***********************************
किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले
धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?
जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले
नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले
जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले
कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले
'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले
किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?
***********************************
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2114
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आह!
धन्यवाद ताई _/\_
In reply to आह! by पैसा
कविता आधीच आवडली आहे !!
इथे 'प्रगो' रे किती 'डाव'
In reply to कविता आधीच आवडली आहे !! by प्रसाद गोडबोले
इथे 'प्रगो' रे किती 'डाव' 'खेळून' झाले ? असा बदल आधीच सुचवला आहेलवकरच दखल घेतली जाईल पंत ;)क्या बातहै! बहोत खूब गझल !
मला काहीच कळत नाही देवा कविता
(No subject)
In reply to मला काहीच कळत नाही देवा कविता by कैलासवासी सोन्याबापु
कविता छान
हीच कविता मुटेंनी टाकली असती
In reply to कविता छान by कपिलमुनी
हीच कविता मुटेंनी टाकली असती तर वेगळ्या प्रकारे 'आस्वाद' घेतला गेला असता हे प्रकर्षाने जाणवले .गैरसमज आहे बंधू हा तुमचा. मुटेंनी त्यांचे समग्र लेखन शेती या विषयाशी संबंधीतच केलेले आहे. पण त्यांचे काही हट्टाग्रही लेख सोडले तर त्यांच्या गझलेवर किंवा कवितांच्या बाबतीत कधीच कुठले आक्षेप, टीका वा तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'वेगळ्या प्रमाणे आस्वाद' हा प्रकार घडलेला नाही वा तसे माझ्या पाहण्यातही नाही. मिपाचे वाचक सुज्ञ आहेत. जिथे करायचा तिथेच गोंधळ करतात. :) असो, बाकी आभार्स प्रतिसादाबद्दल.