✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काळजावर मोगर्‍याचे वार झाले

व — विशाल कुलकर्णी, Sat, 01/31/2015 - 19:51
आज डोळा आसवांचे भार झाले वेदनांचे मोकळे कोठार झाले दुश्मनांची राहिली ना जरब काही ओळखीचे चोर येथे फार झाले देवभोळा साव आता मी न उरलो दैव माझे यारहो गद्दार झाले भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..? चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले? आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले काळजावर मोगर्‍याचे वार झाले वाचले जे झुंजले जगती 'विशाला' पाठ दावुन धावले ते ठार झाले ! *********************************** (वृत्त:मंजुघोषा)

प्रतिक्रिया द्या
5022 वाचन

💬 प्रतिसाद (18)

अप्रतिम रचना!

अजया
Sat, 01/31/2015 - 20:12 नवीन
अप्रतिम रचना!
  • Log in or register to post comments

जबरदस्त! अप्रतिम!

जातवेद
Sat, 01/31/2015 - 20:58 नवीन
जबरदस्त! अप्रतिम!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विशाल कुलकर्णी
Sat, 01/31/2015 - 22:09 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

क्या बात! बढिया!!

चुकलामाकला
Sun, 02/01/2015 - 10:30 नवीन
क्या बात! बढिया!!
  • Log in or register to post comments

जसं जशि एकेक ओळ वाचत गेलो,

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/01/2015 - 11:47 नवीन
जसं जशि एकेक ओळ वाचत गेलो, शब्द बंद बंद होत गेले. __/\__
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक आभार मंडळी !

विशाल कुलकर्णी
Sun, 02/01/2015 - 14:28 नवीन
मन:पूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

खुपच छान

दिपक.कुवेत
Sun, 02/01/2015 - 14:43 नवीन
पण "दैव माझे यारहो गद्दार झाले" ह्या एवजी "दुर्दैव माझे यारहि गद्दार झाले" हे जास्त शोभुन दिसेल का? सॉरी कवितेतील काहिच कळत नाहि तरीही हिम्मत करतोय....
  • Log in or register to post comments

दीपकभौ,अहो दुर्दैव 'आपले

विशाल कुलकर्णी
Sun, 02/01/2015 - 17:08 नवीन
दीपकभौ,अहो दुर्दैव 'आपले'असतेच कधी? जेव्हा दैव (नशीब)साथ देत नाही तेव्हाच त्याला दुर्दैव म्हटले जाते. पण इथे (भल्या असो वाईट असो) माझ्या नशीबाने सुद्धा माझी साथ सोडलीय, गद्दारी केलीय माझ्याशी हीच शायराची खंत आहे. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

भ्रष्ट का अंधारही होतो आताशा!

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 02/01/2015 - 14:58 नवीन
भ्रष्ट का अंधारही होतो आताशा! वाह!!! वाह!!! कुर्निसात स्वीकार करा आझम!! _/\_
  • Log in or register to post comments

कसचं कसचं बापु

विशाल कुलकर्णी
Sun, 02/01/2015 - 17:11 नवीन
कसचं कसचं बापु *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

जोरदार

चाणक्य
Sun, 02/01/2015 - 22:29 नवीन
गझल. आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर !

सस्नेह
Mon, 02/02/2015 - 03:39 नवीन
ओळखीचे चोर येथे फार झाले
हे भारी
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी

विशाल कुलकर्णी
Mon, 02/02/2015 - 10:23 नवीन
धन्यवाद मंडळी :)
  • Log in or register to post comments

कडक

नाखु
Mon, 02/02/2015 - 10:59 नवीन
दैव माझे यारहो गद्दार झाले हे खास विकुलीन ष्टाइल !!
  • Log in or register to post comments

सुन्दर ! !

निरन्जन वहालेकर
Wed, 02/04/2015 - 20:32 नवीन
व्वा ! क्या बात है ! सुन्दर ! !
  • Log in or register to post comments

छान

गणेशा
गुरुवार, 02/05/2015 - 15:50 नवीन
छान
  • Log in or register to post comments

आभार्स मंडळी

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/05/2015 - 16:00 नवीन
आभार्स मंडळी :)
  • Log in or register to post comments

आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र

पाषाणभेद
Fri, 02/06/2015 - 09:03 नवीन
आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले काळजावर मोगर्‍याचे वार झाले क्या बात है विशल्या! जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा