आज सकाळी तडक जाऊन तू नळी वर संबंधित कार्यक्रमाच्या २ ३ क्लिप्स पहिल्या ...
सुरुवातीला हा काहीतरी उच्चप्रतीचा बौद्धिक कोटीक्रमाचा कार्यक्रम असावा असा संशय येतो न येतो तोच
अत्यंत अश्लील, सवंग, शिवराळ भाषेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि माईक समोरील माणसाने बाजूच्या सगळ्यांची नावे घेऊन ..प्रसंगी समोरील दीपिका पदुकोन, आलीय भट्ट आदींची सुद्धा 'काढणे'... एकमेकांच्या लैंगिक अवयवांचा, तदनुश्न्गिक अत्यंत बीभत्स विनोद हे कमी म्हणून कि काय एक महाशय तर दुसर्या उपस्थिताच्या जन्मप्रसंगाचे त्यांच्या मातोश्रींच्या अवयवांचे विक्षिप्त वर्णन ...
लैंगिक क्रिया, अनैसर्गिक संभोग ह्यांचा उल्लेख करतांना कश्शा कश्शाचा संकोच म्हणून नाहीच तो ...
वक्त्यान्न्मध्ये एक पंजाबी स्त्री होती आणि तिने तर कहर केला
संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न क्षण खिदळत होता ...
माणशी ४००० रुपये तिकीट काढून गेलेल्या लोकांची गर्दी बघून केवळ स्तिमित व्हायला झाले ...
...
तुज विकृत म्हणू कि अश्लील रे
असे त्या करण जोहरला म्हणावेसे वाटते ...
मिसळपाव
प्रतिक्रिया
टीआरपी
यात रघूरामने पहिली शिवी देताना सांगितला , ' मी दिलेल्या प्रत्येक शिवीमुळे तुमचा टीआरपी वाढणार आहे'..
तसाच झाला आहे .. बदनाम सही नाम तो हुआ !
बाकी त्या ओंगळवाण्या प्रकाराची चर्चा करण्यात काही अर्थ नाही
पण मी काय म्हणतो ,
पण मी काय म्हणतो , मित्रांमध्ये , दारू पार्ट्यांमध्ये , whats app ग्रुप मध्ये नेहमी सात्विक , देश हिताच्या आणि निर्मल कौटुंबिक गप्पा करणार्या चान चान लोकांच्या देशात असे कार्यक्रम करण्याची लोकांची हिम्मत कशी होते ?
मित्रांमध्ये , दारू
In reply to पण मी काय म्हणतो , by पिंपातला उंदीर
मित्रांमध्ये , दारू पार्ट्यांमध्ये , whats app ग्रुप मध्ये जे बोलले जाते ते जाहिरपणे आपण घरात मुलांसमोर बोलतो का? ते टिव्हीवर दाखवले तर मुलांसमोर आपण टिव्ही सुरु करु का? काही गोष्टी बोलण्यासाठी फक्त मनाने समवयस्क असलेलेच हवेत
अहो त्या कार्यक्रमात लहान
In reply to मित्रांमध्ये , दारू by टवाळ कार्टा
अहो त्या कार्यक्रमात लहान मुल नव्हती कोणी . A I B ग्रुप चा स्वतहाचा एक प्रेक्षक वर्ग आहे . त्यांचे विनॊद काय दर्जाचे आहेत हे त्याना माहित आहे . आणि ते माहित असून ते तिथे जातात . बाकी टीवी वर जे काही दाखवतात (खून , अनैतिक संबंध ई ) ते यांच्या कार्यक्रमापेक्षा बेक्कार आहे . लैच यार . कशामुळे आपली संस्कृती धोक्यात पडेल ते सांगता येत नाही .
+१
In reply to मित्रांमध्ये , दारू by टवाळ कार्टा
बरोबर आहे तुमचे
या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा
या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा तर नव्हे? "बकध्याना"ची आठवण झाली.
बगळा नाही
In reply to या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा by आदूबाळ
बक*द या ग्राम्य म्हणता येईल अशा हिंदी शब्दाचा भावार्थ, "अखंड बडबड करण्याची क्षमता असणारा" असा काहीसा आहे.
फोडः 'बक' म्हणजे वाणी.
पुढील अर्थ माहिती असेलच :)
एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग
एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यांचे सर्व व्हिडीओ स्ट्रीकली फॉर ऍडल्स. मीही त्यांना गेले वर्षभर फॉलो करतोय. रोस्ट हा शो पार वर्षानुवर्ष सुरु आहे, ह्यात मोठमोठे सेलिब्रिटी आपणहून येतात (ऑफकोर्स त्याचे खंडीभर पैसे मिळतात हेवेसांगनल :) ) ..... हे फक्त त्याचे भारतीय वर्जन. त्यांनी जर सर्व परवानग्या घेऊन हा शो केला असेल तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. सरकारने हे आधीच सांगितले आहे (अश्लिल शो ‘AIB’ बंद करू शकत नाही : विनोद तावडे ) :)
.
.
.
बरं बरं.
In reply to एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग by सुहास झेले
बरं बरं.
मग ते मराठी नाटकांचं सेन्सॉरबोर्ड काढून टाका की. वयस्क लोकच बघणार ना तिकीट काढून ? फॉरेनच्या विलायतेत स्टेज वर काय काय सादरीकरण होतंय ते पण येउनच जाऊ द्या म्हणतो. संस्कृती काय बुडत नाही, आणि जी बुडती तिला संस्कृती म्हणत नाहीत.
------------------------------------------------------------------------------------------------------
तुमचा कोंबडा गावगप्पांपेक्षाही वेगाने प्रवास करतो.
जरा हलके घ्या राव..!!
१. या कार्यक्रमामुळे समाज धोक्यात वगैरे येण्याची शक्यता आहे, हे (सुचवलेले!) ऐकून जितकी हहपुवा झाली, तितकी तो कार्यक्रम बघूनही झाली नव्हती.
२. तिकिट काढून अपमान करून घ्यायला आलेल्या लोकांच्या भावना अजिबात दुखावल्या नाहीत. त्यामुळे इतर कुणाच्या दुखवायचा प्रश्नच येत नाही.
३. आपल्याकडे होळीमध्ये जे काही करण्याची पद्धत आहे, त्याहून हा कार्यक्रम फार वेगळा नव्हता. उलट, होळीमध्ये भाग घेण्यास अनुत्सुक असलेल्या त्रयस्थांनाही शिव्या, रंगकाम आणि एकूण सार्वजनिक राडा यांचा सामना करावा लागतो. इथे तसे झाले नाही. तिकिट काढणे किंवा आंतरजालावरील दुव्यावर टिचकी मारणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. याला स्तुत्यच म्हणू नये काय?
४. कार्यक्रमाचा कलात्मक दर्जा फार उच्च होता असे मी (किंवा कुणीही) म्हणणार नाही. पण ज्या समाजात सेक्स हा विषय सार्वजनिकरूपाने निघताच बहुतेकजणांची दातखिळी बसते तिथे, हातचे राखून न ठेवता, भीडभाड न बाळगता, असे थेट विनोद (संबंधितांची नावे घेऊन) तासभर केले जाणे आणि उपस्थित मिश्रलिंगी जनसमुदायाने त्यावर मनमुराद हसून पावती देणे, याचा मला तरी आनंद होतो. हे विनोद कोंडकेछाप द्वयर्थी नसून, थेट लैंगिक अर्थाचे होते. (कोंडकेंचा इरसाल, बेरकी विनोदही मला आवडतो हे इथे नमूद करणे गरजेचे.)
५. लहान मुलांवर काय परिणाम होईल, वगैरे विचार ज्या चिंतातुर जंतूंना छळत आहेत, त्यांना सांगू इच्छितो, की बंधो, लहान मुलांना आपण समजतो त्याहून खूप खूप जास्त जाण असते. उलट विशिष्ट विषयांवर त्यांच्याशी निकोपपणे बोलायला आपण प्रौढच फार चाचरतो.
जबरदस्त सहमत..
In reply to जरा हलके घ्या राव..!! by चलत मुसाफिर
जबरदस्त सहमत..
सहमत
In reply to जरा हलके घ्या राव..!! by चलत मुसाफिर
आपल्या विचारांशी सहमत आहे.
लै भारी समर्थन.
In reply to जरा हलके घ्या राव..!! by चलत मुसाफिर
त्यातील एक मुद्दा
२. तिकिट काढून अपमान करून घ्यायला आलेल्या लोकांच्या भावना अजिबात दुखावल्या नाहीत.
चार चार हजार रूपये एका तिकीटासाठी मोजल्यावर बोलायची चोरी होणारच.
असो. चालू द्या.
आकडा कितीही असूदे...तितक्या
In reply to लै भारी समर्थन. by चिंतामणी
आकडा कितीही असूदे...तितक्या रुपड्यांची किंमत माणसा-माणसापरत्वे बदलते
पिंपातला उंदीर आणि चलत
पिंपातला उंदीर आणि चलत मुसाफिर दोघांशीदेखील सहमत.
बॉलि
बॉलीवूडची 'संस्कृती' अतिशय दळभद्री आहे. आताच नाही तर अगदी पूर्वीपासून. अगदी ५०-६०च्या दशकात विदूषकी चाळे करणारा गायक्,अभिनय सम्राट म्हणवून घेणारा नट्,हिंदीत प्रसिद्ध झालेल्या आपल्याच काही मराठी 'बाया'...अर्थात हे सर्व तेव्हा त्यांच्या पार्ट्यांमध्ये चालायचे.. आता चॅनेलवर दाखवतात.
अर्थात हे सर्व तेव्हा
In reply to बॉलि by माईसाहेब कुरसूंदीकर
अर्थात 'हे' तेव्हा त्यांच्या पार्ट्यांमध्ये चालायचे असं वाचलं गं माई.
प्रॉब्लेम काय आहे ते समजलं
प्रॉब्लेम काय आहे ते समजलं नाही.
१. त्यांनी शो पैसे लावून केला. फुकट नव्हता.
२. वयोमर्यादा होती.
३. उपस्थितांना आवडला/नावडला असला तरी त्यांना काहीच हरकत नव्हती.
मग फुकटात यूट्यूबवर बघताना आपल्याला काय फरक पडतो?
ह्या प्रकारचा विनोद (!) आवडला नाही तर फार तर Not my cup of tea म्हणता येईल.
पण दरवेळी वक्त्याने politically correct असण्याची गरज तरी कमी होईल हे चांगलच.
नसत्या भावना वगैरे न दुखावता जे काही बोलायचंय ते अशा प्रकारच्या विनोदातून निदान बोलता तरी येईल.
चौथा अंक
हल्लीची नाटके सोडा पण फार्फार वर्षांपूर्वी जेव्हा नाटके ही कौटुंबिक, सोज्ज्वळ इ. इ असायची तेव्हादेखिल, तिसर्या अंकाचा पडदा पडला आणि प्रेक्षक (हातरुमालाने डोळे वैग्रे पुसीत) नाट्यगृहाबाहेर गेले, की विंगेत चौथा अंक सुरू होई! (ख खो नटेश्वर जा).
पाचवा अंक.
In reply to चौथा अंक by सुनील
तुम्हाला नक्की काय म्हणायचय कळलं नाही पण चौथा अंक हा 'ओल्या पार्टीचा' असतो. पुढे कांही जोड्यांचा पाचवा अंक हॉटेलच्या रुमवर सुरु होतो. पण सर्व नाटक कंपन्यांत अस्सेच असते असेही नाही.
प्रॉब्लेम काय
अहो प्रॉब्लेम हा आहे कि
--लोकशाहीतल्या जबाबदार्या अजिबात जाणून न घेता त्यातील अधिकार मात्र वाजवून गाजवले जाताहेत ..
--केवळ खिशात पैसे असले कि आपण काहीही कसेही वागू/बोलू शकतो असे सगळ्यांनाच वाटू लागते आणि मग खिशात पैसे येणे हि एकमेव प्रायोरिटी बनते ...आणि मग पुढे विधिनिषेध शून्य वागण्याचे निर्लज्ज समर्थन हे आलेच ..
--खाजगीत कुणी काय वागावे ह्यावर कुणीच काही बोलू शकत नाही आणि नयेच...आक्षेप आहे तो असे कार्यक्रम जाहीर रित्या करण्याला (ते हि एकवेळ करोत बापडे ज्यांना जायचे ते जटील नाही ते नाही) त्याचे यु ट्यूब वर प्रसारण करायला ..कारण शेवटी ती त्याची जाहिरातच आहे ...असो ...पाश्चात्य जगातील ह्या अशा गोष्टी चट्कन उचलणारे आपण लोक ..डिस्कव्हरी चानेल सारखे काही प्रोग्राम्स का निर्माण करू शकत नाही ... हीन अभिरुचीचे आपल्याला जितके आकर्षण वाटून ती आत्मसात करण्याची तत्परता दाखवतो आपण आणि वर व्यक्तीस्वात्नत्र्याचा मुलामा देतो ..परंतु चांगल्या उत्तम गोष्टींचे निर्माण, जतन, संवर्धन ह्या गोष्टी अध्याहृत कर्तव्य आहे ह्याकडे सोयीस्कर काणाडोळा ...
प्रोब्लेम आहे तो इथे...
असो ..
अतिशय समर्पक प्रतिसाद.
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
अतिशय समर्पक प्रतिसाद.
हा एक ग्रूप आहे त्यांचं काम
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
हा एक ग्रूप आहे त्यांचं काम आहे विनोद निर्मिती करणं. त्यांना बाकीच्या गोष्टी नाही जमत, नाही आवडत त्याला ते तरी काय करणार?
तेव्हा त्यांनी विनोदी कार्यक्रम बनवायचं सोडून डिस्कव्हरी चॅनेल वरच्या सारखे कार्यक्रम बनवावे- ही अपेक्षा हुकलेली आहे.
डिस्कव्हरी चॅनेलवाल्यांना स्टँड अप कॉमेडी करायला का नाही सांगत?
निव्वळ विनोदाचा दर्जा बकवास होता असा आक्षेप असेल तर समजू शकतो, पण त्यांनी "हे करावं अन् ते करावं" असा आग्रह का?
असो. रोस्ट वगैरे एक विनोदाचा प्रकार आहे. पटला नाही तर सोडून द्या. त्यांचे बाकीचे यूट्यूब वरचे अंकही छान असतात कधीमधी.
रोस्ट वगैरे एक विनोदाचा प्रकार आहे. पटला नाही तर सोडून द्या
In reply to हा एक ग्रूप आहे त्यांचं काम by भृशुंडी
हा विनोद आहे का ??
दुसरे म्हणजे
..
हि अपेक्षा ह्या विशिष्ट लोकांकडून आहे असे नाही मी एकंदर आपल्या आजूबाजूच्या सांस्कृतिक घडामोडींवर तसे म्हटले आहे ...
आणि माझा आक्षेप फक्त निर्मात्यांवर नाही प्रेक्षकांवर पण आहे ...शेवटी
people get the government they deserve ह्यात government ऐवेजी entertainment सुद्धा टाकता येईल
@ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही
In reply to हा एक ग्रूप आहे त्यांचं काम by भृशुंडी
@ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही छान असतात कधीमधी. >>
@ पटला नाही तर सोडून द्या >>
+१.
आस्क wh questions वगैरे एपिसोड टैमपास होते. बाकी, या व्हिडिओला सुध्दा वॉर्निन्ग दाखवली आहेच की. एवढं असताना ज्यांनी बघितला, त्यांनी का गळे काढावेत तेच समजत नाही.
असे कार्यक्रम एका विशिष्ठ
In reply to @ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही by यसवायजी
असे कार्यक्रम एका विशिष्ठ प्रेक्षकवर्गासाठी असतात आणि जोपर्यंत आयोजकांना हे कार्यक्रम बाकीच्या प्रेक्षकापर्यंत पोचणार नाहित हे सांभाळता येते तोपर्यंत असे कार्यक्रम होणे ठिक आहे ...पण युट्युबसारख्या ठिकाणी हे ठेवणे म्हणजे गुढग्यातसुध्धा मेंदू नसणे याची जाहिर कबुली देणे
युट्युबवर मुले काय बघतात यावर पालकांचा कंट्रोल नस्तो...आणि असे भारतीय लोकांनी केलेले कार्यक्रम आपलीच मुले लवकर डोक्यावर घेतात...कारण १ मुर्खाने चूक / वाईट काम केले की आणखी १०० लोक तेच लगेच करतात
@टका-
In reply to असे कार्यक्रम एका विशिष्ठ by टवाळ कार्टा
@टका-
युट्युबवर व्हिडिओ असवा किंवा नाही हा वेगळा विषय आहे. लेखकाने त्याबद्दल काहीच लिहिले नाही. पण मिडियातलं ऐकुन स्वतःच बघणार आणी उगाच शिव्या देणार त्याला काय करायचं?
बाकी असले व्हिडिओ व्हायरल व्हायला फक्त युट्यूबच आहे असे नाही, २ दिवसामागे हेच व्हिडीओ व्हॉटसॅपवरदिखील आले होते. आजकाल मेडीया शेअरींग सोपे झालंय. त्याचे फायदे आणी तोटे आहेतच.
माझा मुद्दा इतकाच होता की
In reply to @टका- by यसवायजी
माझा मुद्दा इतकाच होता की आयोजकांनी ते व्हिडिओ युट्युबवर टाकायला नको होते
अनुमोदन
In reply to असे कार्यक्रम एका विशिष्ठ by टवाळ कार्टा
अनुमोदन
समर्पक प्रतिसाद
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
समर्पक प्रतिसाद
...१००% सहमत अ.पा. .....!!!
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
'काही मूठ्भर लोकांना तो प्रॉब्लेमच वाटत नाही, हाच खरा प्रॉब्लेम आहे' न्हवे लोकशाहीत त्यांना तसे समजण्याचा अधिकार आहे असेसुद्धा म्हटले जाईल, नैतिकता वगैरे अत्यंत खाजगी बाब आहे किंवा कालबाह्य गोष्ट आहे, त्याचा इतका बाउ कशासाठी ?? असे प्रश्ण्ही आता विचारले जातील. लोकशाहीत ज्याला जे आवडेल ते त्याने करावे / पहावे परंतु कायदेशीर मर्यादेत असा सोयीचा समज करुन हे सगळे घडते.
लोकशाहीच्या चौकटीत 'बदफैलीपणाला जर प्रतिष्ठा लाभत असेल' तर त्याला तुम्हीआम्ही पामर काय करणार ??
यु ट्यूब वर याहून अनेक अतरंगी
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
यु ट्यूब वर याहून अनेक अतरंगी कार्यक्रम आहेत … त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही बरे … मग आत्ताच का … आणि अश्लीलतेचे म्हणाल तर त्यासाठी पहाणार्यांना यु ट्यूब शिवाय इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेतच की …. मग आता काय नेट वरच बंदी घालाल …
उद्या I Am Offended ही
उद्या I Am Offended ही डॉक्युमेंट्री रिलीज होणार आहे.
ही डॉक्युमेंट्री बघूनसुद्धा हजारो लोक ऑफंडेड होतील.
तूनळीवर ट्रेलर बघू शकता.
१० मिनिटांपूर्वी रिलिज झालीये
In reply to उद्या I Am Offended ही by नांदेडीअन
१० मिनिटांपूर्वी रिलिज झालीये ही डॉक्युमेंट्री.
डाऊनलोड करून घ्या.
उगाच बाऊ करू नका...
उगाच बाऊ करू नका . ज्याला पटत त्याने बघाव . ज्याला नाही पटत त्याने बघू नये.
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार ए आय बी ने तो विडीओ काढून घेतला आहे
हा शो काल रात्री तु-नळीवर
हा शो काल रात्री तु-नळीवर पाहिला. शुद्ध य.झ. पणा होता हा.
चॅरिटीच्या नावाखाली केलेला नंगानाच एवढचं म्हणु शकतो. चॅरिटीचं करायची होती तर नाच, स्किट्स वगैरे वगैरे सुद्धा सादर करता आलं असतं. त्यानंतर त्याच्यावरची कालिया भट ची प्रतिक्रिया अजुन चीड आणणारी होती. म्हणे टेन्शन रिलिफ चा एक प्रकार होता? करण जोहरचं तिसरं वाक्य काय असावं शो मधलं?
"माझी आई प्रेक्षकात बसलेली आहे, तिला कार्यक्रम संपता संपता अँब्युलन्स्ची गरज पडणार आहे". वा रे वा.
दिपिका पदुकोण, अलिया भट, सोनाक्षी सिन्हा वगैरेंविषयी एवढ्या खालच्या दर्जाच्या कॉमेंट्स केल्या गेल्या तरीही त्या निर्लज्जपणे हसत होत्या..एखादी असती तर स्टेजवर जाउन ह्यांची थोबाडं रंगवली असती.
र"गु" रामन ह्या थोर महात्म्याविषयी तर काय बोलावं? काय ते त्याचे चाळे, काय अवतात. त्यावर रणवीर आणि अर्जुन कपुरच्या प्रतिक्रिया तर तोंडाच्या गटारपणाचा कळस.
सलमान खानच्या निकटवर्तीयांवर केलेली टिका तर शोमधुन काढुन टाकायला लागलीये. कारण तो स्टेजवर बसलेला हत्ती होता त्याला सलमाननी रात्री दोन वाजता फोन केलेला.
त्याला सलमाननी रात्री दोन वाजता फोन केलेला
In reply to हा शो काल रात्री तु-नळीवर by कॅप्टन जॅक स्पॅरो
हम्म ...बरोबरच आहे
कोणी काय करावे आणि पैसे कसे
In reply to हा शो काल रात्री तु-नळीवर by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणी काय करावे आणि पैसे कसे वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे … समर्थ रामदास फक्त लंगोटी घालून देशभ्रमण करायचे आणि गांधीजींचा (फक्त )पंचा पण जगप्रसिद्ध आहे… त्यांनी केलेल्या कार्याला काय म्हनाल… जगत कल्याणासाठी तप करणारे नंगे साधू अजूनही आहेत … त्यांच्या नागदेपाना पहायचा कि तप हे ज्याचे त्याने ठरवावे
व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले
व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले होते. ते बघुन असे वाटले की कोणीतरी या अभिनेत्यांच्या तोंडात हे संवाद टाकले आहेत आणि एखादा डॉक्टर्ड व्हिडीयो आहे. इतक्या उघडपणे आणि जाहीरप्णे कोणी इतकी अर्वाच्य भाषा वापरेल आणि त्यावर उपस्थित स्त्री पुरुष हसतील असे वाटले नव्हते. अश्लील आणि किळसवाण्या भाषेचा अतिरेक झाला असे वाटते.
लोक खाजगी मध्ये काय भाषा वापरतात आणि एकमेकांना आईबहिणीवरुन काय शिव्या देतात ही पुर्ण वेगळी गोष्ट आहे. पण जाहिर कार्यक्रमात एखाद्याच्या आईबद्दल आणि तिच्या खाजगी अवयवांबद्दल जे उद्गार काढले ते ऐकुन मी धन्य झालो. त्यावर रघु जे किळसवाणे हसला त्याबद्दल तर त्याला जन्माला घातल्याबद्दल त्याच्या आईनेही पश्चात्ताप व्यक्त केला असेल. अतिशय अश्लील आणी हिडीस होते.
चार लोकांत काही द्वयर्थी विनोद सांगणे आणि जाहिर कार्यक्रमातुन इतकी किळसवाणी भाषा वापरणे यात फरक आहे,
अर्थात या प्रकारामुळे आपली संस्कृती वगैरे धोक्यात आली असे काही वाटत नाही. हार्डकोर पॉर्न नेटवर उपलब्ध आहेच की. हिंदी / मराठी निळफीतींमधुनही असली अश्लील / हिडीस भाषा वापरली जाते. त्यात आणी या विनोदात काही फारसा फरक वाटला नाही असेही म्हणवत नाही. आईबद्दलचे (कुणाच्याही असो) इतके हिडीस आणि ओंगळवाणे वक्तव्य कुठल्याही निळफीतीतही कदाचित नसावे**. कोणाला तो विनोद वाटो बापडा. मला वाटणे शक्य नाही.
**: आई बहिणीवरील शिव्या कुठल्या चित्रपटात दिल्या आहेत त्या दाखवुन त्यांचे अर्थ कृपया विचारु नयेत. त्यातला आणि या व्हिडीयो मधला फरक सुजाण नागरिकांना कळत असावा अशी अपेक्षा आहे.
योग्य
In reply to व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले by मृत्युन्जय
योग्य प्रतिसाद रे मृत्युंजया.
त्या रणवीरचा शोमन आजा बाहेर्ख्यालीपणाबदल प्रसिद्ध होता.बाकी त्या जोहरबद्दल तेच.सलमानच्या बापानेही बरेच दिवे लावले आहेत्/होते.नवतारकांना बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक पाहिजे असेल तर सलमानची 'भेट' घ्यावीच लागते असे वाचले आहे.
आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?
रणवीरचा शोमन आजा
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
रणवीरचा सिन्ग चा शोमन आजा ??
का रणवीरचा कपूर चा शोमन आजा
माईंना बहुतेक रणबीर कपूर
In reply to रणवीरचा शोमन आजा by अत्रन्गि पाउस
माईंना बहुतेक रणबीर कपूर नाहीतर अर्जुन कपुर म्हणायचे असावे...वयपरत्वे चुकीचे टंकले गेले असावे...संभाळून घ्या त्यांना :)
बापरे. माईंना रणवीरच्या शोमन
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
बापरे. माईंना रणवीरच्या शोमन आज्याचा राग आलेला दिसतोय. त्याला तुमच्यातही इंटरेस्ट होता की काय? :YAHOO:
सहमत
In reply to व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले by मृत्युन्जय
सहमत
मुळात शिव्या किंवा लैंगिक
मुळात शिव्या किंवा लैंगिक विनोद हा टॅबू का असावा? तो पण आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा भाग आहेच. त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? काही जण म्हणतील कि स्त्रिया आणि मुलांचं काय, तर त्यांना एवढंच सांगतो कि जसे सगळे पुरुष सर्रास शिव्या देत नाहीत तसंच सगळ्या स्त्रियांना शिव्यांचं वावडं नसतं. आणि लहान मुलांना तर याबाबत खुपच माहिती असते.
शेवटी हे मार्केट आहे, तुम्हाला आवडेल ते घ्या नाहीतर पुढे चला, कारण तुम्हाला जशा इतरांच्या काही गोष्टी आवडत नाहीत तसंच इतरांनापण तुमच्या काही गोष्टी आवडत नसतात. प्र॑त्येक ठिकाणी धर्म, संस्कृती आणि समाजस्वास्थ्य यांचा बडगा दाखवुन अभिव्यक्तीची गळचेपी करु नये.
शेवटी "किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही". ज्याची जितकी पोच तो तेवढच घेतो.
अजुन एक, मी तो शो यु ट्युब वर बघितला, चारचौघात(चारचौघीतही) चालणारे विनोद फक्त स्टेज वर सादर करुन प्रक्षेपित केलं एवढंच. कृपा करुन त्याच्याकडे याच आणि एवढ्याच द्रुष्टीने बघावे. यात धक्का बसु शकतो, पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या प्रोसेस चा भाग आहे. हे होतच राहणार.
पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या
In reply to मुळात शिव्या किंवा लैंगिक by जेम्स बॉन्ड ००७
तुमचा प्रतिसाद वाचुन ड्बॉळे पाणावले.
तो बकचो* टीमचा कोण ख्रिश्चन पोरगा होता त्याच्या आई-वडलांविषयीचा, नंतर र"गु"रामनच्या आणि त्याचा तो जुळा टोणगा भाउ आहे त्याच्या जन्माविषयीचा उल्लेख वगैरे गोष्टी जर का डिसलोकेशन प्रोसेस चा भाग असेल आणि इथुन पुढे सार्वजनिक वागण्या-बोलण्याचा भाग होणार असेल तरं माय टाईम इन धिस सोसायटी इज ओव्हर. साला, पैसा मिळतोय म्हणुन आई-बापाच्या खासगी जीवनाचा अत्यंत किळसवाण्या शब्दात केलेला उल्लेख स्वीकारणारे असतात ह्यावर काल रात्रीपर्यंत विश्वास नव्हता. मात्र काल हे ह्याची डोळी ह्याची देही पहायचे दुर्भाग्य लाभलं.
नॉनव्हेज जोक मी सांगत नाही किंवा ऐकत नाही असं नाही. माझ्या जीवलगांच्या गोतावळ्यामधे ज्यात मुलीही आहेत तिथे सगळेचं नॉनव्हेजी आहेत. पण एका मर्यादेमधेचं. मैत्रीच्या सगळ्या मर्यादा आणि नियम सांभाळुन हे प्रकार घडतात. पण ह्याचा अर्थ असा नाही उद्या मी एक स्टेडिअम भाड्यानी घ्यावं तिथे भरम्साठ तिकीट लावुन असला चु*पणा करावा.
असो...
+११११११११
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
+११११११११
नॉनव्हेज जोक मी सांगत नाही किंवा ऐकत नाही असं नाही.
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत
सहमत
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
साला, पैसा मिळतोय म्हणुन आई
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
ईथेही सहमत पण अर्थात या मर्यादा ज्याच्या त्याने ठरवायच्या असतात.
आणि मलाही ते आईबापाचे उल्लेख खटकले तरी ज्यांनी ते केले आणि ज्यांच्या आईबापाचे केले ते याला राजी असतील तर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही..
ज्यांनी अश्लील बोलले त्यांना
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
ज्यांनी अश्लील बोलले त्यांना प्रोब्लेम नाही … ज्यांच्याविषयी अश्लील बोलले गेले त्यांना प्रोब्लेम नाही … ज्यांच्यासमोर बोलले गेले त्यांनासुद्धा काही प्रोब्लेम नाही …. पण "अश्लील कार्यक्रम" अशी प्रसिद्धी मिळताच १. डोळ्यांवरचे हात काढून पळत जाउन तो कार्यक्रम शोधून पाहणाऱ्या २. कानावरचे हात काढू शब्द नि शब्द ऐकणार्या आणि ३. तोंडावरचे हात काढून "हे चूक" "हे अश्लील" "हे … " वगैरे बोलणार्या गांधींच्या तीन माकडांना प्रोब्लेम का असावा
आता मात्र "कहर" झाला
संगत बदला
In reply to मुळात शिव्या किंवा लैंगिक by जेम्स बॉन्ड ००७
चारचौघात(चारचौघीतही) चालणारे विनोद फक्त स्टेज वर सादर करुन प्रक्षेपित केलं एवढंच
संगत बदला.
संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न
तुम्ही एकदाही हसला नाहीत का? खरं सांगा. किंवा असं समजा कि हेच विनोद तुमच्या ग्रुप मधे चालले आहेत, तर हसला असतातच ना? आता फक्त तो ग्रुप मोठा झालाय एवढंच.. त्यात प्रॉब्लेम असेल तर तो ग्रुप सोडावा, कारण तुमची ईच्छा असो वा नसो, प्रायवेट आणि पब्लिक या संकल्पनांमधली सीमा आता ब्लर होतेय, तुम्ही तुमच्यापुरतं हे टिकवुन ठेवु शकता, ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तसंच याच न्यायाने दुसर्यांवर तुम्ही काहीच लादु शकत नाही हे सुद्धा लक्षात असु द्या..
प्रायवेट आणि पब्लिक या संकल्पनांमधली सीमा आता ब्लर होतेय
In reply to संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न by जेम्स बॉन्ड ००७
हे तुम्हाला स्वीकारता येतय?...
हेच म्हणतो कि तुम्ही (म्हणजे ते सादरकर्ते आहेत त्यांना उद्देशून ) सोशल मेडीयावर टाकून लादता आहात ...
हे तुम्हाला स्वीकारता येतय?..
In reply to प्रायवेट आणि पब्लिक या संकल्पनांमधली सीमा आता ब्लर होतेय by अत्रन्गि पाउस
हो. अर्थात ही सीमारेषा व्यक्तिगत असते आणि ज्याप्रमाणे मला माझे लिमीट्स ठरवायचा अधिकार आहे तसाच तो इतरांनाही आहे. आणि माझ्यामते सोशल मिडीयावर असणारी प्रत्येक गोष्ट बघणं हे ऑप्शनल असतं..
एक लक्षात घ्या, एवढी कुप्रसिद्धी होउनही तो शो जे बघतात त्यांना ते हवंच असतं ना?
आज तो भाग बघितला....नुस्ता
आज तो भाग बघितला....नुस्ता वाय्झेडपणा आहे...बरे जे प्रेक्षक आलेले त्यांच्यासाठी असे विनोद चालतील त्याबद्दल काहिही आक्षेप नाही...पण एक चावट संध्याकाळ सुध्धा असेच (पण यापेक्षा सौम्य) नाटक आहे ... चावट्/अश्लील्/वात्रट प्रोग्राम बनवणे ठिक आहे पण असे प्रोग्राम खुल्लेआम युट्युबवर टाकणे हे फार चुकीचे आहे...चुकीच्या प्रक्षकांपर्यंत जातात मग ते
AIB
AIB - All India Bakchod. म्हणजे बडबड करणारे, वटवट करणारे. अशा लोकांना कोणी सिरियसली घेतो का? जर घेत असेल तर तो मूर्ख. शिवाय तुनळी असो किंवा अन्य कोणतेही माध्यम असो,लोकांच्या सहनशक्तीचा मीटर त्यांनीच ठरवलेला असतो आणि तेच योग्य आहे.शिमग्याला गेलो आहोत असं मानावं आणि कार्यक्रम बघावा किंवा बघू नये. आपल्या देशात लोक नको त्या गोष्टी गंभीरपणे घेतात,उदाहरणार्थ हे असे कार्यक्रम.ज्या गोष्टी सिरियसली घ्यायला हव्यात त्या घेत नाहीत , उदाहरणार्थ अजूनही चालू असलेले वाळीत टाकण्यासारखे प्रकार, राजकारणाचं गुन्हेगारीकरण,वगैरे बरेच.
हे मिपा माझे नाही...
विरोधाचा मुळ गाभा लक्षात न घेता चुकीच्या गोष्टींचे जे समर्थन चालले आहे ते पाहून 'मिपा' ही माझ्यापासून दूर जात असल्याचे जाणवले.
पेठकर काकांबरोबर ५०००% सहमत.
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
पेठकर काकांबरोबर ५०००% सहमत.
विरोधाचा मुळ गाभा लक्षात न घेता
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
अगदी अगदी
विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
१. सदर (आणि मिळत्याजुळत्या इतर) मतांशी मी मुळीच सहमत नाही. हा कार्यक्रम गटारी विनोदाचा होता आणि तशीच त्याची प्रसिद्धी करण्यात आली होती. तिकिटे काढून आलेल्या प्रेक्षकांना याची पूर्ण कल्पना देण्यात आलेली होती. तूनळीवरील फिती पाहणे-न पाहणे हा व्यक्तिगत निर्णय असतो. शिवाय, आंतरजालावर इतर कायकाय उपलब्ध असते, हे वेगळे सांगणे नकोच. मग काय भारत सरकारने आंतरजाल बंद करून टाकावे काय?
२. इथे वाचलेल्या प्रतिसादांवरून एक निराळीच गोष्ट लक्षात आली, ती अशी: सदरच्या कार्यक्रमात केवळ लैंगिक विनोद नव्हते तर स्थूल, काळ्या आणि कुरूप व्यक्तींनाही बेसुमार टिंगलीचे लक्ष्य बनवले गेले होते. विस्मयाची बाब म्हणजे, सुजाण, प्रगल्भ मिपाकरांपैकी कोणालाही अजून ते विशेष आक्षेपार्ह वाटलेले दिसत नाही. जो काही विरोध, राग, घॄणा इ. व्यक्त केले जात आहेत, ते केवळ लैंगिक अर्थाच्या विनोदांच्या संदर्भात आहेत. वास्तविक पाहता शारीरिक व्यंगावरून केलेले विनोद हे हीनतेच्या मापावर अधिक खालचे मानले जायला हवेत. कारण शारीरिक गुणधर्म हे व्यक्तीच्या हातात नसतात.
यावरून काय उमजावे? मला हे वाटते, की आपण अजूनही सेक्स हा विषय (!!) मोकळेपणाने, निर्मळपणे हाताळण्यास तयार नाही. दादा कोंडके टाइपचे द्वयर्थी विनोद चालतात, कारण त्यांना एक साळसूद असा 'आवरण-अर्थ' असतो. (माझा अर्थात त्याला आक्षेप नाही, कारण तीही विनोदाची एक निराळी जातकुळी आहे). पण थेट लैंगिक विनोद ऐकून मनमोकळेपणाने हसणे अजून आपल्याला कठीण जाते. बरेचजण गोरेमोरे होतात.
३. इथे होणारा विरोध कार्यक्रमाच्या हीन कलात्मक मूल्यांना आहे या दाव्याला मुळीच अर्थ नाही. या कार्यक्रमातील बहुतेक विनोद बाष्कळ होते यात शंका नाही. पण अशोक-लक्ष्याच्या (भरत-मकरंद असे वाचले तरी चालेल) सिनेमातले ९०% विनोदही बाष्कळ असायचे. तिथे कोणी संस्कॄती धोक्यात आल्याचा ओरडा केला नाही. कारण एकच - ते सिनेमे सेक्सपासून कोसभर दूर राहायचे.
४. येथे मी कोणत्या गोष्टीचे 'समर्थन' करत आहे, हे कॄपया नीट लक्षात घ्यावे. परस्परसंमतीने उडवली गेलेली थट्टा हा इतरांनी निषेध करण्याचा विषय होऊच शकत नाही, हा माझा मुद्दा आहे. उद्या माझ्या मित्राने मला टकलू, ढोल्या किंवा कुत्रा म्हटले, त्याचा व्हिडिओ जालावर टाकला आणि त्यावर मी ळोळ वगैरे लिहिले, तर मिपाकरांना राग येईल काय? सदर कार्यक्रमात थट्टेचा विषय असलेले महाभाग ती ऐकून हास्यरसात गडबडा लोळत होते (तो अभिनय असू शकेल, पण त्यांना आक्षेप नव्हता हे स्पष्ट दिसत होते).
५. करण जोहरची आई प्रेक्षागारात उपस्थित होती. तिलाही तो प्रकार मनोरंजक वाटला असणार असे मानायला हरकत नाही. मग तुम्ही-आम्ही कोण लागून राहिलोत? (आता आई कशी असावी वगैरे धागा इथे कोणी काढला नाही म्हणजे मिळवली!)
६. कोणत्याही performance ला सेन्सॉरबोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक असते, हा कायदा आहे. हा कार्यक्रम performance मधे मोडतो का, त्याला असे प्रमाणपत्र मिळाले होते का, सेन्सॉरबोर्ड असावे की नको, हे मुद्दे सर्वस्वी वेगळे आहेत. त्यावर निराळी चर्चा होऊ शकते. मात्र केवळ लैंगिक विनोद होते म्हणून या कार्यक्रमाला वेगळे काढून झोडपणे अयोग्य आहे असे मला वाटते.
लोभ असावा ही विनंती. :)
+१२३
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
+१२३
दंडवत स्विकारा मालक...
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
दंडवत स्विकारा मालक... शब्दाशब्दाशी सहमत..
+१११
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
सहमत
............/\............
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
सहमत..
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
मी काल हा कार्यक्रम पाहीला. त्याबद्दलच्या गदारोळामुळेच पाहीला. धक्का बसला, कारण की असा कार्यक्रम सार्वजनिकरित्या होऊ शकतो, ह्याचंच अप्रुप आणि आश्चर्य.. शिव्यांचा अतीवापर आणि लैंगिक अवयवांचा उल्लेख, विशेषरित्या रघुरामन आणि त्याच्या जुळ्या भावावर केलेला विनोद अत्यंत हिन दर्जाचा होता. मात्र, बर्याच ठीकाणी मी मनमुराद हसलो. खासकरुन आलियाला टारगेट करुन केलेल्या हजरजवाबी विनोदांवर..
एकदम खरं.. पण कसं आहे ना, जसे 'टॅबू', तसेच आक्षेप.. साधारणतः भारतात जात, वर्ण, शारीरिक व्यंग ह्यांचा उल्लेख किंवा विनोद ह्यात काहीच चुकीचं मानल्या जात नाही. लैगिक वर्णन आलं की ढासळलीच आमची संस्कृती..
असो. काय होणार ह्याची कल्पना असून आलेले प्रेक्षक आणि अभिनेते, वयोमर्यादेची स्पष्ट कल्पना देऊन युट्यूबवर टाकलेला व्हिडीयो, ह्यामुळे मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. मला जे अश्लील वाटतं ते सगळ्यांनाच चुकीचं वाटावं, अशी अपेक्षाही नाही आणि आग्रहपण नाही..
साधारणतः भारतात जात, वर्ण,
In reply to सहमत.. by चिगो
आहा, काय बोललात चिगो साहेब. एकच नंबर. माझ्याकडनं एक आंध्रा थाळी लागू तुम्हांला.
साधारणतः भारतात जात, वर्ण,
In reply to सहमत.. by चिगो
अगदी!!
पेठकरांशी सहमत.
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
बाकी मिपापासून अनेक लोक लांब रहात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. भले मान्य असो वा नसो.
आता ही क्रिया अजून वेगाने होइल.
ज्यांना आमंत्रणाची अक्षत देऊन
ज्यांना आमंत्रणाची अक्षत देऊन बोलवलं होतं त्यांनी हे एंजॉय केलं, पार त्यांच्यावर विनोद झाले तरी!! लैंगिक विनोद किंवा शिव्या म्हणाल तर गधेगाळ/शापवचने यातही अशी भाषा वापरली आहे. शारीरिक व्यंगांवरचे विनोद खरंतर हीन मानायला हवेत, त्याबद्दल एकाही सोकॉल्ड सद्गृहस्थाने तोंड उघडलेलं दिसत नाही.
ज्यांना आमंत्रित केलं आहे त्यांनी आनंद लुटला ज्यांनी आमंत्रित केलंय त्यांनी आनंद लुटला. आपण इथे ऊर बडवण्यात काय हशील आहे. अश्लील वाटत असेल तर बघू नये.
मिपाच्या बाबतीत पाव्हण्यांच्या घरचे नियम आपण ठरवू नये हे ज्यांना कळत असेल, ते युट्युबवर पण आपण पाव्हणेच असतो हे कसं विसरतात? त्यांनी काय प्रक्षेपित करावं हा त्यांचा प्रश्न आहे, काय बघायचं नि काय नाही हे आपलं आपण ठरवू शकतो.
राह्यला प्रश्न मुलांचा!! मुलं आपल्याहून दोन पावलं पुढं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नसलीच तर तीही ते व्हिडिओ आपण होऊन बघणार नाहीत.
चलत मुसाफ़िर आणी सुड- अव्वल
चलत मुसाफ़िर आणी सुड- अव्वल प्रतिसाद
उत्तम ब्लॉग--- जरूर वाचा
जरूर वाचावा असा ब्लॉग
एआयबीची होळी
सॉलिड लिहीलंय
In reply to उत्तम ब्लॉग--- जरूर वाचा by वेल्लाभट
सॉलिड लिहीलंय
A I B ने विडिओ हटवला .
A I B ने विडिओ हटवला . का ? त्याच स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे . सगळ्यात शेवटची ओळ भन्नाट . निळ्या डागाला लाल रंगांचा (रक्ताचा ) डाग समजा असे प्रेक्षकाना सांगणार्या सत्यदेव दुबेंची आठवण झाली . *lol* *LOL* :-)) :))
“I may not agree with you, but I will defend to death my right to get offended. How dare you? Baahar mil.” – Desi Voltaire
Dear everyone,
Let’s just all take a deep breath. They’re just jokes. Unfunny, crass or whatever you want to call them, they’re still just jokes. The AIB Knockout video has been taken down. While we’d love to claim that it’s because so many people watched it that it broke YouTube, the truth’s a little sadder.
First things first; no one person or force forced us to take this video down. This is not something that’s happened because of a 3 am phonecall or a morcha at our front door or a gunman on a grassy knoll. Under the circumstances, this is us being pragmatic. Allow us to explain.
People who’ve been following our work will know that we’ve always tried to experiment with content be it on Youtube or a live comedy show, with the sole intent of making people laugh and/or think. AIB Knockout was another such attempt to try something new and bring the roast format to a country where celebrities aren’t often known to laugh at themselves. To our pleasant surprise, we managed to bring together consenting adults who were willing to be made fun of by other consenting adults in a crowd full of (wait for it) consenting adults. And if we’re honest, it was a phenomenally entertaining evening. Were the jokes repetitive? Crass? It didn’t matter because they happened in the spirit of irony and good humour. It was just liberating to be able to say those things, things that people have thought in one form or another privately for years. A lot of the laughter that night came from that spirit (there’s your answer, people who wondered why everyone was laughing at terrible jokes).
The video came with a clear disclaimer with several age and content warnings. No one was forced to watch it, we didn’t buy airtime on every single TV channel on Earth to broadcast it. YouTube videos do not magically auto-play in front of you. And yet the videos got over 8 million views. Far more importantly, on the video page, the people who liked them outnumbered the people who disliked them by ten times to one. Yes, ten times.
The format was the same as any international roast i.e. insult comedy, delivered in the form of one-liners designed to be as rude as possible. It is performed with the understanding that none of the material is to be taken seriously—none of the performers actually mean the “offensive” things they say to each other on the night. We clarify this simply to provide context.
With the Knockout, in our own juvenile, idiotic way, we wanted to push the envelope of comedy in this country. But then the envelope pushed back. Things got to a point where people who have supported us, people who work hard to make what we do come to life, were put in a position where things could get deeply unpleasant for them. And that’s a problem. We can live with abuse, hate, anger, fury, rage, ignorance, bigotry and perhaps even bullying. But we don’t want anybody to get hurt because of us. And we do mean anybody.
We hope it’s clear by now that we never write with the aim of hurting people. That’s not our goal and we daresay that no comedian ever does that. We don’t go to work and say, “Hmm, let’s offend XYZ people from XYZ community today.” If we really wanted to piss off people and hurt them, we’d be selling credit cards over the phone.
Our job is to raid the newspapers, pop culture and life for observations and analogies and it’s okay if you think we’re juvenile or unfunny. We respect arguments that are critical, and as for the arguments we don’t, we respect your right to make them without impediment. It is a courtesy we wish worked both ways.
Over the last few days, we’ve found ourselves subject to more scrutiny, judgment and opinion than we’re worth. This Knockout shouldn’t matter. In a secure culture it wouldn’t matter.
We’re lucky to have support pouring in from all quarters. First up, from our fans, just the greatest people in the world, who have nothing but good cheer and encouragement and positive thoughts. We were pleasantly surprised that people in power who we have made fun of in the past, including people from both the so-called right wing and left-wing, went out of their way to convey support to us. It was fantastic to know that they stand for free speech as much as us. Friends in the media have told us to stay our course, pledging their support for our right to say anything, no matter how ridiculous. Thank you to anyone who has stated in the last few days that we have the right to say what we want, not as comedians but more importantly as citizens of this country.
There’s a larger cultural conversation going on here, where we’re at the very edges of what it’s okay to say. And it’s a conversation we need to have now because the world we live in is entirely too complicated to be run by silences. We still stand by our belief in the right to absolute freedom of expression for us and for anyone who has anything to say about anything at all. We hope to be part of an environment that supports that sort of expression without fear of persecution, intimidation and most importantly, annoyance. As always, in our own AIB way we’ll continue to strive towards creating that very environment.
In the meantime, we’d like to say thank you to our fans and everyone else who is standing by us. You guys make the struggle worth it. To everyone railing against us and against the stars that were present, to everyone who’s decided we’re destroying the fabric of our culture, to everyone who’s called us seditious pornographers while plotting the downfall of Indian Values And Civilization As We Know It, we would like to reiterate that we are just a bunch of comedians who work, and have always worked, without any malicious intent whatsoever.
We encourage any and all conversation on the subject of freedom of expression, for our own silly selves, and for people better, smarter and more courageous than us. For hundreds and thousands of artists, commentators and any and all citizens that do not have the privilege of social platforms and reach that we do.
We are also cooperating with the authorities and hope to resume normal service soon. We’d like some sort of cheerful resolution to this so we can focus on more important national issues, like the upcoming Cricket World Cup.
P.S. Best of luck Virat Kohli. Sorry for the jokes. We heart emoticon you.
P.P.S. It’s a good thing nobody’s downloaded the file and put it on a torrent website or anything.
यांना लाजही वाटत नाही
In reply to A I B ने विडिओ हटवला . by पिंपातला उंदीर
यांना लाजही वाटत नाही निर्लज्ज समर्थन करायला
एक नंबर लिहिलय. शोधायलाच हवा
In reply to A I B ने विडिओ हटवला . by पिंपातला उंदीर
एक नंबर लिहिलय. शोधायलाच हवा तो व्हीडो आता.
क्या बात है!
धन्य आहे
In reply to A I B ने विडिओ हटवला . by पिंपातला उंदीर
P.P.S. It’s a good thing nobody’s downloaded the file and put it on a torrent website or anything.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचे फक्त अधिकार उपटायचे .. कर्तव्य नाही ...
असो ..आपल्या आजूबाजूला हे पेरले जाते आहे ... उगवल्यावर पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही ...
@अत्रंगी पाउस साहेब -
In reply to धन्य आहे by अत्रन्गि पाउस
@अत्रंगी पाउस साहेब - सेन्सॉर शिप ची गम्मत म्हणजे तुम्ही जेन्व्हा एखाद्या गोष्टीची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न करता तितके तिच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण होते . पीके ला विरोध झाला त्याने ३०० करोड चा धंदा केला . प्रेषिताचे चित्र काढले म्हणून अतिरेक्यांनी हल्ला केला तर चार्ली हेब्दो ने पुन्हा ते चित्र काढलेच वर सोशल नेट्वर्किंग वर अनेक लोकांनी ते चित्र शेयर केले . आता पण A I B च्या विडिओ ला लाखो likes आणि शेयर मिळाले . बहुतेक वेळा सेन्सॉर शिप/ कलाकृतीला विरोध boomerang ठरू शकतो . त्यामुळे जे आवडत / पटत नाही त्याला इग्नोर करण जास्त योग्य असे वाटते .
हे मात्र खरंय
In reply to @अत्रंगी पाउस साहेब - by पिंपातला उंदीर
एक प्रकारची जाहिरातच करतोय आपण
जबरदस्त..
In reply to A I B ने विडिओ हटवला . by पिंपातला उंदीर
जबरदस्त..
झक्कास..
In reply to A I B ने विडिओ हटवला . by पिंपातला उंदीर
क्कं हाणलाय.. =)) :D
ओ साहेब . जरा तोंड आवरा .
ओ साहेब . जरा तोंड आवरा . च्यायला अनुचित भाषेमुळे दुसर्या संकेत स्थळावर ban झालेला इसम दुसर्यांच्या भाषेची मापे काढतो म्हणजे हद्द झाली .
दुसर्या संकेतस्थळावरची
In reply to ओ साहेब . जरा तोंड आवरा . by पिंपातला उंदीर
दुसर्या संकेतस्थळावरची भांडणे इथे घेऊन येऊ नयेत असा इथल्या मालकांचा आदेश आहे. उल्लंघन केलेत तर.............
मी त्या लोकांच्या समर्थनाबद्दल बोलत होतो. तुम्हाला उद्देशून नव्हते ते.
ओके . माफ करा . माझा गैरसमज
ओके . माफ करा . माझा गैरसमज झाला
इट्स ओके. नो प्रोबलेम
In reply to ओके . माफ करा . माझा गैरसमज by पिंपातला उंदीर
इट्स ओके. नो प्रोबलेम :)
अजून एक माहितीपर लेख
रोस्टिंग म्हणजे काय, त्याचा इतिहास, व या शो मागील पर्श्वभूमी, जगातील इतर रोस्टिंग शोजच्या तुलनेत या शोचा केलेला रिव्ह्यू असे एकत्र असणारा हा एक लेख नुकताच वाचनात आला.
इथेही नजर टाकालच
हम्म
In reply to अजून एक माहितीपर लेख by ऋषिकेश
वाचला ...
जेव्हा आपण समाजात राहतो
जेव्हा आपण समाजात राहतो ,तेव्हा काही सामाजिक नियम पाळलेच पाहिजेत
म्हणजे काही निर्लज्ज लोकांनी त्यांना वाटेल तसा नंगानाच करायचा आणि सोशल साइट्सवर त्याचे व्हिडिओ टाकायचे आणि परत हे सो कॉल्ड अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणणार तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही बघु नका ,
म्हणजे सुसंस्कृत लोकांनी त्यांना त्रास होणाऱ्या गोष्टीला विरोध करायचा नाही
म्हणजे निर्लज्ज लोकांना व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी करण्याची मुभा
पण ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांना चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची मुभा नाही
तस झाल की ह्या व्यक्ति स्वातंत्र्य पुरस्कर्त्यांना मिरच्या झोंबतात
(No subject)
फेसबुकची सोय
In reply to (No subject) by नांदेडीअन
आहे ती ...
डीस्लाईक ...असायला हवे होते नाही का ?
:)
मर्यादा
प्रत्येक गोष्तीची मर्यादा वाढत चालेलेली आहे असा वाटत ..पूर्वी या गोष्ती मर्यादा उल्लंघन मानल्या गेल्या
१. नऊवारीची सहा वारी झाली तेव्हा !
२. केसांचे कल्ले वाढले तेव्हा
३. स्त्री शिक्षित झाली तेव्हा ..
आणि
सध्या च्यायला , मायला , आयच्या गावात , भां**, गां* , चु* अशे जे विशेषण बराच तरूणवर्ग सहजपण बोलीभाषेत वापरतो त्या एके काळी घाणेरड्या शिव्या होत्या !
पण त्या आज बरेच जण नियमितपणे वापरतात ( याचे मी समर्थन करत नाही)..
कपडे , मेकअप ते दारू सर्व बाबतीत समाजाच्या मान्यता बदलत चालल्या आहेत. आज पहिल्यांदा ( सार्वजनिकपणे ) हे प्रदर्शन झाले म्हणून बोभाटा झाला ! अजून २० वर्षांनी हे कॉमन असेल ( आपल्याला ते वाईत वाटेल ) आणि पुढची पिढी मात्र धोंडू चिल्ल म्हणून निवांत बघेल
यु त्युब
वर लिंक मिळेना झालीय ...
विडिओ पाहिला
विडिओ पाहिला. मला ते 'विनोद' थर्डक्लास वाटले. मी फुकटही असा शो पाहणार नाही. पण असे विनोद ज्यांना आवडू शकतात त्यांनी ते पाहिल्याने 'मर्यादा' कशी काय ओलांडली जाते बॉ? 'शो'ला आलेले आमंत्रित आणि ज्यांच्यावर विनोद केला गेला असे लोक यांना कुणाला आक्षेप दिसत नाही. अमेरिकेत रसेल पीटर्स सारखे अनेक महाभाग निव्वळ लैंगिक विनोदांवर आख्ख्या करियर चालवतात. बहुतेक सगळ्याच ष्ट्यांडप कॉमेड्या लैंगिक विनोदावरच तगून आहेत.
असो
'भले तर देऊ गांडीची लंगोटी' या तुकारामांच्या मूळ अभंगाचेही सोज्वळीकरण करण्याची आपली 'संस्कृती' असल्याने थोडाफार धुरळा उडणारच.
संत तुकाराम
In reply to विडिओ पाहिला by आजानुकर्ण
*विली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥
करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥
बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥
तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥
एका ( तथाकथित गळेकाढू) बहुजन संमेलनात संत तुकारामांचा हा अभंग ऐकवल्यामुळे उडालेला गोंधळ आठवला
TVF ने AIB च्या समर्थनात एक
TVF ने AIB च्या समर्थनात एक व्हिडिओ बनवला आहे.
https://www.youtube.com/watch?v=IX2Kp7Lip2Q
मि पा
मि पा मुळात अशा सेन्सॉरशिपच्या विरोधात तयार झाले होते. इथे कोणत्याही भाषेवर बंधने नव्हती. आपण ज्या समाजात जी भाषा ऐकतो ती लिहिण्याचे पुर्ण स्वातंत्र्य होते. मग ए आय बी वर बंदी घालण्याची भाषा इथे का? कुणाला बळजबरीने तर कार्यक्रम दाखवला नाही ना!
कुणाला बळजबरीने तर कार्यक्रम
In reply to मि पा by निमिष ध.
अगदी! मगाशीच कुठेतरी वाचलं "स्क्रीनवर उजव्या कोपर्यात एक लाल क्रॉस आहे. नाही आवडलं तर त्यावर क्लिक करता येतं!!!"
खरा मुद्दा वेगळाच आहे मित्रहो
ह्या नॉकआउट कार्यक्रमापेक्षाही थिल्लर आणि विभत्स असे कार्यक्रम आपल्याच देशात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होत आहेत. यामध्ये अश्लील गाण्यांपासून ते नृत्य आणि नाटकांपर्यंत सगळ्याच प्रकारात अगदी रेलचेल आहे. त्याचा आस्वाद घेणारे व्यवस्थित घेत आहेत, कलाकारांची रोजीरोटी सुद्धा सुखनैव सुरु आहे.
उदा: सदर विडिओ (आपापल्या जबाबदारीवर बघावा. मराठी आहे.)
https://www.youtube.com/watch?v=hdr7TOjbcuk
मग याच कार्यक्रमाबद्दल राळ उडण्याचे कारण काय?
कारण आहे हा कार्यक्रम करणारे जे कोण आहेत ते. हेच तथाकथित उच्चभ्रू समाजाच्या खालच्या वर्गाने केलेल्या अश्लील कार्यक्रमांना नाक मुरडतात, सो चीप, फिल्दी म्हणतात. संख्येने मोठा असलेला मध्यमवर्ग, जो संस्कार आणि परंपरा पालनामध्ये इतर घटकांपेक्षा जास्त पुढे आहे, त्यांच्यासाठी हे लोक सेलेब्रिटी आहेत, आदर्श आहेत. एक दिवस यांच्यासारखे श्रीमंत आणि प्रसिद्ध आपणही असू याची वर्गाला आस आहे. त्यामुळे हा हुच्च्भ्रू वर्ग जो करेल त्याचे (आपला मध्यमवर्गीय सुसंस्कारीपणा राखून) आंधळेपणाने आचरण करणे हा मध्यमवर्गाचा अजेंडा आहे.
मध्यमवर्गाच्या मनातल्या हुच्च्भ्रू वर्गाच्या अभिजात प्रतिमेला या कार्यक्रमाने प्रचंड धक्का बसला आहे. एवढी फालतू आणि शिसारी आणणारी शेरेबाजी विनोदाच्या नावाखाली खपवणे, वर आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलाकाराचे हक्क वैगेरे मानतो असा आव आणणे हा दांभिकपणा मध्यमवर्गाच्या गळी उतरत नाही आहे. ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांनीच असे दर्जाहीन कार्यक्रम करावे तर मग मूल्य आणि संस्कार कशाला म्हणावे असा प्रश्न उभा राहिला आहे.
आपण खालच्या वर्गातल्या लोकांना नावे ठेवून ह्या तथाकथित उच्चभ्रू लोकांच्या कलाकृतींना अभिजात दर्जेदार समजत होतो. मग आता नेमके काय समजावे असा गोंधळ झाला आहे. असो.
आता माझे मतः मानवजातीला सर्व नउही रसांमधून अभिव्यक्त व्हायला आवडतं. त्यात उच्चवर्गीय निम्नवर्गीय असा काही भेद नसतो. त्यामुळे हा कार्यक्रम चांगला किंवा वाईट हे मी अजिबात म्हणणार नाही. पण त्याच वेळेस ह्या नॉकआउट प्रकाराला जे कोणी चांगले म्हणून डोक्यावर घेत आहेत त्यांनी इतरही अशाच कार्यक्रमांना, कलाकारांना तोच मान द्यावा. करण जोहर करेल तर हायक्लास कॉमेडी आणि कुणी भोजपुरी भैय्या करेल तर चीप, थर्डक्लास असे म्हणून दांभिकता दाखवू नये.
(दांभिकतेच्या विरोधात क्रांतीची मशाल) संदीप डांगे
ता. क.
कार्यक्रम पूर्ण बघितला. दोन तीन पंचेस सोडले तर बाकी सारे थिल्लर होते. अश्लील विनोदांचा पण काही एक दर्जा असतो. तो नव्हता. ४-५ मूळ विनोदांवर अख्खा कार्यक्रम रिपीट होत होता. त्यामुळे फार मेहनत घेऊन थिल्लरपणा केला असंही नाही.
कार्यक्रमात तिकीट घेऊन जाउन खिदळणाऱ्या पब्लिक ला बघून इडिओक्रसी या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात एका सीन मध्ये लोक थेटरात जाउन द अॅस नावाची फिल्म बघतात ज्यात संपूर्ण दोन तास एका माणसाचा फक्त पार्श्वभाग दाखवला असतो आणि लोक ते बघून नुसते हसत असतात.
हा कार्यक्रम जालावर शोधण्यापरीस हा सिनेमा शोधून बघा. वेळेचा पूर्ण सदुपयोग होईल. ह्या चित्रपटाबद्दल एक छान परीक्षण लिहायचेच आहे, तोवर तुम्ही बघून घ्या, नक्कीच आवडेल.
आणखीन एक डायमेंशन
In reply to खरा मुद्दा वेगळाच आहे मित्रहो by संदीप डांगे
तुम्ही दिलेली क्लिप पाहून दातखीळ बसायची बाकी होती ..
*shok*
अहो, मध्यमवर्गाला अर्धांगवायू
In reply to आणखीन एक डायमेंशन by अत्रन्गि पाउस
अहो, मध्यमवर्गाला अर्धांगवायू होईल असं बरंच काही चाललेलं असतं आपल्या देशात. युपी बिहारच्या काही जत्रा उत्सवांमध्ये तर स्टेजवर प्रत्यक्ष संभोग (चित्रफित नाही) दाखवला जातो आहे. आणि हे गेले कित्येक वर्ष घडत आहे तिकीट लावून.
इथे खाली
In reply to अहो, मध्यमवर्गाला अर्धांगवायू by संदीप डांगे
साती ताई म्हणताहेत तेच खरंय
उत्तम प्रतिसाद
In reply to खरा मुद्दा वेगळाच आहे मित्रहो by संदीप डांगे
छान प्रतिसाद.
(दांभिकतेच्या विरोधात एक कंदील) आजानुकर्ण
मस्त प्रतिसाद
In reply to खरा मुद्दा वेगळाच आहे मित्रहो by संदीप डांगे
मस्त प्रतिसाद :)
इडिओक्रसी
In reply to खरा मुद्दा वेगळाच आहे मित्रहो by संदीप डांगे
अक्षरशः इडिओक्रसी या चित्रपटाचीच आठवण झाली.
एकंदर समाजाची अभिरुची काय थराला गेलीय हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसलं.
विनोद करायला आणि समजायलाही एका किमान बुद्धीची आवश्यकता असते. तिलाच विनोदबुद्धी म्हणत असावेत.
या कार्यक्रमात (म्हणजे ज्या दोन क्लिप्स मी पाहिल्या त्यात तरी) या विनोदबुद्धीचीच कमतरता होती.
बिभत्स हा शब्दही कमी पडावा असा निर्बुद्ध बिभत्सपणा जर आता स्टेज शो या प्रकारात चालु लागला असेल तर वर कुणीतरी म्हटलंय तसं 'आमची या जगाशीही नाळ सुटु लागलीय'.
दांभिकपणाचे मजेशीर नमुने
करण जोहर व इतर उठवळ बॉलीवूडी मंडळींच्या तितक्याच उठवळ परंतु खाजगी कार्यक्रमामुळे दांभिकपणाचे आणखी काही नमुने समोर आले ही एक इष्टापत्तीच मानायला हवी.
१. वर्तमानपत्रात पादरे पावटे, गांडू, लांडे इ. या व अशा अनेक शब्दांचा नियमित रतीब घालणाऱ्या सेनेला हा सर्व प्रकार अश्लील वाटला.
२. जाहीर सभेत 'उपटायची' भाषा करणाऱ्या नेत्याच्या नवनिर्माणवादी पक्षाने या कार्यक्रमाविरोधात आंदोलनाची भाषा केली.
३. धरणात मुतायची भाषा करणाऱ्या नेत्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या भावना या कार्यक्रमामुळे दुखावल्या.
बाकी या कार्यक्रमामुळे जगबुडी आल्याच्या अविर्भात चालू असलेली चर्चा पाहून गंमत वाटली. महाराष्ट्राची लोककला म्हणून उठताबसता नाव घेतल्या जाणाऱ्या तमाशाची निव्वळ पहिली दहा मिनिटे जरी पाहिली तर सदर कार्यक्रम अगदीच घरगुती वाटेल याची खात्री आहे.
खरे आहे पण अशा कार्यक्रमाकडे
खरे आहे पण अशा कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम उपाय !
एक म्हण आठवली, ह*णारा गेला ह*न, बघणारा गेला बघून , आपण का चिवडत बसावे?
आज AIB Knockout चा व्हिडीओ
आज AIB Knockout चा व्हिडीओ बघितला. मी कॉमेडी सेंट्रल चॅनेलचे रोस्ट नियमित बघत असल्याने ह्या कार्यक्रमाची उत्सुकता होती. निराशा झाली आणि नाहीही.
AIB ने जे पॅनल जमवले होते त्यांनी केलेली कॉमेडी 'Insult comedy' ह्या प्रकारातली होती आणि त्यांनां तो प्रकार व्यवस्थित कळला आहे जाणवण्याइतपत ठीकठाक होती. काही-काही पंचेस ब्रिलीयंट होते.
मग माशी कुठे शिंकली? तर ज्यांचे 'रोस्ट' होणार होते त्यांना त्या विनोदाची जातकुळी, जॉनर, समजलाच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. अतिशय थिल्लर प्रकारे त्यांनी विनोद निर्मीती करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांच्याकडून परिपक्व वागणूकीची अपेक्षा करणे हेच जरा अती आहे. अर्जुन कपुर, जो की १२ वी नापास आहे आणि बापाकडे गडगंज पैसा आहे, त्याच्याकडून त्याने जे काही केले त्याच्या वेगळे वागणे शक्यच नव्हते.
पण म्हणून एकंदरीत कार्यक्रमाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे हे थोडे आततायी व्हावे.
त्या कार्यक्रमाचा एक फॉरमॅट आहे, जो दर्जेदार विनोद निर्मीत करू शकतो, अर्थात Insult comedy ह्या जातकुळीतली.
- ('रोस्टेड') सोकाजी
पटले ….
In reply to आज AIB Knockout चा व्हिडीओ by सोत्रि
+१
पण म्हणून एकंदरीत
In reply to आज AIB Knockout चा व्हिडीओ by सोत्रि
पण म्हणून एकंदरीत कार्यक्रमाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे हे थोडे आततायी व्हावे.
इंसल्ट कॉमेडी आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. ती तिकडे पल्याडला स्टँड अप कॉमेडियनची आवडती पद्धतलापण मूळात आक्षेप इंसल्ट कॉमेडीला नाहिच. माझा आक्षेप आहे मुख्यत्वेकरुन त्यातील आईवरुन केलेल्या विनोदाला. अतिशय हिडीस, किळस्सवाणा, बिभत्स, बाजारु, असंस्कृत विनोद होता. आणी वर निर्लज्जपणे तोंड वर करुन लोकांना अक्कल शिकवण्याच्या त्यांच्या कर्तुत्वाला तर सलाम.
त्यांना म्हणाव घरी जा आणि स्वतःच्या आयांना तो विनोद ऐकवा, स्वतःचे नाव घालुन. अर्रे किमान आयांना मुलांना जन्म घातल्याचा पश्चात्ताप होउ नये आणि लाज वाटु नये इतपत लायकीचे तरी विनोद करा ना. झाल्या प्रकाराबद्दल ना खंत ना खेद वर यावर टीका करणार्यांना तुम्ही मागास म्हणून हिणवणार आणी अजुन १० वर्षानंतर बघाच तुम्ही असले विनोद जाहीर कार्यक्रमातुन होणार असेही म्हणणार?
विनोद काळानुसार कदाचित लाऊड होतही जाइल पण विनोदनिर्मितीसाठी एखाद्याला जर एखाद्याच्या आईचा अश्याप्रकारे उल्लेख करावा लागत असेल आणी ज्याच्यावर असा विनोद होत असेल त्याला हसायला आणि टाळ्या वाजवायला लागत असेल आणि आयोजकांना त्याचे समर्थन करावेसे वाटत असेल तर त्या रेम्याडोक्यांना विनोद म्हणजे काय हेच कळाले नाही असे सखेद म्हणायला लागते आहे.
Finally someone said it. Good!
In reply to आज AIB Knockout चा व्हिडीओ by सोत्रि
ह्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद. विनोद, त्याची जातकुळी आणि त्याबद्दल केलेलं विश्लेषण अचूक आहे.
कार्यक्रमाचा दर्जा वाईट होता- पण तो इथे चर्चिल्या गेलेल्या कारणांसाठी नव्हे.
विवाह प्रसंगीचे गारी गीत
आंतरजालावर या विषयावरील चर्चेच्या निमीत्ताने भारतीय सांस्कृतीक संदर्भ दिले जाताहे त्यात विवाह प्रसंगी गायले जाणार्या गारी (गाली) गीतांचा उल्लेखही केला जातो आहे त्यात भोजपुरी आणि छतीसगढी विवाहांचे उल्लेख नमुद केले जात आहेत असे दिसते.
संदर्भ
* छत्तीसगढ़ के विवाह संस्कार - डॉ सत्यभामा आडिल
* भोजपुरी संस्कृति - कुछ रोचक प्रसंग - विवाह में गाली दीहीं, इनाम लीहीं - डॉ. डॉ. पुष्पा तिवारी
तुनळीवर बघितला प्रोग्राम
बरा वाटला. पौगंडावस्था ते बॅचलर लाईफ संपण्यापुर्वीच्या वयात ( थोडंफार अधिक उणे ) जि काहि टवाळाखोरी मित्रांमधे चालते त्यापेक्षा फार काहि वेगळं नव्हतं... आम्हि एव्हढं हाय फाय (म्हणजे नक्की काय?) इंग्लीश बोलु शकत नव्हतो (अजुनही नाहि ;) ) हा भाग वेगळा :)
असो. सोवळेपणाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. मला सेक्रेड वाटणार्या गोष्टींवर केलेले विनोद मला पण सहन होत नाहित.
अत्यंत गलिछ
पातळीवरचे विनोद होते. विनोदाचे कोणाला वावडे नसावे. पण नवरसांपैकि हा बीभत्स रस म्हणावा लागेल. तो ही आवडणारे जगात असतील. बरेचसे लोक्स आपण अश्या आई वरील घाणेरड्या जोक्स वर हसतो म्हणजे आपण 'कुल' आहोत असे दाखवण्यासाठी पण हसत असतील.
स्त्रियांना नैसर्गिक रीत्याच ही गटारगंगा आवडत नसेल , पण ब -याच स्त्रिया स्वःताला मॉडर्न दाखवणे आणि पीअर प्रेशर मध्ये येवुन आपणही एंजॉय करतोय असे दाखवत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बाकी समाजावर वाईट प्रभाव पडण्याच्या पलीकडे समाज गेला आहे. टीनएजर्स ची भाषा एकली तर हा फार सोज्वळ प्रकार वाटेल.
पण एकंदरीत फार बीभत्स.
एकच वाटते, nature is always
एकच वाटते, nature is always naked man makes it NUDE !!
कार्यक्रमाला लोक स्वेच्छेने
कार्यक्रमाला लोक स्वेच्छेने गेले होते.. यु ट्युबवर देखिल बघणे ऐच्छिक आहे सर्व ठिक. पण यांचे नावच ( ऑल इंडीया बक**) चारचौघात घेताना गलिच्छ वाटते. तेवढे तरी निदान सभ्य असायला हवे होते कारण ते सर्वांना ऐकावं बघावं लागतं. आत काय तो धुमाकुळ घाला ज्यांना आवडतय त्यांच्याबरोबर.
बेगाने शादीमे ...
'अ' 'ब'ला शिव्या घालतो.
'ब' दात विचकून हसतो.
हे सगळे बघून 'क' टाळ्या पिटतो.
आणि 'अ', 'ब' किंवा 'क' नसलेली मंडळी त्यावर गहन चर्चा करतात!! ;)
बाकि हे सगळे मिपा वर्च्या
In reply to बेगाने शादीमे ... by सुनील
बाकि हे सगळे मिपा वर्च्या सग्ळ्याच काथ्याकुटाना लागु पडत नाहि का? *smile*
सगळे प्रतिसाद वाचले. तो शो
सगळे प्रतिसाद वाचले. तो शो व्हॉट्सॅपवरची एक ३ मिनिटांची क्लिप वगळता बघितला नाही. तशी इच्छाही नाही. तेवढ्या तीन मिनिटातही केवळ पहिली काही सेकंद हसू आलं नंतर एकंदर तो काय प्रकार आहे कळल्यावर मुळीच हसू आलं नाही. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे it wasnt my cup of tea I suppose. असो. फार सविस्तर लिहावंसं वाटत नाही. हा प्रकार निषिद्ध असावा / नसावा हा वेगळा मुद्दा. परंतु, पैसे मिळतात म्हणून स्वतःवर हिडीस, अश्लील विनोद करून घेणारी स्वाभिमानशून्य व्यक्ती माझ्या लेखी मृतवत आहे. आईवर वगैरे विनोद करून घेणारी व्यक्ती तर म्हणजे....
ए आय बी ने त्या
ए आय बी ने त्या कार्यक्रमातल्या ख्रिस्ती धर्माच्या केलेल्या चेष्टेबद्दल कुठल्यातरी चर्चच्या आर्चबिशपची माफी मागितली असं चेपू वर वाचलं...