शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?
मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो.
बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे:
१. आजच्या भ्रमणध्वनी, उपग्रह वाहिन्या, आंतरजाल या सुविधांनी युक्त अशा जीवनाने भौगोलिक सीमा हा प्रकार (निदान देशांतर्गत तरी) रद्दबातल ठरवलेला आहे. बेळगाव (सामील निपाणी, कारवार, हुबळी, विजापूर इ.) जरी कर्नाटकात असले तरी तेथील मराठीभाषिक जनतेला आपली संस्कृती जपणे अशक्य आहे असे मुळीच नाही. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहणारे अमराठी लोक आपली ओळख सांभाळून असतात (नोंदः यात त्यांच्यावर टीका करण्याचा जराही हेतू नाही), तर कर्नाटकातील मराठी लोकांनाही हे करता येईल. आणि ते करत असणारच.
२. बेळगाव हे काही मराठी वस्ती असलेले महाराष्ट्राबाहेरील एकमेव शहर नव्हे. इंदूर, बडोदा, सुरत, गोवा, रायपूर, जबलपूर भोपाळ, हैदराबाद, बंगलोर अशा अनेक ठिकाणी मराठी जनता बहुसंख्येने राहते. ग्वाल्हेर, झांसी, जयपूर, कोटा, वाराणसी अशा अनेक उत्तर भारतीय शहरांतही मराठीजन स्थायिक होऊन राहिलेले आढळतात. केवळ या एका कारणावरून ही शहरे महाराष्ट्राला जोडावी ही मागणी करणे हास्यास्पद आहे.
३. "कर्नाटक सरकारने केले मराठी जनतेवर अमानुष अत्याचार", "कर्नाटकातील मराठी जनतेचा वाली कोण?" किंवा "कर्नाटक पोलिसांकडून मराठी जनतेची मुस्कटदाबी" असे मथळे काही (कोणत्या ते सांगणे नलगे!) वर्तमानपत्रांतून दिसत असतात. ते शुद्ध अतिरंजन असते हे खालील मजकूर वाचताच उमगते.
४. बेळगाव महाराष्ट्रात आलेच पाहिजे अशी साम्राज्यवादी मागणी करण्यापेक्षा कर्नाटकाला आपल्या मर्हाटी रंगात रंगवून टाकणे हाच मराठी संस्कृतीचा खरा विजय ठरेल अशी माझी समजूत आहे. यामागेही कानडी जनतेचा दुस्वास मुळीच नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो.
५. बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्रवादी पक्षांचा वरचश्मा असतो. तिथे मराठी फलक लावणे, मराठीतून कारभार चालवणे अशा मुद्द्यांवरून वाद होत असतात. हे कर्नाटक राज्याचे अंतर्गत मुद्दे आहेत आणि ते चर्चेने सोडवणे मुळीच कठीण नाही असे मला वाटते.
----
वरील विवेचनात काही चुका असू शकतात. नव्हे, असणारच. कारण मी अनिवासी मराठी आहे.
या मुद्द्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मी मुद्दामच बाजूला ठेवलेली आहे. पूर्वी, भूतकाळात, मराठी जनांवर तिथे अन्याय झाला असेलही. पण त्या जखमा किती दिवस गोंजारत बसणार, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
"इथले लोक बाहेर पळायची संधी शोधतायत आणि तुम्हाला कशाला महाराष्ट्रात यायचंय? लाईट नाही, पाणी नाही, नोकर्या नाहीत, नेते सगळे चोर......." इ. निराशावादी आणि आततायी विचार मी अर्थातच मांडू इच्छित नाही, कारण मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही.
तरी जाणकारांनी सदर वादावर अन्य अंगांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
धन्यवाद.
वाचने
46356
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
+१
वाचतोय..
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...
In reply to जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे... by मंदार कात्रे
जरा दमानं घ्या भाऊ!
असहमत
In reply to असहमत by राही
सहमत
In reply to सहमत by उडन खटोला
बेळगावच्यासमोरच
बेळगावच्यासमोरच महाराष्ट्राच्या सीमेत एक शहर-प्रति बेळगाव-वसवावे. त्याला हवे तर नवे बेळगाव म्हणावे. कालांतराने हे शहर बेळगावचे उपनगर किंवा बेळगाव हे या नव्या शहराचे उपनगर होउ शकले असते.समजले नाही. महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला प्रति-बेळगाव नाव दिल्याने मुळ बेळगावच्या रहिवाश्यांच्या समस्या (स्थलांतरा शिवाय) कशा काय सुटतील? अन्यथा, बॉर्डरजवळ दुसरं बेळगाव वसवलं काय, किंवा कोल्हापुरजवळ वसवलं काय, एन फायदा इल्ले.In reply to बेळगावच्यासमोरच by यसवायजी
काही वर्षांनी..
In reply to असहमत by राही
समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे
In reply to असहमत by राही
सहमत.
कर्नाटक सरकार कडून असली
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
आणि हो, लाँग रेंज पॅट्रोल
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
धन्य झालो!
In reply to धन्य झालो! by चलत मुसाफिर
ज्याचं जळतं त्यालाच कळतं
In reply to ज्याचं जळतं त्यालाच कळतं by काळा पहाड
अहो म्हणूनच.
In reply to धन्य झालो! by चलत मुसाफिर
खिक्क...खास मिपाने मराठी
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
नोकरी बदलण्याचा मोह होत आहे
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
गैरसमज
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
(No subject)
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक
In reply to किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक by कॅप्टन जॅक स्पॅरो
लुंगी
In reply to लुंगी by सुनील
(No subject)
In reply to किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक by कॅप्टन जॅक स्पॅरो
मराठा लाईट इन्फन्ट्रीचं
In reply to कर्नाटक सरकार कडून असली by काळा पहाड
काहीही
माफ करा
In reply to माफ करा by सस्नेह
असे नाही.
टंकाळा आला
In reply to टंकाळा आला by पैसा
धन्यवाद
अशीच परिस्थिती
In reply to अशीच परिस्थिती by चलत मुसाफिर
मराठी वस्तीचेच भाग.
In reply to मराठी वस्तीचेच भाग. by राही
पुरेसा स्पष्ट
बेळगाव हे कर्नाटकचे आहे, हेच
बेळ्गाव
आमच्या निपाणीतली या
In reply to आमच्या निपाणीतली या by यसवायजी
यावरून काय सिद्ध होते?
In reply to यावरून काय सिद्ध होते? by चलत मुसाफिर
@ यावरून काय सिद्ध होते? >>>>
बाळकडू
In reply to बाळकडू by रमेश आठवले
मेट्रो..
वाचतोय.
In reply to वाचतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण इथली लोक गुण्या गोविंदाने
चलत मुसाफ़िर, आपल्या मतांच्या
In reply to चलत मुसाफ़िर, आपल्या मतांच्या by पाषाणभेद
पुन्हा तेच!
In reply to पुन्हा तेच! by चलत मुसाफिर
कसला त्रास आहे???
बेळगाव प्रश्न जागृत ठेवणार्
काही
In reply to काही by चिरोटा
छान.
In reply to काही by चिरोटा
बुद्धीभ्रम ?
In reply to बुद्धीभ्रम ? by अभिरत भिरभि-या
मोठ्ठा + १
In reply to बुद्धीभ्रम ? by अभिरत भिरभि-या
+१
In reply to काही by चिरोटा
धन्यवाद
.
In reply to . by hitesh
कीत्ती कीत्ती जुने विनोद
wiki says..
In reply to wiki says.. by यसवायजी
पाटसकर निवाडा
Sholapur ?
In reply to Sholapur ? by मराठी_माणूस
सोला
In reply to सोला by चिरोटा
येते हो त्यांना.
बेळगावातच वाढलो असल्यामुळे
In reply to बेळगावातच वाढलो असल्यामुळे by अद्द्या
महाराष्ट्र एकीकरण समिती
In reply to महाराष्ट्र एकीकरण समिती by क्लिंटन
......महाराष्ट्रात सामील होऊ
In reply to महाराष्ट्र एकीकरण समिती by क्लिंटन
ते म्हणाले ते पूर्ण खोटं आहे
कारण
चलत मुसाफ़िर
चलत मुसाफ़िर
आत्ता काय चालू आहे? सद्यःस्थिती काय? वर्तमान काय? हे जाणून घेणं आपला उद्देश आहे ना? मग काय आकलन झालं आपल्याला आत्तापर्यंत??? सांगा बरं. आता बरच चित्र स्पष्ट झालं आहे- आत्ताचं/सद्यःस्थितीचं/वर्तमानाचं !!! मग आता आपलं मत,एका निश्चित-बाजुला, आलेलं असायला पाहिजे? मग कुठे आहात आपण(आत्ता)?सांगा?
सांगा?
सांगा?
In reply to चलत मुसाफ़िर by अत्रुप्त आत्मा
अआ, तुम्ही एको पॉईंटवरून
का ?
का ?
का ?
;) +DIn reply to अआ, तुम्ही एको पॉईंटवरून by डॉ सुहास म्हात्रे
हा.... हा.... हा....
हा....
हा....
हा....
=))In reply to हा.... हा.... हा.... by अत्रुप्त आत्मा
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
In reply to तीनच एको का बरे? by काळा पहाड
बुवा माथेरानच्या एको
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
(मी तुमच्या जवळच उभा आहे +D )In reply to बुवा माथेरानच्या एको by डॉ सुहास म्हात्रे
धागा कुठला?? चाल्लंय काय??
धागा कुठला?? चाल्लंय काय??
धागा कुठला?? चाल्लंय काय??
झालाच पाहिजे....?????
भाषावार प्रांतरचनेच्या वेळी
आशाळभूत! :-)
महाराष्ट्र एसटीचे पगार
धागा वर काढण्यासाठी