Skip to main content

लायनीतले अब्जाधीश

लेखक कोंबडी प्रेमी यांनी बुधवार, 28/01/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
लायनीतले अब्जाधीश ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ... ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ? एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ... नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही .... हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ? असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"

वाचने 30587
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

अब्जाधीशांवरून चर्चा झेंडयावर का आली? रांगेचा ऊद्देश जाणुन घेतल्याशिवाय केवळ फोटो बघुन प्रतिक्रिया दिल्या कि असे होते.

टीका नक्की कशावर आहे? रांगेत उभे राहण्यावर?- तसे असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि ते सर्वानीच शिकायला हवं. अब्जाधीश ओबामांना भेटायला गेले म्हणून? - मुक्त अर्थव्यवस्थेत यात वावगं काहीही नाही. पाश्चात्य देशांचे सरकार व्यापार वाढवणाऱ्या स्वदेशी कंपन्यांचे हित बघत असतात. East India Company, तेलाच्या क्षेत्रातल्या Seven Sisters यांची उदाहरणे आहेतच. आपल्यालाही या गोष्टीचं महत्व काळाबरोबर कळत असेल, तर ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने चांगलंच आहे.

हाफ शेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री.कोंबडा प्रेमी आणी मिपाकरांचा सत्कार पॉपकार्न आणी सलामी देऊन करण्यात येत आहे. क्रुपया रांगेय या. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

In reply to by यसवायजी

त्या दुव्यातली गोष्ट खरी आहे असे गृहीत धरूनही... मोठ्या अधिकारावरचा माणूसही फक्त माणूसच असतो. तो पण कधी कधी चूक करतो... आणि तीही चूकच असते. चूक झाकण्याचे प्रयत्न न करता ती प्रामाणिकपणे मान्य करून ती भविष्यात परत होणार नाही अशी काळजी घेण्याची सवय लागली की त्याचे खर्‍या मोठेपणाकडे मार्गक्रमण होऊ लागते.

अन्सारी आडनाव असल्याने अनेकांना देशभक्तीबाबत शंका आलेली दिसतेय. असो. खालील खुलासा समाधानकारक वाटला. Breaking his silence on criticism against him in the social media for not saluting the Tricolour during the Republic Day Parade at Rajpath on Monday, Vice President Hamid Ansari has stated that as per protocol only those in uniform salute the national flag while the National Anthem is being played. Those in plainclothes are just supposed to stand in attention, he added. According to the Flag Code of India, Section VI, only those in uniform may ‘render the appropriate salute’. “During the ceremony of hoisting or lowering the flag or when the flag is passing in a parade or in a review, all persons present should face the flag and stand at attention. Those present in uniform should render the appropriate salute… A dignitary may take the salute without a head dress,” the section states. - See more at: http://indianexpress.com/article/india/india-others/saluting-national-f…

In reply to by आजानुकर्ण

@आजानुकर्ण -Wednesday चित्रपटाच्या शेवटी निवेदक अनुपम खेर च एक वाक्य आहे . मराठीत ढोबळ भाषांतर अस , " मी तुम्हाला त्याच (नसीर च्या पात्राच ) नाव सांगणार नाही कारण नावात धर्म शोधतो ." त्यामुळे माणसाच्या नाव /आडनाव वरून त्याचा धर्म / जात शोधणारे लोक तुम्ही कितीही पोट तीडीकेने स्पष्टीकरण दिले तर ते मान्य करतील असे वाटत नाही .

In reply to by पिंपातला उंदीर

जोपर्यंत आडनावावरुन देशभक्तीवर - अगदी उपराष्ट्रपतींच्याही - शंका घेणारे महाभाग आहेत तोवर इंडियन मुजाहिदीन, आयएसआय, लष्कर ए तोयबा वगैरेंना काहीही काळजी करायची गरजच नाही.

In reply to by आजानुकर्ण

इथे आडनावाचा प्रश्न आहे हा शोध लावण्याइतका विदा या धाग्यातल्या प्रतिसादांत (ओढूनताणूनही) दिसत नाही ! अर्थात स्वतःची बाजू काहीही करून सिद्ध करण्यासाठी लॉजिक बाजूला ठेऊन असा धर्म्/जात्/आडनावाचा सद्य राजकारणमान्य कांगावा काही नविन नाही ! तेव्हा असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरं जाऊ द्या. आडनावाचा संबंध नसावा. उपराष्ट्रपतींवर विनाकारणच शिंतोडे उडवण्याचा हा एक व्यर्थ प्रयत्न मानून सोडून द्या. बाकी राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा. आम्ही म्हणतो तीच आणि तशीच देशभक्ती आणि तशी लेबले वाटत सुटणे ही नवी लाट इथे आलेली दिसते. काही दिवसांपूर्वी क्रिकेट ही एक देशभक्ती ही एक व्याख्या झाली. आता झेंड्याला सॅल्युट करणे हीच देशभक्ती ही नवी व्याख्या आली. उद्या छातीला आडवा हात लावून ध्वजप्रणाम एक- दोन- तीन! हीच देशभक्ती अशी ही नवी व्याख्या येईलच. नाहीतरी गीता हा राष्ट्रीय ग्रंथ होऊ घातलाच आहे.

In reply to by आजानुकर्ण

>>> बाकी राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा. दिग्विजय, मनिष तिवारी, निखिल वागळे, केजरीवाल, कुमार केतकर इ. निधर्मी विचारवंतांकडून नक्कीच हा प्रश्न आला असता.

In reply to by श्रीगुरुजी

उपरोल्लिखित विद्वानांचा या चर्चेत काय संबंध? उपराष्ट्रपती देशभक्त आहेत की नाही याची सिद्धता कुठपर्यंत आली तेवढे बघा.

In reply to by आजानुकर्ण

तुम्हीच विचारलं होतं की त्यांचं नाव स्वामी सच्चिदानंद असतं तर त्यांच्या देशभक्तीविषयी प्रश्न निर्माण झाला असता का. त्याच प्रश्नाचं मी उत्तर दिलंय. त्यांचं नाव काहीही असतं तरी प्रश्न निर्माण झालाच असता. त्यामुळे नावाचा आणि प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही.

In reply to by आजानुकर्ण

ते नंतर बोलू. आधी उपराष्ट्रपतींच्या नावाचा आणि देशभक्तीचा प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही हे पटलं का तुम्हाला ते सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

आधी उपराष्ट्रपतींच्या नावाचा आणि देशभक्तीचा प्रश्न निर्माण किंवा न निर्माण होण्याचा संबंध नाही हे पटलं का तुम्हाला ते सांगा.
नाही पटलं. हे माझं उत्तर. आता सांगा उपराष्ट्रपती देशभक्त आहेत की नाहीत ते.

In reply to by आजानुकर्ण

वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत माझे म्हणणे पुरेसे स्पष्ट केले आहे. पण तरीही व्यवस्थापनाचा वर लिहीलेला एक नियम परत एकदा इथे लिहीतो... कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्‍यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे. उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्‍या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे.
हो पण सॅल्युट करणे हे सावधान राहण्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे असे कुणी सांगितले आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते काय? ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय? ध्वजसंहितेचा नियम पुरेपूर पाळणे ही दुसरी शक्यता असू शकत नाही काय?

In reply to by आजानुकर्ण

७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय? अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :) हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ? आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मते हे खरं असावं. उपराष्ट्रपती मुद्दाम करतील असं वाटत नाही. त्यांच्याच बाजूला ओबामा उभे होते. त्यांनी सलाम करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळं आणि बाकीचे सलाम करतायत हे न जाणवण्यामुळं असं झालं असू शकेल. बाकी बरेच लोक सलाम करत नाहीत हे मी पाहिलंय कारण ताठ उभं रहाणं हे पुरेसं असतं.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अश्या स्थितितील व्यक्त इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! Smile
माफ करा थोडं कठोर बोलतो. प्रतिसादाचा विपर्यास कसा करावा याचे तुमचा प्रतिवाद हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. मूळ मुद्दा काय आहे? सॅल्युट न केल्यास 'देशभक्तीचा अभाव' ही एकच शक्यता उरते का? माझ्या मते नाही. हे दाखवून देण्यासाठी मी आणखी दोन शक्यता बोलून दाखवल्या इतकेच. त्याच शक्यता आहेत असे म्हटलेले नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादातही 'कदाचित' असे होऊ शकते असे म्हटले होते. वृद्ध व्यक्तीला विस्मरण होऊ नये असा नियम आहे काय? आणि अशा स्थितीतील म्हणजे नक्की कशा? भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा पदावर असतानाही त्यांचा वृद्धापकाळाने अनेकदा तोल जात असे. त्यामुळे भारताची नक्की काय वाईट स्थिती झाली बरे? आपल्या लोकशाहीत राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही नामधारी पदे आहेत. तिथल्या पदावरील व्यक्तींना निर्णय घेण्याचे स्वतंत्र हक्क नसल्याइतपत आहेत. तिथल्या व्यक्तींच्या वयाचा भारताच्या परिस्थितीवर काहीही फरक पडणार नाही हा माझा आशावादी दृष्टीकोण आहे. निर्णयक्षम पदांवर पुरेसे सुदृढ लोक आहेत की. उगीच कुठलातरी - नसलेला - तांत्रिक मुद्दा काढून एखाद्याची देशभक्ती चघळत बसल्याने आपले देशप्रेम सिद्ध होते की काय? हमीद अन्सारी यांची करियरची ओळख विकीवर पाहू शकता. भारतासाठी आयएफएसमार्फत त्यांनी पुरेसे योगदान दिलेले आहे असे दिसते. मग देशप्रेमाबाबतची शंका येण्याची कारण काय असावे बरे?
He started his career as Officer in the Indian Foreign Service in 1961. He was Permanent Representative of India to the United Nations, Indian High Commissioner to Australia and Ambassador to the United Arab Emirates, Afghanistan, Iran and Saudi Arabia.

In reply to by आजानुकर्ण

आधीचा प्रतिसाद संपादित करता येत नसल्याने आणखी थोडी भर. किंबहुना आयएफएस सर्विसेसमध्ये सगळी करियर गेल्याने उपराष्ट्रपती महोदयांना हे सर्व संकेत, प्रोटोकॉल्स यांची चांगली ओळख असावी. आंतरजालीय जनतेपेक्षा या सर्व संकेतांचे ज्ञान - विशेषतः कोणत्या गोष्टीने राष्ट्राच्या प्रतीकांचा सन्मान होतो व अपमान होतो हे ज्ञान - त्यांना निश्चितच जास्त असावे यात काहीच शंका नाही. अर्थात भारताचे राष्ट्रपती कोण हेही माहीत नसलेली पब्लिक 'हमीद मोहम्मद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्युट केला नाही' अशा आशयाचे संदेश - फोटोसकट- व्हॉट्सॅपवर कोणत्या उद्देशाने पाठवत असणार हे सांगायलाच नको. तरी बरं, मोदींनी फेटा घातला तसा अन्सारीसाहेबांनी अंडा क्याप वगैरे घालून हा सोहळा अटेंड केला नाही ते. असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हेदेखील अटेंशन पोझमध्येच होते. (सॅल्युट न करता) असे दिसते. हमीद अन्सारी यांना जे कोणी सिंगल आऊट करत आहे त्यांचा हेतू काय असावा हे चटकन समजते. (दिल्लीच्या निवडणुका जवळ आल्याच आहेत). http://www.firstpost.com/living/trolling-hamid-ansari-over-republic-day… प्रतिसाद तुम्हाला म्हणून उद्देशून दिलेला नाही. जस्ट एक माहिती म्हणून वर एक दुवा दिला आहे.

In reply to by आजानुकर्ण

It didn't matter that Kiran Bedi was standing at attention while a security personnel held a umbrella over her head.
=)) ह्या महोदया दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहेत म्हणे. वर दिलेला दुवा वाचाच.

In reply to by आजानुकर्ण

अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय तो व्हिडीओतली (बहुधा दूरदर्शन टीव्ही) फ्रेम screen shot स्वरुपात आहे असे वाटते. सिलेक्टिव्ह ॲंगल आणि नेमके ठराविक लोकच फ्रेममधे दिसतील अश्या बेतानेच तो घेतलेला दिसतो. जरा झूम्ड आउट सीन घेतला असता तर सॅल्यूट न केलेले इतर अनेक दिसले असते अन हा प्रश्न उभा करता आला नसता. लोकांना काय ? सनसनीखेज वाटते अन पुढे ढकलतात.

In reply to by गवि

एका व्यक्ती विशेषाला मुद्दाम टार्गेट करण्यासाठी फोटो फॉर्वर्ड करण्याच्या कुरापती केल्या आहेत कुणितरी.

In reply to by आजानुकर्ण

राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी सच्चिदानंद' वगैरे असते तर हा प्रश्न आला असता का हे प्रामाणिकपणे सांगा. हा प्रश्न फारच अस्थायी वाटला. अन्सारी मुसलमान असल्याने त्यांनी असे केले असे कोणीही म्हटलेले नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचेच झाले तर मी म्हणेन की हो सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया कदाचित स्वामी सच्चिदानंदांसाठीही तिच असली असती. काही काळापुर्वी लालू प्रसाद यादव राष्ट्रगीत वाजवले असताना बसुन राहिले होए (उभे देखील नव्हते) तेव्हा त्यांच्यावरही बरीच टीका झाली होती. त्यांनीही बहुधा असेच काहितरी स्पष्टीकरन दिले होते. पण टीका झाली होती हे अमान्य करता येणार नाही. लालू प्रसाद यादव देखील हिंदुच आहेत.

अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस हेच फार मोठे थोतांड आहे. लोकशाही ही व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी चालविलेला एक मोठा व्यापार आहे त्यात निवडणुका एक फार्स आहे . दर निवडणुकीला एक बाहुला तेथे प्रेसिडेंट पदी आणून बसवतात प्रत्यक्षात सर्व धोरणे ही व्यापाऱ्यांची प्रेशर लॉबी घडवून आणते.शेवटच्या दोन वर्षात ह्या बाहुल्याची चिरफाड करण्याचा अमेरिकन जनतेचा , प्रसार माध्यमांचा एककलमी कार्यक्रम असतो.तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ओबामा भारतात सौदी आणि मिळेल तिथे जाईल , त्याला शेवटच्या दोन वर्षी मिळणारे शिव्या शाप त्यांच्या सुरवातीच्या दोन वर्षात मिळाले आहे , भारतात निदान राजकारणी उद्योग आणि नाना धंदे करतात पैसे कमावतात . राजकारण हाच वंश परंपरागत उद्योग असतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या निवृत्ती वर बंधने नाहीत. अमेरिकेत दहा वर्षाने नवीन बाहुला येतो तेव्हा जुना मोडीत काढतात ,आता बिल क्लिंटन भारतात आला काय केला काय , हिलरी एवढे महत्व सुद्धा त्यास मिळणार नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

सत्ता गेली की संपले रे निनाद्या. अटलबिहारी उद्या सिंंगापूरला वा मनमोहन कौलालंपूरला गेले तर बातमी होईल का? पण नरेण्द्र शनी शिंगणापूरला आला तर मात्र बातमी होईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हि माई सगळ्याच मिपाकरांचा एकेरी ऊल्लेख करते जणूकाही हिने सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळवले आहे. कोणीही मिपाकर याची दखल न घेता माईची खिल्ली उडवतात तो भाग वेगळा. पण देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी ऊल्लेख नक्कीच खटकणारा आहे. तेव्हा सं.मं. ने माईच्या वरच्या प्रतिसादातले शेवटचे वाक्य ऊडवावे आणि माईला जाहिररित्या योग्य समज द्यावी.

In reply to by भाते

अरे यार... कशाचाही इशू करतात लोक. आता माई हा आयडी आपण ७०-८० ची म्हातारी आहोत असं भासवतो आणि म्हणून जनरल प्रत्येकाला अरे तुरे करतो. प्रत्यक्षात त्या आयडीचा/ची धनी अशी म्हातारी नाही हे कोणीही सांगेल. बर हा आय्डी काही वाह्यात अश्लील, आगलाऊ असलं काही लिहित नाही. मला या आयडीचे प्रतिसाद गंमतशीर वाटतात. वाचून मजा येते कधी कधी. उगाच समज देणं वगैरे म्हणजे फार ओव्हर रिअ‍ॅक्षन आहे.

In reply to by अनुप ढेरे

>>> आता माई हा आयडी आपण ७०-८० ची म्हातारी आहोत असं भासवतो आणि म्हणून जनरल प्रत्येकाला अरे तुरे करतो. प्रत्यक्षात त्या आयडीचा/ची धनी अशी म्हातारी नाही हे कोणीही सांगेल. माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे. आपण व ग्रेटथिंकर (आणि पूर्वाश्रमीचे नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, सचीन, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर इ. आयडी) हे आयडी एकच आहोत हे इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून पूर्णपणे वेगळ्या बेअरिंगमधून माईसाहेबच्या आयडीने तो प्रतिसाद लिहितो.

In reply to by श्रीगुरुजी

पण ते बेअरींग माईसाहेबांनी इतका दीर्घ काळ सांभाळलेलं आहे आणि त्यांचे प्रतिसाद देताना त्यांचा तोल जात नाही हे तर मान्य करावंच लागेल.

In reply to by काळा पहाड

मला तरी माई = ग्रेट थिंकर/नेफळे असं अजिबात वाटत नाही. तुम्हीच ते इतकं ठामपणे कसं सांगत ते समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

माईसाहेब फक्त स्वतःच्या "ह्यांचा" आदरार्थी उल्लेख करतो आणि इतरांचा एकेरी उल्लेख. आपण १९ व्या शतकातली थेरडी आहोत असे तो भासवत असला तरी प्रत्यक्षात तो ४० च्या आतला तरूण आहे.
तो तरुण आहे हे तुम्हाला कसे माहीत ?? ती तरुणी (स्त्री) पण असू शकते (आहेच असे आमचे व्यक्तिशः मत आहे).. :)

In reply to by काळा पहाड

ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा लावत असेल.. ;) बादवे .. आमाला खात्री आहे की नाना आणि माई या आयडीमागे स्त्री आहे.. *yes3*

In reply to by हाडक्या

ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा लावत असेल.. Wink
खिक्क...बहुतेक आपल्या चश्म्याचा नंबर सारखा असावा :)

In reply to by काळा पहाड

नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो म्हणून म्ह्ण्लं.
हा "अंदाज" तुम्ही कोणत्या लॉजिकने लावलाय हे जरा इस्कटून सांगता का?...का उग्गीच इकडे तिकडे काड्या

In reply to by काळा पहाड

तुम्ही टका चा चष्मा लावायला लागला का?
इथे माझा संबंधच काय?...च्यायला उग्गीच स्वताला जे वाटते तेच खरे असे असेल तर तुमचे विचार ...जौदे

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अस नाही माई भारतात जर येगळ आहे.सत्तेत नसून केजू युवराज कुठेही जाऊ बातमी होते. दक्षिणेत अम्म्मा व करुणानिधी सत्तेचा खोखो खेळतात म्हणूनच सत्तेत नसतांना सुद्धा त्यांना सरकारी यंत्रणा मान देत .आपली घटना तिरडीवर जाई स्तोवर एखाद्यास राजकारण करू देते , अमेरिकन नियम आपल्याकडे असता तर नेहरू व इंदिरा पर्वच निर्माण झाले नसते.

In reply to by निनाद मुक्काम …

अमेरिकन प्रेसिडेंट जगातील सर्वात शक्तिमान माणूस हेच फार मोठे थोतांड आहे.
हे तुम्ही गंमती गंमती मध्ये म्ह्णताय असं म्हणून सोडून देतो. कारण ओसामाला ओबामाची पहुंच फार उशीरा कळाली. पाक्यांना घंटा धूप न घालता ओसामाला त्याच्या घरात घुसून मारायची आज्ञा द्यायला तो अमेरिकेचाच प्रेसिडेंट असावा लागतो. आपण अजून दावूदचे आणि कसाबच्या हँडलर्स चे पुरावेच देतोय.

माईने कोणाही मिपाकराला अरेतुरे करावे यावर माझा अजिबात आक्षेप नाही आहे. माझा आक्षेप केवळ शेवटच्या वाक्यावर आहे. "पण --- शनी शिंगणापूरला 'आला' तर मात्र बातमी होईल." त्यांच्या वयाचा नाही पण किमान त्या पदाचा मान राखणे तरी अपेक्षित आहे. (माझे वैयक्तिक मत) माझा प्रतिसाद अयोग्य वाटत असल्यास सं.मं. ने तो अवश्य ऊडवावा.

In reply to by भाते

इथे अनेक माजी पंत प्रधानांवर इतक्या खालच्या भाषेत टीका झालेली आहे कि सांगावीशी पण वाटत नाही . जे पेरल ते उगवलं . अवांतर - सध्या मोदी यांच्यावर वर पण सोशल नेट्वर्किंग वर अतिशय वैयक्तिक आणि खालच्या पातळीची टीका चालू आहे . अर्थातच ते चुकीचे आहे . पंतप्रधान या पदाची एक गरिमा आहे . तिचा सन्मान व्हायलाच हवा . पण पुन्हा तेच . पेरल ते उगवलं .

ह्या गुर्जींना नाय काय काम. काय गरज होती का तो कंस टाकायची...छ्या !!! ;)

आपला टर्न येईपर्यंत शिस्तीत रांगेत उभं राहणं चांगल की बेस्टची बस अथवा लोकलमध्ये चढताना जशी रेटारेटी करतात तसं करण अपेक्षीत आहे? अब्जाधीश असले म्हणून काय झालं? रांगेचा फायदा सर्वांना.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी तुम्हीच विचारलंय पटलं की नाही ते. तुम्ही 'काय पटलं की नाही' हे विचारलं. तेच पटलं नाही. तुमचाच प्रश्न एकदा पुन्हा एकदा वाचा की राव.

In reply to by आजानुकर्ण

काय व का पटलं नाही ते जरा स्पष्ट करा ना, म्हणजे तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर देता येईल.