✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

व — विशाल कुलकर्णी, Wed, 01/28/2015 - 08:24
*********************************** किती वाकुडे बोल बोलून झाले स्वत:च्याच सत्वास गाळून झाले धरा सांगताहे कथा पावसाची किती थेंब पदरात झेलून झाले ? जरी भोवती 'माणसे' फार झाली तरी एकट्यानेच 'खेळून' झाले नको रोकडा, दागिनेही नकोसे बियाण्यासवे सत्व तोलून झाले जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ? चकोरापरी प्राण उधळून झाले कसा रे मुरारी तुझा हा अबोला? सुरांवर तुझ्या आज भाळून झाले 'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे' पुन्हा आरशालाच टाळून झाले किती राहिले श्वास देहात बाकी ? 'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ? *********************************** विशाल

प्रतिक्रिया द्या
2101 वाचन

💬 प्रतिसाद (9)

आह!

पैसा
Wed, 01/28/2015 - 15:45 नवीन
कविता आवडली. वृत्तावर आणि शब्दावर तुझी हुकूमत आहे भावड्या! सगळेच सुखात राहोत!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ताई _/\_

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/29/2015 - 11:59 नवीन
धन्यवाद ताई _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कविता आधीच आवडली आहे !!

प्रसाद गोडबोले
Wed, 01/28/2015 - 15:47 नवीन
कविता आधीच आवडली आहे !!
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?
इथे 'प्रगो' रे किती 'डाव' 'खेळून' झाले ? असा बदल आधीच सुचवला आहे ;)
  • Log in or register to post comments

इथे 'प्रगो' रे किती 'डाव'

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/29/2015 - 12:00 नवीन
इथे 'प्रगो' रे किती 'डाव' 'खेळून' झाले ? असा बदल आधीच सुचवला आहे लवकरच दखल घेतली जाईल पंत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

क्या बातहै! बहोत खूब गझल !

दादा पेंगट
गुरुवार, 01/29/2015 - 12:59 नवीन
क्या बातहै! बहोत खूब गझल !
  • Log in or register to post comments

मला काहीच कळत नाही देवा कविता

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/29/2015 - 13:10 नवीन
मला काहीच कळत नाही देवा कविता, वृत्त छन्द , गझल वगैरे मधील ! पण हे शब्द! पार भिडले!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/29/2015 - 13:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कविता छान

कपिलमुनी
गुरुवार, 01/29/2015 - 13:35 नवीन
विशाल , तुमची कविता छानच आहे ! अवांतर : आय डी बदलतात तसे प्रतिसाद बदलतात याची अजून एक प्रचिती ! हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले . @विशाल : तुझ्या धाग्यावर अवांतराबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments

हीच कविता मुटेंनी टाकली असती

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/29/2015 - 13:46 नवीन
हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले . गैरसमज आहे बंधू हा तुमचा. मुटेंनी त्यांचे समग्र लेखन शेती या विषयाशी संबंधीतच केलेले आहे. पण त्यांचे काही हट्टाग्रही लेख सोडले तर त्यांच्या गझलेवर किंवा कवितांच्या बाबतीत कधीच कुठले आक्षेप, टीका वा तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'वेगळ्या प्रमाणे आस्वाद' हा प्रकार घडलेला नाही वा तसे माझ्या पाहण्यातही नाही. मिपाचे वाचक सुज्ञ आहेत. जिथे करायचा तिथेच गोंधळ करतात. :) असो, बाकी आभार्स प्रतिसादाबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा