✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिंदी चित्रपट प्रश्न

आ
आशु जोग यांनी
Tue, 02/03/2015 - 00:45  ·  लेख
लेख


हिंदी चित्रपट प्रश्न !


१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा
२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा
३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा
४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा
५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा
६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे
७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा
८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता
९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती
१०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा

११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा
१२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा
१३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्‍या निर्मात्याचे आडनाव सांगा
१४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते
१५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा.
१६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
१७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
१८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा
१९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण
२०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा
२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा
२२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा
२३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा)
२४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा
२५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा

२६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा
२७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा
२८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा
२९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा

आपल्याशी चर्चा केल्याने आमचेही ज्ञान वाढीस लागेल... अशी अपेक्षा आहे करा मग सुरुवात !

ashujog@gamil.com

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
15867 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

...

आशु जोग
Tue, 02/03/2015 - 00:52 नवीन
उत्तरे इथे दिली तरी चालतील
  • Log in or register to post comments

येस्स्स्स्स्स्स्स्स...

मुक्त विहारि
Tue, 02/03/2015 - 00:55 नवीन
तेच केले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

काही उत्तरे....

मुक्त विहारि
Tue, 02/03/2015 - 00:55 नवीन
६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे ====> अफसाना लिख रही हुं... १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा ====> मधुमती (युसुफखान उर्फ दिलीप कुमार २ भुमिका, वैजयंती माला ३ भुमिका) ११. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा ====> नरीमन इराणी (डॉन १९७८...उर्फ कालिचरणचे विडंबन)
  • Log in or register to post comments

फोटो आवडला, प्रश्नांना पास

पिवळा डांबिस
Tue, 02/03/2015 - 01:09 नवीन
फोटो आवडला, प्रश्नांना पास कारण त्याचे एकच खास उत्कट ते घ्यावे,बाकीचे टाकावे शिकवून गेले समर्थ रामदास!!! :) ह. घ्या...
  • Log in or register to post comments

५. ओह माय गॉड

स्वप्नांची राणी
Tue, 02/03/2015 - 01:32 नवीन
५. ओह माय गॉड २६. कटरीना कैफ करणार आहे म्हणे रणबीर कपूरशी! बाकी माझा पण पास. आणि र्‍हितिक रोशन चा फोटो द्यावा ही विनंती म्हणजे बाकी उत्तरांसाठी थोडे इन्स्पिरेशन मिळेल.
  • Log in or register to post comments

बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/03/2015 - 01:43 नवीन
बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान =)))))
  • Log in or register to post comments

३. जोधा अकबर शिनेमातील भजन.

रेवती
Tue, 02/03/2015 - 02:14 नवीन
३. जोधा अकबर शिनेमातील भजन. ८. स्वदेस
  • Log in or register to post comments

रेवतीताई

आशु जोग
Tue, 02/03/2015 - 09:45 नवीन
रेवतीताई स्वदेस मधे बेला आहे पण हृतिक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जोधा अकबर शिनेमात ऋत्विक रोषन

रेवती
Tue, 02/03/2015 - 16:59 नवीन
जोधा अकबर शिनेमात ऋत्विक रोषन आहे व त्याच शिनेमात बेला शेंडे या गायिकेने म्हटलेले भजन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

...

आशु जोग
Tue, 02/03/2015 - 22:17 नवीन
होय तुमचे बरोबर आहे मी दोन्ही एकत्र वाचले म्हणून माझा गोन्धळ झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

१. अनुष्का शर्मा यांचे किमान

सानिकास्वप्निल
Tue, 02/03/2015 - 02:20 नवीन
१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा
पीके जब तक है जान
२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा
विकी डोनर
८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता
स्वदेस .
१४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते
पेशावर
१६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
गुंज उठी शहनाई
१७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
गुलाम
२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा
ज्योती कलश छलके - एकच आठवतय ...
२६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा
जेनिफर केंडल - शशी कपूर
२९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा
शाहरुख खान अक्षयकुमार नवाझुद्दिन सिद्दिकी सुशांत सिंग
  • Log in or register to post comments

..

आशु जोग
Wed, 02/04/2015 - 13:50 नवीन
खूपच प्रश्नांची उत्तरे दिलीत... छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा

अत्रन्गि पाउस
Tue, 02/03/2015 - 07:49 नवीन
१. खुश है जमाना आज पहेली तारीख है २. जीवन डोर तुम्ही संग बांधी ३. ज्योती कलश छलके
  • Log in or register to post comments

२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा

अत्रन्गि पाउस
Tue, 02/03/2015 - 07:50 नवीन
मद्रास कॅफे
  • Log in or register to post comments

काही उत्तरे

हुप्प्या
Tue, 02/03/2015 - 08:48 नवीन
१२. हृषिकेश मुखर्जी हे आधी कॅमेरामन होते. मग दिग्दर्शक. सिनेमे आनंद, नमक हराम, अभिमान, गोलमाल, नरम गरम, रंगबिरंगी इ. २४. ये जीवन है हे पिया का घर ह्या सिनेमातले गाणे आहे. हा सिनेमा मुंबईचा जावई ह्या मराठी सिनेमावर आधारित होता. हा सिनेमा व. पु. काळ्यांच्या कथेवर आधारित होता. २६. परदेशी धर्मीय म्हणजे काय? भारतीय धर्मीय म्हणजे काय? २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन ह्या दोघांचे वडिल संगीतकार होते.
  • Log in or register to post comments

एक दुरूस्ती

बोका-ए-आझम
Tue, 02/03/2015 - 09:44 नवीन
ह्रषिकेश मुखर्जी कॅमेरामन नाही, संकलक होते. जशी बिमलदांनी कॅमेरामन-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली, तशी ह्रषिदांनी संकलक-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

नाही. सुरवातीला ते कॅमेरामन होते.

हुप्प्या
Tue, 02/03/2015 - 11:33 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Hrishikesh_Mukherjee
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

...

आशु जोग
Tue, 02/03/2015 - 16:25 नवीन
बरोबर हुप्प्याजी व पु काळे यांची मासिकात प्रसिद्ध झालेली कथा होती 'कुचंबणा' त्यावर मुंबईचा जावई, त्यावर पिया का घर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

यथाशक्ति उत्तरे!

बोका-ए-आझम
Tue, 02/03/2015 - 09:15 नवीन
१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात,पीके २. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा विकी डोनर, मद्रास कॅफे ३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा ४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा ५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा ६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे अफसाना लिख रही हूँ - चित्रपट दर्द, संगीतकार नौशाद, गीतकार - प्रेम धवन ७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा ८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता स्वदेस ९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा मधुमती ११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा ह्रषिकेश मुखर्जी, बासु भट्टाचार्य (जावई) १२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा बिमल राॅय - बंदिनी, सुजाता, देवदास अशोक मेहता - मोक्ष संतोष सिवन - अशोका १३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्‍या निर्मात्याचे आडनाव सांगा जोगळेकर (आपकी सेवामे चे निर्माते वसंत जोगळेकर.) १४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते पेशावर १५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा. १६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा १९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण २०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा २१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा ज्योति कलश छलके - भाभी की चूडियां, बांध प्रीती फुलडोर - मालती माधव २२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा तहजीब २३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा) २४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा २५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा २६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा जेनिफर केंडाॅल - शशी कपूर २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा दोघेही डोक्यात जातात! २८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा २९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा राजेश खन्ना, शाहरुख खान
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 02/03/2015 - 16:22 नवीन
संतोष सिवन यांचे नाव वाचून बरे वाटले अलिकडे त्यांचा तहान नावाचा एक चित्रपट आला होता. लॉरेन्स डिसूझा - साजन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

एकच उत्तर माहित होते :)

क्लिंटन
Tue, 02/03/2015 - 17:03 नवीन
दिलीपकुमारचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचे सोडून इतर एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहित नव्हते. टुण्टुण नावाची कोणी अभिनेती आहे हे ही मला माहित नव्हते. (एक नंबरचा रूक्ष) क्लिंटन
  • Log in or register to post comments

टुण्टुण नावाची कोणी अभिनेती आहे हे ही मला माहित नव्हते.?????

तुषार काळभोर
Tue, 02/03/2015 - 17:28 नवीन
खरोखरच रुक्ष ब्वॉ तुमी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

...

आशु जोग
Wed, 02/04/2015 - 23:26 नवीन
उरलेले प्रश्नही पहा ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

...

आशु जोग
Fri, 02/06/2015 - 00:01 नवीन
7 9 15 18 19 23 25 28 हे प्रश्न राहीलेच की प्रयत्न करा धमकी : -अन्यथा राहिलेल्या प्रश्नांसाठी मी नवा धागा काढेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

वपु व ये जीवन है ..

चौकटराजा
Tue, 02/03/2015 - 18:35 नवीन
वपुंच्या कथेवर प्रथम मराठीत मुंबईचा जावई हा चित्रपट निघाला मग अनिल धवन , जया भादुरी यांचा पिया का घर निघाला. त्यात हे गीत आहे ये जीवन हे, इस जीवनका यही है यजी है रंगरूप......
  • Log in or register to post comments

टूनटून

अत्रन्गि पाउस
Tue, 02/03/2015 - 22:26 नवीन
अफसाना लिख रही हुं ...हे उमा देवीने म्हटलेले आहे ... तेव्हा उमादेवी tuntun म्हणून ओळखली जात नव्हती
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 02/03/2015 - 22:42 नवीन
म्हणजे तेव्हाचा तिचा मिपा आय डी वेगळा होता तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

उत्तर नंतर , आधी माझा पण १ सोप्पा प्रश्न :

पहिला राजा
Wed, 02/04/2015 - 16:01 नवीन
उत्तर नंतर , आधी माझा पण १ सोप्पा प्रश्न : तुम्हाला हे सगळे प्रश्न का पडले ????? ( केव्हा नाही, कारण वेळ ००.४५ दिसते आहे , इतक्या रात्री पर्यंत जागरण केले तरच असे विचार (कम प्रश्न) येऊ शकतात अशी आमची १ शक्यता
  • Log in or register to post comments

सारे च्या सारे बाजुला व्हा रे

जेपी
Wed, 02/04/2015 - 16:06 नवीन
सारे च्या सारे बाजुला व्हा रे ... आला रे आला राजा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहिला राजा

१८. गदिमांची पटकथा असलेले

आदूबाळ
Fri, 02/06/2015 - 02:17 नवीन
१८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा
जीवनज्योति दो आँखे बाराह हाथ
  • Log in or register to post comments

१९. एकाच वर्षी हिंदी व

आदूबाळ
Fri, 02/06/2015 - 02:20 नवीन
१९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण
वसंत देसाई, अण्णा चितळकर यापैकीच उत्तर असणार
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Fri, 02/06/2015 - 09:08 नवीन
आदूबाळ चित्रपट सुद्धा सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

डॉ कोटणीस??

तुषार काळभोर
Fri, 02/06/2015 - 16:19 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

चितळकर, देसाई आणि (काही

आदूबाळ
Fri, 02/06/2015 - 16:24 नवीन
चितळकर, देसाई आणि (काही प्रमाणात) राम वाईरकर हेच एका वेळी मराठी + हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यावरून केलेला अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अजय - अतुल??

टवाळ कार्टा
Fri, 02/06/2015 - 23:52 नवीन
अजय - अतुल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

...

आशु जोग
Sat, 02/07/2015 - 00:44 नवीन
अजय - अतुल?? असतील तर चित्रपटही सांगा चितळकर असतील तरी चित्रपट सांगा... वरचे काही प्रश्न सोडवल्यास आपोआप उत्तर मिळू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अजय - अतुल

अर्धवटराव
Sat, 02/07/2015 - 02:05 नवीन
हिंदी - अग्नीपथ मराठी.. बक्कळ आहेत कि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

...

आशु जोग
Sat, 02/07/2015 - 16:52 नवीन
कुठले वर्ष कोणते चित्रपट बा द वे पृथ्वी आणि राज हेही कोणी उत्तरलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

पॉइंट आहे.

आदूबाळ
Sat, 02/07/2015 - 01:27 नवीन
पॉइंट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पॄथ्वी आणि राज

तुषार काळभोर
Tue, 02/10/2015 - 15:46 नवीन
१८ वर्षे फक्त
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 02/10/2015 - 16:33 नवीन
ग्रेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

प्रतिप्रश्न

प्रदीप
Sun, 02/15/2015 - 14:11 नवीन
लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा म्हणजे नक्की काय हवे आहे, कृपया सोदाहरण खुलासा करावा. (बहुधा बडबडगीते म्हणजे 'सावन का महिमा' च्या ठेक्याची त्यांची गाणी तुम्हाला अभिप्रेत असावीत ?)
  • Log in or register to post comments

अजून एक

प्रदीप
Sun, 02/15/2015 - 14:15 नवीन
प्रश्नः सुरेल म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? माझ्या व्याख्येनुसार जे सुरात आहे, ते सुरेल. तसे अभिप्रेत असेल तर बरेच काही सांगता येईल. अथवा 'सुरेल' म्हणजे 'छान चाल असलेली' अशापैकी काही व्याख्या असेल तर उत्तर अर्थात अशक्य आहे, कारण 'छान चाल' हे अगदी सब्जेक्टिव्ह प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

...

आशु जोग
Mon, 02/16/2015 - 00:32 नवीन
उपरवाला वेरी गूड वेरी गूड असली गाणी म्हणजे बडबडगीत .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा