✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लायनीतले अब्जाधीश

क
कोंबडी प्रेमी यांनी
Wed, 01/28/2015 - 07:59  ·  लेख
लेख
लायनीतले अब्जाधीश ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ... ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ? एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ... नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही .... हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ? असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30330 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 08:20 नवीन
इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं देशामधले उद्योगपती जगातल्या सर्वात जास्त शक्तीमान जागी असणार्‍या माणसाच्या भेटीसाठी ताटकळतील. त्यातली कितीतरी न.मो. आणि बराक ओबामांच्या आण्विक चर्चेमधुन आपल्या हाती काही चांगली प्रोजेक्ट्स पडतील का ह्याचा अंदाज घ्यायला आलेले असणारेत. त्यातुन रोजगारनिर्मिती होणारचे.
  • Log in or register to post comments

खरेच ?

कोंबडी प्रेमी
Wed, 01/28/2015 - 08:36 नवीन
सगळ्याचं देशामधले उद्योगपती जगातल्या सर्वात जास्त शक्तीमान जागी असणार्‍या माणसाच्या भेटीसाठी ताटकळतील
बिल गेट्स - वारेन बफे - लरि एलिस्न -मार्कोबा झुकेर्ब्र्क्ग ...प्रभृती राहतील असे रांगेत उभे एका मागे एक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यावसायिक संधींसाठी नक्कीचं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 08:47 नवीन
व्यावसायिक संधींसाठी नक्कीचं. आधीही उभे राहिले असतील आणि पुढेही उभे राहतील. बाकी ते मल्ल्या दिसतं नाहीयेत कुठे फोटोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी

मुळात रांगेत उभे राहण्यात

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 01/28/2015 - 10:58 नवीन
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी

अगदी अगदी!!

अनुप ढेरे
Wed, 01/28/2015 - 11:03 नवीन
अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

शंभर टक्के..

चिगो
Wed, 01/28/2015 - 15:44 नवीन
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे..
१००% सहमत.. ह्या फोटोत लोकांना इतकं नवल वाटण्यासारखं काय आहे, हेच कळत नाही. 'रांगेत उभं राहणं' म्हणजे जणू भीक मागत असल्यासारखं आहे, असं वाटतंय का काय लोकांना? मी हॉस्टेलमध्ये असतांना (जवाहर नवोदय विद्यालय) पाच वर्षं रोज चारदा रांगेत उभं राहीलोय जेवणासाठी. त्यामुळे "रांग म्हणजे अपमान" हा प्रकार पटत नाही मला.. इथे शिलाँगमध्ये एक सरकारी शाळा आहे. अगदी सव्वाशे वर्षं जूनी वगैरे.. फक्त ८,०००/- वार्षिक फी मध्ये १२वीला ICSEचा कोर्स शिकवणार्‍या ह्या शाळेत पोरांना टेबलांवर जेवण वाढायला 'बैरा' ठेवले आहेत.. मायला ! मी तर उडालोच. अबे, जिथं शाळेचा दैनंदिन खर्च चालवायला सरकारकडे पैसा मागावा लागतो, तिथे ही 'गोरा साहीब' आणि 'नेटीव्ह' प्रकारातल्या भावना वाढीस लावणार्‍या फालतू 'लीगसीज' पाळत बसण्याला काय अर्थ आहे? पण नाही.. "प्रिमीयर"पणा जातो म्हणे अशानं. "बडा घर, पोकळ वासा" म्हणजे काय हे अनुभवतोय.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

यात अस्मितेचा संबंध कुठे आला?

आनन्दा
Wed, 01/28/2015 - 09:37 नवीन
यात अस्मितेचा संबंध कुठे आला? अर्थस्य पुरुषो दासः
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/28/2015 - 09:47 नवीन
अगदी लाचार चेहरे करून उभे होते. लाईन पाहून ह्यांनाही धक्का बसला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,महासत्तेपुढे तर नाहीच नाही.अंबानी काय मित्तल काय, परदेशी तंत्रज्ञान्,यंत्रे बाहेरून आणायची,स्वतःची दुकाने चालवून खिसे भरायचे.मग उरलेल्या पैशात 'मेक इन इंडिया'
  • Log in or register to post comments

माई, तुमच्या ह्यांना जरा

काळा पहाड
Wed, 01/28/2015 - 11:02 नवीन
माई, तुमच्या ह्यांना जरा मानसोपचार तज्ञाकडे घेवून जा. उगीच आजार वाढला तर व्हायोलंट व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

+१००

सुबोध खरे
Wed, 01/28/2015 - 11:08 नवीन
+१०० The problem with leftist is nothing right is left in them
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

(No subject)

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 01/28/2015 - 11:39 नवीन
*ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अंबानी काय मित्तल काय, परदेशी

अनुप ढेरे
Wed, 01/28/2015 - 11:13 नवीन
अंबानी काय मित्तल काय, परदेशी तंत्रज्ञान्,यंत्रे बाहेरून आणायची,स्वतःची दुकाने चालवून खिसे भरायचे.
याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

धक्का ????

इरसाल
Wed, 01/28/2015 - 11:37 नवीन
गेले बिले नाय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

डु-आयडीरत्न नानासाहेबांचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 11:43 नवीन
डु-आयडीरत्न नानासाहेबांचा अवतार समाप्त झाल्याची दु़ख्खद वार्ता काही हितचिंतंकांकडुन समजली होती. खरं खोटं माहित नाही. आत्मा अमर असतो तो "ग्रेटथिंकरां"च्या रुपात पुन:र्जन्माला आलाय असं दिसतयं..गुरुकृपा बाकी काय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर

मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 11:51 नवीन
अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर आधीपासुनच होते. काही काळासाठी ते अज्ञातवासात होते. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की नाना, माई, अजातशत्रू, सचीन, हितेश आणि असे इतर बरेच हे एकाच आयडीचे डु आयडी आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

असहमत. हितेश ऊर्फ पोटे ऊर्फ

बॅटमॅन
Wed, 01/28/2015 - 12:38 नवीन
असहमत. हितेश ऊर्फ पोटे ऊर्फ उद्दाम ऊर्फ जामोप्या आणि ग्रेटथुंकर ऊर्फ नाना ऊर्फ माई हे दोन वेगवेगळ्या आयडींचे अवतार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जामोप्या

प्रसाद गोडबोले
Wed, 01/28/2015 - 14:39 नवीन
जामोप्या
मायबोली वरील जामोप्या आणि हे जामोप्या एकच होत काय ? मायबोलीवर काय च्छान छान लेख टाकायचे ते , त्यांचा तो दृष्ट न लागण्या साठीच्या आमुलेटचा लेख मला अजुनही आठवतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

विशाल कुलकर्णी
Wed, 01/28/2015 - 14:51 नवीन
*dash1* *DASH* *WALL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

असहमत. आधीचा ग्रेटथिंकरचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 18:36 नवीन
असहमत. आधीचा ग्रेटथिंकरचा अवतार समाप्त झालेला आहे. हा दुसरा अवतार आहे. हे व्हर्जिनल ग्रेट्थिंकर आहेत का ते माहित नाही. आधीच्या पेक्षा बरीचं वेगळी मतं मांडताना दिसतात हल्ली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लहान सहान गोष्टीची "अस्मिता

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/28/2015 - 09:54 नवीन
लहान सहान गोष्टीची "अस्मिता रेसिपी" बनवणे हा आपल्या भारतीय लोक मानासिकतेचा एक नको असलेला अभिनिवेष आहे असे मनापासुन वाटते, संस्कृति जितकी जुनी तितके हे ओघाने येतेच हे ही खरेच!!!, ह्याचाच फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनी ने "it's just good business" म्हणत हा खंडप्राय देश देशोधडी ला लावला!!! , अर्थात काही प्रमाणात मी सुद्धा ह्याचाच पाईक!! हा विचार खोडला जातोय ह्याचा आनंद!, बिजनेसमैन ची प्रार्थमिकता अन त्याची अस्मिता "प्रॉफिट एंड लोस स्टेटमेंट" असते!!, प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार! कालमहिमा! अजुन काय!!
  • Log in or register to post comments

प्रत्येकाचा एक फोर्टे असतो!

विशाल कुलकर्णी
Wed, 01/28/2015 - 10:23 नवीन
प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार! सहमत आहे सोन्याबापू. मुळात तो फोटो कुठल्या वेळी घेतलाय ते माहीत नाही. सुरक्षाघेर्‍यातून क्रॉस होण्यासाठी सुद्धा थांबलेले असू शकतात. आणि उभे राहीलेच रांगेत तर त्याने असा काय फरक पडतो. त्यांना पण कळू द्या जेव्हा सामान्य माणसाला प्रत्येक लहान-सहान बाबीसाठी इथे रांग लावावी लागते. तेव्हा त्याची मानसिकता काय असते ते. फरक इतकाच आहे की इथे खिडकी तोंडावर बंद होण्याची भीती नाहीये या उद्योगपतींना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

उद्योगपतींना झोडणे हा

सुबोध खरे
Wed, 01/28/2015 - 11:06 नवीन
उद्योगपतींना झोडणे हा आपल्याकडील डाव्या विचार सरणीच्या लोकांचा आवडता उद्योग आहे. ज्या नरेंद्र मोदींना १० वर्षे व्हिसा नाकारला त्याच अमेरिकेने त्यांच्यापुढे लोटांगण घातलेच ना? नुसताच त्यांना व्हिसा दिला असे नव्हे तर त्यांना खास आमंत्रण देऊन अमेरिकेत बोलावले. त्यांच्यावरील खटला सुद्धा रद्दबातल केला. याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का? नसत्या गोष्टीत अस्मिता घेऊन कोणत्याही देशाचा फायदा झालेला नाही. चीन हा सरळ सरळ प्रतिस्पर्धी असताना अमेरिका त्यांच्या फायद्यासाठी चीन बरोबर पण व्यापारी संधी करतेच ना? अस्मिता काय आहे हे आणि उपचार म्हणजे नक्की काय हे माहित नसताना बरेच लोक टीका करताना आढळतात सेनाधिकार्याना त्यांच्या पुढे रांगेत उभे केले तर त्यात गैर काय आहे. जसे आपल्या राष्ट्रपतींना भेटण्यास लष्करी अधिकारी रांगेत ( त्यांच्या वरिष्ठते प्रमाणे) उभे राहतात. तसेच त्या राष्ट्राच्या अध्यक्षांना( ते त्यांच्या लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आहेत) भेटण्यासाठी रांगेत उभे राहिले तर गैर काय? ते आंतरराष्ट्रीय औचित्याला धरून आहे. रांगेचा फायदा तुम्हा आम्हा सर्वांनाच. राहिली गोष्ट पत्रकारांची. त्यांची लायकी एकंदर काय आहे ते अपना सर्वाना माहित आहेच. कोणती गोष्ट काय तर्हेने प्रसारित करावी त्याचे औचित्य काय याचा कोणताही विधिनिषेध त्यांना नाही आणि त्याबद्दल माहिती नसताना whats app वर forward करणारे आपण. अधिक काय लिहिणे?
  • Log in or register to post comments

खरे साहेब

कोंबडी प्रेमी
Wed, 01/28/2015 - 12:08 नवीन
उद्योगपतींना झोडणे हा उद्देश नाहीये... एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे ... रांगेत उभे राहण्या ऐवेजी हे सगळे २-३ च्या गटात उभे राहून आपली टर्न येण्याची वाट बघत आहेत हे शक्य होते ... ...दुसरे...समजा काही कारणाने ते उभे राहणे अपरिहार्य असले तरी तसे फोटो प्रसारित नं होऊ देणे जरुरीचे होते ...
याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का?
चार पैसे मिळवण्या साठी स्वत:च्या तत्वांना झक मारत घातलेली मुरड तरी नक्कीच म्हणता येईल ... असो ... कसली अस्मिता / profit first वगैरे सुरु झाले कि मग काही बोलायलाच नको ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हेच

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/28/2015 - 12:59 नवीन
एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे .
हेच म्हणायचे होते. नरेण्द्रने दम देऊन उभे केल्यासारखे चेहरे दिसत होते.असो. मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी

अगदि अगदि !!!

कोंबडी प्रेमी
Wed, 01/28/2015 - 13:32 नवीन
असेच वाटते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

:)

क्लिंटन
Wed, 01/28/2015 - 14:10 नवीन
मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.
त्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या दहापट मोठी भारतीय अर्थव्यवस्था व्हायला हवी.तसे झाल्यास सगळे सी.ई.ओ आणि शेठजी लोक भारतीय पंतप्रधानांपुढेही लाईनीत उभे राहतील.हे माझ्या (किंवा मिपावरील सगळ्यांच्या) तरी आयुष्यकाळात शक्य होणार नाही त्यामुळे तशी ही हायपोथेटीकल कल्पना आणि शक्यता आहे :) बाकी काहीही असले तरी अमेरिकन लोकांना अगदी लहानपणापासून लाईनीत उभे राहायची सवय असते त्यामुळे असे उद्योगपतींना लाईनीत उभे राहायला लागले तरी त्याविषयी त्यांना कोणताही कमीपणा वाटणार नाही.तसेच अमेरिकन लोकांनाही त्याचे काही वावगे वाटणार नाही. त्यामुळे भारतातील मिसळपाव डॉट कॉमवर जरी अशी चर्चा चालू असली तरी अमेरिकेतील एखाद्या हॅमबर्गर डॉट कॉम यासारख्या वेबसाईटवर अशी चर्चा व्हायची शक्यता सुतराम नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बाबारे

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/28/2015 - 16:00 नवीन
बाबा रे क्लिंटना, लाईनीत उभे रहायला कोणाचीच हरकत नाही.त्यात कमीपणाही नाही.मुकेशभाईनी ८३ नंबरची कुलाबा-सांताक्रूझ बस पकडली तरी त्यात वावगे नाही. गेले काही वर्षे(म्हणजे नरेंद्र सत्तेवर याय्चय आधीपासून हो!) इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

:)

क्लिंटन
Wed, 01/28/2015 - 16:12 नवीन
इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.
अहो माईसाहेब, त्यांचे चेहरे पडेल होते असे मला तरी वाटले नाही.तरीही इंडिया सक्सेस स्टोरी येत आहे म्हणून सतत त्यांचे चेहरे हसतमुख आणि उत्साहाने सळसळतेच पाहिजेत आणि समजा कधी तितका उत्साह त्यांच्या चेहर्‍यावर दिसला नाही तर ते अपयशी आहेत असे थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई मला तरी सगळ्यांच्या चेहर्

मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 18:07 नवीन
माई मला तरी सगळ्यांच्या चेहर्‍यांवर स्मित दिसते आहे. तिथे गाढ्वासारखे खिंकाळुन हसणे शोभले नसते. त्यामुळे शिष्टाचाराला अनुसरुन हास्य / स्मित विलासते आहे चेहर्‍यांवर. अर्थात ज्याला त्याला जे ते पाहयचे आहे तेच दिसणार. तरीही हे फोटो बघा. राष्ट्रपतींच्या फेसबुक पेज वर अप्लोड केले आहेत (त्यांच्याच कार्यालयाने बहुधा): https://www.facebook.com/presidentofindiarb/photos_stream
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा हा. मस्त प्रतिसाद.

रेवती
Wed, 01/28/2015 - 19:28 नवीन
हा हा हा. मस्त प्रतिसाद. तुमचे विनोदी प्रतिसाद साठवून ठेवायची सोय करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

संदर्भरहीत चित्रे

सर्वसाक्षी
Wed, 01/28/2015 - 11:14 नवीन
हे चित्र नक्की कधी व कुठे टिपले आहे याचा तपशिल न पाहताच तर्क लढवणे योग्य नाही. ओबामांचे त्यांच्या विमानातले कुत्र्याशी खेळतानाचे वा विमानाच्या खिडकीतुन बाहेर पाहतानाचे फोटो गेले काही दिवस वॉसपवर फिरत आहेत. उद्या अमेरिकेत यावर चर्चा होऊ शकेल की देशापुढे अनेक समस्या असताना अध्यक्ष महाशय खुशाल कुत्र्याशी खेळत आहेत. भाउ, तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही. बरोबर उभे असलेले नमो, पर्रिकर, राष्ट्रपती वगैरे वंदन मुद्रेत आहेत. आपल्याला ते नाही का खटकलं? ते तर उद्योगपतींनी रांग लावण्यापेक्षा गंभीर आहे.
  • Log in or register to post comments

प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 11:16 नवीन
प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती उपस्थित असताना उपराष्ट्रपतींनी ध्वजाला वंदन करणे अभिप्रेत नाही. राष्ट्रपती काही कारणांनी अनुपस्थितीत असतील तर मात्र ही त्यांची जबाबदारी असते अश्या आशयाचा खुलासा देण्यात आलेला आहे.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

शीर झाकलेले असतांना सलाम

कोंबडी प्रेमी
Wed, 01/28/2015 - 12:11 नवीन
शीर झाकलेले असतांना सलाम करावा अन्यथा फक्त अटेन्शन मध्ये उभे राहावे ..टाचा क्षणभर उंचावून सलामी द्यावी असे शिकल्याचे आठवते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

तो नियम फक्त गणवेशी

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/28/2015 - 12:20 नवीन
तो नियम फक्त गणवेशी सेवांमधल्यांसाठी (युनिफॉर्म्ड सर्विसेसना, उदा लष्कर, पोलीस, इ) आहे; मुलकी अधिकारी आणि नागरिकांसाठी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी

तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो

शिद
गुरुवार, 01/29/2015 - 18:06 नवीन
तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही.
आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता? 'सावधान' स्थितीत उभं राहून नक्कीच हा फोटो काढला गेला नसेल. ह्या अश्या क्षुल्लक गोष्टींवरून बातम्या बनवायचा हा आजकाल मिडियाचा आवडता खेळ झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

आपले उपराष्ट्रपती निदान

विशाल कुलकर्णी
Mon, 02/02/2015 - 12:18 नवीन
आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता? प्रचंड सहमत ! त्या फोटोग्राफरला शोधून त्याच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करु नये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

इतरत्र म्हटल्याप्रमाणे (किमान

गवि
Tue, 02/03/2015 - 13:24 नवीन
इतरत्र म्हटल्याप्रमाणे (किमान माझ्या पाहण्यात आलेला) हा सद्यचर्चेतला फोटो टीव्हीवरच्या फूटेजमधून स्क्रीनशॉट स्वरुपात सिलेक्टिव्हली चारच लोक फ्रेममधे असणारा क्षण साधून प्रत्यक्ष प्रसंगाच्या पश्चात निर्माण केला गेलेला आहे. कोणा फोटोग्राफरने काढलेला फोटो नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

प्रोटोकॉल

सर्वसाक्षी
Wed, 01/28/2015 - 11:28 नवीन
या विषयी माहिती नाही. पण समजा मिळालेली माहिती खरी आहे असे समजलो तरी त्याच प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वंदन करण्यास मनाई नक्कीच नसावी. राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका.
  • Log in or register to post comments

कायच्या काय लॉजिक.. करायची

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 01/28/2015 - 11:33 नवीन
कायच्या काय लॉजिक.. करायची म्हणुन केलेली टिका.. मायक्रोस्कोप मधुन शोधुन काढलेले खुस्पट.. ईत्यादी ईत्यादी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

मला वाटते प्रॉटॉकोल प्रमाणे

मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 11:49 नवीन
मला वाटते प्रॉटॉकोल प्रमाणे त्यांचे वागणे बरोबर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

शीर झाकलेले असतांना सलाम

कोंबडी प्रेमी
Wed, 01/28/2015 - 12:12 नवीन
शीर झाकलेले असतांना सलाम करावा अन्यथा फक्त अटेन्शन मध्ये उभे राहावे ..टाचा क्षणभर उंचावून सलामी द्यावी असे शिकल्याचे आठवते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

ओहो

इरसाल
Wed, 01/28/2015 - 11:40 नवीन
सच्चिन .......सच्चिन ढॅण ढॅण ढॅण सच्चिन .......सच्चिन ढॅण ढॅण ढॅण सच्चिन .......सच्चिन ढॅण ढॅण ढॅण
  • Log in or register to post comments

रांगेत नसेल

उन्मेष दिक्षीत
Wed, 01/28/2015 - 11:50 नवीन
ओबामा तीथं येउन एका लाईनीत सगळ्यांना भेटे पर्यंत तिकडे वळुन उभे असतील फक्त ;)
  • Log in or register to post comments

मुळात रांगेत उभे राहण्यात

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/28/2015 - 11:55 नवीन
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे. : जेम्स बॉन्ड ००७ +१०० प्रथम गोर्‍यांची आणि नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दादा-भाऊ-मामा-नाना-साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांच्या अस्मितेची गळवे कुरवाळण्याची गुलामगिरी करणार्‍या मानसिकतेला हे समजणे कठीण आहे. ज्या देशात लोकशाही नीट रुजली-बहरली आहे तेथे पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहायला कमीपणा वाटत नाही तर ते शिस्तीचे, समतेचे आणि सभ्यपणाचे लक्षण समजले जाते.
  • Log in or register to post comments

बर झाल बुवा आपण अब्जाधिश नाहि

पिंपातला उंदीर
Wed, 01/28/2015 - 11:55 नवीन
बर झाल बुवा आपण अब्जाधिश नाहि. *lol*
  • Log in or register to post comments

हे म्हणजे याचकाचे लक्षण आहे .

सुबोध खरे
Wed, 01/28/2015 - 12:04 नवीन
हे म्हणजे याचकाचे लक्षण आहे . बरे झाले जास्त पैसे मिळत नाहीत नाहीतर आय कर भरावा लागला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/28/2015 - 12:04 नवीन
राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका. : सर्वसाक्षी राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजाला वंदन करावे की नाही हे "तशी माझी जबाबदारी आहे की नाही ?" याचा विचार करून ठरवावे लागते, अश्या माणसाला "राष्ट्राबाबत किती आपुलकी आहे ?" असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नाही !
  • Log in or register to post comments

लष्करात नोकरी करीत असताना मी

सुबोध खरे
Wed, 01/28/2015 - 12:13 नवीन
लष्करात नोकरी करीत असताना मी एक प्रश्न विचारला होता कि मान देण्यासाठी सलाम करणे आवश्यक आहे का? यावर उत्तर असे कि आपण गुड मॉर्निंग, जय हिंद किंवा प्रत्यक्ष सलाम करणे यातील कोणतीही एक गोष्ट करू शकता. मान देणे महत्त्वाचे आहे कसे करता ते नाही. राष्ट्रगीत चालू असताना आपण एकतर सलाम करू शकता किंवा नुसते सावधान मध्ये उभे राहू शकता. अनावश्यक हालचाल करणे, गप्पा मारणे किंवा तत्सम दुसर्या गोष्टी करणे( सिगारेट पिणे) हा ध्वजाचा अपमान होऊ शकतो आपण जर नीट पाहिले असेल कि लष्कराची तुकडी जेंव्हा ध्वजाच्या समोरून जाते तेंव्हा तुकडीचा मुख्य बंदुकीने किंवा तलवारीने किंवा हाताने सलाम करतो आणि तुकडीतील सर्व जण नुसतीच परेड करीत पुढे जातात.ध्वजारोहणाचे वेळी परेड मध्ये फक्त परेड कमांडर हा सलाम करतो इतर सर्व जण सावधान मध्ये निश्चल उभे राहतात तेंव्हा छिद्रान्वेश करण्यात काहीही हशील नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खरे साहेब,

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/28/2015 - 12:42 नवीन
खरे साहेब, तुम्ही सांगितलेली गोष्ट हा सैनिकी परेडमध्ये सैनिकांनी कसे वागावे याबद्दलचा नियम आहे. इथला प्रश्न "राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजासमोर उभे असलेल्या देशाच्या उपराष्ट्रपतींना काय करावे असे वाटले होते?" हा आहे. माझ्या मते जर मनात राष्ट्रध्वजाबद्दल जर आस्था असेल तर "जेव्हा कायद्याने / शिष्टाचारने तसे करणे निषिद्ध नसेल त्या प्रत्येक वेळेस" हात वंदनास वर जातील. तसे न करणे अगदी राष्ट्रद्रोह वगैरे आहे असे मी म्हणणार नाही पण मानसिकतेचे दर्शन मात्र जरूर आहे. विशेषतः जेव्हा इतकी उच्चपदस्थ व्यक्ती असे वागते; जिने देशाबद्दल आणि देशांच्या मानकांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आदर आणि प्रेम असावे असा संदेश देणे अपेक्षित असते; तेव्हा नक्कीच विरोधाभास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक्का साहेब

सुबोध खरे
Wed, 01/28/2015 - 12:50 नवीन
एक्का साहेब हा नियम सर्व सरकारी अधिकार्यांसाठी/ नोकरांसाठी आहे.उलट सिव्हीलीयंसनि सलाम केला पाहिजे हा नियम कोणत्याही शासकीय नियमावलीत नाही. ती केवळ गणवेश धारक नोकरांची केलेली नक्कल आहे. केवळ आपण एकतर सलाम करा किंवा "सावधान" मध्ये उभे राहा. गणवेश असो कि नसो.आपण खिशात हात घालून उभे राहिलात तर चालणार नाही. आणी हे आम्हाला स्पष्टपणे नौदल अकादमीत परेडच्या सरावाच्या वेळेस सांगितले होते. कि तुम्ही एखाद्या उच्च पदस्थाला सलाम करता किंवा ध्वजारोहण करता तेंव्हा त्यांनी सलाम केला किंवा नाही केला तरी चालेल."सन्माननीय" व्यक्ती तुमच्या पुढे संरक्षण मंत्री किंवा तत्सम म्हणून येतील. ( खर तर सिव्हीलीयंस साठी कोणताच नियम नाही) तो केवळ शिष्टाचाराचा भाग आहे. बाकी उपराष्ट्र्पतिनी नक्की काय केले आहे हे मला मीहिती नाही आणी ते पाहीलेलेहि नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा