✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

प
पाहावे मनाचे यांनी
Fri, 01/16/2015 - 11:22  ·  लेख
लेख
मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे. याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील. आम्हाला घोषित करायला अत्यंत आनंद होतोय की दृकश्राव्य कलाकृतींसंबंधित लेखनाला वाहिलेले "पाहावे मनाचे" हे संस्थळ चालू करत आहोत. या संस्थळावर आता कोणत्याही भाषेतल्या चित्रपटांशी, टीव्ही मालिकांशी व नाटकांशी संबंधीत, मराठीतून लिहिलेले लेखन - मुख्यतः परीक्षणे - प्रसिद्ध होतील. या नव्या जमान्यात मराठी प्रेक्षकाची दृकश्राव्य मनोरंजनाची भूक, इतर कोणत्याही प्रेक्षकाइतकीच, विस्तारलेली आहे. नुकताच झालेल्या 'पिफ' (पुणे फिल्म फेस्टिवल) असो किंवा मग नवा वा जुना चित्रपट असो किंवा बॉलीवूड, हॉलिवूड, टॉलिवूड असो, किंवा मराठी चित्रपट असो किंवा अन्य भाषिक जागतिक चित्रपट असो, त्यांच्या विषयी तसेच प्रसंगी नाटक, टीव्ही मालिका यांच्याविषयी मराठीतून केलेले लेखन वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आम्हाला आहे. विविध माध्यमांतून असे लेखन बरेच वाचायला मिळते हे खरे असले, तरी ते फक्त व्यावसायिक व प्रसिद्ध चित्रपटांचे असते. कधी अश्या लेखनाचा दर्जा आणि मत हे अनेकदा "मिडिया पार्टनर"च्या चष्म्यातूनही बदललेले आहे का? अशीही शंका येऊ लागते. शिवाय चित्रपट परीक्षण हे निव्वळ कथेच्या परीक्षणांपेक्षा बाहेर जाऊन तांत्रिक अंगांसकट पूर्ण चित्रपटाचे परीक्षण असावे अशीही इच्छा असते. यातूनच मनातून थेट उतरलेले आणि चांदण्यांच्या औपचारिकतेपेक्षा दिलखुलास व प्रांजळ मत मांडणारे हे संस्थळ काढत आहोत. या संस्थळावर सध्या लेखक मोजके व निवडक असले, तरी भविष्यात पाहुणे बोलावून अधिकाधिक चित्रपट व नाटकांचा परिचय मराठी प्रेक्षक-वाचकांना करून देण्याचा मानस आम्ही बाळगून आहोत. वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या शैलीत नि वेगवेगळ्या घाटांमध्ये लिहिलेली परीक्षणं, सर्च व्यवस्था आणि शक्य त्या त्या प्रकारे सिनेमाबद्दल लिहिण्याची खुजली - असा सगळा मासला असेल. वाचकांना, त्यांचे काही सोशल नेटवर्किंगचे आयडी वापरून, प्रतिक्रिया द्यायची सोय देखील आहेच. तर या नव्या संस्थळावर तुमचे स्वागत करण्यासाठी, तुम्हाला हार्दिक आमंत्रण देण्यासाठी हा धागा काढत आहोत. त्याच बरोबर जर तुम्ही एखादा चित्रपट व/वा नाटक पाहिलेत व त्याचे दीर्घ परीक्षण (किमान २०० शब्द) लिहायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. आमचा पत्ता आहे pahawemanache@gmail.com. नव्या चित्रपटांसोबत, एखाद्या जुन्या परंतू तुमच्या आवडत्या/नावडत्या चित्रपट/नाटकांविषयी लेखनही तुम्ही इथे पाठवू शकता. तोवर या आमच्या नव्या प्रयोगाला सर्वाधिक गरज तुमच्या शुभेच्छांची आणि प्रतिसादांची आहे. त्याचबरोबर या संस्थळाच्या फेसबुक / ट्विटर पानाला लाईक करून जोडल्यास इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनाची सुचनाही तुमच्यापर्यंत पोचेलच. आशा आहे हा नवा अ-व्यावसायिक प्रयोग तुम्हाला आवडेल व दर आठवड्याला नवनवीन लेखनासाठी "पाहावे मनाचे" हा तुमच्या चित्र-जगताशी जोडणारा दुवा ठरेल! मते सर्वथा माध्यमांच्या भरोसे चोखंदळा कौतुक क्रिटीकाचे फसवता न येई रे ऐशा रसिका ऐकूनी जनांचे ठरवितो मनाचे तया पाहू वाटे सिनेमा झकास पहाया न मिळता वाटे भकास सकाळचा शो? बहु द्रव्य वाचे! तेही न जमता, टोरेण्टच खास नसे वावडे रे तयाला कशाचे मनी पाडिले ना कसलेही साचे शाहरुख अपुला तसा ब्रॅड पिटही तयाच्या मनी प्रेम ते अस्सलाचे फिल्मी चक्चकाटास भुलणार नाही रिव्ह्यूची तयाला तमा फार नाही अश्या रसिकाचे असे घोषवाक्य ऐकूनि जनांचे पाहावे मनाचे! पुनश्च स्वागत!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
नाट्य
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
बातमी
संदर्भ
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
13200 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

शुभेच्छा.

कलंत्री
Fri, 01/16/2015 - 11:38 नवीन
प्रयोग / उपक्रम यशस्वी होवो.
  • Log in or register to post comments

खूप छान वाटले आपले संकेतस्थळ

खटपट्या
Fri, 01/16/2015 - 11:50 नवीन
खूप छान वाटले आपले संकेतस्थळ !! शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

पाहुन आलो मस्त आहे.

राजाभाउ
Fri, 01/16/2015 - 11:57 नवीन
पाहुन आलो मस्त आहे. शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

पियुशा
Fri, 01/16/2015 - 12:18 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 12:21 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! नवीन आणि उत्तम काही

बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/16/2015 - 12:24 नवीन
शुभेच्छा! नवीन आणि उत्तम काही तरी वाचायला मिळावे हीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

सविता००१
Fri, 01/16/2015 - 12:41 नवीन
शुभेच्छा ! बिकांशी बाडिस
  • Log in or register to post comments

इकडेही लिहित रहा

सौंदाळा
Fri, 01/16/2015 - 13:00 नवीन
इकडेही लिहित रहा सदस्यकाळ : २ दिवस ४ तास फक्त नविन संस्थळाची जाहिरात करण्यासाठी मिपाखाते काढले नसावे ही अपेक्षा. नविन संस्थळास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

पाहिले

धर्मराजमुटके
Fri, 01/16/2015 - 13:07 नवीन
पाहिले. संस्थळावर सभासद बनून थेट लिखाण करण्याची सुविधा नसल्यामुळे सध्यातरी पास. मात्र नजर ठेवली जाईल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

अजया
Fri, 01/16/2015 - 13:47 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

नाखु
Fri, 01/16/2015 - 14:02 नवीन
पाहावे मनाचे | वाचावे मिपाचे | आस्वादा दोन्हीकडे | किर्ती (वाढो) चोहिकडे !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! comment करण्याची

विशाखा पाटील
Fri, 01/16/2015 - 14:12 नवीन
शुभेच्छा! comment करण्याची सुविधा दिसतेय.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/16/2015 - 14:32 नवीन
शुभेच्छा! :HAPPY:
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ! मराठीत दृकश्राव्य

पिंपातला उंदीर
Fri, 01/16/2015 - 15:02 नवीन
शुभेच्छा ! मराठीत दृकश्राव्य कलाकृतीं या विषयाला वाहिलेल्या संकेतस्थळाची खूप आवश्यकता होती . अगदी योग्य वेळेस घेतलेला योग्य निर्णय .
  • Log in or register to post comments

मराठीत दृकश्राव्य कलाकृतीं

अनुप ढेरे
Fri, 01/16/2015 - 20:34 नवीन
मराठीत दृकश्राव्य कलाकृतीं
अंहं कोणत्याही भाषेतल्या चित्रपटांशी, टीव्ही मालिकांशी व नाटकांशी संबंधीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

शुभेच्छा

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 01/16/2015 - 15:24 नवीन
शुभेच्छा...छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments

ते ठीकाय, पण नाव जरा अजून

सूड
Fri, 01/16/2015 - 15:26 नवीन
ते ठीकाय, पण नाव जरा अजून चांगलं नै का सुचलं हो? *mosking*
  • Log in or register to post comments

छान कल्पना

चेतन677
Fri, 01/16/2015 - 18:21 नवीन
खुप शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम आहे.शुभेच्छा!!!

साधा मुलगा
Fri, 01/16/2015 - 18:39 नवीन
चांगला उपक्रम आहे.शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!!

मुक्त विहारि
Fri, 01/16/2015 - 18:46 नवीन
शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!!

शिद
Fri, 01/16/2015 - 18:53 नवीन
शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

चांगली कल्पना!

विकास
Fri, 01/16/2015 - 19:42 नवीन
प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सुंदर कल्पना, खूप खूप

सौन्दर्य
Fri, 01/16/2015 - 20:29 नवीन
सुंदर कल्पना, खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

फारएंड लिहिणार का

भाकरी
Fri, 01/16/2015 - 21:27 नवीन
तुमच्या सायटईवर? नाय तर आमी नाय जा येणार तिथे.
  • Log in or register to post comments

नवीन संस्थळ पाहिले. छान आहे.

एस
Fri, 01/16/2015 - 23:02 नवीन
नवीन संस्थळ पाहिले. छान आहे. आवडले. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लोकमान्य

मंदार कात्रे
Sat, 01/17/2015 - 17:39 नवीन
लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचे या सन्स्थळावर असलेले परीक्षण आक्ष्व्पार्ह आहे
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

साती
Sun, 01/18/2015 - 23:37 नवीन
संस्थळाचे स्वरूप आवडले. लेख अजून वाचायचे आहेत. प्रकल्पाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!!

समिर२०
Sun, 01/18/2015 - 23:42 नवीन
शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

आभार!

पाहावे मनाचे
Tue, 01/20/2015 - 09:37 नवीन
सर्व मिपाकरांचे शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. लवकर अधिक चित्रपटांची परिक्षणे येत रहातील. विविध प्रकारची, शैलीतील, लेखकांची नानातर्‍हेची नी हरतर्‍हेची परिक्षणे, चित्रपट/नाट्य/टिव्ही मालिका यांसबंधित प्रांजळ व थेट मनातून आलेले लेखन वाचकांना मराठीतून वाचायला मिळावे या भुमिकेतुन आमचे प्रयत्न चालु रहातीलच. या निमित्ताने हे ही सांगणे अगत्याचे आहे की मिसळपाव (व ऐसीअक्षरे) या संस्थळांवरील "पाहावे मनाचे" हा आयडी केवळ या संस्थळासंबंधीत लेखनासाठी घेतलेला आयडी आहे. आम्हाला तसा आयडी घेऊ दिल्याबद्दल व या धाग्याद्वारे नव्या मराठी संस्थळाची घोषणा येथे ठेवल्याबद्दल मिसळपावच्या संपादक मंडळाचे व नीलकांतचे मनःपूर्वक आभार! सर्व मिपाकरांचा असाच लोभ असावा किमान क्षोभ नसावा :) ही विनंती! प्रोत्साहन, सुचना व शुभेच्छांबद्दल पुनश्च आभार!
  • Log in or register to post comments

ओकार्‍या

कपिलमुनी
Tue, 01/20/2015 - 11:49 नवीन
परीक्षण म्हणजे ओकार्‍या नाही ओ ! दर्जा सुधारा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाहावे मनाचे

माफ करा , काही परीक्षणे वाचली

स्पा
Tue, 01/20/2015 - 11:12 नवीन
माफ करा , काही परीक्षणे वाचली आत्तापर्यंत, दर्जा अतिशय सामान्य वाटला, \ जमल्यास घरचा अभ्यास म्हणून येथील परा, फारेंड,समीरसूर यांची परीक्षणे वाचा
  • Log in or register to post comments

+१

सूड
Tue, 01/20/2015 - 15:06 नवीन
घरचा अभ्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

'स्पा'साहेबांशी सहमत आहे. मला

विशाल कुलकर्णी
Tue, 01/20/2015 - 16:45 नवीन
'स्पा'साहेबांशी सहमत आहे. मला आधी वाटले कदाचित 'लोकमान्य' खूपच नावडला असेल, म्हणून मग इतरही काही परि़क्षणे वाचून पाहिली. पण बहुतांशी सगळी परि़क्षणे "फक्त" 'मला असे वाटते' या प्रकारातली वाटली. असो. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शुभेच्छा !

psajid
Tue, 01/20/2015 - 11:30 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

चित्रपट संस्कृतीचा विजय असो.

कलंत्री
Tue, 01/20/2015 - 17:45 नवीन
मराठीमध्ये चांगले चित्रपट येत आहे. त्याला पुरक आणि प्रेरक म्हणून चित्रपट संस्कृती वाढली(च) पाहिजे. अशी संस्थळे हे कार्य सोपे करतील अशी अपेक्षा आहे. बर्‍याच वर्तमानपत्रात चित्रपटाविषयी भरभरुन येत असते. त्याच्याही संकलनासाठी येथे वाव असावा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

पदम
Tue, 01/20/2015 - 18:46 नवीन
मनापासुन शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

पैसा
Tue, 01/20/2015 - 22:18 नवीन
एक लेख आदिजोशीमुळे वाचला. काही वरवर चाळले. लिखाणाच्या शैलीवरून काही लेखकांबद्दल अंदाज आला. पण आंतरजालावरील आपली नेहमीची ओळख लपवायची वेळ या मंडळींवर का आली हे कळले नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

विशाल कुलकर्णी
Wed, 01/21/2015 - 13:10 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नव्या संस्थळाला शुभेच्छा.

मृत्युन्जय
Wed, 01/21/2015 - 13:34 नवीन
नव्या संस्थळाला शुभेच्छा. संकल्पना आवडली. अश्या एका संस्थळाची गरजच होती. परंतु लेखकांना सदस्यत्व घेण्याची आणि परीक्षण स्वतः लिहिण्याची सोय अस्सावी असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा