✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निंगे सासरी ...

ऊ — ऊध्दव गावंडे, Tue, 01/27/2015 - 07:36
निंगे सासरी नवरी मनी फाटलं अभाय नोता निंगता निंगत कसा घरातुनं पाय १ भिरं भिरं लानं भाऊ फिरे तिचया पाठी मांगं घळी घळी पुसे तिले आजं कुठी जातं सांगं २ केला साजं शिनगारं जशी लक्षमी नटली जाता माय बापा जोळं घऴी डोयाची फुटली ३ टाके दमनीतं पायं डोया पाये घराकळे फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले ४ उभी आंगनात मायं हाती डाबलं कुकाचं टाके खुरावरं पानी डोयातलया आसवाचं ५

प्रतिक्रिया द्या
9991 वाचन

💬 प्रतिसाद (46)

बरचसं समजलं नसलं तरी मस्त आहे

यसवायजी
Tue, 01/27/2015 - 08:20 नवीन
बरचसं समजलं नसलं तरी मस्त आहे. भारी।
  • Log in or register to post comments

अंदाजावरनं समजलं आता,छान

यसवायजी
Tue, 01/27/2015 - 08:45 नवीन
अंदाजावरनं समजलं आता,छान लिहिलंय. कुठल्या भागातली आहे भाषा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

ही वर्हाडी भाषा आहे ,

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/27/2015 - 09:51 नवीन
ही वर्हाडी भाषा आहे , विदर्भात वर्हाड़ प्रांतात (अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ) ह्या पाच जिल्ह्यात बोलली जाते! विठ्ठल वाघ सरांचे "काया मातीत मातीत तिफ़न चालते" ह्याच भाषेतले! , गाडगे बाबांचू ओरिजिनल ग्रामोद्धाराची अख्याने ह्याच भाषेतली, रोजच्या वापरात सर्वाधिक संस्कृत शब्द असणारी भारतातल्या अनेक बोली पैकी एक, माझीही मायबोली!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

चार्‍याविना निघाली के काय लेक

स्पंदना
Tue, 01/27/2015 - 08:32 नवीन
चार्‍याविना निघाली के काय लेक घरची? का ह्या दु:काळान बाजार दावला तिला?
  • Log in or register to post comments

(No subject)

अजया
Tue, 01/27/2015 - 08:35 नवीन
:(
  • Log in or register to post comments

कविता भावली

श्रीरंग_जोशी
Tue, 01/27/2015 - 08:52 नवीन
कविता भावली.
  • Log in or register to post comments

आवडली. बहिणाबाई चौधरींच्या

विशाखा पाटील
Tue, 01/27/2015 - 09:42 नवीन
आवडली. बहिणाबाई चौधरींच्या कवितेचा प्रभाव वाटला. कदाचित अहिराणी बोलीमुळे तसे वाटत असेल. दमनी म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

दमणी? बैलगाडी?

अजया
Tue, 01/27/2015 - 11:04 नवीन
दमणी? बैलगाडी?
  • Log in or register to post comments

होय आमच्याकडे वर्हाडात दमनी

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/27/2015 - 15:10 नवीन
होय आमच्याकडे वर्हाडात दमनी म्हणतात , पश्चिम महाराष्ट्रात बहुदा छकडा म्हणतात त्याला , बांबु च्या तट्ट्या ने बंद केलेली "पैसेंजर वर्शन बैलगाड़ी" ३ प्रकार असतात १. मालवाहू असते ती "बंडी" किंवा "बैलबंडी" २. प्रवासी वाहतुकीसाठी असते ती किंवा हलके सामान (सरपण, ओला चारा, थोड़ा बाजार माल इत्यादी) न्यायसाठी वापरतात ती "दमणी" ३. शंकरपट उर्फ़ बैलांच्या शर्यतीसाठी वापरात येते ती "रिंगी" , ही आकाराने फारच लहान असते, शंकरपटाचा सीजन नसता पेरणी च्या वेळी ही एखाद ख़त/बियाण्याचे पोते , फाळ, डवरे(कुळव) इत्यादी न्यायला पण वापरली जाते रिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

रेंगी..

चिगो
Tue, 01/27/2015 - 23:44 नवीन
रेंगी/रिंगी म्हणजे आमच्याकडे (नागपूर) अर्धगोलाकार छताची बैलगाडी. प्रवासी वाहतुकीसाठी, खासकरुन बायाकांकरीता वापरली जायची. जुन्या मराठी चित्रपटात दिसते ही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मस्त आवडली. कुठली बोली भाषा

विवेकपटाईत
Tue, 01/27/2015 - 19:47 नवीन
मस्त आवडली. कुठली बोली भाषा अवगत नसलेला....
  • Log in or register to post comments

कविता छान आहे. आवडली.

एस
Tue, 01/27/2015 - 20:22 नवीन
कविता छान आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

खूप छान कविता, डोळ्यात उगाचच

सौन्दर्य
Tue, 01/27/2015 - 20:29 नवीन
खूप छान कविता, डोळ्यात उगाचच (?) पाणी. इतक्या कमी शब्दात सासरी निघालेल्या मुलीचे, तिच्या आईवडिलांचे, धाकट्या भावाचे भावविश्व फार सुंदर चीतारलेत. ही भाषा कानाला फार गोड वाटते. 'फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले' ह्यातलं सोकाउन म्हणजे सुकून का ? 'आईच्या हातातली कुंकवाची करंडी आणि डोळ्यातील पाणी' लाजवाब. असेच लिहित रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...!

ऊध्दव गावंडे
Tue, 01/27/2015 - 21:08 नवीन
धन्यवाद ! मित्रानो... माझ्या प्रथम पदार्पणा ला आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्या बद्दल आभारी आहे . आणि सोन्या बापु... तुमी तं राजे हो मायं वझं च हलकं केलं. बरं केलं! धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मंग गळ्या उद्धव राव! ना कराव

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/27/2015 - 21:38 नवीन
मंग गळ्या उद्धव राव! ना कराव का! तशेच त सारे म्हणते तुमच्या इकळे "सहकार" नसते! मंग म्हणले चाला बाप्पा असाच सहकार काराव सुरु! नाई सायाची साखरीची फैक्ट्री त कवितेचाच अर्थ समजावावा न बापा लोकाईलर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऊध्दव गावंडे

लय मस्तं!

ऊध्दव गावंडे
Tue, 01/27/2015 - 22:00 नवीन
लय मस्तं! मस्तं काम करून रायले बरं तुमी हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बाप्पा बाप्पा

श्रीरंग_जोशी
Tue, 01/27/2015 - 22:24 नवीन
बाप्पा बाप्पा, कित्ती वर्षांनी वाचाले भेटली आपली बोलीभाषा. भल्लाच खूष झालो ना मी. आयुष्याची पहिली २० वर्षे ही बोलीभाषा ऐकूनही आज मी सराइतपणे बोलू शकत नाही याचे वाईट वाटते. गावाकडे सलग ८-१० दिवस राहिल्यास नक्की बोलू शकीन. मागे लोकसत्तेत वाचलेला एक प्रसंग. स्थळ: न्यु यॉर्क प्रसंग: नोकरीची मुलाखत मुलाखत घेणारा अधिकारी - Where are you from? उमेदवार युवकः India. sir. अधिकारी: अरे भाई, इंडिया में कहा से? युवकः महाराष्ट्र, सर. अधिकारी: अरे महाराष्ट्रात कुठून? युवकः नागपूर, सर. अधिकारी: बाप्पा.... बाप्पा... बम दूर आला नं बे तू... युवकः हव ना सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

+१

मधुरा देशपांडे
Tue, 01/27/2015 - 22:32 नवीन
आयुष्याची पहिली २० वर्षे ही बोलीभाषा ऐकूनही आज मी सराइतपणे बोलू शकत नाही याचे वाईट वाटते.
अगदी हेच. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

थोडासा बदलून..

चिगो
Tue, 01/27/2015 - 23:47 नवीन
लाखत घेणारा अधिकारी - Where are you from? उमेदवार युवकः India. sir. अधिकारी: अरे भाई, इंडिया में कहा से? युवकः महाराष्ट्र, सर. अधिकारी: अरे महाराष्ट्रात कुठून? युवकः नागपूर, सर. अधिकारी: अबे, खर्रा काढ ना बे मंग भडकन.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

थोडासा बदलून-

यसवायजी
Wed, 01/28/2015 - 11:20 नवीन
अधिकारी: रां*च्या. लांब आलैस की.. (गाव सांगायला पायजे काय?) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

(No subject)

सस्नेह
Wed, 01/28/2015 - 17:20 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

अधिकारी: या, राजे! एवढ्या

आदूबाळ
Wed, 01/28/2015 - 18:31 नवीन
अधिकारी: या, राजे! एवढ्या लांबवरून आमच्याकडेच आलात नेमके! (गाव सांगायला पायजे काय?) ;) चिगो - खर्रा म्हणजे सुकी सुपारी ना? की माव्यासारखा त्यात तंबाखूचा अंशही असतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

खर्रा म्हणजे ज्याला पश्चिम

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/28/2015 - 18:42 नवीन
खर्रा म्हणजे ज्याला पश्चिम महाराष्ट्रात मावा म्हणतात तो! खुप जास्त वैविध्य आहे विदर्भात अन नागपुरात ह्या प्रकाराचा , सुपारी कच्ची का शेकी (भाजकी), किवाम अथवा गुंजेचा पाला हवे का नको, पाण्याचा बिनपाण्याचा, नागपुरी खर्रा विशेष प्रसिद्ध, खर्रा अन घोटा वेगळे असतात, लाकडी खडबडीत पट्टी वर पातळ पॉलिथीन मधे मिक्स करुन रगडून बनवलेला असतो तो घोटा, अन त्या पॉलिथीन ची पुरचुंडी तळहातावर घासून बनवतात तो घोटा!!! मायला!! आठवणी जाग्या झाल्या!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कविता आवडली.

रेवती
Tue, 01/27/2015 - 21:49 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

ऊध्दव गावंडे
Tue, 01/27/2015 - 21:57 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लय मस्तं!

ऊध्दव गावंडे
Tue, 01/27/2015 - 21:54 नवीन
लय मस्तं! मस्तं काम करून रायले बरं तुमी हे.
  • Log in or register to post comments

कविता आवडली. काही विसरलेले

मधुरा देशपांडे
Tue, 01/27/2015 - 22:05 नवीन
कविता आवडली. काही विसरलेले शब्द अनेक वर्षांनी वाचले. :)
  • Log in or register to post comments

छान.

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/27/2015 - 23:07 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

लयच बढीया..

चिगो
Tue, 01/27/2015 - 23:48 नवीन
सुंदर कविता.. हृद्यस्पर्शी.. लिहीत रहा..
  • Log in or register to post comments

+१०० लोय टाप…

संदीप डांगे
Wed, 01/28/2015 - 01:23 नवीन
हारपली भाश्या अशी जशी माय जतरेत हिथं भेटते तवा येते पानी माल्या नजरेत
  • Log in or register to post comments

आवडली!

रुपी
Wed, 01/28/2015 - 01:52 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

इतक्या कमी शब्दात सासरी

इन्दुसुता
Wed, 01/28/2015 - 09:35 नवीन
इतक्या कमी शब्दात सासरी निघालेल्या मुलीचे, तिच्या आईवडिलांचे, धाकट्या भावाचे भावविश्व फार सुंदर चीतारलेत.
अगदी हेच. कविता अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

छान वाटले वाचताना.

जागु
Wed, 01/28/2015 - 11:24 नवीन
छान वाटले वाचताना.
  • Log in or register to post comments

गाव असो की शहर्..भावना

रायनची आई
Wed, 01/28/2015 - 15:43 नवीन
गाव असो की शहर्..भावना सारख्याच असतात..आता २ दिवसान्पुर्वी आईकडून आले तेव्हाची आठवण आली..आई अशीच निरोप द्यायला उभी होती :-(
  • Log in or register to post comments

ईरावती कर्वें यांचा

ऊध्दव गावंडे
Wed, 01/28/2015 - 22:46 नवीन
ईरावती कर्वें यांचा पाठ्यपुस्तका मधला धडा आठवला " परीपुर्ती"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रायनची आई

बोलीभाषेचा गोडवाच न्यारा...

माधुरी विनायक
Wed, 01/28/2015 - 17:17 नवीन
कवितेची भाषा आणि भावना... जास्त काय भावलं, हे सांगणं कठीण आहे...
  • Log in or register to post comments

सुंदर!!

शब्दबम्बाळ
Wed, 01/28/2015 - 18:03 नवीन
एक प्रश्न आहे, या भाषेमध्ये जोडशब्द नसतात का?
  • Log in or register to post comments

दुरुस्ती...

शब्दबम्बाळ
Wed, 01/28/2015 - 18:09 नवीन
माफ करा! जोडाक्षरे म्हणायचे होते…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

होय ! आहेत पण मला कदाचित्

ऊध्दव गावंडे
Wed, 01/28/2015 - 23:00 नवीन
होय ! आहेत पण मला कदाचित् लिहिताना शक्य झाले नाहीत.उदा. "घळ्ळी "डोयाची फुटली, घळ्ळी म्हणजे मातीचे मोठे मडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

भाषा मराठीच आहे

श्रीरंग_जोशी
Wed, 01/28/2015 - 23:03 नवीन
भाषा मराठीच आहे, केवळ शैली वर्‍हाडी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

सिर्रंग भाऊ मी काय म्हनतो...

ऊध्दव गावंडे
Wed, 01/28/2015 - 23:19 नवीन
सिर्रंग भाऊ मी काय म्हनतो... श्रीरंग दादा मला काय म्हणायचंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Wed, 01/28/2015 - 23:30 नवीन
लहानपणी शाळेतले अनेक मित्र मला सिर्रंग म्हणून हाक मारायचे. :-) आज अनेक वर्षांनंतर असे कुणी म्हंटले असेल. मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऊध्दव गावंडे

ह्र्दयस्पर्शी

वेल्लाभट
Wed, 01/28/2015 - 18:10 नवीन
ह्र्दयस्पर्शी
  • Log in or register to post comments

खूप गोड!

पैसा
Wed, 01/28/2015 - 18:12 नवीन
खूप गोड कविता आहे!
  • Log in or register to post comments

वा! किती हळवी, सुंदर कविता

चुकलामाकला
गुरुवार, 01/29/2015 - 18:39 नवीन
वा! किती हळवी, सुंदर कविता आहे, डोळ्यातून पाणी आले की भाऊ!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता.

बबन ताम्बे
Fri, 01/30/2015 - 20:06 नवीन
जीव गलबलला !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा