लढत ! दोन पिढ्यांची.

स्पंदना's picture
स्पंदना in विशेष
28 Feb 2011 - 8:21 pm
मराठी दिन

From Recently Updated" width="400" height="400" alt="" />

मंडळी नमना शिवाय मला या लेखाची सुरवातच नाही करता येणार. अर्थात मी फ़कत नमनच करणार आहे. म्हणजे त्या दिवटीवर तेल घालायच काम माझ्या कडे आहे फ़क्त . तेव्हढ झाल की तुम्ही आणी तुमच्या साठी स्पेशली मागुन आणलेली ही माहिती !
काय असत मंडळी , आपण आपल्या घरात रहातो, आपल्या भाषेला महत्व असणाऱ्या राज्यात रहातो. म्हणजे सगळ कस सुरळीत, होय ना? पण अस पण एखाद ठिकाण असत की ज्यांना स्वत:च्या मायेच्या कुशीत न रहाता, सावत्र पणा सोसत वर्षोन वर्ष झुंजत रहाव लागत. सर्वसाधारण माणुस शेवटी शेवटी नमत घेइल, कुणी एखादा प्राणपणाने झुंजेल अन आपण सारे मजा बघत राहु. म्हणतात ना ’ शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा’ तस काहिस. पण एक पुर गाव त्यांच्या हक्कासाठी पेटुन उठण. जवळ जवळ दोन पिढ्यांहुन जास्त एखादा संघर्ष जारी ठेवण, म्हणजे जरा अचंबित करणारी गोष्टच म्हंटली पाहिजे नाही का?

अर्थात मला स्वत:ला याबद्दल अगदी काहीही माहिती नव्हती. पण मराठी दिनाची पताका खांद्यावर घेउन निघालेल्या एका वारकऱ्यान मला ही माहिती , मी त्या भागाची, म्हणुन अगदी अगत्यान विचारली. त्या आधी यळ्ळुर गाव हे बेळगाव पासुन अगदी जवळ आहे अन तिथे आमचे नातेवाइक आहेत एव्हढ एकच मला माहित होत. पण धमाल रावांच्या म्हणण्यानुसार हे एक लढवय्यांच गाव आहे. इथला प्रत्येक जण अगदी जीव पणाला लावुन माय मराठीची कुस राखण्या साठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. काहीही होवो पण सावत्र आईच्या हातच पाणी ही नको अश्या ठाम भुमिकेन ही सारी गावकरी मंडळी आज ही लढत आहेत.
आता मात्र माझही कुतुहल जाग झाल अन मी कुठ काही जास्त माहिती मिळते का का हे पहायचा प्रयत्न सुरु केला. आणी काय आश्चर्य? मराठी दिना निमित्य कुणी आपली माहिती मागतय हे नुसत कळायचा अवकाश , त्या माय मराठीच्या पुतांनी अगदी अगत्यान जमेल तेव्हढ , अर्थात माझ्या साठी भरपुर, उपलब्ध करुन दिल.
ही माहिती काढण्यास उद्युक्त केल्याबद्दल मी श्री. रा. रा. धमाल मुलगा यांचे जाहिर आभार मानते. माझ्या नुसत्या एका वाक्यावर मला ही माहिती उपलब्ध करुन देण्यास सहाय्य केल्या बद्दल, बेळगावात मराठा समाजामध्ये मराठीची धुरा कायम जागती ठेवणाऱ्या माझ्या सासुबाई सौ प्रतिभा कांगले , यांचीही मी आभारी आहे. अन सरते शेवटी मला ही माहिती स्वत:च्या शब्दात लिहुन देणाऱ्या , श्री उदय जाधव अन श्री. प्रभाकर पाटील यांचे ही मी आभार मानते.

पुढील माहिती वाचा त्यांच्याच शब्दात.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील लढवय्या गाव म्हणुन ज्याची ओळख दिली जाते, तो येळ्ळुर गाव १९५६ पासुनच्या सर्व प्रकारच्या सीमा चळवळीतील लढ्यात सातत्याने अग्रणी राहिलेला आहे. सारा बंदीच्या १९६० च्या लढ्यात या गावाने आपले शौर्य दाखवले. त्या वेळच्या ’लुइस’ या पोलिस अधिकाऱ्याच्या जुलुमाला न जुमानता, साराबंदीला याच गावाने पेलला अन यशस्वी केला. आजही त्या लढ्यातील सत्याग्रहींच्या पायात दंडात बंदुकीच्या गोळ्या लागल्याचे व्रण ताजे आहेत! बेळगावच्या दक्षिणेस अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ’यळ्ळुर ’ गावाने ’' महाराष्ट्र राज्य यळ्ळुर’' असा फलक गावाच्या प्रवेश द्वारात लावलेला आहे. कर्नाटकात, सीमा भागात डांबल्याच्या निषेधार्थ , अन आपली महाराष्ट्रात जाण्याची इच्छा आजही किती तीव्र आहे , हेच या फलकाने अधोरेखित केले आहे. हा फलक काढण्या साठी कर्नाटक सरकारने कधी कायद्याचा तर कधी बळाचा वापर केला. पोलिसांना पाचारण करुन फलक काढण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. पण यळ्ळुर गावच्या जनता एकिच्या बळावर त्या फलकाचे रक्षण करण्यासाठी सतत उभी राहिली. गावच्या एकिचे दर्शन असे वेळोवेळी घडल्याने, सरकारने अथवा अधिकारी वर्गाने तो फलक हटवीण्याचा प्रस्ताव रद्द केला.
From Recently Updated" width="400" height="400" alt="" />

देश स्वतंत्र होण्यापुर्वी ’यळ्ळुर गाव ’ कुरुंदवाड संस्थानच्या अधिपत्त्यात होते. त्या वेळी यळ्ळुर गाव तालुक्याचे ठिकाण होते. मुंबई इलाक्यातील , सीमा भागातील अनेक गावे महाराष्ट्राची, मराठी संस्क्रुतीची असुन देखील, केवळ राजकिय स्वार्थासाठी सीमा भागातील १००% मराठी जनतेवर अन्याय झालेला आहे. अशी 2६५ खेडी महाराष्ट्रात जाण्यासाठी आसुसलेली आहेत. सीमा भागातील चार पिढ्या आजवर स्वातंत्र्याच्या मुलभुत हक्का पासुन वंचित राहीलेल्या आहेत. त्यांना आपल्या भाषेत सरकारची कोणतीच माहिती परिपत्रके दिली जात नाहित. सातबारा उतारा , विज बिल अश्या दैनींदिन जीवनाशी निगडीत गोष्टी, बस वरील गावाचे नाव दर्शवणारी पाटी, वाहतुकिचे फलक आदि सर्व कानडी-करणाने मराठी जनतेचे जीवन उद्धवस्त झालेले आहे. १९७८ साला पासुन मराठी शाळेत कन्नड या भाषेची सक्ती करण्यात आली. आजच्या घडीला कानडीकरणाचे वरवंटे फिरवुन मराठी शाळा बंद करण्याचे सरकारने अवलंबिले आहे. अश्या परिस्थीतीतुन मार्गक्रमण करताना म. ए. समिती तर्फे लढविले जाणारे सर्व लढे, यशस्वी करण्या साठी यळ्ळुर गावाचे योगदान वाखाणण्या जोगे आहे.

सामाजिक जागृती:- एका बाजुने स्वत:ची संस्कृती जतन करण्यासाठी लढणारा गाव, स्वत:च्या बळावर जगतो आहे. गावात बऱ्या पैकी शिक्षितांची संख्या असल्याने, या गावात बोकड कोंबडा बळी देउन केल्या जाणाऱ्या जत्रा नाहित. बेळगाव तालुक्यात अन्य गावात , लक्ष्मीयात्रा , मळेकरणी , म्हाईची, भावकेश्वरी, अश्या नावाने अंधश्रद्धा वाढविणाऱ्या बऱ्याच जत्रा प्रतीवर्षी भरविल्या जातात. मात्र या गावात अश्या जत्रा नाहित. कारण बहिर्जी शिरोळकर , शामराव देसाई , भाई दाजिबा देसाई, पंडीतजी ( लक्ष्मणराव पाटील) आदिंच्या समाज प्रबोधन कार्याने श्री बाळशिवाजी वाचनालय सारख्या वाचन मंदिराने यळ्ळुर गावातील नागरिकांची विचारांची पक्की विचारधारा सत्य शोधकाची केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फ़ुले, राजर्षी शाहु महाराज, छ. शिवाजी महाराज आदिंच्या विचारांचे येथे श्रवण केले जाते. त्या मुळे आपले भले कशात आहे हे समजण्याची विचारशक्ती प्रत्येकाकडे आहे. म्हणुन सत्य शोधक चळवळीच्या सर्व प्रकारच्या कार्यात, येथील जनतीने कार्य केलेले आहे. ब्राम्हणाशिवाय पुजा अर्चा , पौराहित्य करण्याचा देशातील पहिला पायंडा या गावाने पाडला. त्या मुळे येथील सर्व प्रकारची दैवादिकादी कार्ये, मंगलकार्ये कोणत्याही जातीच्या पुरोहिता कडुन केली जातात.
आजकाल नोकऱ्या मिळणे अवघड झाल्याने , अनेक शिक्षित रोजगारी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. या गावातील तरुण सेंट्रींग बांधकामातील विविध कामात तरबेज आहेत. यळ्ळुरच्या बांधकामातील मजुराला चांगली मागणी आहे. आज यातीलच अनेक मजुर कॉंट्रॅक्टर झालेले आहेत. महाराष्ट्रात बऱ्या पैकी नाव कमवुन आहेत. देशाच्या रक्षण सेवेतही घरपती एक जवान असल्या सारखी परिस्थीती आहे.

सहकार चळवळ :- १९९२ पासुन यळ्ळुर गावात सहकाराचे बऱ्यापैकी जाळे विणले गेले आहे. त्या मध्ये नवहिंद क्रिडा केंद्र संचालित नवहिंद को ऑप सोसायटी लि. यळ्ळुर . नवहिंद मल्टीपर्पज को ऑप सोसायटी प्रियदर्शीनी नवहिंद महिला पतसंस्था, सैनिक को ऑप सोसायटी अश्या अनेक सहकारी संस्थांमधुन गावाची गरज अन अडीअडचणीच्या काळात मदत भागविली जाते. अश्या एकुण ११ सहकारी संस्था कार्यरत आहेत. नवहिंद बरोबरच्या संस्थातुन वार्षीक ३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. सरकारी बॅंकांपेक्षा उच्च दर्जाचे काम या सहकारी बॅंकातुन होताना दिसते.

शेती:- यळ्ळुर गावाला लोकसंख्येच्या मानाने केवळ २७०० एकर जमिन आहे. तुलनेत अत्यल्प शेती असल्याने, व जल सुविधा नसल्याने निसर्गावर अवलंबुन रहाणारी शेती केली जाते. मात्र बासमती भाताचे पिक हे प्रमुख पिक आहे.’ यळ्ळुर बासमती ’ नावाने येथील बासमती तांदुळ नावारुपास आहे. अन त्याला मागणीही भरपुर आहे. शेती ही बहुतेक पारंपारिक पद्धतीनेच केली जात असल्याने अन शेती हा तोट्यात जाणारा व्यवसाय असल्याने शेतकरी फारसे शेती कडे लक्ष देत नाहीत. कडधान्य ही येथे बऱ्यापैकी पिकतात पण ती ही अत्यल्प प्रमाणात घेतली जातात.

गावाची ठळक वैशिष्ट्ये: एकुण ११००० लोकसंख्येच्या या गावात सर्व रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. जलनिर्माण योजने मुळे घरोघरी पाण्याची सुविधा आहे. प्रत्येक घराचे वेगळे शौचालय असल्याने उघड्यावर जाण्याची गरज भासत नाही, अन गाव मुळता:च स्वच्छता प्रिय असा आहे. बेळगाव बस स्थानका पासुन उत्तम बस सेवा असल्याने वाह्तुकी साठी ही गैरसोय जाणवत नाही.

From Recently Updated" width="400" height="400" alt="" />
आमच ग्राम दैवत आहे श्री चांगलेश्वरी देवी. या देवीच जागृत मंदीर गावाच्या मधोमध आहे. गावाच्या दक्षिणेस राजहंस गड आहे. आणी आमचा गाव बासमती , दुध, लोणी अन सोले (पावटे) या साठी प्रसिद्ध आहे. बेळगाव तालुक्यातील सीमालढ्यात या चळवळीचा केंद्रबिंदु म्हणुन यळ्ळूर गावाच नाव घेतल जात. यळ्ळूर गावाचा ग्रामपंचायत कारभार आजही मराठीतुनच चालतो पण सरकारी परिपत्रके कन्नड मधुनच येतात. मराठी भाषेच प्रामुख्य दैनंदिन जीवनात रहाव म्हणुन तन मन धनाने एक होऊन , एक विचाराने कार्य करणारा यळ्ळूर गाव म्हणुनच राज्य सरकारला हार न जाता समृद्धीच्या वातेने वाटचाल करतोय ते या एका मराठीच्या नाळेमुळेच. प्रवेशद्वारातल्या ’ महाराष्ट्र राज्य यळ्ळुर ’ या ढळढळीत फलकाने अन वेळोवेळी केलेल्या या फलकाच्या संरक्षणाने देश भरातील अनेक टी. व्ही. वाहिन्यांचे कॅमेरे या गावात येउन जातात अन परत परत यळ्ळुरच्या मराठी प्रेमाला उजाळा देउन जातात.

आपला आभारी

उदय जाधव
अध्यक्ष्य
नवहिंद क्रिडाकेंद्र
यळ्ळूर.

तर मंडळी वाचलत? कसा धैर्यवान अन स्वावलंबी आहे हा यळ्ळुर गाव? यातली बरीच माहीती, म्हणजे शेती विषयक अन गावाच्या पतपेढ्यांबद्दल वगैरे प्रथम दर्शनी अनावश्यक वाटेल, पण थोडा विचार केला तर जाणवेल या ‘सावत्रपणात’ टिकुन रहाण्या साठी या सर्व गोष्टींच योग्य नियोजन केल्यानच आज ही मंडळी खंबीर पणे आपल्या मायमराठीचा पदर धरुन आम्ही ’मराठी’ आहोत अस सांगु शकतात . नाही का?

अपर्णा.

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Feb 2011 - 8:28 pm | पैसा

जय हो! आपल्याला कोणी मदत करील म्हणून हे लोक वाट बघत बसले नाहीत, की रडत बसले नाहीत. गाव स्वावलंबी केल्यामुळे ते कर्नाटक सरकारकडे पूर्ण दुर्लक्ष करतायत हे महत्त्वाचं.

अपर्णा, इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

रमताराम's picture

28 Feb 2011 - 9:15 pm | रमताराम

आपल्याला कोणी मदत करील म्हणून हे लोक वाट बघत बसले नाहीत, की रडत बसले नाहीत.
असेच म्हणतो. सदैव त्रात्याची वाट पाहत कर्माला दोष देणारी बहुसंख्या असलेल्या समाजात असे गाव म्हणजे वाळवंटातील ओअ‍ॅसिसच. सर्व येळ्ळूर निवासींना त्यांच्या लढ्यात यश येवो ही शुभेच्छा.

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 9:40 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

सहज's picture

1 Mar 2011 - 10:04 am | सहज

अगदी हेच म्हणतो.

मैत्र's picture

14 Oct 2012 - 6:00 pm | मैत्र

एकुण ११००० लोकसंख्येच्या या गावात सर्व रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. जलनिर्माण योजने मुळे घरोघरी पाण्याची सुविधा आहे. प्रत्येक घराचे वेगळे शौचालय असल्याने उघड्यावर जाण्याची गरज भासत नाही, अन गाव मुळता:च स्वच्छता प्रिय असा आहे. बेळगाव बस स्थानका पासुन उत्तम बस सेवा असल्याने वाह्तुकी साठी ही गैरसोय जाणवत नाही.

कुठे कर्नाटक सरकारकडे दुर्लक्ष आहे? यातली कुठली गोष्ट सरकारी नाही?
उलट हा विचार मनात येतो कि गेली ५० वर्षे इतकी आक्रमक भुमिका असतानाही कर्नाटक सरकारने रस्ते, पाणी, शौचालये, बस सेवा सगळ्या उत्तम सुविधा दिल्या आहेत या गावाला ?
यात कुठे आहे स्वावलंबन?

यळ्ळूरकरांचं कौतुक आहेच पण दोन्ही बाजूंचा विचार व्हावा असं वाटतं..

बॅटमॅन's picture

15 Oct 2012 - 5:21 pm | बॅटमॅन

नौ द्याट ऐ थिंक अबौटिट, तुम्चं म्हण्णं पट्तंय्.

धमाल मुलगा's picture

28 Feb 2011 - 9:38 pm | धमाल मुलगा

सर्वप्रथम सार्‍या येळ्ळुरकरांना मानाचा मुजरा!

इतक्या प्रतिकुल परिस्थितीतही झुंज देऊन गर्दन खडी ठेवण्याची ही जिद्द नुसत्या कौतुकालाच नाही, तर आदरालाही पात्र आहे.
सीमाप्रश्नाचं बहुचर्चित गाव बेळगाव, त्यापासून केवळ आठ कि.मी.वर असलेल्या गावाच्या वेशीलाच 'महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर' असा ठसठशीत फलक चढवून स्वतःच्या अस्तित्वाची कडक जाणिव करुन देणं ही काही खायची गोष्ट नाही. अशा पवित्र्यानंतर येणार्‍या अडचणींना हिमतीनं सामोरं जाणं...स्वतःचं मराठीपण टिकवणं ह्या एकमेव जिद्दीसाठी...किती कौतुकाची गोष्ट आहे!
मला तर हे सगळं मूठभर मावळ्यांनी जीवाचा कोट करुन गनिमाशी गड भांडता ठेवण्याचीच आठवण करुन देतं.

आपण पाहतो, साध्यासुध्या गोष्टीतही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इ.इ.ठिकाणी कशी राजकीय गणितं चालतात. इथंतर एका ग्रामपंचायत असलेल्या गावानं आख्ख्या राज्याशी वाकडं घेतलं! स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या कामातल्या गोमा ह्या ज्यांना ठाऊक आहेत, त्यांना ह्या गोष्टीचं गांभिर्य पटेल.

प्रचारकी थाटाची मराठीची कणव आणि उमाळे येणार्‍या संमेलनी, राजकीय आणि अगदी जालीय मराठी भाषिकांना सांगावसं वाटतंय, लेको, ज्जा! मराठीपण म्हणजे काय ते एकदा शिकून या येळ्ळूरात जाऊन!

पुन्हा एकदा येळ्ळूरकरांना मानाचा मुजरा!!!

अपर्णा,
खूप छान काम केलंस.
तुझ्या सासूबाईंना, श्री.उदय जाधव, श्री. प्रभाकर पाटील ह्यांना माझे मनापासून आभार कळव. अशा स्वाभिमानी भावांची ओळख झाली ह्याचा आनंद वाटला.
धन्यवाद!

आणि हो, ते माझे आभार वगैरे कसले म्हणे? येळ्ळूरबद्दल सुचवलं ते आपल्या श्रावण मोडकांनी. खरे आभार त्यांचे. ज्यांच्यामुळं ह्याबाबत माहिती मिळाली.

स्पंदना's picture

28 Feb 2011 - 9:50 pm | स्पंदना

बर परत एकदा, रा. रा. श्रावण मोडक यांचे धन्यवाद.

बाकि वारकर्‍याचे पाय पकडले तरी पंढरीला जाउन आल्याच भाग्य लाभत म्हंटल धमु!
काय लेखणी उसळली तुझी हा प्रतिसाद देताना! जणु म्यानातुन तरवार! एक अन एक शब्द आवडला भाउ!

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2011 - 11:24 pm | प्रीत-मोहर

सलाम!!!!

अप्पा जोगळेकर's picture

3 Mar 2011 - 1:19 am | अप्पा जोगळेकर

प्रचारकी थाटाची मराठीची कणव आणि उमाळे येणार्‍या संमेलनी, राजकीय आणि अगदी जालीय मराठी भाषिकांना सांगावसं वाटतंय, लेको, ज्जा! मराठीपण म्हणजे काय ते एकदा शिकून या येळ्ळूरात जाऊन!
एकदम भिडलं हे वाक्य. कोणत्याही सोम्या नि गोम्या साहेबांची गरजच नाही.

इतक्या प्रतिकुल परिस्थितीतही झुंज देऊन गर्दन खडी ठेवण्याची ही जिद्द नुसत्या कौतुकालाच नाही, तर आदरालाही पात्र आहे.
+१००

येळ्ळूरचा जयजयकार.

पाषाणभेद's picture

28 Feb 2011 - 10:12 pm | पाषाणभेद

येळ्ळूरकरांना तमाम मराठी बांधवांचा मानाचा मुजरा.
येळ्ळूरकरांनो तुम्ही एकटे नाही आहात. महाराष्ट्रातले मराठी बांधव तुमच्या पाठिशी आहेत.
जय महाराष्ट्र!

मी सध्या बंगळुरात राहतोय पुढच्या वेळी कोल्हापूर ला येताना बेळगावात उतरून येळ्ळूर ची फेरी नक्की .....................

श्रावण मोडक's picture

28 Feb 2011 - 11:15 pm | श्रावण मोडक

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेची आठवण करून दिलीस.
यळ्ळूर आणि त्या व त्या परिसरातील इतर काही गावांचा साराबंदीतील त्याग असाच थोर आहे (ही साराबंदी महाराष्ट्रातच आम्हाला जायचं आहे, यासाठी झाली होती).

तुषार काळभोर's picture

16 Oct 2012 - 5:24 pm | तुषार काळभोर

बेळगाव, कारवार, निपाणी, ग्वाल्हेर, इंदूर, लंडन, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, मस्कत सहीत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!

माझीही शॅम्पेन's picture

28 Feb 2011 - 11:32 pm | माझीही शॅम्पेन

आश्वस्थमाची भळभळती जखम आजही वाहते आहे !

येळ्ळुरकरांना मानाचा मुजरा!

जय महाराष्ट्र !!

स्पंदना's picture

1 Mar 2011 - 7:10 am | स्पंदना

पैसा, ररा, प्री-मो, पाभे, जयदीप आणी शँपेन प्रतिसादाबद्दल आभार. तुमचे हे शब्द त्यांच्या पर्यंत नक्की पोहोचतील अन त्यांचे बळ वाढेल.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 7:51 am | नगरीनिरंजन

येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून ऊर भरून आले. त्यांचा लढा यशस्वी होवो हीच सदिच्छा!

अवलिया's picture

1 Mar 2011 - 8:14 am | अवलिया

असेच म्हणतो !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2011 - 9:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून ऊर भरून आले. त्यांचा लढा यशस्वी होवो हीच सदिच्छा!

लेख आवडला.

-दिलीप बिरुटे

वा... उत्तम माहिती, उत्तम लेख !!!
लेख लिहणारीचे आणि त्यास सहाय्य करणार्‍यांचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत...

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 11:48 am | इन्द्र्राज पवार

"....अशी २६५ खेडी महाराष्ट्रात जाण्यासाठी आसुसलेली आहेत. ...."

~ हे विदारक सत्य आहे सीमाभागातील 'मराठी' जनतेचे. बेळगांव जिल्हाच नव्हे तर अगदी थेट धारवाड आणि हुबळी या दोन जोड जिल्ह्यातीलही अनेक खेडी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याकडे आशेने पाहात आहेत. माझा जन्म धारवाड शहरातीलच असल्याने तेथील 'मराठा कॉलनी'...(अन् तिही अगदी एस.टी.स्टॅण्ड परिसरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आहे) किती सडेतोड वृत्तीने "महाराष्ट्र धर्म वाढवावा" हे सूत्र सांभाळत आहे याची माहिती आहे. पण दुर्दैवाने केन्द्र सरकारकडे एकीकरण समितीचा आवाज ना कधी गेला ना कधी जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

~ अशा बिकट स्थितीतही 'येळ्ळूर' वासीयांचा लढा तर आदर्शवत वाटतो (विशेषतः गावजत्रेबाबत त्यानी पाळलेली प्रथा). सरकारी निर्णयाच्याविरूद्ध जाऊन धाडसाने 'महाराष्ट्र राज्य' असा जाहीर बोर्ड लावणे या कृतीबद्दल त्या मंडळीना सलाम !

इन्द्रा

अतिशय जबरी माहिती.. मला हे माहितीच नव्हते ..

आजच लेख वाचनात आला ..
खुप छान वाटले ..

लवकर काहि तरी अशय गावांचे कल्यान झाले पाहिजे ..
पुन्हा ही मायमराठी गावे महाराष्ट्रात आली पाहिजेत ..

जय महाराष्ट्र

सलाम या मराठीच्या सैनिकांना! :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2011 - 10:44 pm | निनाद मुक्काम प...
एक अत्यंत सरस /सकस लेख आहे हा .
भटांची कविता आठवली .
हा लेख खर तर वृत्तपत्रात यायला हवा .
अविनाशकुलकर्णी's picture

3 Mar 2011 - 11:00 pm | अविनाशकुलकर्णी

येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून ऊर भरून आले. त्यांचा लढा यशस्वी होवो हीच सदिच्छा!
लेख वाचनिय

भडकमकर मास्तर's picture

4 Mar 2011 - 2:44 am | भडकमकर मास्तर

भारी लेख... येळ्ळूर वासीयांना सलाम

एस's picture

14 Oct 2012 - 12:47 am | एस

मराठी नाणं हे अस्सल आहे, खणखणीत आहे. येळ्ळूरकरांचा लढा बघून अगदी मनापासून वाटलं लवून त्रिवार मुजरा करावा.

एक दिवस बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र होणारच...

अपर्णा, धम्या, श्रामो व अपर्णांच्या सासूबाईंसह श्री. उदय जाधवसाहेब व श्री. प्रभाकर पाटीलसाहेब यांना सलाम व आभार.

(बिनकण्याच्या आंतरजालीय मराठी समुदायातील) एक कट्टर मराठीप्रेमी

आयला हे यळ्ळूर प्रकरण माहितीच नव्हतं!!!! मानलं बघा यळ्ळूरकरांना. हे खरे मराठीचे धारकरी!

साष्टांग दंडवत _/\_

विशेषतः तो महाराष्ट्र राज्य वाला फलक म्हणजे तुफान दबंगगिरीचे उदाहरण आहे :)

लेख आवडला. त्यानंतर अधोरेखित करायची एक गोष्ट तूच सांगितली आहेस, ती म्हणजे सर्व गोष्टींच योग्य नियोजन केल्यानच ....... छानच.

सुहास..'s picture

15 Oct 2012 - 11:21 pm | सुहास..

मायला तेज्या !!

प्रेषक, aparna akshay, Mon, 28/02/2011 - 20:21

हा लेख लिहीलास तेव्हा तिथच होतो की काय ??

पिण्याच्या पाण्याची टाकी बसविली की नाही अजुन ???