु-नळीवर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/04/2015 - 09:46 नवीन
हा शो काल रात्री तु-नळीवर पाहिला. शुद्ध य.झ. पणा होता हा. चॅरिटीच्या नावाखाली केलेला नंगानाच एवढचं म्हणु शकतो. चॅरिटीचं करायची होती तर नाच, स्किट्स वगैरे वगैरे सुद्धा सादर करता आलं असतं. त्यानंतर त्याच्यावरची कालिया भट ची प्रतिक्रिया अजुन चीड आणणारी होती. म्हणे टेन्शन रिलिफ चा एक प्रकार होता? करण जोहरचं तिसरं वाक्य काय असावं शो मधलं? "माझी आई प्रेक्षकात बसलेली आहे, तिला कार्यक्रम संपता संपता अँब्युलन्स्ची गरज पडणार आहे". वा रे वा. दिपिका पदुकोण, अलिया भट, सोनाक्षी सिन्हा वगैरेंविषयी एवढ्या खालच्या दर्जाच्या कॉमेंट्स केल्या गेल्या तरीही त्या निर्लज्जपणे हसत होत्या..एखादी असती तर स्टेजवर जाउन ह्यांची थोबाडं रंगवली असती. र"गु" रामन ह्या थोर महात्म्याविषयी तर काय बोलावं? काय ते त्याचे चाळे, काय अवतात. त्यावर रणवीर आणि अर्जुन कपुरच्या प्रतिक्रिया तर तोंडाच्या गटारपणाचा कळस. सलमान खानच्या निकटवर्तीयांवर केलेली टिका तर शोमधुन काढुन टाकायला लागलीये. कारण तो स्टेजवर बसलेला हत्ती होता त्याला सलमाननी रात्री दोन वाजता फोन केलेला.
  • Log in or register to post comments

त्याला सलमाननी रात्री दोन वाजता फोन केलेला

अत्रन्गि पाउस
Wed, 02/04/2015 - 10:27 नवीन
हम्म ...बरोबरच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणी काय करावे आणि पैसे कसे

कहर
गुरुवार, 02/05/2015 - 11:30 नवीन
कोणी काय करावे आणि पैसे कसे वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे … समर्थ रामदास फक्त लंगोटी घालून देशभ्रमण करायचे आणि गांधीजींचा (फक्त )पंचा पण जगप्रसिद्ध आहे… त्यांनी केलेल्या कार्याला काय म्हनाल… जगत कल्याणासाठी तप करणारे नंगे साधू अजूनही आहेत … त्यांच्या नागदेपाना पहायचा कि तप हे ज्याचे त्याने ठरवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

व्हॉट्सअ‍ॅप वर २ व्हिडीयो आले

मृत्युन्जय
Wed, 02/04/2015 - 10:45 नवीन
व्हॉट्सअ‍ॅप वर २ व्हिडीयो आले होते. ते बघुन असे वाटले की कोणीतरी या अभिनेत्यांच्या तोंडात हे संवाद टाकले आहेत आणि एखादा डॉक्टर्ड व्हिडीयो आहे. इतक्या उघडपणे आणि जाहीरप्णे कोणी इतकी अर्वाच्य भाषा वापरेल आणि त्यावर उपस्थित स्त्री पुरुष हसतील असे वाटले नव्हते. अश्लील आणि किळसवाण्या भाषेचा अतिरेक झाला असे वाटते. लोक खाजगी मध्ये काय भाषा वापरतात आणि एकमेकांना आईबहिणीवरुन काय शिव्या देतात ही पुर्ण वेगळी गोष्ट आहे. पण जाहिर कार्यक्रमात एखाद्याच्या आईबद्दल आणि तिच्या खाजगी अवयवांबद्दल जे उद्गार काढले ते ऐकुन मी धन्य झालो. त्यावर रघु जे किळसवाणे हसला त्याबद्दल तर त्याला जन्माला घातल्याबद्दल त्याच्या आईनेही पश्चात्ताप व्यक्त केला असेल. अतिशय अश्लील आणी हिडीस होते. चार लोकांत काही द्वयर्थी विनोद सांगणे आणि जाहिर कार्यक्रमातुन इतकी किळसवाणी भाषा वापरणे यात फरक आहे, अर्थात या प्रकारामुळे आपली संस्कृती वगैरे धोक्यात आली असे काही वाटत नाही. हार्डकोर पॉर्न नेटवर उपलब्ध आहेच की. हिंदी / मराठी निळफीतींमधुनही असली अश्लील / हिडीस भाषा वापरली जाते. त्यात आणी या विनोदात काही फारसा फरक वाटला नाही असेही म्हणवत नाही. आईबद्दलचे (कुणाच्याही असो) इतके हिडीस आणि ओंगळवाणे वक्तव्य कुठल्याही निळफीतीतही कदाचित नसावे**. कोणाला तो विनोद वाटो बापडा. मला वाटणे शक्य नाही. **: आई बहिणीवरील शिव्या कुठल्या चित्रपटात दिल्या आहेत त्या दाखवुन त्यांचे अर्थ कृपया विचारु नयेत. त्यातला आणि या व्हिडीयो मधला फरक सुजाण नागरिकांना कळत असावा अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

योग्य

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/04/2015 - 11:33 नवीन
योग्य प्रतिसाद रे मृत्युंजया. त्या रणवीरचा शोमन आजा बाहेर्ख्यालीपणाबदल प्रसिद्ध होता.बाकी त्या जोहरबद्दल तेच.सलमानच्या बापानेही बरेच दिवे लावले आहेत्/होते.नवतारकांना बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक पाहिजे असेल तर सलमानची 'भेट' घ्यावीच लागते असे वाचले आहे. आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

रणवीरचा शोमन आजा

अत्रन्गि पाउस
Wed, 02/04/2015 - 13:15 नवीन
रणवीरचा सिन्ग चा शोमन आजा ?? का रणवीरचा कपूर चा शोमन आजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईंना बहुतेक रणबीर कपूर

टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 15:33 नवीन
माईंना बहुतेक रणबीर कपूर नाहीतर अर्जुन कपुर म्हणायचे असावे...वयपरत्वे चुकीचे टंकले गेले असावे...संभाळून घ्या त्यांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

बापरे. माईंना रणवीरच्या शोमन

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/05/2015 - 14:58 नवीन
बापरे. माईंना रणवीरच्या शोमन आज्याचा राग आलेला दिसतोय. त्याला तुमच्यातही इंटरेस्ट होता की काय? :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत

मंदार दिलीप जोशी
Wed, 02/04/2015 - 16:31 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मुळात शिव्या किंवा लैंगिक

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 02/04/2015 - 11:59 नवीन
मुळात शिव्या किंवा लैंगिक विनोद हा टॅबू का असावा? तो पण आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा भाग आहेच. त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? काही जण म्हणतील कि स्त्रिया आणि मुलांचं काय, तर त्यांना एवढंच सांगतो कि जसे सगळे पुरुष सर्रास शिव्या देत नाहीत तसंच सगळ्या स्त्रियांना शिव्यांचं वावडं नसतं. आणि लहान मुलांना तर याबाबत खुपच माहिती असते. शेवटी हे मार्केट आहे, तुम्हाला आवडेल ते घ्या नाहीतर पुढे चला, कारण तुम्हाला जशा इतरांच्या काही गोष्टी आवडत नाहीत तसंच इतरांनापण तुमच्या काही गोष्टी आवडत नसतात. प्र॑त्येक ठिकाणी धर्म, संस्कृती आणि समाजस्वास्थ्य यांचा बडगा दाखवुन अभिव्यक्तीची गळचेपी करु नये. शेवटी "किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही". ज्याची जितकी पोच तो तेवढच घेतो. अजुन एक, मी तो शो यु ट्युब वर बघितला, चारचौघात(चारचौघीतही) चालणारे विनोद फक्त स्टेज वर सादर करुन प्रक्षेपित केलं एवढंच. कृपा करुन त्याच्याकडे याच आणि एवढ्याच द्रुष्टीने बघावे. यात धक्का बसु शकतो, पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या प्रोसेस चा भाग आहे. हे होतच राहणार.
  • Log in or register to post comments

पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/04/2015 - 12:41 नवीन
पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या प्रोसेस चा भाग आहे. हे होतच राहणार.
तुमचा प्रतिसाद वाचुन ड्बॉळे पाणावले. तो बकचो* टीमचा कोण ख्रिश्चन पोरगा होता त्याच्या आई-वडलांविषयीचा, नंतर र"गु"रामनच्या आणि त्याचा तो जुळा टोणगा भाउ आहे त्याच्या जन्माविषयीचा उल्लेख वगैरे गोष्टी जर का डिसलोकेशन प्रोसेस चा भाग असेल आणि इथुन पुढे सार्वजनिक वागण्या-बोलण्याचा भाग होणार असेल तरं माय टाईम इन धिस सोसायटी इज ओव्हर. साला, पैसा मिळतोय म्हणुन आई-बापाच्या खासगी जीवनाचा अत्यंत किळसवाण्या शब्दात केलेला उल्लेख स्वीकारणारे असतात ह्यावर काल रात्रीपर्यंत विश्वास नव्हता. मात्र काल हे ह्याची डोळी ह्याची देही पहायचे दुर्भाग्य लाभलं. नॉनव्हेज जोक मी सांगत नाही किंवा ऐकत नाही असं नाही. माझ्या जीवलगांच्या गोतावळ्यामधे ज्यात मुलीही आहेत तिथे सगळेचं नॉनव्हेजी आहेत. पण एका मर्यादेमधेचं. मैत्रीच्या सगळ्या मर्यादा आणि नियम सांभाळुन हे प्रकार घडतात. पण ह्याचा अर्थ असा नाही उद्या मी एक स्टेडिअम भाड्यानी घ्यावं तिथे भरम्साठ तिकीट लावुन असला चु*पणा करावा. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

+११११११११

टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 13:09 नवीन
+११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नॉनव्हेज जोक मी सांगत नाही किंवा ऐकत नाही असं नाही.

अत्रन्गि पाउस
Wed, 02/04/2015 - 13:11 नवीन
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत

मंदार दिलीप जोशी
Wed, 02/04/2015 - 16:32 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

साला, पैसा मिळतोय म्हणुन आई

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 02/04/2015 - 17:42 नवीन
साला, पैसा मिळतोय म्हणुन आई-बापाच्या खासगी जीवनाचा अत्यंत किळसवाण्या शब्दात केलेला उल्लेख स्वीकारणारे असतात ह्यावर काल रात्रीपर्यंत विश्वास नव्हता. मात्र काल हे ह्याची डोळी ह्याची देही पहायचे दुर्भाग्य लाभलं.
सहमत
पण एका मर्यादेमधेचं. मैत्रीच्या सगळ्या मर्यादा आणि नियम सांभाळुन हे प्रकार घडतात.
ईथेही सहमत पण अर्थात या मर्यादा ज्याच्या त्याने ठरवायच्या असतात. आणि मलाही ते आईबापाचे उल्लेख खटकले तरी ज्यांनी ते केले आणि ज्यांच्या आईबापाचे केले ते याला राजी असतील तर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा