Skip to main content

आरती

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 17/01/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे." मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना." मी प्रयत्न केला. -------–------------------ अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी तुझा तांब्या मी वाहीन तुझाच दास मी होईन गायछापाचा नैवैद्य तुजला जिलबीचा प्रसाद दे मजला जरी थांबेन मी दाबून नीट आतल्या आत पडेल पीठ येऊ दे माझी तुला करुणा लल्लल्लल्लल्ललू दयाघना अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी
लेखनविषय:

वाचने 14682
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

आरती चंगली लिहिता हो तुम्ही धण्याजी. आता तुम्हाला आत्माजींच्या शिष्यगणंगात स्थाण णक्की मिळेल.

=)) =)) =))

In reply to by बॅटमॅन

"ठंठंठठंठं" च्या आठवणीमुळे कालिदासाच्याच "गुलुगुग्गुलुगुग्गुलु" ची आठवण झाली. जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले | कपिकम्पितशाखाभ्यो गुलुगुग्गुलुगुग्गुलु || वानरांनी जांभूळववृक्षाच्या फांद्या गदागदा हलवल्यामुळे पक्व झालेली जांभळे पाण्यात पडून 'गुलु गुग्गुलु गुग्गुलु' असा आवाज येत आहे. =))

In reply to by बॅटमॅन

+१ आणि नंतर त्या कवींची राजसभेत चेष्टामस्करी झाल्याने ते नाराज झाल्यानंतर कालिदासाने त्यांना; "जलमध्ये डुबुक् डुबुक्" ऐवजी "जालगोलिका शंकये" असा फरक करायला सांगून राजसभेत बक्षीस मिळवून दिले अशी कथा ऐकली होती.

In reply to by बॅटमॅन

जलमध्ये डुबुक डुबुक हे अगदी अलीकडचे संस्करण असावे कारण हे दोन्ही शब्द मराठी आहेत. डुबुक हां नादवाचक शब्द असला तरी संस्कृतात कुठे वापरलेला पाहिला नाही.

In reply to by प्रचेतस

जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच नाही. (अमुकतमुक)मध्ये अशा प्रकारची रचना संस्कृतात कैक ठिकाणी आढळते, उदा. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत - गीता. जलमध्ये असा सर्च दिल्यावरही कैक उदा. दिसतात. https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A… बाकी ध्वनिवाचक शब्दाकरिता डुबुक् हा शब्द खास मराठी आहे हे खरेच. पण तेवढ्यावरून तो अंदाज बांधता येईलसे वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

जलमध्ये हा शब्द/रचना मराठीच नाही. हेच सांगायला येत होतो. मराठीत ते जलामध्ये असे होईल. बाकी, ही गोष्ट बहुतेक हायस्कूलातल्या संस्कृत अध्यापकांनी सांगितली होती... कालिदासाचे माणूस आणि कवी म्हणून मोठेपण दाखवायला. जांभळाची फळे आणि मासेमारीसाठी वापरलेल्या जाण्यार्‍या जाळ्यांच्या शिश्याच्या गोळ्या यातील साधर्म्य पकडून आणि त्याचबरोबर "मासे जाळ्याच्या गोळ्या समजून पाण्यात पडलेल्या जांभळांना खात नाहीत" ही अफलातून कवीकल्पना वापरून, काव्याची एकच ओळ बदलल्याने, संपूर्ण चारोळी काव्याच्या वरच्या स्तरावर गेली आहे ! ...मग हे काम स्वतः कालिदासाने केले असो वा नसो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे बघा. http://www.misalpav.com/node/25004 इथे ते तीनही श्लोक आहेत. यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः | नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः || आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

In reply to by चौकटराजा

समास वगैरे मी साफ विसरलो बगा. पुन्हा रिव्हिजन करावी लागतीय आता. तुम्ही म्हणताय ते बरोबर वाटतंय पण कन्फर्म नाही.

In reply to by सूड

सुड्राव, पुरण घालून केलेली पोळी असा विग्रह करून मध्यमपद लोपी समास हा बरोबर आहे. पण त्याची तुलना जलमध्य या शबदाशी होत नाही. मध्य अशी काही एंटीटी नाही. डोंगरमाथा -( डोंगराचा माथा-) हा जसा शब्द आहे तो षष्ठी तत्पुरूष आहे. तसेच जलाचा मध्य-जलमध्य. षोडषे वर्षे ही जशी सप्तमी तसेच 'जलमध्ये' हा शब्द .

पहिल्या चार ओळीत खपल्या गेलो आहे. :) -दिलीप बिरुटे

सगाश्रींना तांबी... आपलं तांब्यासंप्रदायातला सुपरशिष्योत्तम असे बिरूद देण्यात येत आहे हे झाईर कर्ण्यास आमाला अत्यानंद होत हाये होssssssssssssssssssss

स.गा. http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw022.gif जी राव वाकडे तुमचे थोबाड करा इकडे http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry011.gif रोकेल्चा एक डबा आणि जाळायला http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent028.gif लाकडे! ========= कारण नसताना काढली माझि खोडी .......................http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent001.gif ही घ्या तुमच्या टाळक्यात हातोडि!

In reply to by अत्रुप्त आत्मा

झालं गेलात आमच्या गुरुजींच्या वाटेला आता "मला स्थान द्याना गडे" असे म्हणुन धुमाकुळ घालु नका तुमला तुम्हला आता बाबाजीचा ठेंगा. 1

बाबौ !! आरतीपुस्तक छापावे लागेल !! रच्याकने ! मीबी कळव्याचाच रहीवासी आहे. पण मी नाय फोन केला हा...

In reply to by खटपट्या

ते वेगळे. त्यांचा गुरुजींवर फार जीव. एकदा पुण्याला आले असता गुरुजींनी त्यांना भेटायचे वचन देऊन ऐनवेळी अपेक्षाभंग केला. हे शल्य उरी ठेवून त्यांनी एकलव्याच्या निष्ठेने तांब्याभ्यास सुरु ठेवला. आज ते तांब्या संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जातात.

In reply to by सतिश गावडे

दुसरी गोष्ट : टका ता मनाचे (माझ्या) श्लोक लिहा हे सुचवतायत. *ACUTE* आता पहिली गोष्ट यात "भांडे का लपविता" हा शब्द प्रयोग का हुकला. ;-) ;) (का राखून ठेवलाय पुढच्या आरतीसाठी ?) बुवाज भक्तगण नेह्मी निशाणी डावा अंगठा संघ.

In reply to by नाखु

बुवाज भक्तगण नेह्मी निशाणी डावा अंगठा संघ.
हे चूक बुवा'ज भक्तगण नेह्मी निशाणी गायछाप अत्तर संघ. असे हवे ;)

In reply to by खटपट्या

मी एकदम कळलाव्याचा निवासी वाचले. जवळच रहाणार्‍या एका नारदाकडे तुम्ही पेंइंग गेष्ट म्हून आलेत की काय अशी श़ंका आली !

>> अत्रुप्त आत्मा माझे आई >> स्थाण दयावे तुझे पायी हे बेळगावी लिखाण आहे :D

आरती वाचली. तक्राद अशी की मीट्रात गंडलीय. गाता आली पाहिजे न अडखळता. बरं तांब्या पंथ नक्की कोणता ? एक तांब्या जिलबीचा बरोबर आहे दुसरा कोणता तरी आहे ना ? तुम्ही नक्की जिलबीकर लेखकांच्या बाजूचे की तांब्याकर कवी अ. आ चे . असो. बाराव्या शतकात एक महान संतकवि होऊन गेले .पंथाने त्याना " पुरूष" असूनही माउली म्हणून संबोधले. तुम्ही आई या शब्दाचा वापर करून इतिहासाची पुनरावृत्ति केलीय. धन्य तो भक्त धन्य धन्याची माउली !!!!!!!

In reply to by सतिश गावडे

कंपु म्हणजे कंड पुरक रे . काही लोकांना अध्यात्माचा कंड असतो , काहींना मानसशास्त्राचा , काहींना लेण्या पाहण्याचा , काहींना उदारमतवादाचा तर काहींना संस्क्रुताभ्यासाचा वगैरे वगैरे. तर असा ह्या विषयांवर चर्चा करण्याचा कंड ज्या घोळक्यात विशेष हरकत न घेता पुरवला जातो त्याला म्हणतात कंपुरक अर्थात कंपु =))

In reply to by प्रसाद गोडबोले

@म्हणतात कंड पुरक अर्थात कंपु>> =))))) अशुद्ध लेखन शास्त्रानुसार तुमची व्याख्या बरोबर,आणि बेशुद्ध लेखनशास्त्राणुसार आमची! :-D

In reply to by प्रसाद गोडबोले

हे तर चांगलेच आहे की. "वादे वादे जायते तत्वबोध" किंवा उगाच चकाटया पिटण्यापेक्षा हे बरं आहे. मी जेव्हा आठवीला होतो तेव्हा ("मी जेव्हा बोटीवर होतो तेव्हा" हे पुन्हा पुन्हा वाचल्याचा परीणाम) माझे शंभर मार्कांचे संस्कृत होते. तेव्हा सुभाषितमाला नामक प्रकारात रटलेला एक श्लोक आठवला या निमित्ताने:
काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छती धीमताम व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा
पण हा कंपू बनवायचा कसा?

In reply to by सतिश गावडे

कंपू बनवायचा नसतो. तो आपोआप बनत असतो. कंपूभावणांशी जुळवून न घेऊ शकणारे बाजूला पडतेत.

In reply to by प्रचेतस

@कंपूभावणांशी जुळवून न घेऊ शकणारे बाजूला पडतेत.>>> कचकून सहमत हाय! कंपूत आल्यावर सहज विलिन होणारा- आत्मू मिसळकर.

In reply to by अत्रुप्त आत्मा

कंपूत आल्यावर सहज विलिन होणारा
>>> नकळत पणे तुम्ही सगाजीरावांच्या हातात कोलीत दिले आहे , आता पुढील कट्ट्याला ते महाआरतीचा घाट घालणार बघा १००% =))

In reply to by सतिश गावडे

कंपू म्हणजे,आपली टोळि सोडुन इतरांचे नाव सहभावाने मधे येताच ज्यांच्या अंटर्मणास कंप सुटून,त्यातून व्यक्तिवादाच्या दुर्गंधिचि घाण येते... अश्या व्यक्तिंच्या टोळिसमुहास कंssssपू ( :P ) असे म्हणतात. =))

In reply to by सूड

हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.सतिश गावडे आणी त्यांचे कळव्याचे मित्र यांचा सत्कार आरती ओवाळुन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

In reply to by सतिश गावडे

सर्व अवतारांची लिस्ट असेल नाही तुझ्या कडे ? असो तुमच्या अवतारानंतर ३ महिन्यांनी आमचा मिपावरती प्रवेश झाला होता. म्हणजे हा अवतार आमचा समकालीन असल्याने आमचा प्रवेश पावन झाला असे म्हणावे लागेल.. धनाजीराव हा अवतार काय करतोय मग ?

In reply to by गणेशा

गणेशा तो त्याचा एकच अवतार नाहिये हो! हे पहा....

"आधी होता फटु मग झाल्या धन्या" डु आयडींचा पायघोळ झगा" कसा रे सावरतोस तु सगा?"


बघा भौ नाहीतर तो पायघोळ सावरता सावरता पाय अडकुन पडशील. +)) रचल्याने :- या पायघोळ झग्याची लांबी कीती आहे हो? नाही म्हणजे त्या हिंग्लीशच्या राणीसारखं मागे दोन टंकनिका ठेवौन द्या ना गडे तो झगा सावरायला. +))

In reply to by प्रमोद देर्देकर

फिकर नॉट. मी हे आयडी "वन आयडी अ‍ॅट अ टाईम." या तत्वावर चालवतो. त्यामुळे पाय अडकण्याचा प्रश्नच नाही. किंबहूना हे तिन्ही माझे आयडी आहेत हे सार्‍यांना माहिती असल्याने ते रुढार्थाने डुआयडी नाहीत. डुआयडीमध्ये आयडीमागची व्यक्ती अज्ञात असते. :)

=)) =)) झॅक...पहिल्या ६ ओळीतं वारलो गेलोय...गायछापचा नैवेद्य... =)) अग्गागाग्गाग्गगगग्ग!!! =))